विवेचन सारांश
अनन्यभक्तीतील भावाचे महत्व
परंपरेनुसार प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने विवेचनाचा शुभारंभ झाला.
जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करण्यात आले.
जगद्गुरू वेदव्यासांना आणि भग्वद्गीतेला वंदन करण्यात आले.
भगवान वेदव्यासांना वंदन करण्यात आले.
राजविद्याराजगुह्ययोग हा ज्ञानेश्वर माऊलींचा अतिशय प्रिय अध्याय आहे. भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचे सार या अध्यायात आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांचा संगम यात झालेला दिसतो. पहिल्याच श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणतात,
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्।।९.१।।
तू माझा परमप्रिय शिष्य असल्याने अतिशय गोपनीय ज्ञान विज्ञानासहीत मी तुला सांगतो आहे. हे प्राप्त केल्याने सर्व अशुभांपासून अर्थात संसारबंधनातून तू मुक्त होशील. यात आपल्याला ज्ञानविज्ञानयोग दिसतो. जरी भगवान अर्जुनाला सांगतात तरी ते ज्ञान आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. या ठिकाणी परमात्म्याचे वर्णन आलेले आहे. भगवान श्रीकृष्ण व्यक्ती नाही तर साक्षात परमात्माच आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे. भगवंतांनी स्वतः या अध्यायात म्हटले आहे -
पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक् साम यजुरेव च।।९.१७।।
या श्लोकात भगवान म्हणतात या जगाला धारण करणारा, कर्मफल देणारा, आई वडील आजोबा मीच आहे. जाणण्याजोगे जे काही आहे ते, तसेच पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे.
पुढे भगवान म्हणतात-
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् l
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम्।।९.१८।।
प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ति-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.
श्रीकृष्ण या घनीभूत अवतारात प्रत्यक्ष परमात्मा अर्जुनाला हे गुह्य ज्ञान देत आहेत हे समजून घ्यावयास हवे. त्वमेव माता च पिता त्वमेव या श्लोकात देखील परमात्माच सर्व रूपात भरून राहिला असल्याचे वर्णन आहे. हे सारे विश्व त्याचे प्रकट रूप आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
त्या परमात्म्याला प्राप्त कसे प्राप्त करायचे याचे अत्यंत गुह्य ज्ञान यानंतर भगवान इथे देणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच श्रोत्यांना अवधान दीजे, लक्षपूर्वक ऐकण्यास सांगतात कारण ते म्हणतात गीता कशी आचरणात आणायची या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. लोक भगवंताची पूजा प्रार्थना करतात पण ही करताना ते स्वर्गसुखाची इच्छा करतात. ते स्वर्गसुख त्यांना मिळते. पण त्यांच्या तपसाधनेचे पुण्य क्षीण झाल्यावर त्यांना क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति - परत पृथ्वीवर जन्माला यावे लागते. अशावेळी भगवंताची प्राप्ती कोणाला होते हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
भगवंतांना अशा भक्तांचा भार वाहतात कारण हे भक्त संपूर्णतया भगवंतांवर अवलंबून असतात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
त्यास जे जे वाटे करावे, ते ते मजसी लागे करावे
जैसे पक्षिणीस लागती यत्न करावे, पिलासाठी
[मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।
जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥]
मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षिण जगते, ॥९-३३९॥
पक्षीण आपल्या पिलांसाठी दाणापाणी पुरवते आणि त्याचे रक्षणही करते. त्याचप्रमाणे जर भक्त भगवंताशी अनन्यभावाने जोडला असेल तर त्याचे रक्षण करणे आणि त्याचे भरण पोषणाची व्यवस्था भगवंत बघतो. पण याचा अर्थ असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असा घ्यायचा नाही. मी भजन पूजन करतो आहे आता मला आणखीन काही करायची गरज नाही, भगवंत बघून घेतील असा विचार करू नये.
एकदा एका गावात भयंकर पुराची आपत्ती आली. लोक पुरापासून रक्षण करू लागले. मात्र एक व्यक्ती स्वतःला पुरापासून वाचवण्यासाठी एका वृक्षावर चढून बसली. पुराचे पाणी वाढत होते. लोकांनी त्या व्यक्तीला खाली उतरण्याविषयी सांगितले. एक काठी त्याच्याकडे फेकली. त्या काठीच्या आधाराने पुढे जाण्याविषयी सांगितले. परंतु तो मनुष्य म्हणाला, माझे भगवंत येतील आणि मला वाचवतील. त्यानंतर एक नाव पाठवली. नावेत बसून पुढे जा म्हंटले पण तो एकच म्हणत होता माझे भगवंत येतील आणि माझे रक्षण करेल. शेवटी हेलिकॉप्टर मधून त्याला वाचवण्यासाठी लोक आले आणि त्याला विनंती केली की तू झुल्याला लटकून वर ये. तरीही तो एकच म्हणत होता भगवंत येतील. शेवटी त्याच्या नाका- तोंडात पाणी जाऊ लागले. तो भगवंताचा धावा करू लागला. भगवंत म्हणाले मी अनेक रूपात तुझ्याकडे आलो पण तू मला ओळखले नाहीस. आता मी काय करू? तसेच आपले आहे भगवंत सर्वत्र आहे. तो विविध रूपात आपल्यासमोर दृगोच्चर होतो त्याला ओळखल्याशिवाय समजल्याशिवाय भजन कीर्तन करणे व्यर्थ आहे. पुढच्या श्लोकात त्याला समजून अनन्य चिंतन कसे करावे हे भगवंतआपल्याला सांगतात.
गुरूवंदना झाली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुस्साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।
जगद्गुरू श्रीकृष्णांना वंदन करण्यात आले.
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने॥
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥
संत ज्ञानेश्वरांना नमन करण्यात आले.
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहम् ।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशं आळन्दिवल्लभम्॥
भारतमातेला वंदन करण्यात आले.
भारतमातेला वंदन करण्यात आले.
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिररत्नाढ्यां वन्दे भारतमातरम् ॥
जगद्गुरू वेदव्यासांना आणि भग्वद्गीतेला वंदन करण्यात आले.
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतं |
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीं ||
भगवान वेदव्यासांना वंदन करण्यात आले.
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः।।
परमपूज्य गोविंददेव गिरिजी महाराजांना प्रणिपात करण्यात आला. त्यानंतर सर्व साधकांना अभिवादन करून गीतेच्या या परमप्रिय आणि महत्त्वपूर्ण अध्यायाच्या उत्तरार्धाला सुरुवात झाली.राजविद्याराजगुह्ययोग हा ज्ञानेश्वर माऊलींचा अतिशय प्रिय अध्याय आहे. भगवद्गीतेच्या सर्व अध्यायांचे सार या अध्यायात आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती या तिघांचा संगम यात झालेला दिसतो. पहिल्याच श्लोकात भगवंत अर्जुनाला म्हणतात,
इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे।
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात्।।९.१।।
तू माझा परमप्रिय शिष्य असल्याने अतिशय गोपनीय ज्ञान विज्ञानासहीत मी तुला सांगतो आहे. हे प्राप्त केल्याने सर्व अशुभांपासून अर्थात संसारबंधनातून तू मुक्त होशील. यात आपल्याला ज्ञानविज्ञानयोग दिसतो. जरी भगवान अर्जुनाला सांगतात तरी ते ज्ञान आपल्यासाठी तितकेच महत्त्वाचे आहे. या ठिकाणी परमात्म्याचे वर्णन आलेले आहे. भगवान श्रीकृष्ण व्यक्ती नाही तर साक्षात परमात्माच आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचे आहे. भगवंतांनी स्वतः या अध्यायात म्हटले आहे -
पिताऽहमस्य जगतो माता धाता पितामहः।
वेद्यं पवित्रमोंकार ऋक् साम यजुरेव च।।९.१७।।
या श्लोकात भगवान म्हणतात या जगाला धारण करणारा, कर्मफल देणारा, आई वडील आजोबा मीच आहे. जाणण्याजोगे जे काही आहे ते, तसेच पवित्र ओंकार, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद ही मीच आहे.
पुढे भगवान म्हणतात-
गतिर्भर्ता प्रभु: साक्षी निवास: शरणं सुहृत् l
प्रभव: प्रलय: स्थानं निधानं बीजमव्ययम्।।९.१८।।
प्राप्त होण्याजोगे परमधाम, भरण-पोषण करणारा, सर्वांचा स्वामी, शुभाशुभ पाहणारा, सर्वांचे निवासस्थान, शरण जाण्याजोगा, प्रत्युपकाराची इच्छा न करता हित करणारा, सर्वांच्या उत्पत्ति-प्रलयाचे कारण, स्थितीला आधार, निधान आणि अविनाशी कारणही मीच आहे.
श्रीकृष्ण या घनीभूत अवतारात प्रत्यक्ष परमात्मा अर्जुनाला हे गुह्य ज्ञान देत आहेत हे समजून घ्यावयास हवे. त्वमेव माता च पिता त्वमेव या श्लोकात देखील परमात्माच सर्व रूपात भरून राहिला असल्याचे वर्णन आहे. हे सारे विश्व त्याचे प्रकट रूप आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे.
त्या परमात्म्याला प्राप्त कसे प्राप्त करायचे याचे अत्यंत गुह्य ज्ञान यानंतर भगवान इथे देणार आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणूनच श्रोत्यांना अवधान दीजे, लक्षपूर्वक ऐकण्यास सांगतात कारण ते म्हणतात गीता कशी आचरणात आणायची या प्रश्नाचे उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळते. लोक भगवंताची पूजा प्रार्थना करतात पण ही करताना ते स्वर्गसुखाची इच्छा करतात. ते स्वर्गसुख त्यांना मिळते. पण त्यांच्या तपसाधनेचे पुण्य क्षीण झाल्यावर त्यांना क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति - परत पृथ्वीवर जन्माला यावे लागते. अशावेळी भगवंताची प्राप्ती कोणाला होते हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
अनन्याश्चिन्तयन्तो मां, ये जनाः पर्युपासते।
तेषां नित्याभियुक्तानां, योगक्षेमं वहाम्यहम्॥९.२२॥

जे अनन्य प्रेमी भक्त मज परमेश्वराला निरंतर चिंतन करीत निष्काम भावनेने भजतात, त्या नित्य माझे चिंतन करणार्या माणसांचा योगक्षेम मी स्वतः त्यांना प्राप्त करून देतो.
अनन्य म्हणजे न अन्य - अर्थात परमेश्वराला सोडून मी अन्य कोणालाही जाणत नाही असा भाव असणे. कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥ किंवा रामात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥ कृष्णाशिवाय किंवा रामाशिवाय माझ्यासाठी अन्य कोणीही परमतत्त्व नाही. अनन्य प्रेमी भक्त अशा अनन्य भावाने भगवंतांची, नित्याभियुक्तानां, निरंतर भक्ती करतात. निरंतर भक्ती कशी करावी हेच तर शिकायचे आहे. अनन्य भक्त भगवंतांशी नित्य अभियुक्त म्हणजे सदैव जोडलेले असतात. भगवंत त्यांचा योगक्षेम चालवतात. योगक्षेमं - योगः अप्राप्तस्य प्रापणं क्षेमः तद्रक्षणं । जे अप्राप्त आहे त्याची प्राप्ती म्हणजे योग आणि जे प्राप्त आहे त्याचे रक्षण म्हणजे क्षेम. भगवंत अनन्य भक्तांचा योग - अर्थात जे प्राप्त नाही ते प्राप्त करून देणे आणि क्षेम जे प्राप्त आहे त्याचे रक्षण करणे हे दोन्हीही करतात.
आयुर्विमा मंडळाचे बोधवाक्य आहे योगक्षेम वहाम्यहम् l तुम्ही आमचा प्रीमियम भरा. आम्ही तुम्हाला जीवनभर पैसे देऊ असे आश्वासन या ठिकाणी आयुर्विमा मंडळ देते. त्याचप्रमाणे जर आपण अनन्य भावाने भगवंताचे निरंतर चिंतन केले तर भगवंत आपल्या योगक्षेमाचे आश्वासन आपल्याला देतात.भगवंतांना अशा भक्तांचा भार वाहतात कारण हे भक्त संपूर्णतया भगवंतांवर अवलंबून असतात.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
त्यास जे जे वाटे करावे, ते ते मजसी लागे करावे
जैसे पक्षिणीस लागती यत्न करावे, पिलासाठी
[मग तींहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें ।
जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥ ३३९ ॥]
मग जे जे म्हणून त्यांस करावयाचे असते ते ते सर्व मलाच करावे लागते. जसे पंख न फुटलेल्या पिलांच्या जीवित्वाने पक्षिण जगते, ॥९-३३९॥
पक्षीण आपल्या पिलांसाठी दाणापाणी पुरवते आणि त्याचे रक्षणही करते. त्याचप्रमाणे जर भक्त भगवंताशी अनन्यभावाने जोडला असेल तर त्याचे रक्षण करणे आणि त्याचे भरण पोषणाची व्यवस्था भगवंत बघतो. पण याचा अर्थ असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असा घ्यायचा नाही. मी भजन पूजन करतो आहे आता मला आणखीन काही करायची गरज नाही, भगवंत बघून घेतील असा विचार करू नये.
एकदा एका गावात भयंकर पुराची आपत्ती आली. लोक पुरापासून रक्षण करू लागले. मात्र एक व्यक्ती स्वतःला पुरापासून वाचवण्यासाठी एका वृक्षावर चढून बसली. पुराचे पाणी वाढत होते. लोकांनी त्या व्यक्तीला खाली उतरण्याविषयी सांगितले. एक काठी त्याच्याकडे फेकली. त्या काठीच्या आधाराने पुढे जाण्याविषयी सांगितले. परंतु तो मनुष्य म्हणाला, माझे भगवंत येतील आणि मला वाचवतील. त्यानंतर एक नाव पाठवली. नावेत बसून पुढे जा म्हंटले पण तो एकच म्हणत होता माझे भगवंत येतील आणि माझे रक्षण करेल. शेवटी हेलिकॉप्टर मधून त्याला वाचवण्यासाठी लोक आले आणि त्याला विनंती केली की तू झुल्याला लटकून वर ये. तरीही तो एकच म्हणत होता भगवंत येतील. शेवटी त्याच्या नाका- तोंडात पाणी जाऊ लागले. तो भगवंताचा धावा करू लागला. भगवंत म्हणाले मी अनेक रूपात तुझ्याकडे आलो पण तू मला ओळखले नाहीस. आता मी काय करू? तसेच आपले आहे भगवंत सर्वत्र आहे. तो विविध रूपात आपल्यासमोर दृगोच्चर होतो त्याला ओळखल्याशिवाय समजल्याशिवाय भजन कीर्तन करणे व्यर्थ आहे. पुढच्या श्लोकात त्याला समजून अनन्य चिंतन कसे करावे हे भगवंतआपल्याला सांगतात.
9.23
येऽप्यन्यदेवता भक्ता, यजन्ते श्रद्धयान्विताः।
तेऽपि मामेव कौन्तेय, यजन्त्यविधिपूर्वकम्।।9.23।।
हे अर्जुना! जे सकाम भक्त श्रद्धेने दुसर्या देवांची पूजा करतात, तेही माझीच पूजा करतात. परंतु त्यांचे ते पूजन अज्ञानपूर्वक असते.
भगवंत सांगतात लोक ज्या रूपात त्यांना भजतात त्या रूपातच ते अडकतात. आपण अनेक देवतांची पूजा करतो. भगवान म्हणतात जे लोक श्रद्धा पूर्वक अनेक देवतांची उपासना करतात, त्यांची अनेक व्रते करतात, ते माझीच उपासना करतात हे समजून घ्यायला हवे. मात्र लोक उपासना करताना ते जाणत नाहीत. लक्ष्मी, सरस्वती, गणेश, सूर्य इत्यादी देवतांची उपासना करताना जाणले पाहिजे की ते परमात्म्याचीच उपासना करत असतात.
पाणी सर्वत्र आहे. ते नळातून येते, नदीत असते समुद्रात असते. झऱ्याच्या रूपाने असते. जरी पाण्याची रूपे अनेक असली तरी त्याचे मूळ स्वरूप H2O हेच आहे. ज्ञानेश्वर महाराज यांचे सुंदर वर्णन करतात.
दहाही इंद्रिये ती जरी एकाच देहाची असती ।
त्यांनी सेविले विषय जाती जरी एकाच ठिकाणी ॥
[कां दहाही इंद्रियें आहाती । इयें जरी एकेचि देहींचीं होती ।
आणि इहीं सेविले विषयो जाती । एकाचि ठायीं ॥ ३४७ ॥]
किंवा दहा इंद्रिये आहेत आणि जरी ती एकाच देहात आहेत आणि त्यांनी भोगलेले विषय एकाच ठिकाणी भोक्त्याला जाऊन पोचतात. ॥९-३४७॥
आपली दहा इंद्रिये एकाच शरीरात राहून काम करत असतात. नाकाने आपण वास घेतो. जिभेने चव घेतो. कानाने ऐकतो, डोळ्यांनी दृश्य बघतो. आपण वेगवेगळ्या क्रिया करत असलो तरी विषय सेवन करणारा 'मी' एकच आहे. त्याचप्रमाणे कोणत्याही देवाची उपासना केली तरी ती उपासना एकाच परमात्म्याची आहे.
हर देश में तू, हर भेष में तू,
तेरे नाम अनेक तू एक ही है,
तेरे नाम अनेक तू एक ही है।
लोक हे जाणत नाहीत. ते अज्ञानाने उपासना करतात. सर्व परमात्म्याचे रूप आहे हे समजून घ्यायला हवे. उत्तम पक्वांनाचे सेवन तोंडानेच करावे लागते. सुगंधाचे ग्रहण कानाने करता येत नाही त्यासाठी नाकाचीच गरज पडते. वेगवेगळ्या साध्यांसाठी वेगवेगळ्या साधनांची गरज असते. बलासाठी सूर्याची किंवा हनुमंतांची उपासना करावी लागते. पण अंतिमतः ती परमात्म्याचीच उपासना असते.

अहं(म्) हि सर्वयज्ञानां(म्), भोक्ता च प्रभुरेव च।
न तु मामभिजानन्ति, तत्त्वेनातश्च्यवन्ति ते।।9.24।।
कारण सर्व यज्ञांचा भोक्ता आणि स्वामीही मीच आहे. पण ते मला तत्त्वतः जाणत नाहीत; म्हणून पुनर्जन्म घेतात.
सर्व यज्ञांचा भोक्ता मी आहे. भोक्ता म्हणजे भोग घेणारा परमात्माच आहे. भगवंत म्हणतात सर्वांचा स्वामी मी एकच आहे. पण त्या परमात्म्याची अनेक रूपे आहेत.
सरकार या शब्दात अनेक खात्यांचा समावेश होतो. ज्या ज्या खात्याशी आपला संबंध असेल, तिथे जाऊन आपण आपले काम करून घेतो. जसे पोलीस खाते, अर्थ खाते, शिक्षण खाते, आरोग्य खाते, दळणवळण खाते इत्यादी. त्याचप्रमाणे सर्वांचा स्वामी परमात्माच आहे. साक्षात परमात्मा श्रीकृष्णाच्या रुपात अवतार घेऊन अर्जुनाला निमित्त करुन आपल्याला उपदेश देतो आहे. या श्लोकात अहं याचा अर्थ पक्का अहं आहे. देहबुद्धीने जेव्हा मी करतो असे म्हंटले जाते तेव्हा तो कच्चा अहं होय. इथे भगवंत जेव्हा अहं हि सर्वयज्ञानां म्हणतात तेव्हा तो पक्का, सच्चा अहं आहे. न तु मामभिजानन्ति - प्रत्यक्ष अर्जुनालाही वाटते की कृष्ण माझा सखा, मित्र, भाऊ आहे. पण तो हे जाणत नाही की साक्षात परमात्माच माझ्याशी बोलत आहे. अर्जुनाला हळूहळू भगवंतांच्या रूपाची प्रचिती येऊ लागते. तो पुढे म्हणतो न हि ते भगवन् व्यक्तीं विदुर्देवा न दानवाः - आपले रूप देव आणि दानव देखील जाणत नाहीत. तो भगवंतांना पुढे त्यांच्या विभूती सांगण्याची विनंती करतो, त्यांच्या विश्वरूपदर्शनाची इच्छा करतो. हे आपण पुढे दहाव्या आणि अकराव्या अध्यायात पाहणार आहोत.
आपण भगवंतानेच दिलेल्या गोष्टी भगवंताला अर्पण करत असतो. पण तत्वतः - म्हणजे परमात्म्याला त्याच्या भावाने आपण जाणत नाही. त्याचेच त्याला अर्पण केले जाते हे जाणणे आवश्यक आहे.

यान्ति देवव्रता देवान्, पितॄन्यान्ति पितृव्रताः।
भूतानि यान्ति भूतेज्या, यान्ति मद्याजिनोऽपि माम्।।9.25।।
देवांची पूजा करणारे देवांना मिळतात. पितरांची पूजा करणारे पितरांना जाऊन मिळतात. भूतांची पूजा करणारे भूतांना प्राप्त होतात आणि माझी पूजा करणारे भक्त मला येऊन मिळतात. त्यामुळे माझ्या भक्तांना पुनर्जन्म नाही.
जे लोक देवाची पूजा करतात ते स्वर्गलोकापर्यंत पोहोचतात. काही लोक पंचमहाभूतांची पूजा करतात, ते तेथवर पोहोचतात. काही लोक भूत प्रेतांची पूजा करतात. असे ज्याची याचना करतात त्या त्या ठिकाणाला ते पोहोचतात. माझ्यासाठी यज्ञ करणारे, माझी पूजा करणारे भक्त मलाच प्राप्त होतात.
भगवान मला धनसंपत्ती मिळो, मला सुख मिळो अशी इच्छा करणारे भगवंताकडून ते प्राप्त करून घेतात. जे लक्ष्य मनात धरू त्या लक्ष्याप्रत आपण पोहोचतो. आपण आपले लक्ष्य जाणत नाही ही आपली समस्या आहे. वेदात सांगितल्याप्रमाणे सुखप्राप्तीसाठी कर्म करण्यात गैर काही नाही. पण आपले लक्ष्य भगवंताला प्राप्त करणे हे असले पाहिजे. त्यासाठी भक्ताने काय करावे हे समजून घेऊन त्या प्रकारे भक्ताने वागावे असे भगवंत येथे सांगतात. भगवंताला फक्त भावाचीच अपेक्षा असते.

पत्रं(म्) पुष्पं(म्) फलं(न्) तोयं(य्ँ), यो मे भक्त्या प्रयच्छति।
तदहं(म्) भक्त्युपहृतम्, अश्नामि प्रयतात्मनः॥9.26॥
जो कोणी भक्त मला प्रेमाने पान, फूल, फळ, पाणी इत्यादी अर्पण करतो, त्या शुद्ध बुद्धीच्या निष्काम प्रेमी भक्ताने अर्पण केलेले ते पान, फूल इत्यादी मी सगुण रूपाने प्रकट होऊन मोठ्या प्रीतीने खातो.
भक्त मला पत्र, पुष्प, फळ अर्पण करतात. फुले मिळाली नाही तर फळे अर्पण करतात. फळे मिळाली नाहीत तर पत्र अर्पण करतात. काहीच नसले तर जल अर्पण केले जाते. तुम्ही काय अर्पण करता याच्याशी भगवंताला काहीही महत्त्व नसते. अर्पण करण्यामागचा भाव भगवंत बघत असतो. भक्तीपूर्वक जे अर्पण केले जाते, ते भगवंत ग्रहण करतो.
संत तुकडोजी महाराजांचे एक प्रसिद्ध भजन आहे.
मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशा न भेटायचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रं ll
ते म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही, देव भेटण्यासाठी मनात भावाची अत्यंत आवश्यकता आहे.
पण आज आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपल्याला भगवंतासाठी काढायला वेळ नाही. घरातील देवघरात पाउल ठेवायला आपल्याकडे वेळ नाही. भगवंत हे जाणतात. ते म्हणतात हरकत नाही, चिंता करू नका. तुमच्याकडे वेळ नाही ना तरीही तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी आणखीन काही अर्पण करू शकता. काय अर्पण करू शकता ते पुढे सांगतात.

देव अशान, भेटायचा नाही हो।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ॥धृ o ॥
मातीचा देव, त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चाँदीचा देव, त्याल चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव ।
देव बाजारचा... ....॥१॥
देवाच देवत्व नाही दगडातं ।
देवाच देवत्व नाही लाकडातं ।
सोन्या चांदीत नाही देवाची मात
देव बाजारचा.........॥२॥
भाव तिथ देव ही संताची वाणी
आचारा वाचून पाहिला कोणी?
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी ।
देव बाजारचा... ......॥३॥
देवाच देवत्व आहे ठायी - ठायी ।
मी-तू गेल्याविण अनुभव नाही।
तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा..........॥४॥
मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव
देव अशा न भेटायचा नाही रं
देव बाजारचा भाजीपाला नाही रं ll
ते म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही, देव भेटण्यासाठी मनात भावाची अत्यंत आवश्यकता आहे.
पण आज आपण एवढे व्यस्त झालो आहोत की आपल्याला भगवंतासाठी काढायला वेळ नाही. घरातील देवघरात पाउल ठेवायला आपल्याकडे वेळ नाही. भगवंत हे जाणतात. ते म्हणतात हरकत नाही, चिंता करू नका. तुमच्याकडे वेळ नाही ना तरीही तुम्ही माझ्या प्राप्तीसाठी आणखीन काही अर्पण करू शकता. काय अर्पण करू शकता ते पुढे सांगतात.
यत्करोषि यदश्नासि, यज्जुहोषि ददासि यत्।
यत्तपस्यसि कौन्तेय, तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।
हे अर्जुना! तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान करतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर.
भगवान म्हणतात तू जे कर्म करशील ते मला अर्पण कर. तू काही खाशील ते मलाच अर्पण कर.
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे
सहज हवन होते नाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्णब्रह्म
उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म ll
भोजनाच्या वेळी समर्थ रामदासांचा हा श्लोक म्हटला जातो. जेवताना आपण तोंडात जो घास घेतो तो भगवंताचे नाम घेऊन खाल्ल्यास तो एक प्रकारचा यज्ञ होऊन जातो. कोणत्याही गोष्टीचे दान देताना, भगवंता तुझेच तुला दान देतो आहे असा भाव मनात असायला हवा. जय जगदीश हरे या सुप्रसिद्ध भजनात म्हटले आहे तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा । दान देताना, कोणतेही कर्म करताना हे भगवंतांचे आहे त्यांना देतो आहे, त्यांच्यासाठी करतो आहे हा भाव असायला हवा.
संत तुकाराम म्हणतात -
आपुलिया बळे नाही मी बोलत । सखा कृपावंत वाचा त्याची ॥१॥
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । शिकविता धनी वेगळाची ॥२॥
मी माझ्या बळाने बोलत नाही, भगवंत त्याच्या कृपेने माझ्याकडून करून घेतो. साळुंकी मंजुळ बोलते पण तिचा बोलविता धनी निराळाच, तो परमात्माच, असतो. अशाप्रकारे आपण कर्तुत्व आणि भोक्तृत्व भगवंताला अर्पण करावे.
संत कबीर म्हणतात -
जो कुछ किया सो तुम किया मै कुछ किया नाही ।
कहो कुछ मैं किया तो तुमही हो मुझ माही ।।
मी काही करू शकत नाही, माझ्या स्थूल शरीरात काहीही करण्याचे सामर्थ्य नाही. जे काही मी करतो ते तूच माझ्याकडून करून घेतोस.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
जे जे काही व्यापार करिसी, जे जे भोग भोगसी ।
अथवा जे यज्ञ करिसी नानाविध मजसाठी ।।
ज्या इतर सर्व क्रिया सहजपणे घडतील ।
परी त्या भक्तीने कराव्या माझ्यासाठी ।।
मी जो काही व्यापार करेन, जे भोग भोगेन, जे काम करेन ते भगवंताचे आहे अशा भावाने जेव्हा कुठलेही कार्य होते तेव्हा त्यात दोष राहत नाही आणि ते शुद्ध होऊन जाते.
परी सर्वथा आपल्या जीवी केल्याची स्मृतीही नसावी |
ऐसी धुवोनि कर्म द्यावी माझ्या हाती ।।
मी केले याचे स्मरण देखील नसावे. अशा भावाने ती कर्म धुवून अर्थात अहंकाराचा त्याग करून अर्पण करावी असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात.
असे केल्याने काय घडेल? भगवंतासाठी काम करणे म्हणजे कर्मयोग. तो समजून करणे म्हणजे ज्ञानयोग कारण तशी बुद्धी भगवंत आपल्याला देतो आणि अशा भावाने काम करणे म्हणजे भक्तियोग. या तिघांचा संगम यामध्ये होतो.
आद्य शंकराचार्य म्हणतात -
आत्मा त्वं गिरिजा मति: सहचरा: प्राणाः शरीरं गृहं
पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थिति: ।
संचारः पदयोः प्रदक्षिण विधिः स्तोत्राणि सर्वा गिरा
यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनाम ।
हे शंकरा आत्मा हेच तुमचे रूप आहे. बुद्धी पार्वती देवी आहे. पंचप्राण व इंद्रिये तुमचे सहचर आहेत. देह हे तुमचे राहण्याचे स्थान आहे. अनेक प्रकारचे विषय सेवन करण्यासाठी मी जी आरास केलेली आहे ती पूजा आहे. माझी निद्रा हीच समाधी अवस्था आहे. माझ्या पायांनी इकडे तिकडे जो संचार करतो, हीच प्रदक्षिणा असून मी जे बोलतो ती तुमचीच स्तोत्रे आहेत. हे शंभू मी जे काही करतो ती तुमचीच आराधना आहे. असा भाव मनात असल्यास आपली वाणी व कार्य शुद्ध होईल. गीता आचरणात आणण्याचा हा सोपा मार्ग आहे. परमपूज्य स्वामीजी म्हणतात असा भाव मनात आणल्यास आपल्या जीवनात अमूलाग्र बदल होईल. गीताभ्यास केल्यानंतर आपण श्रीकृष्णार्पणमस्तु असे म्हणतो त्यामुळे कर्मबंधनातून मुक्त होतो.

शुभाशुभफलैरेवं(म्), मोक्ष्यसे कर्मबन्धनैः।
सन्न्यासयोगयुक्तात्मा, विमुक्तो मामुपैष्यसि।।9.28।।
अशा रीतीने ज्यामधे सर्व कर्मे मला भगवंताला अर्पण होतात, अशा संन्यासयोगाने युक्त चित्त असलेला तू शुभाशुभफलरूप कर्मबंधनातून मुक्त होशील आणि मला येऊन मिळशील.
अशाप्रकारे कार्य केल्यास कर्माचा त्याग आणि कर्तुत्वाचा त्याग केल्यास संन्यासयोग होतो. त्यागाने आपण आपोआप भगवंताशी जोडले जातो. भगवंताच्या अशा प्रकारे केलेल्या चिंतनाने आपले चित्त त्याच्या ठायी युक्त होते. कार्य आपण केले या भावातून मुक्त झाल्याने त्याचे शुभाशुभ जे फल असते त्यापासून आपण मुक्त होऊन जातो. ते आता माझे नाही तुझे आहे असे मानल्यास चिंतेतून मुक्त होऊन तू मलाच प्राप्त होशील असे भगवंत म्हणतात.
समोऽहं(म्) सर्वभूतेषु, न मे द्वेष्योऽस्ति न प्रियः।
ये भजन्ति तु मां(म्) भक्त्या, मयि ते तेषु चाप्यहम्।।29।।
मी सर्व प्राणिमात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय. परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात, ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो.
भगवान म्हणतात सर्व भूतमात्रात मी समभावाने राहतो. मला कुणाचा द्वेष नाही आणि माझे कोणी प्रिय नाही. मात्र कोणी माझा द्वेष करू शकतो. कोणी माझी भक्ती करून माझ्यावर प्रेम करू शकतो. काही लोक माझे भजन चिंतन करतात त्यांच्या हृदयात मी राहतो. भक्तांच्या हृदयात भक्त भगवंत राहतात आणि भगवंत आपल्या भक्तांना त्याच्या हृदयात ठेवतो. थंडीच्या दिवसात आपण शेकोटी पेटवतो. तिच्याजवळ बसल्यास आपल्याला उष्णता मिळते पण तिच्यापासून दूर असल्यास उष्णता न मिळाल्याने थंडीपासून रक्षण होत नाही. तसेच भगवंताच्या निकट असतो त्यालाच भगवंत जवळ करतात. आपल्या घरी अपरिचित माणूस आल्यास आपण त्याला व्हरांड्यातच बसवतो. पण ओळखीचा माणूस आपल्या दिवाणखान्यापासून स्वयंपाकघरापर्यंत येऊ शकतो. त्याचप्रमाणे भगवंताचे चिंतन मनन करणारी व्यक्ती भगवंता जवळ त्याच्या हृदयात स्थित होऊ शकते.
अपि चेत्सुदुराचारो, भजते मामनन्यभाक्।
साधुरेव स मन्तव्यः(स्), सम्यग्व्यवसितो हि सः।।9.30।।
जर एखादा अत्यंत दुर्वर्तनीसुद्धा अनन्यभावाने माझा भक्त होऊन मला भजेल, तर तो सज्जनच समजावा. कारण तो यथार्थ निश्चयी असतो. अर्थात त्याने ईश्वरभजनासारखे दुसरे काहीही नाही, असा पूर्ण निश्चय केलेला असतो.
एखादी व्यक्ती अत्यंत दुराचारी असूनही जर अनन्य भावाने माझे भजन करत असेल, माझी भक्ती मनापासून करत असेल तर त्याला साधू किंवा सज्जनच मानावे, असे भगवंत सांगतात . त्याचा निश्चय पक्का असेल आणि त्याला पश्चाताप झाला असेल तसेच तो माझे कार्य करत असेल तर त्याला धर्मात्मा म्हणावे. अशा व्यक्तीच्या पश्चात्तापाला ज्ञानेश्वर महाराज अनुतापतीर्थ असे म्हणतात.
वो आधी जरी दुराचारी तरी सर्वोत्तमची हो अवधारी ।
जैसा बुडाला महापुरी न मरता निघावा ।।
जर कोणी महापुरात बुडणारा किनाऱ्यावर आला तर तो वाचला असेच आपण म्हणतो. तसेच ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जरी कोणी कितीही दुराचारी असेल पण तो जर भगवंतांच्या किनाऱ्याला लागला तर तो वाचला, तो साधूच म्हणावा. पापाच्या नदीत बुडणाऱ्याला संतांची सांगत लाभली तर तो साधूच होतो. अशी व्यक्ती साधू होऊन जाते. ज्याप्रमाणे परिसाचा स्पर्श लोहाला झाल्यास त्याचे सोने बनते त्याप्रमाणे अशी व्यक्ती सज्जन बनते.
दुष्कृती जरी जाहला, तो अनुतापतीर्थी नाहला ।
मज आत होऊन आला, सर्वभावे ।।
भावासहित जर तो माझ्याप्रती आला तर तो माझाच होऊन जातो असे भगवंत सांगतात.
यासाठी किती वेळ लागतो हे भगवान आपल्याला पुढच्या श्लोकात सांगतात.

क्षिप्रं(म्) भवति धर्मात्मा, शश्वच्छान्तिं(न्) निगच्छति।
कौन्तेय प्रतिजानीहि, न मे भक्तः(फ्) प्रणश्यति।।9.31।।
तो तत्काळ धर्मात्मा होतो आणि नेहमी टिकणाऱ्या परम शांतीला प्राप्त होतो. हे अर्जुना! तू हे पक्के सत्य लक्षात ठेव की माझा भक्त नाश पावत नाही.
अशी व्यक्ती तात्काळ धर्मात्मा होते. ज्याप्रमाणे आपण एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि आपला नंबर येण्याची वाट बघतो. तेवढ्यात एखादी अपघाताची केस आल्यास डॉक्टर आधीचे नंबर सोडून त्या पेशंटला तपासायला घेतात त्याचप्रमाणे अशा पश्चात्ताप झालेल्याला, माझे चिंतन करणाऱ्या भक्ताला मी परमशांतीला प्रदान करतो. असा माझा भक्त कधीच नाश पावत नाही. भगवान त्याचा लगेच स्वीकार करतात. ज्ञानमार्गाने भगवंतांची प्राप्ती कठीण असते. सहाव्या अध्यायात भगवंत म्हणतात अनेकजन्मसंसिद्धस्ततो याति परां गतिम् - अनेक जन्मांच्या सिद्धी नंतर अशा योगीला भगवंतांची प्राप्ती होते. सातव्या अध्यायात सांगितले आहे - बहूनां जन्मनामन्ते ज्ञानवान्मां प्रपद्यते। पुष्कळ जन्मांच्या साधनेनंतर ज्ञानी भगवंतांना प्राप्त करतो. परंतु जो अनुतापतीर्थात नाहलेला दुराचारी असतो, तो जेव्हा अनन्य भावाने भगवंतांना शरण येतो; त्याचा भगवंत तात्काळ स्वीकार करतात.
मां(म्) हि पार्थ व्यपाश्रित्य, येऽपि स्युः(फ्) पापयोनयः।
स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रा:(स्), तेऽपि यान्ति परां(ङ्) गतिम्।।9.32।।
हे अर्जुना! स्त्रिया, वैश्य, शूद्र तसेच पापयोनी अर्थात चाण्डालादी कोणीही असो, तेसुद्धा मला शरण आले असता परम गतीलाच प्राप्त होतात.
जी व्यक्ती मला शरण येते, ती परमगतीला प्राप्त होते. अशावेळी स्त्री, वैश्य, शूद्र किंवा कोणीही असो; भगवंत म्हणतात ती व्यक्ती कोणत्याही जातीची किंवा लिंगाची असली, त्याने पापयोनीत जन्म घेतला असेल, तरीही तो परमगतीलाच प्राप्त होतो. इथे स्त्री, शूद्र असा उल्लेख का केला असा काहींचा आक्षेप असतो. तर ही केवळ उदाहरणे आहेत. स्त्रिया अतिशय भावनाप्रधान असतात. वैश्य अर्थार्जन करण्यात मग्न असतात आणि शूद्र लोक आपल्या कामात व्यग्र असतात. तरीही कोणीही जर मला शरण आले, तर ते परमगतीला प्राप्त होतात.
किं(म्) पुनर्ब्राह्मणाः(फ्) पुण्या, भक्ता राजर्षयस्तथा।
अनित्यमसुखं(म्) लोकम्, इमं(म्) प्राप्य भजस्व माम्।।9.33।।
मग पुण्यशील ब्राह्मण तसेच राजर्षी भक्तलोक मला शरण येऊन परम गतीला प्राप्त होतात, हे काय सांगावयास पाहिजे? म्हणून तू सुखरहित व नाशवंत या मनुष्यशरीराला प्राप्त होऊन नेहमी माझेच भजन कर.
पुण्यवान ब्राह्मण, राजर्षी आणि भक्त मला शरण आल्यास ते परम गतीला प्राप्त होतात. संसार अनित्य आहे. मिळालेले सुख हे खरे नसते. म्हणूनच खोट्या सुखाला सोडून तू माझे भजन कर. एखादा गरीब मनुष्य पैसा नाही म्हणून दुःखी होतो. पैसे असलेला धनवान शांती नाही म्हणून दुःखी होतो. हे सर्व अनित्य आहे. या बेगडी सुखातून मुक्त होऊन तू माझे भजन कर असे भगवंत म्हणतात.
एक मनुष्य म्हणाला - When I had no money, I was miserably sorry. Now I have much, I am comfortably sorry.
माझ्याकडे काहीच नव्हते तेव्हा मी दुःखात होतो. आता माझ्याकडे पुष्कळ काही आहे तरीही मी दुःखीच आहे. सुखाच्या विरुद्ध दुःख शब्द आहे. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. भगवंतांच्या भजनात आनंद आहे.

मन्मना भव मद्भक्तो, मद्याजी मां(न्) नमस्कुरु।
मामेवैष्यसि युक्त्वैवम्, आत्मानं(म्) मत्परायणः।।9.34।।
माझ्यात मन ठेव. माझा भक्त हो. माझी पूजा कर. मला नमस्कार कर. अशारीतीने आत्म्याला माझ्याशी जोडून मत्परायण होऊन तू मलाच प्राप्त होशील.
हे अर्जुन तू मनाने माझी भक्ती कर. मनात संकल्प, विकल्प उठतात. मनात भगवंतांचा संकल्प करा. भगवंतांवर प्रेम करा. माझ्यासाठी कार्य करणारे बना. भोजनाला बसल्यावर आपण भगवंतासाठी जेवतो हा भाव मनात असावा. मुखी घास घेता करावा हा विचार, कशासाठी हे अन्न मी करितो सेवन - हे अन्न मी भगवंतांसाठी ग्रहण करतो आहे हा विचार असावा. भगवान म्हणतात माझ्या शरणात या माझ्यासाठी कार्य करा. असे केल्याने तुम्ही मलाच प्राप्त करू शकता.
कर प्रणाम तेरे चरणो मे
लगता हू अब तेरे काज
पालन करने को आज्ञा तव
मैं नियुक्त होता हू आज l
अंतर मे स्थिर रहकर मेरी
बागडोर पकडे रहना
निपट निरंकुश चंचल मन को
सावधान करते रहना ll
असे केल्याने मनुष्य चिंतामुक्त होऊन त्याला शाश्वत शांती मिळते. मात्र यासाठी साधना करण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही काम करताना हे भगवंताचे काम आहे असा भाव मनात आणून ते करायला हवे.
अशाप्रकारे हा आचरणात आणण्याचा अध्याय आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असा अध्याय असल्याने त्यानुसार वागण्याचा आपण प्रयत्न करूया. आजचे विवेचन भगवंतांच्या चरणी अर्पण करून अध्यायाची सांगता करूया.
गायत्री देवी -
अविधीपूर्वक या शब्दाचा अर्थ विस्ताराने सांगा.
उत्तर- शास्त्राने सांगितलेले याला विधिपूर्वक असे म्हणतात. जो हे जाणत नाही आणि अज्ञानाने कर्म करतो त्याला अविधीपूर्वक असे म्हणतात. कोणतेही काम करताना आपण ते समजून करायला हवे.
अत्यंत दुराचारी व्यक्ती दिवसभर वाईट काम करते आणि रात्री ध्यानधारणा करून भगवंताची होते हे चुकीचे नाही का?
उत्तर- या श्लोकाचा अर्थ वेगळा आहे. दुराचारी व्यक्ती पश्चात्ताप झाल्याने चांगल्या मार्गाला लागली आहे. ती मला शरण येऊन माझेच काम आणि माझी अनन्य भक्ती करत असल्याने सदाचारी होते आणि मला प्राप्त होते असे भगवान म्हणतात.
सुमित्रा दीदी -
आपण चांगले काम केल्यास त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळेल का?
उत्तर- या प्रश्नाचे उत्तर देताना महत्त्वाचा भाग हा आहे की आपण भगवंतासाठीच कार्य करणे हे गरजेचे आहे. मी भगवंताचे काम करतो हे समजून जर काम केले तर त्याचे निश्चित चांगले फळ मिळते. मी घर स्वच्छ करतो आहे, हे भगवंताचे घर असल्याने ते साफ ठेवले माझे कर्तव्य आहे, या भावनेने जर आपण काम केले तर ते योग्य होते.
जयंत भैय्या -
कोणतीही गोष्ट भगवंताला अर्पण करा असे तुम्ही म्हणता पण भगवंतांनीच दिलेले त्याला अर्पण करायचे यात तो आणि मी वेगळे नाहीच. मग कसे अर्पण करावे.
उत्तर- तो आणि मी एकच आहे ही अत्युच्च अवस्था आहे. अद्वैत अवस्थेचे हे लक्षण आहे. असे क्वचितच असते.
संतोष भैय्या -
मनाला भगवंताशी जोडावे असे तुम्ही सांगितले. पण मन हे सर्वत्र आहे. ते फिरत असते. मन निर्जीव आहे ते सजीवाशी कसे जोडावे?
उत्तर - मनाचे कार्य भावनेशी संबंधित आहे. बुद्धी त्याचे विश्लेषण करत असते. एखाद्या गोष्टीत मन लावून काम करणे याचा अर्थ त्यात भाव ओतून, भावनेला जागृत करून काम करणे असा आहे.
प्रश्नोत्तरानंतर हनुमान चालीसा होऊन या सत्राची सांगता झाली.

प्रश्नोत्तरे :-

।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।