विवेचन सारांश
अर्पणबुद्धीने कर्मपुष्प भगवंताला वाहावे
परंपरेप्रमाणे प्रार्थना आणि दीपप्रज्वलन झाले.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम्।
पूर्णब्रह्मपरानन्दमीशमाळन्दिवल्लभम्॥
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥
नमोऽस्तु ते व्यास विशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र।
येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्ज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः॥
परमपूज्य सद्गुरु श्री गोविंद देव गिरिजींना, सरस्वती देवीला, महर्षी वेदव्यासांना, ज्ञानेश्वर माऊलींना, भारतवर्षाला, आणि श्रीमद्भवद्गीतेला वंदन करून गीताप्रेमींचे हृदयापासून अभिवादन करून आजच्या विवेचनाची सुरुवात झाली.
अठरावा अध्याय हा भगवद्गीतेचा कलशोध्याय आहे. पंधराव्या अध्यायापर्यंत गीतेचे सर्व ज्ञान भगवंतांनी अर्जुनाला विशद करुन सांगितले होते. पुढे सोळाव्या अध्यायात दैवी आणि आसुरी संपदेचे वर्णन आणि सतराव्या अध्यायात निरनिराळ्या श्रद्धांचे विवेचन भगवंतांनी केले. यानंतर भगवंत बोलायचे थांबले, ते शांत झाले. भगवंतांना पुन्हा बोलते करण्यासाठी काही प्रश्न विचारणे आवश्यक होते. मग अर्जुन त्यांना म्हणाला -
संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम्।
त्यागस्य च हृषीकेश पृथक्केशिनिषूदन॥
संन्यास आणि त्याग यात भावाचा काय फरक असतो असे त्याने विचारले. याच्या उत्तरादाखल भगवंतांनी आत्तापर्यंत कथन केलेला सर्व उपदेश संक्षेपाने पुन्हा सांगितला.
भगवंतांनी पुन्हा एकदा कर्मयोगाचे महत्त्व सांगितले.

यतः प्रवृत्तिर्भूतानां, येन सर्वमिदं ततम्।
स्वकर्मणा तमभ्यर्च्य, सिद्धिं विन्दति मानवः॥१८.४६॥

ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परम सिद्धी मिळवितो. जेथून सर्व विश्व उत्पन झाले त्या परमात्म्याचे पूजन करायचे असेल तर सर्व कर्मे करुन त्या कर्मांची कर्मपुष्पे भगवंतांना अर्पण करावीत असे त्यांनी सांगितले.
पुढे त्यांनी संन्यासाचे पुन्हा एकदा संक्षेपाने वर्णन करताना नैष्कर्म्यसिद्धी कशी प्राप्त होते ते कथन केले.

असक्तबुद्धिः सर्वत्र, जितात्मा विगतस्पृहः।
नैष्कर्म्यसिद्धिं परमां, सन्न्यासेनाधिगच्छति॥१८.४९॥

सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निःस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्ययोगाने त्या श्रेष्ठ 'नैष्कर्म्यसिद्धीला' प्राप्त होतो.
परमात्मा काहीही न करता देखील सर्व काही करतो, तद्वत सर्व कर्मे आत्मतत्त्वाद्वारे होत आहेत हे जो मनुष्य जाणतो त्याला नैष्कर्म्यसिद्धी प्राप्त होते.

पुढे ज्ञानप्राप्तीसाठी आवश्यक शुद्ध बुध्दी, सात्त्विक धृती, इंद्रिय आणि मनाचा संयम असे गुण प्राप्त करणारा योगी कसा असतो हे भगवंतांनी सांगितले. -
बुद्ध्या विशुद्धया युक्तो, धृत्यात्मानं नियम्य च।
शब्दादीन्विषयांस्त्यक्त्वा, रागद्वेषौ व्युदस्य च॥१८.५१॥
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहम्।
विमुच्य निर्ममः शान्तो ब्रह्मभूयाय कल्पते॥१८.५३॥

अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रहवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा; ममतारहित व शांतीयुक्त असा पुरुष सच्चिदानंदघन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो.
परब्रह्माची प्राप्ती झाल्यावर पुढे काय होते हे भगवंत आता सांगत आहेत.

18.54
ब्रह्मभूतः(फ्) प्रसन्नात्मा, न शोचति न काङ्क्षति।
समः(स्) सर्वेषु भूतेषु, मद्भक्तिं(म्) लभते पराम्॥18.54॥
मग तो सच्चिदानन्दघन ब्रह्मांत तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो.
ब्रह्म हा शब्द संस्कृत ब्र धातूपासून तयार झाला आहे. ब्र म्हणजे विशाल किंवा विराट. ब्रह्मभूत त्याच्याशी एकरूप होणे. परब्रह्माशी एकरूपता साधणे हा योग आहे. भगवद्गीता हे योगशास्त्र आहे. असे म्हटले आहे -
एकरूपता परमात्म्याशी, साधावी हो या उद्देशी,
मुनिजन अवघे ध्यान लावती, मांडून पद्मासन,
करा हो नियमित योगासन.

ऋषी, मुनि परमात्म्याशी तादात्म्य साधण्यासाठी ज्या प्रकारे पद्मासनात ध्यान लावत, त्याच प्रकारे सामान्य मनुष्याने देखील परमात्म्याशी एकरूप होण्यासाठी नियमित योगासने करायला हवीत असे परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज सांगतात. कर्मयोग आणि योगासनांचा अभ्यास करायला हवा.
नियमित योगासनांच्या अभ्यासाने स्थूल देहावर नियंत्रण मिळवता येते. त्यानंतर प्राणायामाने मन आणि इंद्रिये वश करता येतात. प्रत्याहाराद्वारे इंद्रिये पूर्ण नियंत्रणात येतात. पुढे ध्यान, धारणा, समाधी या मार्गाने परब्रह्माशी एकरूपता साधण्यासाठी योगी सिद्ध होतो.
भगवद्गीतेच्या आरंभी अर्जुन विषण्ण होता. गीतेच्या आचरणाने ब्रह्मभूत होणारा योगी प्रसन्न होतो. जे आपल्या हातातून जाते, जे आपण गमावतो त्याचा शोक करतो. भविष्याच्या चिंतेत, अपेक्षेत आपण गुंततो. पण ज्याला काही गमवायचे नसते, मिळवायचे शिल्लक नसते तो प्रसन्न राहतो. अशा योग्याचा आप पर भाव नष्ट होतो. ज्या बुध्दीच्या योगाने भेद दिसतात ती राजस, तामस बुद्धी असते. ज्या बुद्धीमुळे भेद नष्ट होतात ती सात्त्विक बुद्धी होय. ज्या योग्याची बुद्धी अशी सात्त्विक असते त्याला सर्वत्र एकत्व, समत्व दिसते. त्याचे सर्व भूतांप्रती वर्तन समान नसले तरी त्याला सर्व भूतमात्रांमध्ये एकाच परमात्म्याचे दर्शन होत असते.
मद्भक्तिं लभते पराम् सर्व भूतांच्या ठायी समभाव ठेवणाऱ्या योग्याला परमभक्ती प्राप्त होते असे भगवंत सांगतात. उपासना आणि भक्ती यामध्ये फरक आहे. परमभक्ती प्राप्त होईपर्यंत जी साधना करावी लागते ती म्हणजे उपासना होय. वेदांमध्ये कर्मकांड, उपासनापद्धती सांगितल्या आहेत. भक्ती कशी करावी हे सांगितलेले नाही. उपासनेची अंतिम स्थिती म्हणजे परमभक्ती प्राप्त होणे.
मेघातून बरसणाऱ्या पर्जन्याला पृथ्वीवरच बरसावे लागते असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ब्रह्मभूत योग्याला त्याचप्रमाणे परमभक्ती प्राप्त होते.

कृष्णात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥
रामात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥
शिवात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥
रामात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥
शिवात्परं किमपि तत्त्वमहं न जाने॥
कृष्णाच्या, रामाच्या, शिवाच्या परे अन्य तत्त्व मी जाणत नाही असा भाव या परमभक्तीत होऊन जातो.
भक्त्या मामभिजानाति, यावान्यश्चास्मि तत्त्वतः।
ततो मां (न्) तत्त्वतो ज्ञात्वा, विशते तदनन्तरम्॥18.55॥
त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला 'मी जो आणि जसा आहे', अगदी बरोबर तसाच तत्त्वत: जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्त्वत: जाणून त्याचवेळी माझ्यात प्रविष्ट होतो.
भगवंत म्हणतात, “परा भक्तीने काय मिळते तर योगी परा भक्तीने भगवंताला परिपूर्ण रुपाने जाणतो”. अभिजानाति - अंतर्बाह्य जाणणे. आपल्या प्रिय व्यक्तीविषयी, I know him IN and OUT असे म्हंटले जाते. हे तसेच आहे. ज्याच्यावर आत्यंतिक प्रेम असते त्यालाच अंतर्बाह्य जाणता येते. ज्याला भगवंतांची परमभक्ती प्राप्त होते तोच भगवंतांना परिपूर्ण रुपाने जाणतो. ज्ञानातून भक्ती का भक्तीतून ज्ञान असा एक गमतीदार प्रश्न आहे.
कर्मयोगाचे आचरण करताना कर्माने चित्त शुद्ध होते. चित्तशुद्धीतून ज्ञान होते. ज्ञान होऊ लागल्यावर प्रेम उत्पन्न होऊ लागते. जसे प्रेम वाढते तसे कर्मयोगाची तीव्रता वाढते. अधिक कर्मयोगातून अधिकाधिक चित्तशुद्धी होते. यातून अधिक ज्ञान, अधिक प्रेम आणि अखेर या प्रेमाचे भक्तीत रुपांतर होते. हे सर्व हातात हात घालून घडते. योगी भगवंताला तत्त्वतः जाणू लागतो. बालकाचे बालकत्व, मातेचे मातृत्व तसेच भगवंतांना तत्त्वतः जाणणे म्हणजे त्यांना त्यांच्या भावासह जाणणे होय.
योगी जेव्हा भगवंतांना तत्त्वतः जाणतो तेव्हा तो परब्रह्मात प्रवेश करतो. तो ब्रह्मरूप होऊन जातो.

सर्वकर्माण्यपि सदा, कुर्वाणो मद् व्यपाश्रयः।
मत्प्रसादादवाप्नोति, शाश्वतं (म्) पदमव्ययम्॥18.56॥
माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेने सनातन अविनाशी परम पदाला प्राप्त होतो.
तुकाराम महाराजांनी म्हटले आहे - तुका म्हणे आता । उरलो उपकारापुरता ॥ ब्रह्मभूत झालेल्या योग्यासाठी करण्यायोग्य कोणतेही कार्य उरत नाही तरी तो त्याची कर्तव्य करत राहतो. भगवंतांच्या चिंतनात, तोच कर्ता, करविता आहे हे जाणून तो कर्म करतो.
आमी यंत्र तुमी यंत्री असे ठाकूर रामकृष्ण परमहंस म्हणत असत. ते स्वतःला कालीमातेच्या हातचे यंत्र मानत. भगवंत सर्व करत आहेत या भावनेने ते कर्म करत.
अर्जुन विषण्ण होता. भगवंत प्रहसन्निव, किंचित हसल्यासारखे उपदेश करत होते. मत्प्रसादात् - भगवंत म्हणतात, माझ्या कृपेने योग्याला प्रसन्नता प्राप्त होते. तो अव्यय परमपदाला प्राप्त होतो. त्याचे प्रत्येक कर्म भगवंतांचे कर्म होऊन जाते.

प्रतिपल निज इंद्रिय समूह से, जो कुछ भी आचार करूं |
केवल तुझे रिझाने को, बस तेरा ही व्यवहार करूं ||

जे काही मी करतो ते तुझेच कार्य आहे असा भाव योग्याचा असतो. संतांचे वागणे देखील असेच असते. संत सावतामाळी भाजी विकताना गात- कांदा मुळा भाजी । अवघी विठाई माझी।। त्यांना त्यांच्या भाजीपाल्यात देखील विठ्ठलाचे दर्शन होत असे. त्यांचे भाजी विकणे देखील भगवत्कार्य होते. जनाबाई म्हणत -
देव खाते देव पीते।
देवावरी मी निजते।।
देव देते देव घेते।
देवा संगे व्यवहारिते।।
देव येथे देव तेथे।
देवाविणे नाहीं रिते।।
जनी म्हणे विठाबाई।
भरुनी उरले अंतर्बाही।।
आपण सर्व जगाला खूश करू शकत नाही. पण प्रत्येक कर्म करताना ते भगवंताचे कार्य आहे, तोच आपल्याकडून ते करवून घेत आहे अशा भावनेने ते त्यालाच अर्पण करुन केवळ त्याला खूश करावे. गीता पढ़े, पढ़ाये और जीवन में लाये, यात “जीवन में लाये” म्हणजे काय हे पुढील श्लोकातून समजेल.
चेतसा सर्वकर्माणि, मयि सन्न्यस्य मत्परः।
बुद्धियोगमुपाश्रित्य, मच्चित्तः(स्) सततं(म्) भव॥18.57॥
सर्व कर्मे मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धिरूप योगाचा अवलंब करून मत्परायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो.
मनाने, बुद्धीने, अंतरंगातून जे काही कर्म करतो ते भगवंतांना अर्पण करावे. गीता आचरणात कशी आणावी हेच इथे सांगितले आहे. दिवसभर आपण जे काही कर्म करतो ते त्या परमात्म्याला अर्पण करावे. हे करताना सर्वांच्या कल्याणाचा भाव मनात असावा. आपल्या जगण्याचा केंद्रबिंदू परमात्मा असायला हवा. आपण मंदिरात जातो. तिथे गर्भगृहात देवाची सुंदर मूर्ती असते. तिला आपण नमस्कार करतो. नंतर त्या गर्भगृहाधंभोवती प्रदक्षिणा घालतो. असे करताना आतील मूर्ती केंद्रस्थानी असते. तसेच आपले प्रत्येक कर्म त्या परमेश्वराला केंद्रस्थानी ठेवून करायला हवे.
कर प्रणाम तेरे चरणों में लगता हूं अब तेरे काज ।
पालन करने को आज्ञा तब मैं नियुक्त होता हूं आज ॥

अन्तर में स्थित रह मेरी बागडोर पकड़े रहना ।
निपट निरंकुश चंचल मन को सावधान करते रहना ॥
अन्तर्यामी को अन्तः स्थित देख सशंकित होवे मन ।
पाप वासना उठते ही हो, नाश लाज से वह जल भुन ॥
जीवों का कलरव जो दिन भर सुनने में मेरे आवे ।
तेरा ही गुनमान जान मन प्रमुदित हो अति सुख पावे ॥
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि ! तुझमें यह सारा संसार ।
इसी भावना से अन्तर भर मिलूं सभी से तुझे निहार ॥
प्रतिपल निज इन्द्रिय समूह से जो कुछ भी आचार करूं ।
केवल तुझे रिझाने, को बस तेरा ही व्यवहार करूं ॥

दिवसाची सुरुवात या सुंदर प्रार्थनेने करावी. भगवंतांना सांगावे आज मी तुझे कर्म करण्यास तयार झालो आहे. जे काही कर्म करेन ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करेन या भावाने ते करावे. प्रत्येक कर्म त्याच्या आज्ञेचे पालन आहे असा भाव असेल तर आपल्या कर्मात त्याचे अनुमोदन मिळते आहे हे जाणवू लागते. कर्म करावे, त्याला अर्पण करावे; पुढच्या कार्याला लागावे. असे केल्याने 'मी केले' हा कर्तृत्वभाव नष्ट होऊ लागतो, प्रसन्नता वाढू लागते.
तुकाराम महाराज म्हणतात -
आपुलीया बळे नाही मी बोलत।
सखा कृपावंत वाचा त्यांची।। १।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी।
शिकवीता धनी वेगळाची।। २।।
काय म्या पामरे बोलावी उत्तरे।
परि त्या विश्वंभरे बोलवीले।। ३।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा।
वागवी पांगुळा पायावीण।। ४।।
सखा कृपावंत वाचा त्यांची।। १।।
साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी।
शिकवीता धनी वेगळाची।। २।।
काय म्या पामरे बोलावी उत्तरे।
परि त्या विश्वंभरे बोलवीले।। ३।।
तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा।
वागवी पांगुळा पायावीण।। ४।।
साळुंकी आपल्या मुखे बोलत नाही. तिच्या मुखातून येणारा मंजूळ शब्द भगवंतांकडून येत असतो. आपल्या सर्व कर्मांचा कर्ता, करविता भगवंतच असतो हेच त्यांना इथे सांगायचे आहे.
कविवर्य श्री वर्णेकरांनी त्यांच्या सुंदर कवितेत म्हटले आहे -
"प्रभो तव कृपा विना तृण कणोंपि न स्पंदते"
हे प्रभो तुझ्या कृपेशिवाय तृणाचे पाते देखील हलत नाही. सहस्त्र रश्मी धारण करणारा सूर्य, शीतल प्रकाश देणारा चंद्र आकाशात विराजमान होऊ शकत नाहीत. तुझ्या कृपेखेरीज विद्यावाचस्पतींची अद्भुत वाणी प्रकट होऊ शकत नाही तर माझ्यासारख्या जडमती कवीकडून कविता तरी कशी होईल.
ज्या इष्ट रूपाला आपण भजतो त्या रूपाला कर्म अर्पण करावे. असा भाव सतत ठेवल्याने भगवंतांचे स्मरण राहू लागते. मच्चित्तः सततं भव - सदैव माझ्या स्मरणात रहा असेच भगवंत इथे सांगतात. भवसागर तरुन जाणे सोपे नाही. या सागरात लाटांवर लाटा उठत असतात. मोठमोठ्या संकटांचा सामना करताना भगवंत करवून घेतील हा भाव ठेवून आपण आपले कर्म करावे.

मच्चित्तः(स्) सर्वदुर्गाणि, मत्प्रसादात्तरिष्यसि।
अथ चेत्त्वमहङ्कारान्, न श्रोष्यसि विनङ्क्ष्यसि॥18.58॥
वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटांतून सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील अर्थात परमार्थाला मुकशील.
भगवंत म्हणतात माझ्यात चित्त ठेवून कर्म केलेस तर संकटांचे दुर्ग आपोआप नष्ट होतील. भगवंतांचे कार्य ही भावना ठेवली की संकटे आली तरी त्यातून पार जाण्याची शक्ती देखील प्रसादरुपाने आपल्याला मिळते. पण जर अहंकाराने ऐकले नाही, भगवंतांनी सांगितले तसे आचरण केले नाही तर आपणच आपला विनाश ओढवून घेतो. आपला उद्धार आपल्याच हाती असतो हे भगवंतांनी सहाव्या अध्यायात सांगितले आहे -
मी युद्ध करणार नाही, कौरवांनी निःशस्त्र मला मारले तरी चालेल असे अर्जुन म्हणत होता. भगवंत पुढे म्हणतात.
उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवसादयेत्।
आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६.५॥
स्वतःच स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण हा मनुष्य स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे. Mind your own business. आपण आपले कार्य भगवंतांचे कार्य या भावनेने करावे.आत्मैव ह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः ॥६.५॥
मी युद्ध करणार नाही, कौरवांनी निःशस्त्र मला मारले तरी चालेल असे अर्जुन म्हणत होता. भगवंत पुढे म्हणतात.
यदहङ्कारमाश्रित्य, न योत्स्य इति मन्यसे।
मिथ्यैष व्यवसायस्ते, प्रकृतिस्त्वां (न्) नियोक्ष्यति॥18.59॥
तू अहंकार धरून 'मी युद्ध करणार नाही' असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करावयास लावील.
प्रकृती आपल्या स्वभावाप्रमाणे आपल्याकडून कर्म करवून घेत असते. अहंकाराने जसे 'मी करतो, मी करेन', असे म्हणतात तसेच 'मी करणार नाही' असेही म्हणतात. अर्जुन अहंकाराने 'मी युद्ध करणार नाही' असे म्हणत होता. भगवंत त्याला सांगतात, "तू क्षत्रिय आहेस. युद्ध कारणे तुझा स्वभाव आहे. प्रकृती तुझ्याकडून हे युद्धकर्म करवून घेईल."
मनुष्यदेह अनेक जन्मांच्या परिश्रमाने मिळाला आहे. आपला स्वभाव अनेक जन्मांच्या कर्मसंस्कारातून बनलेला असतो. स्वभाव बदलणे सोपे नसते. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. स्वभावस्य नास्ति औषधम्। स्वभावाला औषध नसते.
अकबर बिरबलाची एक गोष्ट आहे. एकदा दरबारात एक संगीतज्ञ गायक आला होता. त्याचे गायन सुरू केले. गायन सुरू होताच अनेकजण वाहवा करू लागले. अकबर बिरबलाच्या कानात कुजबुजला, "आपले दरबारी रसिक झालेले दिसतात." यावर बिरबल म्हणाला, "नाही खाविंद. ते तर तुमच्यासमोर वाहवा करत आहेत." खरा रसिक कसा ओळखावा असा प्रश्न अकबराने विचारताच बिरबलाने एक युक्ती सांगितले. बिरबलाच्या सांगण्यानुसार अकबराने फर्मान काढले, "जो कोणी गाणे चालू असताना तोंड उघडेल त्याची जीभ छाटण्यात येईल." झाले, आता जीभ छाटली जायच्या भीतीने सर्व वाहवा थांबल्या. गाणे चालू राहिले. काही वेळाने एका व्यक्तीच्या तोंडून न कळत 'वाह !' असे उद्गार आले. आता बिरबल म्हणाला, "महाराज हा तुमचा दरबारी खरा रसिक आहे. याची जीभ छाटू नका."
भगवंत अर्जुनाला सांगतात, तुझ्या स्वभावानुसार तू युद्धकर्मापासून स्वतःला थांबवू शकणार नाहीस. मग जर स्वभावानुसार प्रकृती कर्म करवून घेणारच आहे तर ते भगवंताचे कार्य म्हणून करण्यास काय हरकत आहे.

स्वभावजेन कौन्तेय, निबद्धः(स्) स्वेन कर्मणा।
कर्तुं(न्) नेच्छसियन्मोहात्, करिष्यस्यवशोऽपि तत्॥18.60॥
हे कुंतीपुत्रा! जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस, तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील.
प्रत्येक जण आपल्या स्वभावानुसार कर्म करत असतो. खेळाडूचे मन क्रीडांगणावर रमते, ते अभ्यासात रमत नाही. याउलट अभ्यासू क्रीडेत रमू शकत नाही. सैन्यात भरती करताना सैनिकांची स्वभावपरीक्षा घेतली जाते. त्यांना शंभर प्रश्नांची उत्तर अर्ध्या तासात द्यायला सांगतात. कितीही पाठांतर केले तरी सर्व प्रश्नांची उत्तर इतक्या जलद गतीने केवळ पाठांतराच्या आधारे देता येत नाहीत. कोणत्यातरी प्रश्नाला स्वभावानुसार उत्तर दिले जाते. परीक्षकाला हे बरोबर समजते. मागेच आपण कर्माणि प्रविभक्तानि स्वभावप्रभवैर्गुणैः॥ पाहिले आहे. कर्म स्वभावानुसार उत्पन्न झालेल्या गुणांनी होतात. शिवाय स्वभाव प्रकृतीच्या सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेले असतात. कितीही मी करणार नाही म्हटले तरी स्वभावाप्रमाणे कर्म घडतेच मग ते परमात्म्यासाठी करतो हा भाव ठेवून करावे. आता ज्या परमात्म्यासाठी कर्म करायचे तो कोठे आहे.
ईश्वरः(स्) सर्वभूतानां(म्), हृद्देशेऽर्जुन तिष्ठति।
भ्रामयन्सर्वभूतानि, यन्त्रारूढानि मायया॥18.61॥
हे अर्जुना! अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेने शरीररूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयांत राहिला आहे.
भगवंत म्हणतात, तो परमात्मा आपल्या अंतर्यामी निवास करतो. आपल्या अंतर्यामी राहून आपल्या मायेने तो जीवाला भ्रमित करतो. जो आपल्या आत असून आपल्याला भ्रमित करतो त्याला प्राप्त कसे करावे ?
तमेव शरणं(ङ्) गच्छ, सर्वभावेन भारत।
तत्प्रसादात्परां(म्) शान्तिं(म्), स्थानं(म्) प्राप्स्यसि शाश्वतम्॥18.62॥
हे भारता! तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनेच तुला परम शान्ती आणि सनातन परम धाम मिळेल.
भगवंतांना सर्वभावे पूर्णतः शरण जावे. भगवंता मी तुमचे कार्य करतो आहे, तुम्ही जसे करवून घ्याल तसे मी करेन असा भाव ठेवावा. शरण जाताना शरणागती पूर्ण असावी. बहुतेक वेळा आपली इच्छा असते. इथे आपली गडबड होते. इच्छा देखील अर्पण करावी. कोणतीही इच्छा मनात उत्पन्न झाली की ती भगवंताला आवडेल का असा विचार करावा. त्याची इच्छा आहे असा भाव ठेवून मग त्यासाठी कर्म करावे.
संगणकाचे कार्य त्याच्यातील प्रणालीवर चालत असते. संगणकप्रणाली तयार करणारा अभियंता प्रणाली बनवेल तसे कार्य घडते. त्यात बदल करायचा असेल तर त्या अभियंत्याकडे जावे लागते. तसेच आपली इच्छा बदलायची असेल, कर्म बदलायचे असेल तर भगवंतांना शरण जावे.

इति ते ज्ञानमाख्यातं(ङ्), गुह्याद्गुह्यतरं(म्) मया।
विमृश्यैतदशेषेण, यथेच्छसि तथा कुरु॥18.63॥
अशाप्रकारे हे गोपनीयाहूनही अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसेच कर.
समोर आलेले कर्म त्याचे आहे या भावनेने, तोच कर्ता करविता आहे हे जाणून त्यालाच अर्पण केले तर परमशांती प्राप्त होते. पुन्हा एकदा त्या प्रातःप्रार्थनेचे स्मरण होते.
कर प्रणाम तेरे चरणों में लगता हूं अब तेरे काज ।
पालन करने को आज्ञा तब मैं नियुक्त होता हूं आज ॥
पालन करने को आज्ञा तब मैं नियुक्त होता हूं आज ॥
अन्तर में स्थित रह मेरी बागडोर पकड़े रहना ।
निपट निरंकुश चंचल मन को सावधान करते रहना ॥
निपट निरंकुश चंचल मन को सावधान करते रहना ॥
दिवसाचे एखादे तरी कर्म भगवंतांना अर्पण करेन असा प्रयत्न करावा. त्यात सातत्य आणावे. हळूहळू एकाचे दोन, दोनाचे तीन असे करत जास्तीत जास्त कर्मे अर्पण भावनेने करायचा प्रयत्न करावा. सरते शेवटी दिवसाचे प्रत्येक कर्म भगवंतांना अर्पण करावे.
सतारीच्या तारांतून निरनिराळे सूर निघतात. काही प्रसन्न करणारे असतात तर काही करुण असतात. तारा छेडताना बोटांना शरण गेले तर जे सूर निघतील ते आर्त असतील.

सर्वगुह्यतमं(म्) भूयः(श्), शृणु मे परमं(म्) वचः।
इष्टोऽसि मे दृढमिति, ततो वक्ष्यामि ते हितम्॥18.64॥
सर्व गोपनीयांहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे.
भगवंत म्हणतात, काहीही बाकी न ठेवता अतिशय गुह्य असे ज्ञान मी तुला दिले. ते पुढे त्याला म्हणतात, आता योग्य काय आणि अयोग्य काय याचा समग्र विचार करुन तुला जसे वाटेल तसे तू कर. इतर कोणत्याही धर्मात अशी मुभा दिल्याचे आढळत नाही. इथे भगवंतांनी सर्व मार्गांचे विश्लेषण करुन अर्जुनाला संपूर्ण ज्ञान दिले आणि आता निर्णय सर्वस्वी त्याचा आहे.
औषधांच्या दुकानात असंख्य औषधे असतात. त्यातील आपल्या वयाला, परिस्थितीला योग्य असे एखादेच असते. तसेच अर्जुनाला सांगितलेल्या ज्ञानाच्या अनेक गोष्टींमधून त्याच्यासाठी कोणती योग्य हे त्याने ठरवायचे आहे. शास्त्र मार्ग दाखवतात पण कर्म जीवालाच करायचे असते. आदी शंकराचार्य म्हणतात -
शास्त्रं ज्ञापकं न तु कार्यम्॥
शास्त्र केवळ सूचना देणारे आहे, कार्य करणारे नाही.
Construction site वर पाटी असते - अपनी सुरक्षा स्वयं करे आपणच आपल्या सुरक्षेला जबाबदार असतो. हे तसेच आहे. अर्जुनाने निश्चित कल्याणकारक मार्ग विचारला होता. भगवंतांनी तो सांगितला. आता कर्म अर्जुनाला करायचे आहे.
भगवंत पुन्हा एकवार अर्जुन त्यांचा प्रिय सखा असल्याने गुह्यतम परमवचन सांगतात. भगवंताचे हे परमवचन काय आहे हे पुढील सत्रात पाहूया. आजचे विवेचन भगवंताच्या चरणी अर्पण करुन इथे थांबुया.
प्रश्न: स्वभाव बदलू शकत नाही असे श्लोक क्रमांक एकूणसाठ आणि साठ मध्ये म्हटले आहे. असे आहे तर मग आपण आपला उद्धार कसा करुन घेणार ? याच्या विपरीत गोष्ट आपण पाहतो आहोत. ब्राह्मणाचा मुलगा नोकरी करताना दिसतो. क्षत्रियाचा मुलगा धंदा करताना दिसतो. शूद्र शिक्षक झालेला दिसतो आहे. हे सर्व स्वभाव बदलल्याशिवाय कसे शक्य आहे ? अर्जुनाला स्वभाव बदलायचा होता. युद्ध करायचे नव्हते. पण भगवान श्रीकृष्णांनी येन केन प्रकारेण उपदेश करुन त्याला युद्धप्रवृत्त केले. त्यातून कौरव मारले गेले ते ठीक आहे पण पांडवांच्या बाजूला देखील प्रचंड हानी झाली. यातून फार काही निष्पन्न झाले असे दिसत नाही उलट मानव जातीचे नुकसानच झाले. श्रीकृष्णाचे यादव सैन्य देखील यात मारले गेले. अर्जुन जर स्वभाव बदलण्यास तयार होता तर श्रीकृष्णाने त्याला अन्य काही मार्ग का सुचवला नाही ? असे केले असते तर कदाचित आज समाज जास्त सुखी झाला असता.
उत्तर: स्वभाव आपल्या गुण आणि कर्मानुसार बनतो. तो केवळ जन्मावर ठरत नाही. माता पित्याच्या गुणसूत्रांचा, आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडतो. भगवंतांनी सांगितले आहे -
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:।
गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची निर्मिती झालेली आहे. हे चार वर्ण स्वभावानुसार बनलेले आहेत.
स्वभावस्य नास्ति औषधम्। हे सुभाषित आपण आधी पाहिले. याचा सर्वसाधारण अर्थ स्वभावाला औषध नसते असा जरी असला तरी तो शब्दश: खरा नाही. स्वभावस्य योग औषधम् । अर्थात कर्मयोगाने स्वभावात हळूहळू बदल करता येतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत सांगतात - स्वभावजेन कौन्तेय, निबद्धः स्वेन कर्मणा। स्वभावानुसार कर्म करण्यास आपण बद्ध असतो. स्वभावानुसार प्राप्त कर्म करणेच आपल्याला जमते आणि भावते. अर्जुन योद्धा होता, क्षत्रिय होता. क्षत्रियकुलात जन्मलेला होता. आजच्या युगात सर्व मिश्रण झालेले दिसते, निरनिराळे लोक निरनिराळ्या प्रकारची कर्मे करताना दिसतात. त्या काळी तसे नव्हते. क्षत्रिय युध्दकर्मच करत असत.
भगवान श्रीकृष्णांना देखील युद्ध नको होते. ते पांडवांसाठी पाच गावे मागण्यास गेले होते. जेव्हा दुर्योधनाने सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा देणार नाही असे उत्तर दिले तेव्हा युद्ध अटळ झाले होते. आता प्रत्यक्ष युद्धभूमीवर अर्जुन मी युद्ध करणार नाही असे म्हणू लागला होता. भगवंतांनी अर्जुनाला युद्धासाठी नव्हे तर त्याचे कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केले होते. अर्जुनाला माध्यम करून भगवंत आपल्याला देखील कर्तव्यपरायण होण्याचा उपदेश देत आहेत. अर्जुनाचे उदाहरण असल्याने इथे युद्ध करण्यास भगवंत सांगतात. चीन सारख्या शत्रू राष्ट्राने जर आपल्यावर आक्रमण केले तर आपल्याला त्या देशाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. अशा वेळी युद्ध कितीही भीषण भासले तरी त्याला दुसरा पर्याय उरत नाही. अहिंसा परमो धर्म:। हे जरी खरे असले तरी त्याच्या पुढची ओळ ती म्हणजे धर्म हिंसा तथैव च। अर्थात कर्तव्य म्हणून जर कोणाची हिंसा करावी लागली तर तो देखील धर्मच होय. दहशतवाद्याला न्यायाधीश फाशीची शिक्षा देतात, जल्लाद त्याला फासावर लटकवतो. न्यायाधीश आणि जल्लाद काही हिंसा करत नाहीत. ते त्यांच्या कर्तव्याचे पालन करतात. अशा प्रकारे केलेले कर्तव्यपालन ही अहिंसाच आहे.
भगवंत युद्ध करण्यास प्रवृत्त करत नाहीत तर कर्तव्य करण्यास प्रवृत्त करतात. आपले कर्तव्य आपल्या स्वभावानुसार ठरत असते. यापलीकडे तुम्ही म्हणालात आजकाल ब्राह्मणाचा मुलगा वैश्यासारखा व्यवसाय करताना दिसतो. हे बरोबर आहे. माझेच उदाहरण घ्या. मी ब्राह्मणकुळात जन्मलो. वडील संस्कृतचे महाकवी होते. जन्मानुसार मी देखील संस्कृतचा अभ्यासक व्हायला हवे होते. पण मला सैन्यात जायचे होते. तेथील परीक्षेत त्यांनी माझा स्वभाव चटकन ओळखला आणि माझी सैन्यासाठी निवड झाली नाही. मग मी पुढे बांधकाम व्यावसायिक झालो. तरीही मूळ स्वभाव, ओढ शिकण्याकडे होती त्यामुळे गीतेचा, संस्कृतचा अभ्यास करू लागलो आणि आज गीतापरिवारात काम करतो आहे. आपल्या गुण आणि कर्मानुसार नियत कर्म ठरते. त्यातून तुम्ही जे निवडता ते तुमचे विहित कर्म होते. ते कर्म कर्तव्यकर्म म्हणून करावे आणि भगवंताला अर्पण करावे हे महत्त्वाचे. अखेरीस यथेच्छसि तथा कुरु। सर्व समग्र विचार करून तुला योग्य वाटेल तसे तू कर असेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. तसेच पूर्ण विचारांती जी अंतःप्रेरणा आपल्याला होते ती भगवंतांची इच्छा असे समजून कर्म करावे.
भावना दीदी
प्रश्न: पूर्वजन्मीच्या संस्कारातून स्वभाव घडतो हे समजले. बुद्धीने, विवेकाने जीव निर्णय घेतो. परंतु आठव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात म्हटले आहे - स्वभावोऽध्यात्ममुच्यते। इथे माझा गोंधळ होतो आहे.
उत्तर: आठव्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांना विचारले होते - किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम। याचे उत्तर देताना भगवंत म्हणाले - स्वभाव: अध्यात्मं उच्यते स्वभावाला अध्यात्म म्हटले आहे. एक प्राकृतिक स्वभाव असतो आणि एक आहे आत्मभाव. स्वभाव म्हणजे 'मी' पणा. स्वभाव म्हणजे माझे स्वरूप काय आहे - तर आत्मरूप हे माझे स्वरूप आहे. देहाशी संबंध आल्यानंतर प्राकृतिक स्वरूप बनते तो म्हणजे प्राकृतिक स्वभाव. 'मी' मध्ये एक पक्का 'मी' म्हणजे माझे मूळ स्वरूप येते. माझे मूळ स्वरूप आत्मा आहे. माझा देह म्हणणारा मी, आत्मा होय. देहाशी संबंध आल्यानंतर जो मी दिसतो तो कच्चा मी अर्थात माझा प्राकृतिक स्वभाव होय. मी आलो, मी गेलो, मी बसलो, मी खाल्ले हे म्हणताना माझ्यातील कच्चा मी, अर्थात देहस्वरूप प्राकृतिक स्वभाव दृगोच्चर होत असतो. देहाच्या स्तरावर एक स्वभाव आहे आणि एक आत्मभाव जो आत्मस्तरावर आहे. या आत्मभावाविषयी भगवंतांनी आठव्या अध्यायात सांगितले आहे. आत्मस्तरावर जेव्हा आपण आपल्याला जाणू तेव्हा तो स्वभाव आत्मभाव असेल.
या अध्यायात वर्णन केलेला प्राकृतिक स्वभाव होय. स्व चा देहाशी संबंधित अर्थ प्राकृतिक स्वभाव होय आणि स्व चा आत्म्याशी निगडित अर्थ म्हणजे अध्यात्म होय. मनुष्याच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास स्वार्थाकडून स्व अर्थाकडे चालू असतो असे म्हटले आहे. लहान मुलाला दूध हवे असते. तो त्याचा देहाच्या पोषणाचा स्वार्थ असतो. आपण जसजसे मोठे होतो तसे स्वार्थाचा परीघ वाढत जातो. त्यात पुढे आपले कुटुंब, मित्र, परिवार येतात. पुढे मग देश, समाज, मानवजाती असा जेव्हा विस्तार होऊ लागतो तेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने स्व चा अर्थ समजू लागतो. तो देहाशी निगडित स्वभावाकडून त्याचा आत्मभाव जाणण्याकडे जाऊ लागतो. या दोन्ही स्तरावर हा अर्थ समजून घ्यायला हवा.
इथे प्रश्नोत्तर सत्र संपले. यानंतर समारोपाची प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने सत्राची सांगता झाली.
औषधांच्या दुकानात असंख्य औषधे असतात. त्यातील आपल्या वयाला, परिस्थितीला योग्य असे एखादेच असते. तसेच अर्जुनाला सांगितलेल्या ज्ञानाच्या अनेक गोष्टींमधून त्याच्यासाठी कोणती योग्य हे त्याने ठरवायचे आहे. शास्त्र मार्ग दाखवतात पण कर्म जीवालाच करायचे असते. आदी शंकराचार्य म्हणतात -
शास्त्रं ज्ञापकं न तु कार्यम्॥
शास्त्र केवळ सूचना देणारे आहे, कार्य करणारे नाही.
Construction site वर पाटी असते - अपनी सुरक्षा स्वयं करे आपणच आपल्या सुरक्षेला जबाबदार असतो. हे तसेच आहे. अर्जुनाने निश्चित कल्याणकारक मार्ग विचारला होता. भगवंतांनी तो सांगितला. आता कर्म अर्जुनाला करायचे आहे.
भगवंत पुन्हा एकवार अर्जुन त्यांचा प्रिय सखा असल्याने गुह्यतम परमवचन सांगतात. भगवंताचे हे परमवचन काय आहे हे पुढील सत्रात पाहूया. आजचे विवेचन भगवंताच्या चरणी अर्पण करुन इथे थांबुया.
प्रश्नोत्तरे
सुरेश गुप्ता भैय्या प्रश्न: स्वभाव बदलू शकत नाही असे श्लोक क्रमांक एकूणसाठ आणि साठ मध्ये म्हटले आहे. असे आहे तर मग आपण आपला उद्धार कसा करुन घेणार ? याच्या विपरीत गोष्ट आपण पाहतो आहोत. ब्राह्मणाचा मुलगा नोकरी करताना दिसतो. क्षत्रियाचा मुलगा धंदा करताना दिसतो. शूद्र शिक्षक झालेला दिसतो आहे. हे सर्व स्वभाव बदलल्याशिवाय कसे शक्य आहे ? अर्जुनाला स्वभाव बदलायचा होता. युद्ध करायचे नव्हते. पण भगवान श्रीकृष्णांनी येन केन प्रकारेण उपदेश करुन त्याला युद्धप्रवृत्त केले. त्यातून कौरव मारले गेले ते ठीक आहे पण पांडवांच्या बाजूला देखील प्रचंड हानी झाली. यातून फार काही निष्पन्न झाले असे दिसत नाही उलट मानव जातीचे नुकसानच झाले. श्रीकृष्णाचे यादव सैन्य देखील यात मारले गेले. अर्जुन जर स्वभाव बदलण्यास तयार होता तर श्रीकृष्णाने त्याला अन्य काही मार्ग का सुचवला नाही ? असे केले असते तर कदाचित आज समाज जास्त सुखी झाला असता.
उत्तर: स्वभाव आपल्या गुण आणि कर्मानुसार बनतो. तो केवळ जन्मावर ठरत नाही. माता पित्याच्या गुणसूत्रांचा, आजूबाजूच्या वातावरणाचा आपल्या स्वभावावर प्रभाव पडतो. भगवंतांनी सांगितले आहे -
चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागश:।
गुण आणि कर्मानुसार चार वर्णांची निर्मिती झालेली आहे. हे चार वर्ण स्वभावानुसार बनलेले आहेत.
स्वभावस्य नास्ति औषधम्। हे सुभाषित आपण आधी पाहिले. याचा सर्वसाधारण अर्थ स्वभावाला औषध नसते असा जरी असला तरी तो शब्दश: खरा नाही. स्वभावस्य योग औषधम् । अर्थात कर्मयोगाने स्वभावात हळूहळू बदल करता येतो. महत्त्वाची गोष्ट ही आहे की भगवंत सांगतात - स्वभावजेन कौन्तेय, निबद्धः स्वेन कर्मणा। स्वभावानुसार कर्म करण्यास आपण बद्ध असतो. स्वभावानुसार प्राप्त कर्म करणेच आपल्याला जमते आणि भावते. अर्जुन योद्धा होता, क्षत्रिय होता. क्षत्रियकुलात जन्मलेला होता. आजच्या युगात सर्व मिश्रण झालेले दिसते, निरनिराळे लोक निरनिराळ्या प्रकारची कर्मे करताना दिसतात. त्या काळी तसे नव्हते. क्षत्रिय युध्दकर्मच करत असत.
भगवान श्रीकृष्णांना देखील युद्ध नको होते. ते पांडवांसाठी पाच गावे मागण्यास गेले होते. जेव्हा दुर्योधनाने सुईच्या टोकावर मावेल इतकी जमीन सुद्धा देणार नाही असे उत्तर दिले तेव्हा युद्ध अटळ झाले होते. आता प्रत्यक्ष युद्धभूमीवर अर्जुन मी युद्ध करणार नाही असे म्हणू लागला होता. भगवंतांनी अर्जुनाला युद्धासाठी नव्हे तर त्याचे कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त केले होते. अर्जुनाला माध्यम करून भगवंत आपल्याला देखील कर्तव्यपरायण होण्याचा उपदेश देत आहेत. अर्जुनाचे उदाहरण असल्याने इथे युद्ध करण्यास भगवंत सांगतात. चीन सारख्या शत्रू राष्ट्राने जर आपल्यावर आक्रमण केले तर आपल्याला त्या देशाच्या आक्रमणाला प्रत्युत्तर द्यावेच लागेल. अशा वेळी युद्ध कितीही भीषण भासले तरी त्याला दुसरा पर्याय उरत नाही. अहिंसा परमो धर्म:। हे जरी खरे असले तरी त्याच्या पुढची ओळ ती म्हणजे धर्म हिंसा तथैव च। अर्थात कर्तव्य म्हणून जर कोणाची हिंसा करावी लागली तर तो देखील धर्मच होय. दहशतवाद्याला न्यायाधीश फाशीची शिक्षा देतात, जल्लाद त्याला फासावर लटकवतो. न्यायाधीश आणि जल्लाद काही हिंसा करत नाहीत. ते त्यांच्या कर्तव्याचे पालन करतात. अशा प्रकारे केलेले कर्तव्यपालन ही अहिंसाच आहे.
भगवंत युद्ध करण्यास प्रवृत्त करत नाहीत तर कर्तव्य करण्यास प्रवृत्त करतात. आपले कर्तव्य आपल्या स्वभावानुसार ठरत असते. यापलीकडे तुम्ही म्हणालात आजकाल ब्राह्मणाचा मुलगा वैश्यासारखा व्यवसाय करताना दिसतो. हे बरोबर आहे. माझेच उदाहरण घ्या. मी ब्राह्मणकुळात जन्मलो. वडील संस्कृतचे महाकवी होते. जन्मानुसार मी देखील संस्कृतचा अभ्यासक व्हायला हवे होते. पण मला सैन्यात जायचे होते. तेथील परीक्षेत त्यांनी माझा स्वभाव चटकन ओळखला आणि माझी सैन्यासाठी निवड झाली नाही. मग मी पुढे बांधकाम व्यावसायिक झालो. तरीही मूळ स्वभाव, ओढ शिकण्याकडे होती त्यामुळे गीतेचा, संस्कृतचा अभ्यास करू लागलो आणि आज गीतापरिवारात काम करतो आहे. आपल्या गुण आणि कर्मानुसार नियत कर्म ठरते. त्यातून तुम्ही जे निवडता ते तुमचे विहित कर्म होते. ते कर्म कर्तव्यकर्म म्हणून करावे आणि भगवंताला अर्पण करावे हे महत्त्वाचे. अखेरीस यथेच्छसि तथा कुरु। सर्व समग्र विचार करून तुला योग्य वाटेल तसे तू कर असेही भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. तसेच पूर्ण विचारांती जी अंतःप्रेरणा आपल्याला होते ती भगवंतांची इच्छा असे समजून कर्म करावे.
भावना दीदी
प्रश्न: पूर्वजन्मीच्या संस्कारातून स्वभाव घडतो हे समजले. बुद्धीने, विवेकाने जीव निर्णय घेतो. परंतु आठव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकात म्हटले आहे - स्वभावोऽध्यात्ममुच्यते। इथे माझा गोंधळ होतो आहे.
उत्तर: आठव्या अध्यायात अर्जुनाने भगवंतांना विचारले होते - किं तद्ब्रह्म किमध्यात्मं किं कर्म पुरुषोत्तम। याचे उत्तर देताना भगवंत म्हणाले - स्वभाव: अध्यात्मं उच्यते स्वभावाला अध्यात्म म्हटले आहे. एक प्राकृतिक स्वभाव असतो आणि एक आहे आत्मभाव. स्वभाव म्हणजे 'मी' पणा. स्वभाव म्हणजे माझे स्वरूप काय आहे - तर आत्मरूप हे माझे स्वरूप आहे. देहाशी संबंध आल्यानंतर प्राकृतिक स्वरूप बनते तो म्हणजे प्राकृतिक स्वभाव. 'मी' मध्ये एक पक्का 'मी' म्हणजे माझे मूळ स्वरूप येते. माझे मूळ स्वरूप आत्मा आहे. माझा देह म्हणणारा मी, आत्मा होय. देहाशी संबंध आल्यानंतर जो मी दिसतो तो कच्चा मी अर्थात माझा प्राकृतिक स्वभाव होय. मी आलो, मी गेलो, मी बसलो, मी खाल्ले हे म्हणताना माझ्यातील कच्चा मी, अर्थात देहस्वरूप प्राकृतिक स्वभाव दृगोच्चर होत असतो. देहाच्या स्तरावर एक स्वभाव आहे आणि एक आत्मभाव जो आत्मस्तरावर आहे. या आत्मभावाविषयी भगवंतांनी आठव्या अध्यायात सांगितले आहे. आत्मस्तरावर जेव्हा आपण आपल्याला जाणू तेव्हा तो स्वभाव आत्मभाव असेल.
या अध्यायात वर्णन केलेला प्राकृतिक स्वभाव होय. स्व चा देहाशी संबंधित अर्थ प्राकृतिक स्वभाव होय आणि स्व चा आत्म्याशी निगडित अर्थ म्हणजे अध्यात्म होय. मनुष्याच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास स्वार्थाकडून स्व अर्थाकडे चालू असतो असे म्हटले आहे. लहान मुलाला दूध हवे असते. तो त्याचा देहाच्या पोषणाचा स्वार्थ असतो. आपण जसजसे मोठे होतो तसे स्वार्थाचा परीघ वाढत जातो. त्यात पुढे आपले कुटुंब, मित्र, परिवार येतात. पुढे मग देश, समाज, मानवजाती असा जेव्हा विस्तार होऊ लागतो तेव्हा मनुष्य खऱ्या अर्थाने स्व चा अर्थ समजू लागतो. तो देहाशी निगडित स्वभावाकडून त्याचा आत्मभाव जाणण्याकडे जाऊ लागतो. या दोन्ही स्तरावर हा अर्थ समजून घ्यायला हवा.
इथे प्रश्नोत्तर सत्र संपले. यानंतर समारोपाची प्रार्थना आणि हनुमान चालीसा पठणाने सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।