विवेचन सारांश
अर्जुनाला झालेला विषाद
1.25
भीष्मद्रोणप्रमुखतः(स्), सर्वेषां(ञ्) च महीक्षिताम्।
उवाच पार्थ पश्यैतान्, समवेतान्कुरूनिति।।1.25।।
तत्रापश्यत्स्थितान्पार्थः(फ्), पितृ़नथ पितामहान्।
आचार्यान्मातुलान्भ्रातृ़न्, पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा।।1.26।।
श्वशुरान्सुहृदश्चैव, सेनयोरुभयोरपि।
तान्समीक्ष्य स कौन्तेयः(स्), सर्वान्बन्धूनवस्थितान्।।1.27।।
कृपया परयाविष्टो, विषीदन्निदमब्रवीत्।
अर्जुन उवाच
दृष्ट्वेमं स्वजनं(ङ्) कृष्ण, युयुत्सुं(म्) समुपस्थितम्।।1.28।।
सीदन्ति मम गात्राणि, मुखं(ञ्) च परिशुष्यति।
वेपथुश्च शरीरे मे, रोमहर्षश्च जायते।।1.29।।
गाण्डीवं(म्) स्रंसते हस्तात्, त्वक्चैव परिदह्यते।
न च शक्नोम्यवस्थातुं(म्), भ्रमतीव च मे मनः।।1.30।।
त्याने युद्धात शंकराला जिंकले होते, तो एका क्षणात मोहाने ग्रासला गेला. संजय म्हणाला, आप्तस्वकीयांना पाहून अर्जुन युद्धाविषयीची इर्षा विसरून गेला. त्यानंतर तो श्रीकृष्णाला म्हणाला मला येथे राहणे योग्य वाटत नाही. टत नाही.
निमित्तानि च पश्यामि, विपरीतानि केशव।
न च श्रेयोऽनुपश्यामि, हत्वा स्वजनमाहवे।।1.31।।
आज-काल कार्पोरेट ऑफिसेस मध्ये मनाचे परिवर्तन होण्यासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात. त्यावर कौशल्य कसे प्राप्त करायचे हे शिकवलेेे जाते . त्यामुळे कामाची गती वाढवून कामगारांकडून योग्य काम करून घेता येते.
जपानच्या हिरोशिमा वर जेव्हा अमेरिकेने बॉम्ब टाकला तेव्हा जपान बेचिराख झाले होते. त्यानंतर तो देश फिनिक्स पक्षाप्रमाणेेेे राखेतून उठला. एका सफाई कामगाराला त्याच्या कामाबद्दल विचारले असता तो म्हणाला मी माझे काम माझ्या देशाची मान उंच होण्यासाठी करतो. इथे येणारा कामगार प्रसन्न होऊन जातो.यामुळे आमच्या देशातील उत्पादन वाढते आणि परकीय चलन मिळते. अर्जुन आपला उद्देश विसरला आहे.
न काङ्क्षे विजयं(ङ्) कृष्ण, न च राज्यं(म्) सुखानि च।
किं(न्) नो राज्येन गोविन्द, किं(म्) भोगैर्जीवितेन वा।।1.32।।
येषामर्थे काङ्क्षितं(न्) नो, राज्यं(म्) भोगाः(स्) सुखानि च।
त इमेऽवस्थिता युद्धे, प्राणांस्त्यक्त्वा धनानि च।।1.33।।
आचार्याः(फ्) पितरः(फ्) पुत्रास्, तथैव च पितामहाः।
मातुलाः(श्) श्चशुराः(फ्) पौत्राः(श्), श्यालाः(स्) सम्बन्धिनस्तथा।।1.34।।
एतान्न हन्तुमिच्छामि, घ्नतोऽपि मधुसूदन।
अपि त्रैलोक्यराज्यस्य, हेतोः(ख्) किं(न्) नु महीकृते।।1.35।।
दुर्योधनाने स्त्रीचे वस्त्रहरण केले आहे आणि अन्यायाने राज्य मिळवले आहे. आततायी ची सहा लक्षणे आहेत. आग लावणारे, विष देणारे, जमीन हडप करणारे, स्त्रीचे वस्त्रहरण करणारे, छल कपटाने राज्य मिळवणारे , इत्यादी सर्व पापे कौरवांनी केले आहे. कृष्ण म्हणतो, अर्थशास्त्र हे धर्मशास्त्रापेक्षा बलवान असल्याने हे पाप होणार नाही. अर्जुनाचेेेे मनोबल वाढवण्यासाठी हा मनमोहन त्याच्यासोबत आहे. प्रत्येक नकारात्मक विचारापासून तो अर्जुनाला दूर ठेवतो.
निहत्य धार्तराष्ट्रान्नः(ख्), का प्रीतिः(स्) स्याज्जनार्दन।
पापमेवाश्रयेदस्मान्, हत्वैतानाततायिनः।।1.36।।
तस्मान्नार्हा वयं(म्) हन्तुं(न्), धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान्।
स्वजनं(म्) हि कथं(म्) हत्वा, सुखिनः(स्) स्याम माधव।।1.37।।
यद्यप्येते न पश्यन्ति, लोभोपहतचेतसः।
कुलक्षयकृतं(न्) दोषं(म्), मित्रद्रोहे च पातकम्।।1.38।।
कथं(न्) न ज्ञेयमस्माभिः(फ्), पापादस्मान्निवर्तितुम्।
कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन।।1.39।।
आपण गीता शिकतो त्यामुळेेेेेेेेेेेेेेेेे आपल्याबरोबर समाजाचे कल्याणही आपल्याला समजायला हवे. संघशक्ती कलियुगेेअसे म्हणतात त्यामुळे सर्वांचा विचार करून तू युद्ध कर. आततायीना कमी करण्यासाठी, पृथ्वीवरील पापी लोकांना कमी करण्यासाठी तू लढ.
कुलक्षये प्रणश्यन्ति, कुलधर्माः(स्) सनातनाः।
धर्मे नष्टे कुलं(ङ्) कृत्स्नम्, अधर्मोऽभिभवत्युत।।1.40।।
अधर्माभिभवात्कृष्ण, प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः।
स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय, जायते वर्णसङ्करः।।1.41।।
सङ्करो नरकायैव, कुलघ्नानां(ङ्) कुलस्य च।
पतन्ति पितरो ह्येषां(ल्ँ), लुप्तपिण्डोदकक्रियाः॥1.42॥
दोषैरेतैः(ख्) कुलघ्नानां(व्ँ), वर्णसङ्करकारकैः।
उत्साद्यन्ते जातिधर्माः(ख्), कुलधर्माश्च शाश्वताः॥1.43॥
उत्सन्नकुलधर्माणां(म्), मनुष्याणां(ञ्) जनार्दन।
नरकेऽनियतं(व्ँ) वासो, भवतीत्यनुशुश्रुम॥1.44॥
अहो बत महत्पापं(ङ्), कर्तुं(व्ँ) व्यवसिता वयम्।
यद्राज्यसुखलोभेन, हन्तुं(म्) स्वजनमुद्यताः॥1.45॥
यदि मामप्रतीकारम्, अशस्त्रं(म्) शस्त्रपाणयः।
धार्तराष्ट्रा रणे हन्युस्, तन्मे क्षेमतरं(म्) भवेत्।।1.46।।
सञ्जय उवाच
एवमुक्त्वार्जुनः(स्) संख्ये, रथोपस्थ उपाविशत्।
विसृज्य सशरं(ञ्) चापं(म्), शोकसंविग्नमानसः।।1.47।।
अशातऱ्हेने अर्जुनाची मनोव्यथा सांगणारा हा अध्याय आहे. प्रार्थनेने या अध्यायाची सांगता झाली.