विवेचन सारांश
कर्मांचे प्रकार व कर्मसिध्दीची सूत्रे
प्रारंभिक प्रार्थना, दीप प्रज्वलन आणि गुरुचरणी वंदन करून भगवद्गीतेच्या "मोक्ष-संन्यास योग" या अध्यायाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात झाली.
भगवंतांची अपार कृपा आपणां सर्वांवर बरसत आहे. हे आपल्या या जन्मातील किंवा पूर्वजन्मातील सुकृतामुळे, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद किंवा कोण्या संत-महात्म्याच्या कृपादृष्टीमुळेच शक्य झाले आहे व आपल्या भाग्याचा उदय झाला आहे. जगातील अनेक विद्वानांचे, गुरुजनांचे व महापुरुषांचे असे म्हणणे आहे की मानवाच्या कल्याणाकरिता, भगवद्गीतेइतका साधा आणि सहज-सुंदर असा दुसरा कोणताही ग्रंथ नाही. आपण १८ व्या अध्यायाच्या पहिल्या ६ श्लोकांचे चिंतन पहिल्या सत्रात केले. त्यामध्ये आपण कर्मांच्या विहित आणि निषिद्ध अशा मुख्य प्रकारांबद्दल माहिती घेतली. विहित कर्मांमध्ये नियत कर्मे काय असतात याबद्दल विस्ताराने पाहिले. आता आपण ७ व्या श्लोकापासून पुढे पाहूया. या श्लोकात तामस त्यागाविषयी भगवंत सांगत आहेत.

18.7
नियतस्य तु सन्न्यासः(ख्), कर्मणो नोपपद्यते।
मोहात्तस्य परित्याग: (स्), तामसः(फ्) परिकीर्तितः॥18.7॥
(निषिद्ध आणि काम्य कर्मांचा तर स्वरूपत: त्याग करणे योग्यच आहे.) परन्तु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला 'तामस त्याग' म्हटले आहे.
निषिद्ध आणि काम्य कर्मांचा स्वरूपतः त्याग केला पाहिजे. निषिद्ध म्हणजे शास्त्रानुसार जी कर्मे करू नयेत ती व काम्य कर्मे म्हणजे आपल्या कामनापूर्तींसाठी केली जाणारी कर्मे असतात. आपल्या कामनांची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न सतत केला पाहिजे. आपण दिवसभरात किती काम्य कर्मे करतो याचा विचार करावा. तसेच आपण दही किंवा आपल्याला आवडणारा गोड पदार्थ न घेता जेवलो का हे आठवावे. मात्र अजिबात जेवण न करणे हे सुद्धा एक प्रकारचे निषिद्ध किंवा काम्य कर्मच झाले, ते टाळावे. जेवढा आपण अशा कर्मांचा त्याग करू तेवढी आपली आध्यात्मिक प्रवृत्ती वाढेल. मनुष्ययोनीत विवेक असल्यामुळे हे शक्य आहे पण पशुयोनीत नाही. निषिद्ध कर्मांच्या त्यागामुळे मनुष्य घडतो व काम्य कर्मांच्या त्यागामुळे तो भगवद्प्राप्तीकडे अग्रेसर होतो. परंतु नियत कर्मांचा त्याग हा तामसी त्याग आहे. काही लोक आपल्या आळशीपणाचे समर्थन "मन चंगा तो कठौती में गंगा" किंवा "आज मी मानसिक स्नान केले" अशा विचारसरणीने करतात. पण अशी विचारसरणी म्हणजे आलस्य आहे किंवा श्रम व खर्च टाळण्यासाठी कोणतेही धर्मविधी कसेतरी उरकणे हेही योग्य नव्हे. ही तामस त्यागाची उदाहरणे आहेत. आपल्या नियत कर्मांची कधीही उपेक्षा करू नये.
दुःखमित्येव यत्कर्म, कायक्लेशभयात्त्यजेत्।
स कृत्वा राजसं(न्) त्यागं(न्), नैव त्यागफलं(म्) लभेत् ॥18.8॥
काही कर्म आहे, ते दुःखरूपच आहे, असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही.
आपल्या शरीरास क्लेश होतील किंवा आपली गैरसोय होईल म्हणून टाळली जाणारी कर्मे हा राजसिक त्यागाचा प्रकार आहे. यज्ञाचे वेळी होणाऱ्या धुराचा त्रास सहन न करता येणे, त्यावेळी पंखा किंवा वातानुकूल यंत्र लावण्यास सांगणे ही राजस त्यागाची उदाहरणे आहेत. आपण बरीच वर्षे साधना करतो पण अध्यात्मात विशेष प्रगती होत नाही याचे आपले शरीरावरचे प्रेम व शरीरसुखाचा प्रामुख्याने विचार हे कारण असते. अर्जुनाने पहिल्या अध्यायात निरनिराळे तर्क-कुतर्क करून भगवंतांना आपण युद्ध का करू शकत नाही याचे विवेचन केले, हे राजसी प्रभावामुळेच झाले.
कानपूरमधील एका शिवनारायण नावाच्या अध्यापकांची गोष्ट आहे. ते अतिशय गंभीर स्वभावाचे होते व गांधीजींच्या विचारसरणीचे होते. त्यामुळे त्यांना शिवनारायण गांधी असे म्हणत. त्यांच्या कोणत्याही विद्यार्थ्याकडून जरी चूक झाली तरी ते स्वतःस छडी मारून घेत.
शेठजी श्री जयदयाळजी गोयंदका यांनी गांधीजींप्रमाणेच अ-स्वादाचे व्रत घेतले होते.
याच संदर्भात गांधीजींचा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमातील प्रसंग येतो. एकदा अमेरिकेचा एक फिशर नावाचा पत्रकार गांधीजींची मुलाखत घ्यावयास आश्रमात आला होता. जेवणाची वेळ होती त्यामुळे त्यालाही जेवणाचे आमंत्रण देण्यात आले. परंतु गांधीजी जे भोजन करीत ते त्यास योग्य होणार नाही म्हणून त्याचेसाठी वेगळे भोजन मागविण्यात आले. जेवायला बसल्यावर फिशरला समजले की त्याचे भोजन गांधीजींपेक्षा वेगळे आहे. त्याने गांधीजींना म्हंटले की हा तर अन्याय झाला. आपण जे भोजन करणार आहात ते माझ्यापेक्षा वेगळे कसे? त्यांना मनुजी व गांधीजींनी समजावून देण्याचा प्रयत्न केला की गांधीजींचे जेवण त्याला चालणार नाही. परंतु त्याने हट्टच धरला की त्याला गांधीजींचेच जेवण हवे. त्याप्रमाणे गांधीजींचे जेवण त्याला आणून देण्यात आले. त्या जेवणाचा पहिलाच घास घेतल्यावर त्याच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. आता फक्त बाजरीची भाकरी व कडूलिंबाची मिठाविना बनवलेली चटणी खाल्ल्यावर काय होणार, तेच त्याचे झाले. त्याला कोठे माहित होते की गांधीजींचा आहार असा आहे? त्याची कल्पना म्हणजे एखाद्या व्हाईसरॉयला जसे पंच-पक्वान्नांचे जेवण येईल तसे जेवण गांधीजी घेत असतील अशी होती. त्याला आपण गांधीजींबद्दल चुकीचा समज करून घेतल्याचे अतिशय वाईट वाटले. त्या दिवसानंतर तो गांधीजींचा भक्त बनला व तो आश्रमात गांधीजींबरोबर काही दिवस राहिला व नंतर त्याने एक छोटेसे पुस्तक त्यांचेवर लिहिले. नियत कर्मांच्या पूर्तीसाठी देहास थोडे क्लेश घेण्याचे भय नसावे (काय-क्लेश भयात् त्यजेत् ) याचा धडा त्याला मिळाला.

कार्यमित्येव यत्कर्म, नियतं(ङ्) क्रियतेऽर्जुन।
सङ्गं(न्) त्यक्त्वा फलं(ञ्) चैव, स त्यागः(स्) सात्त्विको मतः॥18.9॥
अर्जुना जे शास्त्रविहित कर्म 'करणे कर्तव्य आहे' या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते, तोच 'सात्त्विक' त्याग मानला गेला आहे.
आपल्या कर्माचे फळ काय मिळेल यावर दृष्टी ठेवून कर्म केले तर कर्म करण्यात आनंद मिळणार नाही. एखाद्या भाजीचा मूळ स्वाद तेव्हाच कळतो जेंव्हा त्यात मसाला नसतो. कर्तव्य भावनेने व फळाच्या आसक्तीचा त्याग करून जे शास्त्र-विहित कर्म केले जाते ते सात्विक कर्म असते. ते करण्यामुळे लाभ होईल किंवा हानी होईल याचा विचार त्यामागे नसावा.
वनवासात असताना एकदा द्रौपदीने धर्मराजाना प्रश्न केला की "महाराज, आपण मोठे धर्म-पालक असूनही वनवासात राहून येथे दुःख-कष्ट भोगीत आहात व तो पापी दुर्योधन तेथे सर्व सुखे भोगतो आहे, हा अन्याय नाही का?" त्यावर धर्मराजांनी असे उत्तर दिले की "धर्म पालन करताना सुख-दुःखावर दृष्टी ठेवून चालत नाही".
दशरथ पुत्र प्रभू रामचंद्र मोठे सम्राट होते. त्यांच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असताना अशी खबर आली की कैकेयीने त्यांना १४ वर्षे वनवासास जाण्याची आज्ञा केली आहे. फक्त वल्कले परिधान करून कोणताही सेवक बरोबर न घेता ते मातेचे आज्ञापालन करण्यासाठी वनवासास निघाले. वाटेत कोणत्याही नगरीत जाण्यास त्यांना मनाई होती. शिजविलेले अन्न खाता येत नव्हते व केवळ जंगलातील फळे खाऊन त्यांना राहायचे होते. ह्या सर्व गोष्टींचा त्यांनी आनंदाने स्वीकार केला केवळ कर्तव्य-कर्माचे पालन करण्यासाठी. वास्तविक त्यांना एकट्याला वनवासास जायचे होते परंतु सीतामाई व लक्ष्मणही त्यांचेबरोबर गेले.
आपण २-३ दिवस जरी एखाद्या कॅम्पला जंगलात गेलो तर आपल्याला कळते की त्यात किती कष्ट आहेत. जंगलातील डास आपले जगणे हैराण करू शकतात. एखादा दिवस उपवास केला तरी आपल्याला त्याचे इतके अप्रूप वाटते व आपण अनेकांना त्याचे वर्णन करून सांगतो. अनेक चांगली कर्मे करणारेसुद्धा त्या कर्माच्या आसक्तीमध्ये अडकून पडतात. लोकांनी आपली तारीफ करावी, आपल्याला मोठे म्हणावे यासाठी हे होते, मग ते कर्म सात्विक कसे असेल? असे कर्म तर राजसी असते.

न द्वेष्ट्यकुशलं(ङ्) कर्म, कुशले नानुषज्जते।
त्यागी सत्त्वसमाविष्टो, मेधावी छिन्नसंशयः॥18.10॥
जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्त्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय.
ज्याचा संशय नष्ट झाला आहे असा ज्ञानी (मेधावी छिन्न संशयः) कसा असतो याचे वर्णन या श्लोकात येते. अशा व्यक्तीस कर्म कसे असावे व काय करावे याबद्दल जराही संभ्रम नसतो. अकुशल कर्मे म्हणजे जी शास्त्र विहित कर्मे फळाच्या अपेक्षेने केली जातात अशी किंवा शास्त्र निषिद्ध कर्मे असतात. ज्ञानी व्यक्ती अशा कर्मांचा द्वेष न करता त्याग करते. कुशल कर्मे म्हणजे शास्त्र विहित कर्मे, जी वर्ण /आश्रम/ परिस्थितीनुसार नियुक्त केली आहेत (नियत कर्मे) व जी आसक्ती व फलेच्छेचा त्याग करून केली जातात.
जसे आपल्याला दोन अधिक दोन म्हणजे चार याचा जास्त विचार करावा लागत नाही त्याप्रमाणेच "मेधावी छिन्नसंशयः" असणाऱ्या व्यक्तीस संसारविषयक व अध्यात्मविषयक ज्ञानाबद्दल काहीच संशय नसतो, त्याला सर्व काही साफ दिसत असते. त्याला विहित कर्म काय किंवा निषिद्ध कर्म काय याबद्दल संभ्रम नसतो.
भगवंत जेंव्हा पाषाणरूपी अहिल्येजवळ पोहोचले तेंव्हा त्यांना क्षणभरही विचार करावा लागला नाही व त्यांनी पदस्पर्श करताच त्या पाषाणरूपी अहिल्येस मुक्ती मिळाली. प्रभू रामचंद्रांनी मारीच राक्षसाचा वध केला नाही, कारण तो पुढे कामास येणार होता परंतु खरदूषणाचा मात्र वध केला.
याच संदर्भात, रामचरितमानसातील किष्किंधाकांडात हनुमंतांची गोष्ट येते. हनुमंत अतिशय बुद्धिमान होते. परंतु कर्तव्य पालनातही दक्ष होते. त्यांना आपल्या कर्तव्य-कर्मांबद्दल कोणताही संभ्रम नव्हता. जेंव्हा त्यांना समुद्र उल्लंघून लंकेत असलेल्या सीतामाईंना प्रभू रामचंद्रांचे कुशल कळवायचे होते, तेंव्हा त्या कार्याची माहिती असून देखील जांबुवंतांकडून आज्ञा मिळेपर्यंत ते गप्प राहिले.
त्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन किष्किंधा कांडातील खालील दोहे/चौपाई यांतून आले आहे. त्यामधून कर्तव्यदक्ष हनुमंतांची ओळख पटते. सर्व कर्मे करताना देखील त्यात ते लिप्त होत नाहीत व १२ व्या अध्यायात सांगितलेल्या "सर्वारंभपरित्यागी" याचे ते मूर्तिमंत प्रतीक आहेत.
भावार्थ : जांबुवंत म्हणाले की मी आता म्हातारा झालो आहे व माझ्यात पहिल्यासारखे बळ उरले नाही. जेंव्हा खराचा नाश करणारे प्रभू रामचंद्र वामन बनले होते, तेंव्हा मी तरुण व शक्तीशाली होतो ॥4॥
दोहा :
बलि बाँधत प्रभु बाढ़ेउ सो तनु बरनि न जाइ।
उभय घरी महँ दीन्हीं सात प्रदच्छिन धाइ॥29॥
भावार्थ : बलीस बांधताना प्रभूंनी आपले शरीर एवढे मोठे केले तरी मी त्याच्या सात प्रदक्षिणा क्षणातच घातल्या॥29॥
चौपाई :
अंगद कहइ जाउँ मैं पारा। जियँ संसय कछु फिरती बारा॥
जामवंत कह तुम्ह सब लायक। पठइअ किमि सबही कर नायक॥1॥
भावार्थ : अंगदाने म्हंटले की मी समुद्र तर पार करू शकेन परंतु माझ्या परत येण्याची खात्री नाही. त्यावर जांबुवंत म्हणाले की, "अंगदा, तू तर सर्व वानरांचा प्रमुख आहेस, मी तुला कसे पाठवू?"॥1॥
कहइ रीछपति सुनु हनुमाना। का चुप साधि रहेहु बलवाना॥
पवन तनय बल पवन समाना। बुधि बिबेक बिग्यान निधाना॥2॥
भावार्थ : जांबुवंत म्हणाले, हे हनुमंत, तू तर काहीच बोलत नाहीस, तू चूप का आहेस? तू पवनपुत्र आणि बलशाली आहेस. शिवाय विवेक आणि बुद्धी यांची खाण आहेस.॥2॥
कवन सो काज कठिन जग माहीं। जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं॥
राम काज लगि तव अवतारा। सुनतहिं भयउ पर्बताकारा॥3॥
भावार्थ : या जगात कोणतेच असे काम नाही की तू जे करू शकत नाहीस. प्रभू रामचंद्रांच्याच कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे. हे ऐकताच हनुमंत एखाद्या पर्वताप्रमाणे विशालकाय झाले.
॥3॥
कनक बरन तन तेज बिराजा। मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा॥
सिंहनाद करि बारहिं बारा। लीलहिं नाघउँ जलनिधि खारा॥4॥
भावार्थ : हनुमानजींचा रंग सोन्याप्रमाणे होता व शरीरावर अत्यंत तेज होते. जणू काही (सुमेरूप्रमाणे) पर्वताचा राजा अशा त्यांनी सिंहगर्जना करून सांगितले की मला हा समुद्र पार करणे एखाद्या खेळाप्रमाणे आहे.॥4॥
सहित सहाय रावनहि मारी। आनउँ इहाँ त्रिकूट उपारी॥
जामवंत मैं पूँछउँ तोही। उचित सिखावनु दीजहु मोही॥5॥
भावार्थ : रावण आणि त्याच्या सैनिकांना मारून त्रिकुट पर्वत उखडून मी आपल्याकडे आणू शकतो. हे जांबुवंत महाराज, मला आपल्याकडून योग्य ती आज्ञा द्यावी. ॥5॥
एतना करहु तात तुम्ह जाई। सीतहि देखि कहहु सुधि आई॥
तब निज भुज बल राजिवनैना। कौतुक लागि संग कपि सेना॥6॥
भावार्थ : जांबुवंत हनुमंतास म्हणाले, तू फक्त सीतामाईना पाहून त्या खुशाल आहेत ना हे मला येऊन कळव. त्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या सामर्थ्याने सीतामाईंची सुटका करतील व सोबतीस फक्त गम्मत म्हणून वानरसेना घेऊन जातील.॥6॥
त्यानंतर हनुमंतांनी त्यांना जेवढे काम सांगितले होते तेवढेच आज्ञाधारकपणे केले. एवढे शक्तिशाली असून देखील लव-कुश यांच्याकडून स्वतःस बांधून घेतले. सुग्रीव व बिभीषण यांची प्रभू रामचंद्रांशी भेट घडविली. पण कोठेही त्यांनी केलेल्या कामाचा अहंकार केला नाही.
भगवान श्रीकृष्णांचे जीवनही असेच निःसंदेह होते. त्यांचे संपूर्ण जीवन स्वच्छ आणि सरळ होते. कोणत्याही प्रसंगात ते कधीही डगमगले नाहीत अथवा विचलित झाले नाहीत. जरासंधाने मथुरेवर १७ स्वाऱ्या केल्या; एका स्वारीच्या प्रसंगी त्यांना मथुरा सोडून पलायन करणे योग्य वाटले त्यामुळे त्यांनी तसेही केले. या प्रसंगानंतर त्यांचे एक नाव रणछोडदास असे पडले.
या संदर्भात, संत कबीरदासजींचे एक सुंदर भजन गायिले गेले -
संतो सहज समाधि भली ।
साईं ते मिलन भयो जा दिन ते सुरत न अन्त चली ।।१।।
आँख न मूँदूँ कान न रूँधूँ काया कष्ट न धारूँ ।
खुले नैन मैं हँस-हँस देखूँ सुंदर रूप निहारूँ ।।२।।
कहूँ सो नाम सुनूँ सो सुमिरन जो कछु करूँ सो पूजा ।
गिरह उध्यान एक सम देखूँ भाव मिटाऊँ दूजा ।।३।।
जहँ-जहँ जाऊँ सोई परिकरमा जो कछु करूँ सो सेवा ।
जब सोऊँ तब करूँ दण्दवत पूजूँ और न देवा ।।४।।
शब्द निरंतर मनुआ राता मलिन बचन का त्यागी ।
उठत-बैठत कबहुँ न बिसरै ऐसी तारी लागी ।।५।।
कहै 'कबीर' यह उनमुनि रहनी सो परगट कर गाई ।
सुख-दुख के इक परे परम सुख तेहि में रहा समाई ।।६।।
भगवंतांच्या भक्तीमध्ये संत कबीरांची जी उन्मनी अवस्था झाली तिचे वर्णन या भजनातून येते. उन्मनी अवस्थेत त्यांना भगवंतांशिवाय काही दुसरे सुचत नाही. काही करण्यापेक्षा न करणे, खाण्यापेक्षा न खाणे, निद्रेप्रेक्षा जागृत राहणे किंवा बोलण्यापेक्षा न बोलणे अशी वृत्ती जेंव्हा बनते, तेंव्हा उन्मनी अवस्था येते.
लालाजी नावाचे एक सूफी संत होते. त्यांना एकदा आपल्या गुरूंना भेटावयास जायचे होते. गुरूंना भेटण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावयाची होती. वाटेत मुसळधार पाऊस आला. त्यात त्यांचे सर्व कपडे भिजले. अशा कपड्यात गुरूंकडे कसे जायचे म्हणून त्यांनी मोठ्या प्रयासाने कपडे वाळवले व त्यानंतर निघाले. गुरूंच्या जवळ आले असताना त्यांनी दुरूनच असे पाहिले की गुरू एका ओढ्याच्या काठी अर्धनिद्रित व समाधी अवस्थेत आहेत. त्यांना लगेच समजले की ही गुरूंची उन्मनी अवस्था आहे व ती भंग करणे त्यांना योग्य वाटले नाही. ते तसेच गुरूंना न भेटता आपल्या गावी परतले. गावातील लोकांना आश्चर्य वाटले की एवढे कष्ट करून, महाराज गुरूंना न भेटताच परत आले. महाराज परत २-३ दिवसांनी गुरूंना भेटण्यास गेले. गुरूंना त्यांना पाहून अतिशय आनंद झाला व ते त्यांना म्हणाले, "हे शिष्य, मी तुझ्यावर व तुझ्या भक्तीवर अतिशय प्रसन्न आहे. तू यापूर्वी आल्याचे मला कळले होते". असे म्हणून त्यांनी त्यास आशीर्वाद दिले.
उन्मनी स्थितीवर एक शेर असा आहे-
जब दिल को नींद आ जाती है और रुह भी गाफील हो जाती है|
तब मैं भी अकेला होता हूँ और मेरे यार की महफिल होती है||
ही स्थिती त्रिगुणांपलीकडे गेलेल्यांची असते. फक्त भगवंतांशी तादात्म्य असते.
जसे आपल्याला दोन अधिक दोन म्हणजे चार याचा जास्त विचार करावा लागत नाही त्याप्रमाणेच "मेधावी छिन्नसंशयः" असणाऱ्या व्यक्तीस संसारविषयक व अध्यात्मविषयक ज्ञानाबद्दल काहीच संशय नसतो, त्याला सर्व काही साफ दिसत असते. त्याला विहित कर्म काय किंवा निषिद्ध कर्म काय याबद्दल संभ्रम नसतो.
भगवंत जेंव्हा पाषाणरूपी अहिल्येजवळ पोहोचले तेंव्हा त्यांना क्षणभरही विचार करावा लागला नाही व त्यांनी पदस्पर्श करताच त्या पाषाणरूपी अहिल्येस मुक्ती मिळाली. प्रभू रामचंद्रांनी मारीच राक्षसाचा वध केला नाही, कारण तो पुढे कामास येणार होता परंतु खरदूषणाचा मात्र वध केला.
याच संदर्भात, रामचरितमानसातील किष्किंधाकांडात हनुमंतांची गोष्ट येते. हनुमंत अतिशय बुद्धिमान होते. परंतु कर्तव्य पालनातही दक्ष होते. त्यांना आपल्या कर्तव्य-कर्मांबद्दल कोणताही संभ्रम नव्हता. जेंव्हा त्यांना समुद्र उल्लंघून लंकेत असलेल्या सीतामाईंना प्रभू रामचंद्रांचे कुशल कळवायचे होते, तेंव्हा त्या कार्याची माहिती असून देखील जांबुवंतांकडून आज्ञा मिळेपर्यंत ते गप्प राहिले.
त्या वेळच्या परिस्थितीचे वर्णन किष्किंधा कांडातील खालील दोहे/चौपाई यांतून आले आहे. त्यामधून कर्तव्यदक्ष हनुमंतांची ओळख पटते. सर्व कर्मे करताना देखील त्यात ते लिप्त होत नाहीत व १२ व्या अध्यायात सांगितलेल्या "सर्वारंभपरित्यागी" याचे ते मूर्तिमंत प्रतीक आहेत.
अस कहि गरुड़ गीध जब गयऊ। तिन्ह के मन अति बिसमय भयऊ॥
निज निज बल सब काहूँ भाषा। पार जाइ कर संसय राखा॥3॥
भावार्थ: तेंव्हा त्या वानरांच्या मनात आश्चर्य दाटले. सर्वानी आपापले बळ किती आहे याचे वर्णन केले परंतु समुद्र पार करण्याबाबत त्यांच्या मनात संशय होता.॥3॥निज निज बल सब काहूँ भाषा। पार जाइ कर संसय राखा॥3॥
जरठ भयउँ अब कहइ रिछेसा। नहिं तन रहा प्रथम बल लेसा॥
जबहिं त्रिबिक्रम भए खरारी। तब मैं तरुन रहेउँ बल भारी॥4॥भावार्थ : जांबुवंत म्हणाले की मी आता म्हातारा झालो आहे व माझ्यात पहिल्यासारखे बळ उरले नाही. जेंव्हा खराचा नाश करणारे प्रभू रामचंद्र वामन बनले होते, तेंव्हा मी तरुण व शक्तीशाली होतो ॥4॥
दोहा :
बलि बाँधत प्रभु बाढ़ेउ सो तनु बरनि न जाइ।
उभय घरी महँ दीन्हीं सात प्रदच्छिन धाइ॥29॥
भावार्थ : बलीस बांधताना प्रभूंनी आपले शरीर एवढे मोठे केले तरी मी त्याच्या सात प्रदक्षिणा क्षणातच घातल्या॥29॥
चौपाई :
अंगद कहइ जाउँ मैं पारा। जियँ संसय कछु फिरती बारा॥
जामवंत कह तुम्ह सब लायक। पठइअ किमि सबही कर नायक॥1॥
भावार्थ : अंगदाने म्हंटले की मी समुद्र तर पार करू शकेन परंतु माझ्या परत येण्याची खात्री नाही. त्यावर जांबुवंत म्हणाले की, "अंगदा, तू तर सर्व वानरांचा प्रमुख आहेस, मी तुला कसे पाठवू?"॥1॥
कहइ रीछपति सुनु हनुमाना। का चुप साधि रहेहु बलवाना॥
पवन तनय बल पवन समाना। बुधि बिबेक बिग्यान निधाना॥2॥
भावार्थ : जांबुवंत म्हणाले, हे हनुमंत, तू तर काहीच बोलत नाहीस, तू चूप का आहेस? तू पवनपुत्र आणि बलशाली आहेस. शिवाय विवेक आणि बुद्धी यांची खाण आहेस.॥2॥
कवन सो काज कठिन जग माहीं। जो नहिं होइ तात तुम्ह पाहीं॥
राम काज लगि तव अवतारा। सुनतहिं भयउ पर्बताकारा॥3॥
भावार्थ : या जगात कोणतेच असे काम नाही की तू जे करू शकत नाहीस. प्रभू रामचंद्रांच्याच कार्यासाठी तुझा जन्म झाला आहे. हे ऐकताच हनुमंत एखाद्या पर्वताप्रमाणे विशालकाय झाले.
॥3॥
कनक बरन तन तेज बिराजा। मानहुँ अपर गिरिन्ह कर राजा॥
सिंहनाद करि बारहिं बारा। लीलहिं नाघउँ जलनिधि खारा॥4॥
भावार्थ : हनुमानजींचा रंग सोन्याप्रमाणे होता व शरीरावर अत्यंत तेज होते. जणू काही (सुमेरूप्रमाणे) पर्वताचा राजा अशा त्यांनी सिंहगर्जना करून सांगितले की मला हा समुद्र पार करणे एखाद्या खेळाप्रमाणे आहे.॥4॥
सहित सहाय रावनहि मारी। आनउँ इहाँ त्रिकूट उपारी॥
जामवंत मैं पूँछउँ तोही। उचित सिखावनु दीजहु मोही॥5॥
भावार्थ : रावण आणि त्याच्या सैनिकांना मारून त्रिकुट पर्वत उखडून मी आपल्याकडे आणू शकतो. हे जांबुवंत महाराज, मला आपल्याकडून योग्य ती आज्ञा द्यावी. ॥5॥
एतना करहु तात तुम्ह जाई। सीतहि देखि कहहु सुधि आई॥
तब निज भुज बल राजिवनैना। कौतुक लागि संग कपि सेना॥6॥
भावार्थ : जांबुवंत हनुमंतास म्हणाले, तू फक्त सीतामाईना पाहून त्या खुशाल आहेत ना हे मला येऊन कळव. त्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या सामर्थ्याने सीतामाईंची सुटका करतील व सोबतीस फक्त गम्मत म्हणून वानरसेना घेऊन जातील.॥6॥
त्यानंतर हनुमंतांनी त्यांना जेवढे काम सांगितले होते तेवढेच आज्ञाधारकपणे केले. एवढे शक्तिशाली असून देखील लव-कुश यांच्याकडून स्वतःस बांधून घेतले. सुग्रीव व बिभीषण यांची प्रभू रामचंद्रांशी भेट घडविली. पण कोठेही त्यांनी केलेल्या कामाचा अहंकार केला नाही.
भगवान श्रीकृष्णांचे जीवनही असेच निःसंदेह होते. त्यांचे संपूर्ण जीवन स्वच्छ आणि सरळ होते. कोणत्याही प्रसंगात ते कधीही डगमगले नाहीत अथवा विचलित झाले नाहीत. जरासंधाने मथुरेवर १७ स्वाऱ्या केल्या; एका स्वारीच्या प्रसंगी त्यांना मथुरा सोडून पलायन करणे योग्य वाटले त्यामुळे त्यांनी तसेही केले. या प्रसंगानंतर त्यांचे एक नाव रणछोडदास असे पडले.
या संदर्भात, संत कबीरदासजींचे एक सुंदर भजन गायिले गेले -
संतो सहज समाधि भली ।
साईं ते मिलन भयो जा दिन ते सुरत न अन्त चली ।।१।।
आँख न मूँदूँ कान न रूँधूँ काया कष्ट न धारूँ ।
खुले नैन मैं हँस-हँस देखूँ सुंदर रूप निहारूँ ।।२।।
कहूँ सो नाम सुनूँ सो सुमिरन जो कछु करूँ सो पूजा ।
गिरह उध्यान एक सम देखूँ भाव मिटाऊँ दूजा ।।३।।
जहँ-जहँ जाऊँ सोई परिकरमा जो कछु करूँ सो सेवा ।
जब सोऊँ तब करूँ दण्दवत पूजूँ और न देवा ।।४।।
शब्द निरंतर मनुआ राता मलिन बचन का त्यागी ।
उठत-बैठत कबहुँ न बिसरै ऐसी तारी लागी ।।५।।
कहै 'कबीर' यह उनमुनि रहनी सो परगट कर गाई ।
सुख-दुख के इक परे परम सुख तेहि में रहा समाई ।।६।।
भगवंतांच्या भक्तीमध्ये संत कबीरांची जी उन्मनी अवस्था झाली तिचे वर्णन या भजनातून येते. उन्मनी अवस्थेत त्यांना भगवंतांशिवाय काही दुसरे सुचत नाही. काही करण्यापेक्षा न करणे, खाण्यापेक्षा न खाणे, निद्रेप्रेक्षा जागृत राहणे किंवा बोलण्यापेक्षा न बोलणे अशी वृत्ती जेंव्हा बनते, तेंव्हा उन्मनी अवस्था येते.
लालाजी नावाचे एक सूफी संत होते. त्यांना एकदा आपल्या गुरूंना भेटावयास जायचे होते. गुरूंना भेटण्यासाठी अनेक मैलांची पायपीट करावयाची होती. वाटेत मुसळधार पाऊस आला. त्यात त्यांचे सर्व कपडे भिजले. अशा कपड्यात गुरूंकडे कसे जायचे म्हणून त्यांनी मोठ्या प्रयासाने कपडे वाळवले व त्यानंतर निघाले. गुरूंच्या जवळ आले असताना त्यांनी दुरूनच असे पाहिले की गुरू एका ओढ्याच्या काठी अर्धनिद्रित व समाधी अवस्थेत आहेत. त्यांना लगेच समजले की ही गुरूंची उन्मनी अवस्था आहे व ती भंग करणे त्यांना योग्य वाटले नाही. ते तसेच गुरूंना न भेटता आपल्या गावी परतले. गावातील लोकांना आश्चर्य वाटले की एवढे कष्ट करून, महाराज गुरूंना न भेटताच परत आले. महाराज परत २-३ दिवसांनी गुरूंना भेटण्यास गेले. गुरूंना त्यांना पाहून अतिशय आनंद झाला व ते त्यांना म्हणाले, "हे शिष्य, मी तुझ्यावर व तुझ्या भक्तीवर अतिशय प्रसन्न आहे. तू यापूर्वी आल्याचे मला कळले होते". असे म्हणून त्यांनी त्यास आशीर्वाद दिले.
उन्मनी स्थितीवर एक शेर असा आहे-
जब दिल को नींद आ जाती है और रुह भी गाफील हो जाती है|
तब मैं भी अकेला होता हूँ और मेरे यार की महफिल होती है||
ही स्थिती त्रिगुणांपलीकडे गेलेल्यांची असते. फक्त भगवंतांशी तादात्म्य असते.
न हि देहभृता शक्यं(न्), त्यक्तुं(ङ्) कर्माण्यशेषतः।
यस्तु कर्मफलत्यागी, स त्यागीत्यभिधीयते॥18.11॥
कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे, तोच त्यागी आहे, असे म्हटले जाते.
शरीरधारी व्यक्तींकडून सर्व कर्मांचा पूर्णपणे त्याग होणे शक्य नाही. पण कर्मांच्या (कर्मफळाच्या) आसक्तीचा त्याग करावा. अध्यात्म मार्गात असलेले काही जण म्हणतात मी काही गोष्टींचा त्याग केला आहे पण त्यांचे मन त्या वस्तूंमधून पूर्णपणे निघत नाही.
भगवान बुध्दांना त्यांचे दोन शिष्य एकदा भेटावयास निघाले होते. वाटेत एक नदी पार करावयाची होती. पहिला शिष्य थोडा पुढे गेला. दुसरा मागून येत असता त्याने नदीमध्ये काहीतरी हालचाल पहिली. नदीजवळ गेल्यानंतर त्याने पाहिले की एक युवती नदीच्या पाण्यात बुडत आहे व मदतीसाठी हाक मारत आहे. त्याने क्षणाचाही विचार न करता नदीत बुडी मारली व तिला खांद्यावर घेऊन नदी पार केली व सुरक्षित जागी नेऊन बसविले. पहिला शिष्य धावत धावत भगवान बुध्दांकडे आधी पोहोचला व त्यांना म्हणाला, "हे तथागत, जे घडू नये ते घडले आहे. माझा जो सहकारी मागून येतो आहे त्याने थोड्या वेळा पूर्वी एका स्त्रीस स्पर्श केला व आपल्या खांद्यावर घेऊन नदीपार आणले. हे ब्रह्मचर्य नियमाविरुद्ध झाले आहे तरी आपण त्यास शासन करावे". दुसऱ्या शिष्यास आल्यावर बुद्धांनी विचारले की काय घडले? त्याने त्या युवतीचे प्राण वाचविण्यासाठी तसे केल्याचे सांगितले. बुद्धांना सर्व समजले व त्यांनी पहिल्या शिष्यास सांगितले, "अरे, तुझ्या सहाध्यायींने योग्य काम केले आहे. त्याने निसंदेहपणे त्या युवतीचे प्राण वाचवून तिला किनाऱ्यावर आणून सोडले. तू मात्र अजून तिचाच विचार करतो आहेस".

अनिष्टमिष्टं(म्) मिश्रं(ञ्) च, त्रिविधं(ङ्) कर्मणः(फ्) फलम्।
भवत्यत्यागिनां(म्) प्रेत्य, न तु सन्न्यासिनां(ङ्) क्वचित्॥18.12॥
कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे तीन प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते; परन्तु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही.
कर्मांचे तीन प्रकार व त्यांच्या फळांच्या स्वरूपांबद्दल येथे विवेचन आहे. संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमाण कर्म हे कर्मांचे तीन प्रकार असतात. मनुष्य जेंव्हा कोणत्याही योनीत जन्म घेतो तेंव्हा त्याचेकडे पूर्वजन्मातून आलेले संचित कर्म असते. हे एखाद्या बँकेमधील खात्यातील कर्ज व जमा याप्रमाणे असते. नवीन जन्मात संचितातील थोडा भाग प्रारब्ध बनून मिळतो. परंतु खात्याचा हिशेब पूर्ण होत नाही. या प्रारब्धास या जन्मातील कर्मानुसार वाढविता किंवा घटविता येते. या वाढविणे व घडविणे अशा क्रिया ज्या कर्मातून होतात ती क्रियमाण कर्मे. ही फक्त मनुष्य योनीतच शक्य होतात. इतर योनींमध्ये नाही. त्या फक्त भोगयोनी म्हंटल्या जातात. त्यामध्ये संचित व प्रारब्धाचा भोग होतो पण क्रियमाण कर्मे होत नाहीत.
प्रारब्ध कर्मांची फळे ३ प्रकारची असतात - इष्ट म्हणजे अनुकूल असे, अनिष्ट म्हणजे प्रतिकूल आणि मिश्र म्हणजे दोन्हींचे मिश्रण असलेले. ही फळे पूर्वजन्माच्या संचितानुसार असतात. मिश्र फळांचे परिणाम अनिश्चित असतात.
या जन्मातील क्रियमाण कर्मांची फळे पुढील जन्मात संचित बनून येतात. क्रियमाण कर्मफलांचे दोन अंश असतात - एक म्हणजे फलांश व दुसरा संस्कार अंश. फलांश दृष्टीस येतो जसे की पाप आणि पुण्य. संस्कार अंश दिसत नाही. तो आपण आचरणात आणतो, जसे की गीताध्ययन करणे, प्रवचने ऐकणे. मनुष्य जन्मातील संस्कारांमुळे हे शक्य होते. आपण चांगली कर्मे केली तर त्यांची फळे म्हणून पुण्य व संस्कार लाभतात. काही फळे दृश्यरूपात मिळतात तर काही अदृश्य रूपात. दृष्ट रूपात मिळणारी फळे तात्कालिक म्हणजे या जन्मातील असतात. तर काही फळे कालांतरित म्हणजे पुढील जन्मात मिळतात. तात्कालिक फळांमध्ये सुद्धा इष्ट, अनिष्ट व मिश्र असे ३ प्रकार आहेत. अदृष्ट फळांमधे लौकिक व अलौकिक असे २ प्रकार आहेत. लौकिक फळामधे परत इष्ट, अनिष्ट व मिश्र असे ३ प्रकार आहेत. तर अलौकिक फळामधे पुनरावृत्ती व नानुवृत्ती असे २ प्रकार आहेत. नानुवृत्तीची फळे कायम स्वरूपी असतात , त्यामध्ये पुनर्जन्म घ्यावा लागत नाही (भगवंतांच्या धामास गेल्यानंतर पृथ्वीलोकात परतावे लागत नाही). पुनरावृत्ती फळांमध्ये स्वर्गप्राप्ती होते परंतु पुण्यसंचय संपल्यानंतर पुनर्जन्म घ्यावा लागतो व परत नवी कर्मे (पाप/पुण्य) करावी लागतात. जन्म-मरणाच्या फेऱ्यात मनुष्य अडकतो. हे कर्मफलांची आसक्ती असल्यामुळे होते. ज्यांना अशी आसक्ती नसते, ते जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटतात.
राजा हरिश्चंद्र, युधिष्ठिर व प्रभू रामचंद्र ह्यांना देखील इष्ट, अनिष्ट व मिश्र फळे मिळाली. परंतु या सर्वानी मानवजातीसाठी चांगले संस्कार दिले. कर्मफळांनी आयुष्य मोजले जात नाही परंतु दिलेल्या संस्कारांमुळे त्याचे सार्थक होते. असे महापुरुष आपल्यासाठी वंदनीय आहेत.
एका गुरुजींचे दोन शिष्य होते. गुरुजी थकल्यामुळे त्यांना आता आपल्या जागी नवीन गुरु नेमायचे होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या या शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले. त्यांनी दोन्ही शिष्यांना ३-३ रुपये दिले व प्रत्येकाला सांगितले की हे ३ रुपये तुला असे खर्च करावयाचे आहेत की यातील १ रुपया येथे कामी येईल, एक रुपया तेथे कामी येईल व एक रुपया ना येथे कामी येईल ना तेथे. व मला परत येऊन ते कसे खर्च केले ते सांगावे.
एक शिष्य लवकरच परत आला व त्याने गुरुजींनी खर्चाबद्दल विचारल्यावर सांगितले की मी १ रुपया या आपल्या आश्रमासाठी दिला (येथे कामी आला), एक रुपयाचे दान केले (तेथे कामी आला) व एक रुपयांची भरपूर पुरी-कचोरी खाल्ली (जो दोन्हीकडे कामी आला नाही). दुसरा शिष्य काही तासानंतर परत आला व त्याने गुरुजींना खर्चाबद्दल सांगितले की मी एक रुपयाची भरपूर पुरी-कचोरी खाल्ल्ली (येथे कामी आला), एक रुपयाचा भंडारा केला व मंदिरातील साधूंना पोटभर पुरी-कचोरी खाऊ घातली (तेथे कामी आला) व एक रुपया नदीत फेकून दिला ( जो दोन्हीकडे कामी आला नाही). गुरुजींनी दुसऱ्या शिष्यास आपले पद दिले कारण त्याला "येथे, तेथे व कुठेच नाही" याचा बरोबर अर्थ समजला होता. पहिल्या शिष्याची गुरुजींना जे अभिप्रेत होते ते समजण्यात गफलत झाली.
आपण जेंव्हा "ॐ पूर्णमदः पूर्णमिदं, पूर्णात् पूर्ण मुदच्यते" हा श्लोक म्हणतो तेंव्हा त्याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.
अर्थ: परब्रह्म परमात्मा सर्व दृष्टींनी पूर्ण आहे. ह्या जगतात तेच पूर्ण ब्रह्म भरलेले आहे कारण परब्रह्म परमात्म्यामुळे त्याची निर्मिती झाली आहे. पूर्ण जगताची उत्पत्ती होऊन सुद्धा परब्रह्म परमात्मा परिपूर्ण आहे. म्हणून त्या पूर्णातून पूर्ण वजा केल्यावरही पूर्णच उरते.

पञ्चैतानि महाबाहो, कारणानि निबोध मे।
साङ्ख्ये कृतान्ते प्रोक्तानि, सिद्धये सर्वकर्मणाम्॥18.13॥
हे महाबाहो सर्व कर्मांच्या सिद्धींची ही पाच कारणे, कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे.
या श्लोकात भगवंतांनी सांख्य शास्त्रामध्ये, कर्मसिद्धीसाठी ५ कारणे असतात असा उल्लेख केला आहे.
अधिष्ठानं(न्) तथा कर्ता, करणं(ञ्) च पृथग्विधम्।
विविधाश्च पृथक्चेष्टा, दैवं (ञ्) चैवात्र पञ्चमम्॥18.14॥
कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच पाचवे कारण दैव आहे.
कर्मसिध्दीची ५ सूत्रे भगवंतांनी या श्लोकात स्पष्ट केली आहेत -
१) अधिष्ठान - कोणतेही कर्म करताना त्याचा उद्देश काय आहे हे जाणणे आवश्यक आहे. ह्यालाच अधिष्ठान असे म्हणतात. तप रावणाने केले होते, ध्रुवाने केले होते व हिरण्यकश्यपूने देखील केले होते पण प्रत्येकाचे उद्दिष्ट वेगळे होते. रावणास आपण पराभूत होऊ नये असे उद्दिष्ट होते, तर हिरण्यकश्यपूस आपण शत्रूस कसे मारू हे. ध्रुवास आपल्याला जिथून कोणीही उठवू शकणार नाही असं अढळपद मिळावे असा उद्देश होता. त्या सर्व अधिष्ठानांची त्यांना वेगवेगळी फळे मिळाली.
२) कर्ता - ज्याच्याकडून कर्म घडते तो कर्ता असतो. अधिष्ठान असेल परंतु कर्ताच जर नसेल तर चालणार नाही.
३) करण - करण म्हणजे कर्म करताना लागणारी साधने. जसे गीता वर्गाचे आयोजन करताना झूम मीटिंग करावी लागते, जवळ मोबाइल फोन किंवा संगणक लागतो. अंतःकरण (मन, बुद्धी, चित्त आणि अहं), बहिर्करण (५ कर्मेंद्रिये व ५ ज्ञानेंद्रिये) व उपकरण (उदः चष्मा, घड्याळ) अशी ३ प्रकारची करणे आहेत.
४) प्रयत्न - बाकी सर्व काही उपलब्ध आहे परंतु जर प्रयत्नच केले नाहीत तर कामे कशी होतील? गीता वर्ग उपलब्ध आहे परंतु मोबाइल किंवा संगणक जर वापरलाच नाही तर वर्गात सहभाग कसा घेता येईल?
५) दैव - सर्व काही आहे परंतु दैवाची साथ नाही. असे झाले तरी कर्मे होऊ शकणार नाहीत पण त्यावर पूर्णपणे अवलंबून रहाणे योग्य नाही. त्याचा भाग फक्त एक पंचमांश आहे हे ध्यानात असावे. आपले दैव कमजोर असेल तर कार्यसिद्धीकरिता प्रयत्न आणखी वाढवावेत.

शरीरवाङ्मनोभिर्यत्, कर्म प्रारभते नरः।
न्याय्यं(म्) वा विपरीतं(म्) वा, पञ्चैते तस्य हेतवः॥18.15॥
मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो, त्याची ही पाचही कारणे असतात.
मन, शरीर आणि वाणीने मनुष्य जी शस्त्रविहित किंवा निषिद्ध अशी कार्ये करतो त्याची वर दिलेली ५ कारणे असतात.
तत्रैवं(म्) सति कर्तारम्, आत्मानं(ङ्) केवलं(न्) तु यः।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्, न स पश्यति दुर्मतिः॥18.16॥
परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही.
असे असताना देखील जो मनुष्य कर्मे पूर्ण होण्यासाठी आत्मा हाच कर्ता आहे असे समजतो, तो अशुद्ध बुद्धीचा व अज्ञानी होय.
यस्य नाहङ्कृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते।
हत्वाऽपि स इमाँल्लोकान्, न हन्ति न निबध्यते॥18.17॥
ज्या माणसाच्या अंत:करणात 'मी कर्ता आहे' असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांत आणि कर्मांत लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही.
कर्मे करताना त्यात मीपणा व लिप्तता नसावी. आपले भाव या प्रार्थनेप्रमाणे असावेत-
कर प्रणाम तेरे चरणोंमें लगता हूँ अब तेरे काज।
पालन करनेको आज्ञा तव मैं नियुक्त होता हूँ आज॥
अर्थ: तुझ्या चरणी वंदन करून, तू नियुक्त केलेल्या कामासाठी व तुझ्या आज्ञापालनासाठी मी तयार झालो आहे.
दोन प्रकारचे भाव असतात. एक अहंकृत ज्यामध्ये कर्तेपणाचा भाव असतो व दुसरा अहंस्फूर्त ज्यामुळे स्वयं स्फुरणेमुळे कर्म होते. जेंव्हा कबीरदासजी म्हणतात की "कहत कबीर सुनो भई साधो" तेंव्हा ते अहंस्फूर्त भावाने म्हंटलेले असते.

ज्ञानं(ञ्) ज्ञेयं(म्) परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना।
करणं(ङ्) कर्म कर्तेति, त्रिविधः(ख्) कर्मसङ्ग्रहः॥18.18॥
ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.
या श्लोकात भगवंत कर्मप्रेरणा व कर्मसंग्रह ह्या दोन सिध्दांतांबद्दल सांगतात. कर्मप्रेरणा (सूक्ष्म) ही ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय ह्या तीन गोष्टींमुळे होते तर कर्मसंग्रह (स्थूल) हा कर्ता, करण आणि कर्म या तिन्हीमुळे असतो. उदाहरणार्थ, जिलबी (ज्ञेय) गोड व चविष्ट (ज्ञान) असते (ज्ञाता) ही कर्मप्रेरणा आहे. परंतु जिलबी खाण्यासाठी दुकानात जावे लागेल व आपल्या इंद्रियांचा (मुख/जिह्वा) उपयोग करून खावी लागेल. हे कर्म-संग्रहामुळे होते.
पुढील सत्रात ज्ञान. कर्म व कर्ता याबद्दल अधिक विवेचन येईल.
"हरी शरणं" चे नामसंकीर्तन करून येथे सत्राचे समापन झाले.
१) अरविंद दत्ता जी
प्रश्न: हनुमानचालिसा मधे तुलसीदासजी हनुमंतास एका दोह्यातून विनंती करतात की आपल्याप्रमाणे रामजी माझ्या हृदयात वास करोत. तेथे दोहा म्हणताना आपले नाव तुलसीदासांच्या जागी घेतले तर चालेल काय?
उत्तर: असे करणे योग्य नाही. हे तुलसीदासांसारख्या थोर संताचे भाव आहेत. त्याची आपल्याशी तुलना होणार नाही. कोण्या महान व्यक्तीस जसे आपण भेटावयास जातो तेंव्हा मध्यस्थाचा संदर्भ देतो, ज्यास ती व्यक्ती ओळखत असते.
२) माया सक्सेना जी
प्रश्न: १६ व्या श्लोकाचा अर्थ नीट समजला नाही. तो स्पष्ट कराल काय?
उत्तर: येथे भगवंतांना असे सांगायचे आहे की कोणतेही कर्म करताना जो कर्तेपणाचा भाव ठेऊन करतो तो अज्ञानी असतो. हे सर्व आपले शरीर करीत आहे पण मी हे सतत बदलणारे शरीर नाही तर न बदलणारे आत्मतत्व आहे, हे समजणे हे ज्ञान आहे.
३) विमलकुमार गोएंका जी
प्रश्न: ९ व्या श्लोकात कर्माची आसक्ती व कर्मफळाची आसक्ती असे विवेचनात आले आहे, ते स्पष्ट कराल काय?
उत्तर: हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल. जसे मी दरवर्षी दानामध्ये गरिबांना पांघरुणांचे वाटप करतो असा भाव म्हणजे कर्माबद्दल आसक्ती असणे. मी रसगुल्ला खातो व त्याचा स्वाद मला खूप आवडतो, हे झाले कर्मफळाबद्दलच्या आसक्तीचे उदाहरण.
४) कांता धवन जी
प्रश्न: अनिष्ट कर्म म्हणजे काय?
उत्तर: मला जे अभिप्रेत नाही असे कर्म म्हणजे अनिष्ट कर्म. उदाहरणार्थ, मला नावडता शेजारी असणे.
५) दिव्या शर्मा जी
प्रश्न: "मृतात्मा" याचा अर्थ काय आहे?
उत्तर: हा शब्द चुकीचा आहे. आत्म्यास मरण नाही. त्याऐवजी "दिवंगत" आत्मा असा उल्लेख योग्य आहे.
६) सदानंद कवीश्वर जी
प्रश्न: "हरी शरणं" या नामसंकीर्तनात कधी कधी आपण हरी शरणौ असेही म्हणता. याचे कारण काय?
उत्तर: हे दोन्हीही बरोबर शब्द आहेत. संगीताच्या दृष्टीने असे म्हंटले जाते.
७) देवराज गोयल जी
प्रश्न: आपण गांधीजींच्या साधेपणाचे उदाहरण दिले आहे. प्रत्यक्षात साधे जीवन जगणे अवघड आहे व धर्मपालनात अनेक अडचणी येतात. त्यासाठी काय करावे?
उत्तर: भगवंतांनी ६ व्या अध्यायात म्हंटले आहे-
अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते|
निरंतर प्रयत्न व विषयांपासून निवृत्ती यामुळेच आपली वृत्ती बदलेल. थोड्या प्रयत्नांनी काही होणार नाही.
प्रश्न: आपल्या कर्मांचा हिशेब याच जन्मी का होत नाही?
उत्तर: आपण अनेक कर्मे एका जन्मात करतो त्याची निरनिराळी फळे मिळतात. एका जन्मात ती भोगण्यासाठी पुरी नाहीत. त्यासाठी पुनर्जन्म घ्यावा लागतो.
८) प्रल्हाद सिंग जी
प्रश्न: शुभ कार्यात कोणी अडसर आणू लागला तर काय केले पाहिजे?
उत्तर: यासाठी कर्म करण्यापूर्वीच त्याची योजना तयार हवी. त्यासाठी काय साधने लागतील, कोणाची साथ लागेल इत्यादी विचार केला पाहिजे.
९) जया पै जी
प्रश्न: आपण म्हणतो की शरीर सर्व कार्ये करते, आत्मा साक्षी असतो व जे करतो ते भगवंतास अर्पण करावे. मग चुकीचे काम केले तर ते आपल्याला त्याचा परिणाम का भोगावा लागतो?
उत्तर: आपण मनात कामना व वासना ठेऊन कामे केली नाहीत तर आपल्या हातून निषिद्ध कर्मे होणार नाहीत. चुकीची कर्मे अशा कामनांमुळेच होतात. युधिष्ठिर महाराजांनाही त्यांच्या द्यूत खेळण्याच्या सूक्ष्म वासनेमुळे कंकाचे द्यूत खेळण्याचे काम करावे लागले होते.
१०) गायत्री सिंग जी
प्रश्न: प्रारब्ध व क्रियमाण कर्मांबद्दल आपण सांगितले. प्रारब्धाची फळे आपणास याच जन्मी भोगावी लागतात का?
उत्तर: प्रारब्ध कोणाला चुकले नाही. महापुरुषांना देखील त्यांच्या प्रारब्धामुळे अनेक व्याधी भोगाव्या लागतात. प्रारब्धास टाळण्याची शक्ती भगवंतांनी मनुष्यास दिलेली नाही.
प्रश्न: कर्मे करताना नियम पालनाचा आग्रह म्हणजे आसक्ती आहे काय?
उत्तर: जेंव्हा भोगांबद्दल आसक्ती नाहीशी होते तेंव्हा नियमांची आसक्ती रहात नाही. आपली नियत कर्तव्य-कर्मे कधी टाळू नयेत.
११) मनीषा शर्मा जी
प्रश्न: उन्मनी वृत्ती म्हणजे काय?
उत्तर: अशी वृत्ती फक्त साधू-संतांनाच प्राप्त होते. ते भगवंताशी एकरूप झालेले असतात. वरवर अचेतन दिसत असले तरी त्यांच्यामध्ये चेतना असते.
परंतु नशा केल्यानंतर जी अवस्था येते ती उन्मनी नसते. ते तामसी वृत्तीचे स्वरूप असते.

प्रश्नोत्तर सत्र