विवेचन सारांश
गुणांच्या आधारे ज्ञान, कर्म आणि कर्त्याचा विचार
प्रथेप्रमाणे आरंभीची प्रार्थना आणि दीपप्रज्वलन झाले. यानंतर गुरुवंदना करण्यात आली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः| गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः||
आपण अठराव्या अध्यायाचे चिंतन करत आहोत. भगवान श्रीकृष्ण स्वतः हे अत्यंत गूढ ज्ञान आपल्याला देत आहेत. सोळाव्या श्लोकापर्यंत आपण मागल्या वेळी पाहिले. आता पुढे पाहू.

18.16
तत्रैवं(म्) सति कर्तारम्, आत्मानं(ङ्) केवलं(न्) तु यः।
पश्यत्यकृतबुद्धित्वान्, न स पश्यति दुर्मतिः॥18.16॥
परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्धस्वरूप आत्म्याला कर्ता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही.
18.16 writeup
यस्य नाहङ्कृतो भावो, बुद्धिर्यस्य न लिप्यते।
हत्वाऽपि स इमाँल्लोकान्, न हन्ति न निबध्यते॥18.17॥
ज्या माणसाच्या अंत:करणात 'मी कर्ता आहे' असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थांत आणि कर्मांत लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही.
भगवंत ही गोष्ट विशेष करून अर्जुनाला सांगत आहेत. भगवंतांचा हा उपदेश शब्दशः सर्व परिस्थितीमध्ये सर्वांना लागू होत नाही. इथे भगवंत अर्जुनाला युद्धप्रसंगी हा उपदेश करत आहेत. अर्जुन योद्धा आहे. त्याला यातील काही गोष्टी लागू पडतात.
इस्रायल आणि पॅलेस्टिनी संघर्ष आता आपण पाहतो आहोत. इस्रायलने प्रत्युत्तर देणे योग्य आहे का, अशा पद्धतीने उत्तर देणे योग्य आहे का असा प्रश्न आपल्यापैकी काहींना पडतो. परंतु हमास सारख्या दहशतवादी संघटनेला पॅलेस्टिनी जनतेने साथ दिलेली आहे. हमासने मुले आणि स्त्रियांची हत्या केली आहे.
महाभारत युद्धात भीष्म पितामह जरी पूज्य असले तरी ते अधर्माने वागणाऱ्या कौरवांची साथ देत आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण करणाऱ्या दुःशासनासारख्या दुराचारी लोकांबरोबर भीष्म आणि द्रोणाचार्य उभे आहते त्यामुळे त्यांचे पारिपत्य करणे उचित ठरते हेच भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. ते अर्जुनाला हे कृत्य कर्तव्य भावनेने करावयास सांगतात. अकराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला म्हणाले होते -
भगवंत अर्जुनाला वैर न बाळगता कर्तव्य म्हणून शत्रूंना मारण्यास सांगतात. शत्रूंना मारणे हे क्षत्रियाचे, सैनिकाचे कर्तव्य असते म्हणून त्याने ते करावे.
अकराव्या अध्यायात अखेरीस भगवंत म्हणतात -
सैनिकाने जर त्याचे युद्धकर्तव्य केले नाही तर दहशतवादी निरपराध महिला, मुले यांचीही हत्या करतात त्यामुळे त्यांचा वेळीच समाचार घेणे योग्य ठरते. इतकेच नाही तर त्यांना साथ देणाऱ्यांना देखील मारावे लागते. पण हे सर्व करताना, त्या कर्मात लिप्त होऊ नकोस असे भगवंत अर्जुनाला सांगतात. देहाद्वारे केलेली कर्मे जेंव्हा समाजकल्याणासाठी केली जातात तेंव्हा त्यांचा दोष लागत नाही.

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व,
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव,
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥११.३३॥
म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची! तू फक्त निमित्तमात्रच हो.जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव,
निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥११.३३॥
भगवंत अर्जुनाला वैर न बाळगता कर्तव्य म्हणून शत्रूंना मारण्यास सांगतात. शत्रूंना मारणे हे क्षत्रियाचे, सैनिकाचे कर्तव्य असते म्हणून त्याने ते करावे.
अकराव्या अध्यायात अखेरीस भगवंत म्हणतात -
मत्कर्मकृन्मत्परमो, मद्भक्तः सङ्गवर्जितः।
निर्वैरः सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव॥११.५५॥
हे अर्जुना! केवळ माझ्याचसाठी सर्व कर्तव्यकर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा, असा माझा भक्त जो आसक्तिरहित असतो आणि सर्व प्राणिमात्राविषयी वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मलाच प्राप्त होतो.निर्वैरः सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव॥११.५५॥
सैनिकाने जर त्याचे युद्धकर्तव्य केले नाही तर दहशतवादी निरपराध महिला, मुले यांचीही हत्या करतात त्यामुळे त्यांचा वेळीच समाचार घेणे योग्य ठरते. इतकेच नाही तर त्यांना साथ देणाऱ्यांना देखील मारावे लागते. पण हे सर्व करताना, त्या कर्मात लिप्त होऊ नकोस असे भगवंत अर्जुनाला सांगतात. देहाद्वारे केलेली कर्मे जेंव्हा समाजकल्याणासाठी केली जातात तेंव्हा त्यांचा दोष लागत नाही.
ज्ञानं(ञ्) ज्ञेयं(म्) परिज्ञाता, त्रिविधा कर्मचोदना।
करणं(ङ्) कर्म कर्तेति, त्रिविधः(ख्) कर्मसङ्ग्रहः॥18.18॥
ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या तीन प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत. आणि कर्ता करण तसेच क्रिया हे तीन प्रकारचे कर्मसंग्रह आहेत.
कर्म दोन स्तरांवर घडते. आपल्याला कुठे बाहेरगावी प्रवासाला जायचे असेल तर प्रथम याचे चिंतन मनात होते. कुठे जावे, कसे जावे, तारीख काय असावी, कोणाबरोबर जावे हे सर्व मनात ठरते. नंतर हे विचार प्रत्यक्षात येतात, हा कर्माचा दुसरा स्तर आहे. जोवर मनात विचार संपूर्ण आकार घेत नाही तोवर कित्येकदा बाहेर कोणालाही त्याची कल्पना देखील नसते.
तहान लागते तेंव्हा त्याची जाणीव पहिल्यांदा मनात होते, मेंदूला त्याचा संदेश जातो. बुद्धी पाण्याने तहान भागेल याचा निर्णय घेते. इथे तहान लागणे हे ज्ञान आहे आणि पाणी हे ज्ञेय होय; हे सर्व जाणणारे आपण आहोत. डोळे बघतात तेंव्हा बघणारा आत बसलेला असतो. तो ज्ञाता होय. ज्ञान, ज्ञेय, ज्ञाता हे सर्व देहाच्या आत आहेत. हे दिसत नाहीत. कर्म जेंव्हा घडते तेंव्हा ते दिसते. इंद्रियांच्या सहाय्याने कर्म होते तेंव्हा ते दिसते. तहान भागवण्यासाठी आपण चालत माठापर्यंत जातो आणि पाणी पितो. हे कर्म कर्त्यामुळे घडते. इंद्रियांद्वारे होणारी क्रिया कर्ताच करत असतो. हा कर्ता कोण याचे ज्ञान होणे आवश्यक आहे. जेंव्हा हे ज्ञान होते तेंव्हा तोच कर्ता अकर्ता होऊ शकतो. कर्म करणारा देह नाही तर आत्मा आहे, देह केवळ माध्यम आहे हे समजू लागते. हे ज्ञान झाले की मग होणारे कर्म आत्म्याच्या धारणेसाठी देहाद्वारे केले जाते.

ज्ञानं(ङ्) कर्म च कर्ता च, त्रिधैव गुणभेदतः।
प्रोच्यते गुणसङ्ख्याने, यथावच्छृणु तान्यपि॥18.19॥
गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने तीन-तीन प्रकारचेच सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक.
देह प्रकृतीद्वारे बनलेला आहे. यात नाक, कान, जिव्हा, डोळे, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये येतात; हात, पाय, तोंड, आणि उत्सर्जनाची दोन इंद्रिये मिळून पाच कर्मेंद्रिये येतात. शिवाय मन, बुद्धी अहंकार ही सूक्ष्म तत्वे येतात. ही सर्व तत्वे जड प्रकृतीचा भाग आहेत. झाड उगवते, वाढते. परंतु झाड मूलतः जड प्रकृतीपासून बनते. तसेच देह देखील जड प्रकृतीपासून बनलेला असतो. चैतन्यतत्त्वाने तो चलायमान होतो. जोवर देहात चैतन्य असते तोवर तो क्रियमाण असतो.
जड प्रकृती त्रिगुणात्मक देखील आहे. चौदाव्या अध्यायातील गुणत्रयविभागयोगात याचे विस्ताराने वर्णन भगवंतांनी केलेले आहे. जे सुप्त असते ते तामस होय. जे थोडे जागृत असते पण ज्ञान नसते, जिथे द्वंद्व असते ते राजस होय. जे संपूर्ण जागृत आणि ज्ञानी असते, जिथे द्वंद्व पूर्ण समाप्त होते ते सात्विक होय. भगवंत सांगतात याच तीन गुणांनुसार ज्ञान, कर्म आणि कर्ता यांच्यात भेद निर्माण होतात. या गुणांची व्याख्या भगवंत पुढे करतात.

सर्वभूतेषु येनैकं(म्), भावमव्ययमीक्षते।
अविभक्तं(म्) विभक्तेषु, तज्ज्ञानं(म्) विद्धि सात्त्विकम्॥18.20॥
ज्या ज्ञानामुळे माणूस "निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावाने भरून राहिला आहे", असे पाहतो, ते ज्ञान तू सात्त्विक आहे, असे जाण.
समुद्रात लाटा निर्माण होतात. त्यांना लाटा म्हटले तरी तो समुद्रच असतो. घटात दिसणारे आकाश आणि बाहेरील आकाश एकच असते, ते दिसते फक्त भिन्न. घट फुटताच घटाकाश आणि बाहेरील आकाश एक झालेले दिसते. तद्वत एकच परमात्मतत्त्व सर्व भूतांमध्ये आत्मरूपात दिसते. हे ज्ञान म्हणजे सात्त्विक ज्ञान होय.
संत ज्ञानेश्वरांनी इथे सूर्याचे सुंदर उदाहरण दिले आहे. सूर्य कधी अंधार शोधण्यास गेला तर त्याला अंधार कधीच सापडणार नाही. प्रकाश नसणे म्हणजे अंधार. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार कधीच असू शकत नाही. आपण कधी आपली सावली पकडू शकत नाही, किंवा आपण आरशातील आपल्या प्रतिबिंबाला कधी आलिंगन देऊ शकत नाही. आपली सावली आपल्यामुळेच असते, ती आपल्यापासून वेगळी होऊ शकत नाही. आपण स्वतःच्या प्रतिमेला कधीच आलिंगन देऊ शकत नाही कारण त्या प्रतिमेचे अस्तित्व आपल्यावर अवलंबून असते. सूर्याची किरणे सूर्यापासून अलग होऊ शकत नाहीत. तसेच सर्व भूतांच्या ठायी एकच परमात्मतत्त्व वसलेले आहे हे ज्ञानी जाणतो. हे जो जाणतो तो सर्वांप्रती अद्वेष्टा होतो - अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । सर्वांप्रती त्याच्या मनात मैत्रीचा भाव निर्माण होतो. ज्ञान प्रकाश देणारे असते. चौदाव्या अध्यायात भगवंतांनी म्हटलेले आहे -
तत्र सत्त्वं निर्मलत्वात्, प्रकाशकमनामयम् । - सत्त्व गुणाने ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो.

पृथक्त्वेन तु यज्ज्ञानं(न्), नानाभावान्पृथग्विधान्।
वेत्ति सर्वेषु भूतेषु, तज्ज्ञानं(म्) विद्धि राजसम्॥18.21॥
परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारांचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज.
प्रथम आपण सर्वांभूती एकतत्त्व पाहणारे सात्त्विक ज्ञान पाहिले. राजस ज्ञानात सर्वत्र भिन्नतत्त्व दिसते. एखादा कोणी सोने सोनाराला देतो आणि दागिना घडवायला सांगतो. समजा हातात दागिना आल्यावर त्याने माझे सोने कुठे गेले असा प्रश्न सोनाराला विचारला तर सोनार त्याला म्हणेल अरे त्याचाच तर दागिना बनला ना! आता दागिना हातात आलेला मनुष्य तरीही हे माझे सोने नाही असे म्हणू लागला तर ते मूर्खपणाचे ठरेल. राजस ज्ञान असणारा मूळ तत्त्व जाणत नाही. मातीचा घडा बनवल्यावर माती कुठे गेली असे विचारणारा तो घडा मातीचाच बनलेला आहे, हे विसरतो; तो फक्त ते रूप जाणतो.
भूतमात्रांच्या भिन्न भिन्न रूपातून व्यक्त होणारे परमात्मतत्त्व सर्वांच्या ठायी एकच असते हे जाणायला हवे. एका मेणबत्तीच्या सहाय्याने दुसरी मेणबत्ती पेटवल्यावर दोन्ही मेणबत्त्यांचा प्रकाश एक होतो. त्या प्रकाशातून प्रत्येक मेणबत्तीचा प्रकाश वेगळा दाखवता येत नाही. परमात्मतत्त्व असेच एकच असते. ते भिन्न रूपांमधून भिन्न भासते. या भेदातून दृगोचर होते ते राजस ज्ञान होय.

यत्तु कृत्स्नवदेकस्मिन्, कार्ये सक्तमहैतुकम्।
अतत्त्वार्थवदल्पं(ञ्) च, तत्तामसमुदाहृतम्॥18.22॥
परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, तात्त्विक अर्थाने रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हटले गेले आहे.
तामस ज्ञानात कसलीच जिज्ञासा नसते. अज्ञान शब्दात देखील ज्ञान येतेच. ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान. भगवंत तामसी व्यक्तीला ज्ञानशून्य, तुच्छ संबोधतात. अशा व्यक्तीला कसलेच देणे घेणे नसते. त्याला फक्त आसक्ती असते; अशी व्यक्ती अंधारात बुडालेली असते. असे ज्ञान तामस ज्ञान होय.
आता भगवंत सात्त्विक, राजस आणि तामस कर्माची व्याख्या करतात.

नियतं(म्) सङ्गरहितम्, अरागद्वेषतः(ख्) कृतम्।
अफलप्रेप्सुना कर्म, यत्तत्सात्त्विकमुच्यते॥18.23॥
जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्त्विक म्हटले जाते.
आपली कर्मे भगवंतांनी सांगितलेल्या कर्माच्या या कसोटीवर तपासून पाहायला हवीत. यामुळे आपली कर्मे सात्त्विक, राजस की तामस आहेत हे समजेल आणि त्याप्रमाणे आपल्याला सुधारणा करता येईल. हेच भगवद्गीता शिकवते.
वेद, उपनिषदे इत्यादी आपली शास्त्रे आहेत. या शास्त्रांच्या आधारे नियत कर्मे करावयास हवीत. कर्मे करताना कर्तेपणाचा अभिमान बाळगू नये. इथे भगवंत अरागद्वेषतः - असे म्हणतात. राग याचा अर्थ अनुराग, प्रेम, आसक्ती असा इथे अभिप्रेत आहे. कर्म आसक्ती आणि द्वेषरहित, फळाची इच्छा मनात न धरता केलेले असेल तर ते सात्त्विक कर्म होते.
फलाकांक्षेचा त्याग करण्यास गीता वारंवार सांगते. फळ मिळणार नाही असे गीता सांगत नाही. कर्म केले की फळ मिळतेच पण फळाच्या अपेक्षेने कर्म करू नये असे गीता सांगते. आंब्याचे झाड लावल्यावर त्याला फळ येईलच. पण फळ आले की नाही, अजून का आले नाही असे म्हणून जर आपण लावलेले रोप वारंवार उकरून बघू लागलो तर त्याने फक्त एक दिवस ते रोप मरून जाईल. त्याउलट आपण जर आपले रोप लावण्याचे काम केले, त्याला नियमीत पाणी देण्याचे काम केले की यथावकाश त्याला फळ येईलच. रोपाला नियमित पाणी देण्याचे, त्याची काळजी घेण्याचे काम कर्तव्य म्हणून आणि प्रेमाने करत राहिले तर ते कर्म करतानाच आनंद प्राप्त होईल, कर्म करण्याचे समाधान मिळेल. फळ आपल्याला जरी मिळाले नाही तरी पुढच्या पिढीला नक्की मिळेल. पण अपेक्षा ठेवून कर्म केले की कर्माचा देखील नाश होतो.
IIT च्या प्रवेश परीक्षेसाठी दर वर्षी अनेक विद्यार्थी तयारी करतात. प्रवेश मिळावा या हेतूने कसून तयारी करतात आणि मग अपेक्षित यश मिळाले नाही तर काही विद्यार्थी आत्महत्येसारख्या घातक मार्गाचा अवलंब करतात. हे सर्वथा चूक आहे. विद्यार्थी त्वरित यशप्राप्तीची अपेक्षा धरतात. प्रवेश मिळावा ही फळाची अपेक्षा कामगिरीचा निर्देशांक घटवते. अपेक्षेने ताण वाढतो. याउलट मी जो अभ्यास करतो आहे तो ज्ञानवृद्धीसाठी करतो आहे असे ध्येय ठेवले तर त्याने ज्ञानप्राप्ती नक्की होईल. फळाची अपेक्षा शून्य केली तर तणावमुक्त होऊन कार्य करता येते. अर्जुन अत्यंत तणावग्रस्त होता. भगवंतांनी त्याला केलेला उपदेश तणावमुक्त करण्यासाठी केलेला होता. भगवद्गीता समुपदेशनाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे.
ज्या क्षणी विद्यार्थी IIT प्रवेशाचा विचार सोडून ज्ञानवृद्धीवर लक्ष केंद्रित करतो आणि त्यासाठी अभ्यास करू लागतो त्या क्षणी तो तणावमुक्त होऊन कार्य करू लागतो. मग IIT मध्ये प्रवेश देखील मिळतो. जोवर फळाच्या मागे धावत राहतो तोवर फळ दूर जाते. असेच साधकाने साधनेत आनंद घ्यायला हवा. साधना निरपेक्ष भावनेने, प्रार्थनास्वरूप करायला हवी. साध्य आपोआप हाती येते.
आपल्या मुलांचे संगोपन करताना जर पालकांनी हा मुलगा मोठा होऊन आपला सांभाळ करेल या अपेक्षेने केले तर अखेरीस दुःख पदरी येऊ शकते. मुलगा मोठा होऊन परदेशी गेला आणि तेथेच स्थायिक झाला तर आई वडिलांना त्याचा आधार मिळत नाही. मग अपेक्षाभंगाचे दुःख पदरी येते. याउलट मुलाचे संगोपन आपले कर्तव्य आहे, याउपर कसलीही अपेक्षा न ठेवता केले तर परदेशी स्थायिक झालेला मुलगा चार दिवस जरी भेटीसाठी आला तरी पालकांना आनंद मिळतो.
अपेक्षा अंतिमतः दुःखालाच कारणीभूत होते हेच भगवंत वारंवार गीतेत सांगत आहेत. अपेक्षेशिवाय केलेले कार्य अत्यंत आनंद देणारे असते. गीतापरिवारात सेवाकार्य करणारे कित्येक स्वयंसेवक कसल्याही अपेक्षेशिवाय सेवा देत आहेत. त्यांना प्रसिद्धीची, काही प्राप्त करण्याची कसलीही अपेक्षा नाही. ते फक्त सेवाकार्याचा आनंद घेत आहेत. सेवाभावाने केलेले कार्य attention वाढवते. अपेक्षेने केलेले कार्य केवळ tension ला कारणीभूत ठरते. जीवनाच्या ABCD मध्ये B म्हणजे Birth आणि D म्हणजे Death. या दोन्हींच्या मध्ये C Choice चा येतो. कर्म कसे करावे याचा निर्णय, Choice, आपला आहे. अपेक्षेशिवाय केलेल्या कर्मातून आपल्या अंतरातील आनंदझरा स्रवू लागेल, त्याने जीवन प्रसन्न होईल. भगवंत दुसऱ्या अध्यायात म्हणतात -
उत्तम झोप येण्यासाठी मऊ गादीपेक्षा मनातून आनंदी असणे आवश्यक असते. सुख बाहेरून येते तर आनंद अंतरातून प्राप्त होतो. कर्म करताना भाव बदलला तर कोणतेही कर्म सात्त्विक कर्म होईल. मग अर्जुनाचे युध्दकर्म देखील सात्त्विक कर्म होते. स्वयंपाक करणारी गृहिणी भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक करते तेंव्हा त्यातून आनंद मिळतो, ते कर्म सात्त्विक कर्म होते. घर स्वच्छ करण्यासाठी जेंव्हा झाडू फिरवला जातो तेंव्हा तो भगवंतांसाठी करतो आहोत या विचाराने केला तर त्यातून शबरीला मिळाला तसा आनंद मिळतो. असे केले नाही तर त्या कर्माचे ओझे होते. कर्म कसे करावे, प्रेमाने कर्तव्य बुद्धीने, अपेक्षेशिवाय करावे की रडत करावे हा निर्णय आपला असतो.
दुसऱ्या अध्यायात क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते- अर्थात नपुंसकासारखा भाष्य करू नकोस, हृदयदौर्बल्य सोड असे कठोर शब्दात अर्जुनाला सुनावणारे भगवंत कायम प्रसन्नच आहेत. पहिल्या अध्यायात विषण्ण असणाऱ्या अर्जुनाला भगवंत प्रसादयुक्त बनवत आहेत. विषादाकडून प्रसादाकडे नेणारा हा प्रवास आहे. अठरा अध्याय पुरे झाले की आपल्याला देखील प्रसाद प्राप्त व्हायला हवा. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. अंतरातून प्रसन्न होणे हाच भगवद्गीतेचा उद्देश आहे.
प्रसन्न भावनेने दुकान जरी चालवत असू तर येणाऱ्या ग्राहकांमध्ये देखील भगवंतांचेच दर्शन होईल.

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।।२.६५।।
अन्तःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तम प्रकारे स्थिर होते.प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते।।२.६५।।
उत्तम झोप येण्यासाठी मऊ गादीपेक्षा मनातून आनंदी असणे आवश्यक असते. सुख बाहेरून येते तर आनंद अंतरातून प्राप्त होतो. कर्म करताना भाव बदलला तर कोणतेही कर्म सात्त्विक कर्म होईल. मग अर्जुनाचे युध्दकर्म देखील सात्त्विक कर्म होते. स्वयंपाक करणारी गृहिणी भगवंतांना नैवेद्य दाखवण्यासाठी स्वयंपाक करते तेंव्हा त्यातून आनंद मिळतो, ते कर्म सात्त्विक कर्म होते. घर स्वच्छ करण्यासाठी जेंव्हा झाडू फिरवला जातो तेंव्हा तो भगवंतांसाठी करतो आहोत या विचाराने केला तर त्यातून शबरीला मिळाला तसा आनंद मिळतो. असे केले नाही तर त्या कर्माचे ओझे होते. कर्म कसे करावे, प्रेमाने कर्तव्य बुद्धीने, अपेक्षेशिवाय करावे की रडत करावे हा निर्णय आपला असतो.
दुसऱ्या अध्यायात क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते- अर्थात नपुंसकासारखा भाष्य करू नकोस, हृदयदौर्बल्य सोड असे कठोर शब्दात अर्जुनाला सुनावणारे भगवंत कायम प्रसन्नच आहेत. पहिल्या अध्यायात विषण्ण असणाऱ्या अर्जुनाला भगवंत प्रसादयुक्त बनवत आहेत. विषादाकडून प्रसादाकडे नेणारा हा प्रवास आहे. अठरा अध्याय पुरे झाले की आपल्याला देखील प्रसाद प्राप्त व्हायला हवा. प्रसाद म्हणजे प्रसन्नता. अंतरातून प्रसन्न होणे हाच भगवद्गीतेचा उद्देश आहे.
प्रसन्न भावनेने दुकान जरी चालवत असू तर येणाऱ्या ग्राहकांमध्ये देखील भगवंतांचेच दर्शन होईल.
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि ! तुझमें यह सारा संसार ।
इसी भावना से अंतर भर, मिलूँ सभी से तुझे निहार ।।
भगवंत सहाव्या अध्यायात म्हणतात - यो मां पश्यति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति।
तस्याहं न प्रणश्यामि स च मे न प्रणश्यति।।६.३०।।

जो पुरुष सर्व प्राण्यांत सर्वांचा आत्मा असलेल्या मला वासुदेवालाच व्यापक असलेला पाहतो आणि सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही.
अशा भावनेने सात्त्विक कर्म करणाऱ्याच्या अंतरातील आनंदाचा झरा स्रवू लागतो, त्याच्यासाठी मृत्यू देखील आनंद सोहळाच होऊन जातो.

यत्तु कामेप्सुना कर्म, साहङ्कारे/ण वा पुनः।
क्रियते बहुलायासं (न्), तद्राजसमुदाहृतम्॥18.24॥
परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते, ते राजस म्हटले गेले आहे.
आपल्या नजरेस असे अनेक लोक पडतात. भागवत कथा करणारे देखील अहंकाराने 'मी हे कार्य केले' या भावनेने सर्वत्र त्याचे प्रदर्शन करतात. यज्ञ करताना, आहुती देताना देखील 'मी करतो' अशी भावना असेल तर हे राजस कर्म होते.
छोट्या प्राप्तीसाठी जेंव्हा अत्यंत क्लेश घेऊन एखादे कर्म केले जाते तेंव्हा ते राजस कर्म होते. संत ज्ञानेश्वरांनी बेडकाचे उदाहरण दिले आहे. थोडेसे शेवाळे खायला मिळावे म्हणून तो मोठा तलाव ढवळून काढतो, हे राजस कर्म होय. एखादा गारुडी दोन पैशाच्या अपेक्षेने अत्यंत विषारी नागाला डोक्यावर घेऊन फिरतो हे राजस कर्म आहे.
भगवंतांनी सांगितलेली ही कर्मलक्षणे कसोटी म्हणून आपली कर्मे तपासण्यासाठी वापरावीत. आपले कोणते कर्म सात्त्विक, कोणते राजस आणि कोणते तामस आहे याचा विचार करावा. तामस कर्म राजस कसे होईल, राजस सात्त्विक कसे होईल याचा विचार करावा. अखेरीस या सर्वांच्या पलीकडे जाऊन गुणातीत कसे होता येईल याचा विचार करायला हवा.
भगवंत पुढे तामस कर्म कसे असते ते सांगतात.

अनुबन्धं(ङ्) क्षयं(म्) हिंसाम्, अनवेक्ष्य च पौरुषम्।
मोहादारभ्यते कर्म, यत्तत्तामसमुच्यते॥18.25॥
जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते, ते तामस होते.
संत ज्ञानेश्वर म्हणतात, पाण्यावर रेघा ओढणारा व्यर्थ प्रयत्न करत असतो, हे तामस कर्म होय. सोने मिळवण्यासाठी राखेचे ढीग उपसलेत, अगदी राखेचा अख्खा पर्वत उपसला तरी त्यातून सोने मिळत नाही. हे व्यर्थ कर्म तामस कर्म होय. भाताची पेज, कांजी घुसळून त्यातून लोणी मिळत नाही. अज्ञानाने केलेले असे व्यर्थ कर्म तामस होय. निरर्थक कार्य करण्यात आयुष्य वाया घालवू नये. जीवन निरर्थक जाने न पाये अशा विचाराने आपण देखील आपली कर्मे तपासून पाहावीत. दयाघनाला प्रार्थना करावी -
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
ऐसा जगा दो फिर सो ना जाऊँ
अपने को निष्काम प्रेमी बनाऊँ
तुमको ही चाहु तुमको ही पाऊँ
संसार का भय कुछ रह ना पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
वो योग्यता दो सत्कर्म करलू
ह्रदय में अपने सद्भाव भरलू
नर तन है साधन भवसिन्धु तरलू
ऐसा समय फिर आये न आये
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
जीवन निरर्थक जाने न पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
ऐसा जगा दो फिर सो ना जाऊँ
अपने को निष्काम प्रेमी बनाऊँ
तुमको ही चाहु तुमको ही पाऊँ
संसार का भय कुछ रह ना पाए
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
वो योग्यता दो सत्कर्म करलू
ह्रदय में अपने सद्भाव भरलू
नर तन है साधन भवसिन्धु तरलू
ऐसा समय फिर आये न आये
ये मन ना जाने क्या क्या कराये
कुछ बन ना पाए मेरे बनाये
हे नाथ अब तो ऐसी दया हो
जीवन निरर्थक जाने न पाए
मुक्तसङ्गोऽनहंवादी, धृत्युत्साहसमन्वितः।
सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः(ख्), कर्ता सात्त्विक उच्यते॥18.26॥
जो कर्ता आसक्ती न बाळगणारा, 'मी माझे' न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, 'कार्य सिद्ध होवो न होवो', त्याविषयी हर्षशोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्त्विक म्हटला जातो.
जो आपल्या कर्माचा गाजावाजा करत नाही, निमित्तमात्र होऊन कर्म करतो तो सात्त्विक कर्ता होय.
रामायणात एका राक्षसिणीची कथा आहे. तिला असे वरदान लाभलेले होते की ती ज्याची सावली पकडेल तो तिचे भक्ष्य बनेल. एकदा तिने हनुमानाची सावली पकडली व हनुमानाला गिळून टाकले. परंतु हनुमान सामर्थ्यवान होते. ते तिचे मस्तक फोडून बाहेर पडले. या कथेत एक रूपक दडलेले आहे. त्यावेळी छाया पकडणारे राक्षस होते. हल्ली प्रसिद्धीच्या हव्यासापायी छायाचित्राच्या मागे लागलेले लोक आपण पाहतो. ते देखील एक प्रकारचे राक्षसच होत. ते उल्लेखनीय असे कोणतेच कर्म करीत नाहीत परंतु छायाचित्र सतत लोकांसमोर रहावे अशा प्रसिद्धीच्या हव्यासाने फोटो काढून घेतात. ते हे जाणत नाहीत की फोटो हा केवळ देहाचा निघतो. खरा कर्ता कोण आहे याविषयी ते अज्ञानीच असतात.
गीतापरिवारात सेवा देणारे साधक कसलीही अपेक्षा धरत नाहीत. सेवाकार्यातून आनंद प्राप्त करतात. माझे नाव होईल, कुठे छायाचित्र प्रसिद्ध होईल अशी कसलीच अपेक्षा त्यांच्या मनात नसते. धैर्य आणि उत्साहाने, प्रसन्नतेने ते त्यांचे कर्म करत राहतात. अशा प्रकारच्या कर्त्याला कार्य सिद्ध झाले म्हणून खूप हर्ष किंवा झाले नाही तर दुःख होत नाही. असा कर्ता सात्त्विक म्हटला जातो.
छोट्या छोट्या अडचणींनी काहीजण उद्विग्न होतात. सात्त्विक कर्ता सदैव प्रसन्न वृत्तीने कार्य करतो. तो छोट्या प्राप्तीने हर्षभरित होत नाही किंवा अडचणींनी उद्विग्न होत नाही. त्याच्या चेहऱ्यावर नेहमी स्मित असते. भगवंतांनी बाराव्या अध्यायात म्हंटले आहे - हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः - जो हर्ष, मत्सर, भीती आणि उद्वेग इत्यादींपासून अलिप्त असतो, तो भक्त मला प्रिय आहे.

रागी कर्मफलप्रेप्सु:(र्), लुब्धो हिंसात्मकोऽशुचिः।
हर्षशोकान्वितः(ख्) कर्ता, राजसः(फ्) परिकीर्तितः॥18.27॥
जो कर्ता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळांची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष- शोकांनी युक्त असतो, तो राजस म्हटला जातो.
अपेक्षा आणि दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख, दुःख एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुख प्राप्त व्हावे म्हणून पैशाच्या मागे लागलेला आयुष्यभर कामात व्यस्त राहतो. पैसा येतो पण तोवर आयुष्य मागे पडलेले असते. मुले मोठी झालेली असतात. त्यांचे बालपण बघायचा आनंद मिळालेलाच नसतो. कधी कधी मुले पण अशी निपजतात की मिळालेला पैसा उडवतात, मग त्याचा काही उपयोग होत नाही. कधी पैसा असला तरी दुखणे मागे लागते मग पैशातून मिळणारी सुखे भोगण्याचे सामर्थ्य देहात उरत नाही. सुखापाठोपाठ दुःख ठरलेलेच असते. आनंद मात्र निखळ असतो. आनंदाचा परमानंद होऊ शकतो पण त्यातून दुःख कदापि येत नाही. तुकाराम महाराज म्हणतात -
परंतु जे फळाच्या अपेक्षेने, लोभाने कर्म करणारा कर्ता राजस करता असतो असे भगवंतांनी इथे सांगितले.
आनंदाचे डोही आनंद तरंग ।
आनंदची अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
आनंदाच्या डोहात आनंदाचेच तरंग उठतात.आनंदची अंग आनंदाचें ॥१॥
काय सांगो जालें कांहीचियाबाही ।
पुढें चाली नाहीं आवडीनें ॥२॥
गर्भाचे आवडी मातेचा डोहळा ।
तेथींचा जिव्हाळा तेथें बिंबे ॥३॥
तुका म्हणे तैसा ओतलासे ठसा ।
अनुभव सरिसा मुखा आला ॥४॥
परंतु जे फळाच्या अपेक्षेने, लोभाने कर्म करणारा कर्ता राजस करता असतो असे भगवंतांनी इथे सांगितले.
अयुक्तः(फ्) प्राकृतः(स्) स्तब्धः(श्), शठो नैष्कृतिकोऽलसः।
विषादी दीर्घसूत्री च, कर्ता तामस उच्यते॥18.28॥
जो कर्ता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवन-वृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो, तो तामस म्हटला जातो.
एक मजेशीर कहाणी आहे. एक सदू नावाचा मनुष्य होता. दुसऱ्यांवर, खास करून आपल्या पत्नीवर अवलंबून होता. एक दिवस त्याचे डोके दुखत होते. पत्नीला त्याने काय करावे असे विचारले. पत्नीने त्याला वैद्याकडे जायला सांगितले. मग जवळच्या वैद्याकडे जाऊ की शहरात जाऊ असा प्रश्न त्याला पडला. तुम्ही शहरात जाणारच आहात तर तिकडच्याच चांगल्या वैद्याकडे जा असा सल्ला पत्नीने दिला. सदू शहरातील वैद्याकडे गेला. वैद्याने त्याला तपासून पित्त वाढल्याचे सांगितले. त्यावर त्याला गोळ्या दिल्या. जेवणाबरोबर त्यांचे सेवन करण्यास सांगितले. आता सदूने गोळ्या जेवणाआधी घेऊ की नंतर असे विचारले. वैद्याने एक गोळी आधी आणि एक नंतर घे असे सांगितले. मग त्याने विचारले गोळी चावून खायची की गिळायची. वैद्य म्हणाले गोळी कडू आहे त्यामुळे चावून न खाता गिळावी. मग सदू म्हणाला, "पाण्याबरोबर घेऊ की दुधाबरोबर." दीर्घसूत्री तो, प्रश्न विचारतच राहिला. वैद्याने कसेही घेतले तरी हरकत नाही असे सांगितल्यावर सदू म्हणाला नक्की काय ते सांगा. वैद्याने गोळी दुधाबरोबर घेण्यास सांगितली. पुढचा प्रश्न होता, "दूध किती घेऊ ? वाटीभर, पेलाभर की लोटाभर ?" "लोटाभर घेतलेस तर अपचन होईल, तेंव्हा वाटीभर पुष्कळ होईल", वैद्य म्हणाला. मग गरम दूध घेऊ की थंड, सदू विचारू लागला. वैद्य म्हणाला, "वेडा आहेस का ? कोमट दुधाबरोबर घे, जा आता." सदू म्हणाला, "असे नाही महाराज. नीट सांगा. दूध गायीचे घेऊ की म्हशीचे ?" त्यावर वैद्य म्हणाला, "अरे बकरीचे घेतलेस तरी चालेल. जा आता." मग सदू म्हणाला, "दूध बसून घेऊ की उभा राहून ?" वैद्य वैतागला. तो म्हणाला. "बसून घे, पण आता इथून उठ, माझे पैसे दे आणि चालता हो." सदू म्हणाला, "वैद्य महाराज, घाई करू नका. दूध माझ्या हाताने घेऊ की पत्नीच्या ते सांगा." आता वैद्याने डोक्याला हात लावला. वैद्य म्हणाला, "कसेही घे. माझे शंभर रुपये दे आणि इथून निघ." त्यावर सदू विचारू लागला, "पैसे सुटे देऊ की बंदे चालतील ?" अखेर जेरीला आलेल्या वैद्याने आपलाच खण उघडून त्यातून पन्नास च्या दोन नोटा काढून त्याच्या हातावर ठेवल्या आणि म्हणाला, "हे पैसे तूच घे आणि इथून ताबडतोब चालता हो." सदू बाहेर आला. आता आपल्या हातात पन्नास च्या दोन नोटा पाहून त्याला प्रश्न पडला हे वैद्याने आपल्याला का दिले ? तो पुन्हा आत गेला आणि वैद्याला म्हणाला, "महाराज, हे पैसे तुम्ही मला का दिलेत ? मी याचे काय करू ?" वैद्य म्हणाला, "पन्नास रुपयांचे औषध घे आणि पन्नास रुपये रिक्षाला दे आणि आता घरी जा." त्यावर सदू म्हणाला, "वैद्य महाराज रागावू नका पण शेवटचा प्रश्न विचारतो. कुठले पन्नास औषधासाठी वापरू आणि कुठले रिक्षासाठी हे तरी सांगा."
असा अज्ञानी कर्ता तामसी होय. भगवंतांनी हे अर्जुनाला समजावले. पुढे बुद्धी आणि धृतीविषयी भगवंत सांगतात. ते पुढील सत्रात पाहू. आज इथे थांबू आणि काही प्रश्न घेऊ.
प्रश्न: श्राद्ध करताना दान कोणास द्यावे ?
उत्तर: भगवंतांनी सतराव्या अध्यायात दानाविषयी सांगितले आहे. देशे काले च पात्रे च - सत्पात्री, कालसुसंगत दान करावे. अनाथ आश्रमात, लहान मुलांसाठी भोजन द्यावे. असे केल्याने पितरांना तृप्ती नक्की मिळेल. घरात वस्तू आहे, तिचा काही उपयोग नाही म्हणून कोणाला देऊ नये. आपण जे देतो त्याचा ज्याला देतो आहे त्याला उपयोग व्हायला हवा.
प्रश्न: ब्राह्मणांना दान करावे असे सांगितले जाते. पण हल्ली पूजा सांगायला येणारे सगळे ब्राह्मण पात्र असतात असे दिसत नाही. काय करावे ?
उत्तर: ब्राह्मणांना दान देण्यास का सांगितले जाते याचा आधी विचार करायला हवा. आपला देश प्राचीन काळी वेद, उपनिषदांच्या ज्ञानाने समृद्ध होता. त्याच्या सीमा उत्तरेला अफगाणिस्तान, इराक, इराण तर दक्षिणेला म्यानमार, इंडोनेशिया पर्यंत पसरलेल्या होत्या. पूर्वेला नेपाळ आर्यावर्तात होता. परकीय आक्रमणांमध्ये प्रथम ब्राह्मणांवर हल्ले झाले. त्यांना भूमीतून पिटाळण्यात आले. काश्मीरमध्ये हेच झालेले आपण अनुभवले आहे. ब्राह्मण वेद, उपनिषदांचे ज्ञान देतात. त्यांना जर पिटाळून लावले तर वेदसंस्कृतीचा ऱ्हास होतो हा या आक्रमणांमागचा उद्देश होता. त्यामुळे वेद संस्कृतीचे संवर्धन करणाऱ्या ब्राह्मणांना दान करण्यास सांगितले जाते. सर्व ब्राह्मण पात्र नसतात हे अगदीच योग्य आहे. त्यामुळे नीट विचार करून विवेकाने दान करावे. याउपर भुकेलेल्या कोणासही अन्नदान करावे. मागणारा आपण दिलेल्या दानाचा काय उपयोग करतो हा वेगळा भाग आहे. आपल्या हाताला दानाची सवय व्हावी म्हणून भुकेल्या कोणासही दान द्यावे.
त्रिपाठी जी
प्रश्न: अकर्ता म्हणजे काय हे जरा परत समजावून सांगाल का ?
उत्तर: मी करतो अशा भावाने कार्य करणारा कर्ता होय. पण कोणतेही कार्य देहाद्वारे होते. आत्मा साक्षी असतो, तो प्रत्यक्ष कार्य करत नाही हा भाव जेंव्हा जागृत होतो तेंव्हा ते कार्य करणारा कर्ता अकर्ता होतो. ते कर्म अकर्म होते.
सुशीला जी
प्रश्न: हवन मंत्राच्या अखेरीस स्वाहा म्हटले जाते यात स्वाहा चा अर्थ काय ?
उत्तर: हे माझे नाही असा अर्पण भाव म्हणजे स्वाहा.
मंजू जी
प्रश्न: आई नि:स्वार्थ भावाने आपले काम करते असे आपण म्हणतो. कित्येक स्त्रियांना मुलगा होईल अशी अपेक्षा असते. आपला मुलगा आपला सांभाळ करेल या अपेक्षेने कित्येक आया मुलाचे संगोपन करताना दिसतात. अशा आया मुलीची उपेक्षा देखील करतात. यांना कसे समजवावे ?
उत्तर: मुलगा होणे, मुलगी होणे आपल्या हातात नसते. हा प्रारब्धाचा भाग आहे. मुलगा सुख देईल असा विचार करणाऱ्याला अपेक्षाभंगाचे दुःख पदरी पडू शकते. मुलगा तुमच्या जवळच राहील याची काहीच शाश्वती तुम्ही देऊ शकत नाही. याउलट कित्येक परिवारात मुली परिवाराची जास्ती काळजी घेताना दिसतात. तेंव्हा मुलगा, मुलगी असा भेद करणे योग्य नाही. हे सर्व आपण समजून घ्यावे. दुसऱ्याला समजावण्याच्या फंदात पडू नये.
प्रश्न: तुम्ही प्रारब्धाचा उल्लेख केलात. कर्मफळामध्ये प्रारब्ध किती महत्त्वाचे असते ?
उत्तर: कर्मफळाच्या प्राप्तीमध्ये पाच गोष्टींचा समावेश होतो. त्यात एक दैव किंवा प्रारब्ध येते. टॉल्स्टॉयची एक कथा आहे.
एकदा यमलोकातून एक यमदूत एका स्त्रीचे प्राण हरण करण्यास आला. त्या स्त्रीच्या मृतदेहापाशी त्याला तीन अर्भके रडताना दिसली. त्या तिळ्या मुली होत्या. आईच्या देहाशी रडून त्यांनी आकांत मांडला होता. तिन्ही भुकेल्या होत्या. हे दृश्य बघून यमदूत द्रवला. त्या तीन मुलींमधली एकतर मृतदेहाच्या स्तनातून स्तनपान करू पाहत होती. ते पाहून यमदूत खूप कष्टी झाला. आपण हे काय काम करतो आहोत असा प्रश्न त्याला पडला. परंतु यमाच्या आदेशानुसार तो त्या स्त्रीचे प्राण घेऊन यमलोकी आला. झाल्या प्रकाराने त्याला त्याच्या कामाचा उबग मात्र आला. तो यमदेवांना म्हणाला, "हे काम माझ्याने होणार नाही. हे काम कष्टदायक आहे. आता भुकेने व्याकुळ झालेल्या त्या तीन मुलींचे प्राण हरण करण्याचे काम देखील तुम्ही मलाच सांगाल. मला हे जमणार नाही. माझा राजीनामा मी देतो." यमदेव त्यावर म्हणाले, "तुला असे करता येणार नाही. काम करायचे नाही ना, मग जा पृथ्वीवर जा आणि तिथेच आता खितपत पड. जेंव्हा तू तीनदा हसशील तेंव्हाच तुला यमलोकात परत येता येईल."
यमदूत आता पृथ्वीवर आला. तो वृद्ध होता. त्याच्या अंगावर कपडे नव्हते. भयानक थंडीत तो येऊन पडला होता, थंडीने कुडकुडत होता. तेवढ्यात तिथे एक मनुष्य आला. त्याने आपल्या अंगावरील कोट म्हाताऱ्या यमदूताला दिला. यमदूताने त्याला खायला मागितले. त्या मनुष्याने त्याला खायला दिले. मग यमदूताने त्याला आपल्या घरी घेऊन जाण्याची विनंती केली. तो म्हणाला, "महाराज, तुम्ही मला अन्न, वस्त्र दिलेत आता निवारा देखील दिलात तर तुमचे उपकार होतील." तो माणूस एक चांभार होता. चांभार म्हणाला, "तू माझ्याकडे काय करशील ?" यमदूताने आपण द्याल ते काम मी करेन असे त्याला सांगितले.
चांभार यमदूताला घेऊन आपल्या घरी आला. चांभाराची बायको अनाहूत पाव्हण्याला पाहून चांभारावर खूप रागावली. "आपल्या दोघांना देखील खायला पुरत नाही आणि तुम्ही तिसऱ्याला घेऊन आलात", ती त्याच्यावर कडाडली. हे ऐकून यमदूताला हसू आले. चांभाराने हसण्याचे कारण विचारल्यावर यमदूत वेळ आल्यावर सांगेन असे म्हणाला. चांभाराने यमदूताला चपला शिवण्यास शिकवले. काही काळातच यमदूत चप्पल, बूट शिवण्यात वाकबगार झाला. त्याची ख्याती सर्वदूर पोहोचली. त्या नगराचा राजा होता. एकदा तो त्याच्यासाठी बूट शिवायला एक खास प्रकारचे चामडे घेऊन चांभाराकडे आला. त्याने तुमच्या कारागिराकडून या उत्तम प्रतीच्या खास चामड्याचे बूट शिवून घ्या, असे चांभाराला सांगितले. काही दिवसात राजाचे काम पूर्ण झाले. यमदूताने राजासाठी शिवलेली चप्पल चांभाराच्या हातात ठेवली. चप्पल पाहून चांभार भडकला. तो म्हणाला, "अरे राजाने एवढे महागाचे चामडे बूट शिवायला दिले होते. त्याची तू चप्पल काय शिवलीस?" तेवढ्यात राजाचे दूत चांभाराकडे आले. ते म्हणाले, "महाराजांनी दिलेल्या चामड्याच्या चपला शिवून हव्या आहेत. महाराजांचे निधन झाले आहे. मृतदेहाला चपला घालण्याची परंपरा आहे, तेंव्हा बूट न शिवता चपला बनवून द्या." चांभार म्हणाला, "चला, हरकत नाही. चापलाच बनवल्या आहेत. घेऊन जा."
थोडे दिवसांनी राजवाड्यातून पुन्हा उत्तम बूट शिवण्यासाठी राणीकडून निरोप आला. राणीच्या तीन राजपुत्रांचे लग्न व्हायचे होते. आपल्या राजपुत्रांसाठी आणि होणाऱ्या तीन पुत्रवधूंसाठी उत्तम बूट शिवण्यास चांभाराला बोलावण्यात आले. चांभार आपल्या म्हाताऱ्या कारागिराला घेऊन राजदरबारी गेला. यमदूताने राजपुत्रांच्या पायाचे माप घेतले नंतर तो तीनही मुलींच्या पायाचे माप घेऊ लागला. माप घेताना या तीनही मुलींचे पाय अगदी एकसारखे आहेत हे त्याच्या लक्षात आले. आश्चर्याने त्याने वर मान करून त्यांच्याकडे बघितले तर त्या तिघी तिळ्या असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने कुतूहलाने त्यांना त्यांच्या माता पित्याविषयी विचारले. मुली म्हणाल्या आमची आई आमच्या लहानपणीच वारली. जवळ राहणाऱ्या सावकाराच्या घरी आम्ही वाढलो. सावकाराच्या श्रीमंत घरात मोठे झालेल्या त्या तीन मुलींना आज राजाच्या घरचे स्थळ आले होते. या मुलींची आई जर त्यांच्या लहानपणी वारली नसती तर कदाचित सावकाराने त्यांचे संगोपन केले नसते आणि त्या राजाच्या पुत्रवधू झाल्या नसत्या. यमदूताला पुन्हा हसू आले. म्हाताऱ्या यमदूताने चांभाराला त्याच्या हसण्याचे प्रयोजन सांगितले. मी यमदूत आहे आणि या तीनही मुलींच्या आईचे प्राण हरण करण्याचा मला आदेश होता हे त्याने सांगितले. तो म्हणाला, "मी त्या वेळी माझे काम करताना रडलो होतो. तेंव्हा मला पृथ्वीवर यावे लागले. आज हा सर्व प्रारब्धाचा खेळ आहे हे माझ्या लक्षात आले. आता माझी परत जायची वेळ झाली." असे म्हणून तो यमदूत अंतर्धान पावला. तात्पर्य म्हणजे कर्मफळामध्ये प्रारब्धाचा सहभाग असतो.
कित्येकदा कर्माचा कार्यकारण भाव आपल्याला समजत नाही, त्यामागे प्रारब्ध असते. आपण मात्र वृथा भगवंतांना दोष देत राहतो.
कांचन जी
प्रश्न: ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या चार वर्णांनुसार कर्म वेगळी असतात. मी ब्राह्मण कुळात जन्मले तर मग मला त्या वर्णनानुसार आलेलीच कर्मे करावयास हवीत का ? इथे माझा गोंधळ होतो आहे. कृपया समजावून सांगाल का?
उत्तर: जन्मानुसार आपली जात ठरते. वर्ण वेगळा असतो. चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात - चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः। गुण आणि कर्मानुसार मी चार वर्णांची रचना केली आहे. जात निराळी आहे. वर्णव्यवस्था गुणकर्मावर आधारित आहे. आपला वर्ण आपल्याला ओळखता यायला हवा. ९०% घरांमध्ये आई वडिलांप्रमाणेच सर्वसाधारणपणे मुले निपजतात. आई वडील जर कुशाग्र बुद्धीचे असतील तर मुले देखील सर्वसाधारणपणे तल्लख बुद्धीची असलेली दिसतात. त्यामुळे अशा मुलांचे पाठांतर उत्तम असते. ते ज्ञानप्राप्ती करू शकतात. हे सर्वसाधारणतः ९०% वंशाधारित असते. १०% बाबतीत मात्र असे होतेच असे नाही. ब्राह्मण घरात जन्म घेतलेले काहीजण मांसाहार करताना दिसतात किंवा त्यांचे विद्याध्ययनात मन रमत नाही. हा जातिस्वभाव आहे. हा वर्ण नव्हे. पूर्वी वर्ण बदलण्याची व्यवस्था होती. विश्वामित्र राजर्षी होते. त्यांना ब्रह्मर्षी व्हायचे होते. ज्याच्या मनात ब्रह्म जाणण्याची इच्छा होते तो ब्राह्मण होय. माझे कर्म कसे असावे तर - सहजं कर्म कौंतेय हे याच अध्यायात आलेले आहे. सहजरूपाने जे माझे कर्म आहे ते मी केले पाहिजे. सहजन्मना प्राप्त्यर्थं इति असा सहजं चा दुसरा अर्थ देखील आहे. अर्थात जे जन्माने आले आहे ते. पण सहजं कर्म सहज तेंव्हाच होईल जेंव्हा ते माझ्या अंतःप्रेरणेतून येईल. अर्जुनाची अंतःप्रेरणा क्षत्रियाची होती त्यामुळे भगवंतांनी त्याला युद्धकर्माचा उपदेश दिला. जर भगवंत आपल्यासमोर प्रकट झाले तर ते आपल्याला आपल्या स्वभावधर्मानुसार कर्माचा उपदेश देतील. भगवंत आपल्या अंतर्मनातच वसलेले आहेत. भगवद्गीता जसजशी आपण शिकू तसतसे आपल्याला अंतःप्रेरणेने या प्रश्नाचा उलगडा होऊ लागेल.
यानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाच्या पठणाने सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।
असा अज्ञानी कर्ता तामसी होय. भगवंतांनी हे अर्जुनाला समजावले. पुढे बुद्धी आणि धृतीविषयी भगवंत सांगतात. ते पुढील सत्रात पाहू. आज इथे थांबू आणि काही प्रश्न घेऊ.
प्रश्नोत्तरे
कमलेश दीदीप्रश्न: श्राद्ध करताना दान कोणास द्यावे ?