विवेचन सारांश
त्रिगुणांचा प्रभाव आणि गुणातीताची लक्षणे
भगवद्गीतेच्या या गुणत्रयविभागयोग नामक चौदाव्या अध्यायाच्या मागील सत्रात आपण पाहिले की भगवंत अर्जुनाला सत्त्व, रज आणि तम या तीन गुणां विषयीचे ज्ञान देत आहेत.
आता कुणालाही हा प्रश्न पडणे अगदी स्वाभाविक आहे की या ज्ञानाची आपल्याला काय आवश्यकता आहे? ज्या कुणाला त्याच्या आयुष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील असं जे काही बनायचं असतं त्याचे आवश्यक ते ज्ञान मिळवण्यासाठी तो त्या त्या विद्याशाखेत प्रवेश घेतो. त्रिगुणांचे ज्ञान त्यासाठी आवश्यक आहे का?
मनुष्याने जीवनात जरी कोणताही व्यवसाय निवडलेला असला तरी त्या व्यवसायात आणि एकूणच जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर हे ज्ञान अत्यावश्यक आहे. जीवनात नायक तोच बनू शकतो ज्याच्याकडे सोळाव्या अध्यायात सांगितलेल्या दैवी संपत्तीचा संचय आहे.
दानं दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम् ॥ १६-१ ॥
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम् ॥ १६-२ ॥
भवन्ति सम्पदं दैवीमभिजातस्य भारत ॥ १६-३ ॥
हे भारता! (अर्थात भरतवंशी अर्जुना), दैवी संपत्ती घेऊन जन्मलेल्या माणसाची ही सर्व लक्षणे आहेत.
ज्यांच्याकडे या दैवी संपत्ती ऐवजी आसुरी संपत्तीचा संचय असतो ते खलनायक मानले जातात. अर्जुन हा नायक आहे. त्याच्याकडे या दैवी संपत्तीचा संचय आहे. त्याला यशस्वी बनण्यासाठी हे ज्ञान आवश्यक होते म्हणून भगवंत त्याला आणि त्याच्या निमित्ताने आपल्यालाही हे ज्ञान देत आहेत.
14.9
सत्त्वं(म्) सुखे सञ्जयति, रजः(ख्) कर्मणि भारत।
ज्ञानमावृत्य तु तमः(फ्), प्रमादे सञ्जयत्युत॥14.9॥
रजस्तमश्चाभिभूय, सत्त्वं(म्) भवति भारत।
रजः(स्) सत्त्वं(न्) तमश्चैव, तमः(स्) सत्त्वं(म्) रजस्तथा॥14.10॥
रामायणातील सुंदरकांडामधील एका कथानकात हनुमंतांची परीक्षा घेण्यासाठी देवांनी सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांचे प्रतिनिधित्व करणारे मैनाक पर्वत, सुरसा आणि लंकिनी यांना हनुमंतांना अडविण्यासाठी सामोरे केले असता हनुमंतांनी त्यांच्यावर कसा विजय प्राप्त केला हे अतिशय सुंदर पद्धतीने सांगितले आहे.
हनुमंतांकडे सीतेच्या शोधासाठी समुद्र लंघून जायची शक्ती होती पण शापामुळे त्यांना त्या शक्तीचा विसर पडला होता.
कनक भूधराकार शरीरा। समर भयंकर अतिबल बीरा॥
आता देवतांना हनुमंताच्या शक्ती आणि युक्तीची परीक्षा घ्यायची होती. त्यासाठी त्यांनी नागांची माता सुरसा हिला पाठवले.
रजोगुणाचे प्रतीक असलेली सुरसा गडगडाटी हास्य करून म्हणाली,
हे ऐकून हनुमंतांनी तिला समजावले,
मोहि सुरन्ह जेहि लागि पठावा। बुधि बल मरमु तोर मै पावा॥
अशाप्रकारे सत्त्वगुणाला सत्त्वगुणाने आणि रजोगुणाला रजोगुणाने जिंकून हनुमंत पुढे निघाले. हनुमंतांनी उड्डाण केले आणि पुढचा प्रवास सुरु केला.
अशा रीतीने सत्त्वगुणी मैनाक पर्वताला नमस्कार करुन, रजोगुणी सुरसेला युक्तिवादाने व बुद्धिबळाने तर तमोगुणी राक्षसीला प्रहाराने हरवून हनुमंत पुढे आले होते. लंकिनीमधे तीनही गुणांचे प्राबल्य होते. तिच्यावरही त्यांनी मात केली. त्यांना कार्यापासून परावृत्त करण्यासाठी देवांनी सात्त्विक, राजसी आणि तामसी अशी तीनही प्रलोभने ठेवली होती पण हनुमंत त्या प्रलोभनांना बळी न पडता परीक्षेत उत्तीर्ण झाले.
सर्वद्वारेषु देहेऽस्मिन्, प्रकाश उपजायते।
ज्ञानं(म्) यदा तदा विद्याद्, विवृद्धं(म्) सत्त्वमित्युत॥14.11॥
आयुष्यात आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत याबद्दल ज्याची धारणा निश्चित असते, त्याच्यात सत्त्वगुण प्रबळ असतो. ज्यावेळी आपल्या मनात, चित्तात आणि बुद्धीत विवेक शक्ती आणि चेतना जागृत होते तेव्हा असे निश्चित समजावे की आपला सत्त्वगुण प्रबळ झाला आहे. स्वतःसाठी काय उत्तम आहे, कोणती गोष्ट श्रेयस्कर आहे हे अशा व्यक्तीला समजते.
विषादाने भ्रमित झालेल्या अर्जनाने दुसऱ्या अध्यायात भगवंतांना श्रेयस काय आहे हे सांगण्याची व उपदेश देण्याची विनंती केली होती.-
लोभः(फ्) प्रवृत्तिरारम्भः(ख्), कर्मणामशमः(स्) स्पृहा।
रजस्येतानि जायन्ते, विवृद्धे भरतर्षभ॥14.12॥
सर्व विकारांमध्ये लोभ हा अतिशय त्रासदायक विकार आहे. हा विकार माणसांमध्ये सतत अस्तित्वात असतो. मनुष्याच्या लोभाला अंत नसतो. कितीही मिळाले तरी त्याची तृप्ती होत नाही. उलट तो वाढतच असतो. अति लाभ झाला असता अति लोभ निर्माण होतो. बहुतांश वेळा माणसाकडे येणारा पैसा जसजसा वाढतो तसतशी त्याची दानत कमीकमी होत जाते. ही एक सार्वत्रिक प्रवृत्ती आहे.
माणसांमध्ये सहसा सत्तेचा लोभ, स्थावर मालमत्तेचा लोभ, पदाचा लोभ आणि स्त्रियांमध्ये दागिन्यांचा लोभ हे सर्वसामान्यपणे अनुभवास येतात. लोभामुळे मनुष्याचे पतन होते. लोभी वृत्तीच्या माणसाने सतत लोभ केल्यास लोभ ही त्याची प्रवृत्ती बनते आणि मग त्याचे प्रत्येक आचरण लोभी होते. लोभामुळे तो काहीही करण्यास प्रवृत्त होतो. असा लोभग्रस्त मनुष्य नेहमीच अशांत असतो. जितके अधिक मिळेल तितका माणूस बेचैन होत जातो. लोभाच्या अग्नीवर संतोषाचे पाणी टाकले तरच तो थंड होतो.
अप्रकाशोऽप्रवृत्तिश्च, प्रमादो मोह एव च।
तमस्येतानि जायन्ते, विवृद्धे कुरुनन्दन॥14.13॥
दास मलूका कह गए, सब के दाता राम॥
सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दुःखभाग्भवेत्॥
बंदउँ खल जस सेष सरोषा।
सहस बदन बरनइ पर दोषा॥
यदा सत्त्वे प्रवृद्धे तु, प्रलयं(म्) याति देहभृत्।
तदोत्तमविदां(म्) लोकान्, अमलान्प्रतिपद्यते॥14.14॥
सत्त्वगुणाची अतिशय वृद्धी झालेली असताना ज्याचा मृत्यू होतो तो उत्तम तत्त्वे जाणणार्यांचा निर्मल लोक प्राप्त करतो.
रजसि प्रलयं(ङ्) गत्वा, कर्मसङ्गिषु जायते।
तथा प्रलीनस्तमसि, मूढयोनिषु जायते॥14.15॥
तमोगुणाची अतिशय वृद्धी झालेली असताना ज्याचा मृत्यू होतो तो कीटक, पशू आदी मूढ योनींमध्ये जन्म घेतो.
ज्याप्रमाणे एखादा विद्यार्थी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण झाला की A, B, C, D, E, F अशा वेगवेगळ्या श्रेणी असतात, त्याचप्रमाणे मनुष्याने वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेतला तरी त्यातही विविध श्रेणी असतात. उदाहरणार्थ मनुष्य जन्मातही रूप, गुण, वर्ण, आरोग्य इत्यादींप्रमाणे वेगवेगळ्या श्रेणी असतात. त्याचप्रमाणे पशूंच्या मध्ये जन्म घेतल्यानंतर सुद्धा पाळीव प्राणी, हिंस्र प्राणी, जलचर, वनचर इत्यादी विविध श्रेणी असू शकतात.
आता तमोगुण प्रभावी असताना मृत्यू झाला तर पशू योनीत जन्म का होतो? तमोगुणी व्यक्तीला अज्ञानामुळे उन्नती करण्यात रुची नसते आणि अज्ञानातून बाहेर पडण्याची इच्छाही नसते.
कर्मणः(स्) सुकृतस्याहुः(स्), सात्त्विकं(न्) निर्मलं(म्) फलम्।
रजसस्तु फलं(न्) दुःखम्, अज्ञानं(न्) तमसः(फ्) फलम्॥14.16॥
सत्त्वात्सञ्जायते ज्ञानं(म्), रजसो लोभ एव च।
प्रमादमोहौ तमसो, भवतोऽज्ञानमेव च॥14.17॥
तसेच रजोगुणापासून निःसंशय लोभ आणि त्यातून लोभाविष्ट होऊन मनुष्य कर्म करत रहातो आणि कर्माचे अपेक्षित फळ न मिळाल्याने तो दु:खी होतो .
तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतात आणि अज्ञानही होते.
ऊर्ध्वं(ङ्) गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः।
जघन्यगुणवृत्तिस्था, अधो गच्छन्ति तामसाः॥14.18॥
भगवद्गीता शिकण्याची संधी वेळोवेळी मिळाली असूनही त्यावेळी तिला प्रतिसाद न देणारेही पूर्वसुकृताच्या बळावर योग्य वेळ येताच तिला प्रतिसाद देऊन आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करू लागतात.
नान्यं(ङ्) गुणेभ्यः(ख्) कर्तारं(म्), यदा द्रष्टानुपश्यति।
गुणेभ्यश्च परं(म्) वेत्ति, मद्भावं(म्) सोऽधिगच्छति॥14.19॥
गुणानेतानतीत्य त्रीन्, देही देहसमुद्भवान्।
जन्ममृत्युजरादुःखै:(र्), विमुक्तोऽमृतमश्नुते॥14.20॥
अर्जुन उवाच
कैर्लिंगैस्त्रीन्गुणानेतान्, अतीतो भवति प्रभो।
किमाचारः(ख्) कथं(ञ्) चैतांस्, त्रीन्गुणानतिवर्तते॥14.21॥
श्रीभगवानुवाच
प्रकाशं(ञ्) च प्रवृत्तिं(ञ्) च, मोहमेव च पाण्डव।
न द्वेष्टि सम्प्रवृत्तानि, न निवृत्तानि काङ्क्षति॥14.22॥
अर्थात गुणातीत ही अनुभूतीची अवस्था आहे. त्याचे कितीही वर्णन केले तरी जोपर्यंत त्याची प्रत्यक्ष अनुभूती येत नाही तोपर्यंत ते आपल्याला कळणार नाही.
अशा गुणातीत व्यक्तींना सत्त्वगुणाचा प्रकाश, रजोगुणाची प्रवृत्ती आणि तमोगुणाचा मोह हे प्राप्त झाले किंवा प्राप्त झाले नाही तरी त्यांचा हर्ष अथवा विषाद तसेच कार्य करणे आणि न करणे या दोन्ही मध्ये रस अथवा द्वेष नसतो.
उदासीनवदासीनो, गुणैर्यो न विचाल्यते।
गुणा वर्तन्त इत्येव, योऽवतिष्ठति नेङ्गते॥14.23॥
गुणातीत व्यक्ती मात्र 'शरीराला भूक लागली आहे', 'डोळ्यांनी अन्न पाहिले आहे', 'हाताने घास उचलला आहे', 'तोंडाने ग्रहण केला आहे', 'शरीराने पचवले आहे' अशा साक्षीभाव वृत्तीने भोजन करते. यात 'मी' कोठेही नसतो.
समदुःखसुखः(स्) स्वस्थः(स्), समलोष्टाश्मकाञ्चनः।
तुल्यप्रियाप्रियो धीर:(स्), तुल्यनिन्दात्मसंस्तुतिः॥14.24॥
मानापमानयोस्तुल्य:(स्), तुल्यो मित्रारिपक्षयोः।
सर्वारम्भपरित्यागी, गुणातीतः(स्) स उच्यते॥14.25॥
मां(ञ्) च योऽव्यभिचारेण, भक्तियोगेन सेवते।
स गुणान्समतीत्यैतान्, ब्रह्मभूयाय कल्पते॥14.26॥
ब्रह्मणो हि प्रतिष्ठाहम्, अमृतस्याव्ययस्य च।
शाश्वतस्य च धर्मस्य, सुखस्यैकान्तिकस्य च॥14.27॥
अभिषेक जी:- रज आणि तम गुणांचा प्रभाव कमी करून सत्त्वगुणाची वृद्धी कशी करावी?
उत्तर:- सतराव्या अध्यायात भगवंतांनी विशिष्ट गुणाचे प्राबल्य असलेल्या व्यक्तींचा आवडता आहार तसेच विहार इत्यादी सविस्तर माहिती दिली आहे. जर सत्त्वगुणप्रधान व्यक्तींच्या आवडीनिवडी जाणीवपूर्वक आपल्या अंगी बाणवून घेतल्या तर रज आणि तम गुणांचा प्रभाव कमी करून सत्त्वगुणाची वृद्धी होऊ शकते. तसेच सत्संग, भगवद्गीतेसारख्या आध्यात्मिक ग्रंथांचा अभ्यास मदत करतो. मी चांगला वागतो म्हणून माझे या भौतिक जगात सर्व चांगलेच होणार ही एक अवास्तव अपेक्षा आहे. जिथे साक्षात कालीमातेशी संभाषण करणार्या श्री रामकृष्ण परमहंस यांना घशाचा कँसर होऊन त्रास होत होता तिथे सामान्य माणसाची काय कथा हे विसरून चालणार नाही. सत्त्वगुण प्रभावी व्हायला कर्म, प्रारब्ध आणि संस्कार हे घटक प्रभावी असतात.
प्रश्न
दिनेश जी:- श्रद्धेचा विषय मन, बुद्धी वा अहंकार सगळ्यांशी निगडित आहे का? श्रद्धा विचलित का होते?
उत्तर:- श्रद्धा हे विशेषण आहे. ते सगळ्यांनाच लागू पडते. मनाची श्रद्धा काय आहे, बुद्धीची श्रद्धा काय आहे, श्रद्धा सात्त्विक आहे की राजसी आहे की तामसी, तात्कालिक आहे की शाश्वत आहे असे श्रद्धेचे अनेक विभाग असू शकतात. श्रद्धा असेल तरच मनुष्य काहीतरी करू शकतो. ज्याची जशी श्रद्धा तसा तो बनतो. श्रद्धावान व्यक्तीलाच ज्ञान मिळते.
श्रद्धावाँल्लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः।
प्रश्न
रमा जी:- जेव्हा समोर कोणी छान गात असेल, उत्कृष्ट भाषण करत असेल, सुंदर नृत्य करत असेल; तर त्या व्यक्तीच्या जागी मनातल्या मनात मी स्वतःला बघत असते. हे कोणत्या गुणाचे लक्षण आहे?
उत्तर:- जगात जे जे काही आकर्षक, प्रभावी आहे ते आपल्याकडे हवे हे रजोगुण प्रबळ असल्याचे लक्षण आहे तर माझे विहीत कर्तव्यकर्म काय आहे हे जाणून ते आचरणात आणण्यासाठी दक्ष रहाणे हे सत्त्वगुण प्रबळ असल्याचे लक्षण आहे.
प्रश्न
रतन जी:- मी प्रत्येक दिवशी कामानिमित्त पंधरा पंधरा तास घराबाहेर असलो तरी घरी आल्यावर माझा शीण लक्षात न घेता सर्वजण कटकट करतात, त्यामुळे क्रोध अनावर होतो.
उत्तर:- दिवसभर फक्त आपणच दमतो, इतरांना आपली पर्वा नाही या सर्व आपल्या चुकीच्या धारणा असल्यामुळे आपल्याला क्रोध अनावर होत असतो. आपण त्याचे खापर इतरांवर फोडत असतो.
प्रश्न
राकेश जी:- परधर्मीय जेव्हा आपल्या सनातन धर्माची निंदा करतात तेव्हा त्यांना प्रतिक्रिया देणं योग्य की अयोग्य असते?
उत्तर:- परधर्मीयांना आपण कशी प्रतिक्रिया देतो यापेक्षा त्यांच्या निंदेचा आपल्यावर आणि आपल्या धर्मावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून भगवद्गीतेचा अभ्यास आणि प्रसार यामार्फत आपले आत्मबल वाढवणे हे अधिक महत्त्वाचे नाही का?