विवेचन सारांश
आत्म्याबद्दल भगवंतांचे विवेचन
परंपरेनुसार आरंभिक प्रार्थना व दीप-प्रज्वलन करण्यात आले.
गुरूंना वंदन करून या सत्राच्या विवेचनाचा प्रारंभ झाला.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
आज विश्वचषक क्रिकेटच्या अंतिम सामन्याचा मोह टाळून आपण सर्व जण भगवद्गीतेच्या या महत्त्वाच्या अध्यायाच्या विवेचनासाठी एकत्र आलो आहोत. श्रोत्यांची जिज्ञासा विवेचनाची प्रेरणा देते. मागील सत्रात आपण पाहिले की अत्यंत विषादग्रस्त होऊन अर्जुन भगवंतांना तो युद्ध करणार नसल्याचे सांगतो.
प्रथम अध्यायाच्या ३२ व्या श्लोकात अर्जुन म्हणतो-
न काङ्क्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च।
किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा।।१.३२।।
भावार्थ: हे कृष्ण, मला विजय, राज्य व सुख यातील काहीही नको. हे राज्य, भोग किंवा जगणे काय कामाचे?
पितामह भीष्म व गुरू द्रोणाचार्य यांना युद्धात मारून मला कोणते राज्य भोगायचे आहे? त्यापेक्षा मी आपले जीवन त्यागण्यासही तयार आहे. असे भाषण करणारा अर्जुन मोहग्रस्त होऊन आपल्या क्षत्रिय कर्तव्यापासून दूर जात होता. तो रडवेला होऊन भगवंतांकडे शरणागती मागत होता व त्याच्यासाठी निश्चितपणे श्रेयस्कर काय आहे हे भगवंतांनी सांगावे असे त्यांना विनवित होता. हे विचारताना देखील त्याच्या मनात अनेक शंका होत्या.
भगवद्गीतेच्या या दुसऱ्या अध्यायात आपल्याला गीतेचे सार शिकण्याची संधी मिळते. पुढील अध्यायांत भगवंत त्यातील संकल्पनांचा आणखी विस्तार करतात. काही लोक असे म्हणतात की भगवंतांनी फक्त दुसरा अध्याय सांगितला व वेदव्यासजींनी त्याचाच आणखी विस्तार केला परंतु हे सत्य नाही. कोणतेही शास्त्र शिकविताना ते प्रथम संक्षेपात सांगावे, नंतर त्याचा विस्तार करावा व शेवटी परत एकदा ते संक्षेपात सांगावे अशी परंपरा असते. भगवंतांचा उपदेश ह्याच पद्धतीने अर्जुनास केला गेला आहे.
अर्जुनाने जेव्हा पितामह भीष्म व गुरु द्रोणाचार्यांना युद्धासाठी समोर उभे पाहिले तेव्हा त्याने युद्ध करण्यास नकार दिला. त्यावर भगवंतांनी त्याची खालील श्लोकातून कठोर शब्दांत कानउघाडणी केली -
कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम्।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तिकरमर्जुन।।२.२।।
क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत्त्वय्युपपद्यते।
क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप।।२.३।।
भावार्थ: हे अर्जुना, अशा अयोग्य वेळी तुझ्यात श्रेष्ठ पुरुषांना न शोभणारा भ्याडपणा कोठून आला? त्यामुळे तुला स्वर्गलोक प्राप्त होणार नाही व तुझी अकीर्तीच होईल. अशी नपुंसकता तुला शोभत नाही. ही हृदयाची क्षुद्र दुर्बलता टाकून तू युद्धास तयार हो.
अर्जुन शूर क्षत्रिय होता, तपस्वीही होता. कोणत्याही शूर योध्दयास त्याच्या पौरुषत्वाबद्दल बोलल्यास अपमानास्पद असते. परंतु भगवंतांनी हे सर्व त्यास स्मितहास्य करीत सांगितले. त्यांच्यासाठीही हा प्रसंग कठीण होता तरी त्यांनी आपली प्रसन्नता व चेहऱ्यावरील हास्य ढळू दिले नाही. कितीही कठीण परिस्थिती असली तरी मनाची प्रसन्नता कायम ठेवावी हीच भगवद्गीतेची शिकवण आहे.
युद्ध टाळण्यासाठी स्वतः भगवंत हस्तिनापुरास गेले होते व त्यांनी दुर्योधनाकडे शिष्टाई केली होती. त्यांनी अर्धे राज्य नाही तर कमीत कमी पाच गावे तरी पांडवांना द्यावीत, त्याने ते समाधानी होतील व युद्ध टळेल, असा प्रस्ताव मांडला होता. परंतु दुर्योधनाने तो प्रस्ताव धुडकावून लावला व त्यांना अपमानित केले होते. प्रसिद्ध कवी रामधारीसिंह "दिनकर" यांच्या खालील सुंदर कवितेत या प्रसंगाचे वर्णन आहे -
भगवंतांनी दुर्योधनास अशा तऱ्हेने युद्धाच्या भीषण परिणामांबद्दल व त्याच्या भविष्याबद्दल दरबारात त्याला सुनावले होते. आता युद्ध व नरसंहार अटळ होता व दुर्योधनाचा मृत्यूही! भगवंतांनी हे सारे आधीच घडविले होते. आता ते अर्जुनास सर्व फक्त समजावून सांगत होते. ते अर्जुनास मृत्यूची भीती बाळगू नये असे सांगतात. मृत्यूमुळे देह नष्ट झाला तरी त्यात वास करणारा आत्मा अमर आहे म्हणून अर्जुन जो विचार करीत आहे तो बरॊबर नाही असे ते सांगतात.

कृष्ण की चेतावनी
वर्षों तक वन में घूम-घूम,
बाधा-विघ्नों को चूम-चूम,
सह धूप-घाम, पानी-पत्थर,
पांडव आये कुछ और निखर।
सौभाग्य न सब दिन सोता है,
देखें, आगे क्या होता है।
मैत्री की राह बताने को,
सबको सुमार्ग पर लाने को,
दुर्योधन को समझाने को,
भीषण विध्वंस बचाने को,
भगवान् हस्तिनापुर आये,
पांडव का संदेशा लाये।
‘दो न्याय अगर तो आधा दो,
पर, इसमें भी यदि बाधा हो,
तो दे दो केवल पाँच ग्राम,
रक्खो अपनी धरती तमाम।
हम वहीं खुशी से खायेंगे,
परिजन पर असि न उठायेंगे!
दुर्योधन वह भी दे ना सका,
आशीष समाज की ले न सका,
उलटे, हरि को बाँधने चला,
जो था असाध्य, साधने चला।
जब नाश मनुज पर छाता है,
पहले विवेक मर जाता है।
हरि ने भीषण हुंकार किया,
अपना स्वरूप-विस्तार किया,
डगमग-डगमग दिग्गज डोले,
भगवान् कुपित होकर बोले-
‘जंजीर बढ़ा कर साध मुझे,
हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे।
यह देख, गगन मुझमें लय है,
यह देख, पवन मुझमें लय है,
मुझमें विलीन झंकार सकल,
मुझमें लय है संसार सकल।
अमरत्व फूलता है मुझमें,
संहार झूलता है मुझमें।
‘उदयाचल मेरा दीप्त भाल,
भूमंडल वक्षस्थल विशाल,
भुज परिधि-बन्ध को घेरे हैं,
मैनाक-मेरु पग मेरे हैं।
दिपते जो ग्रह नक्षत्र निकर,
सब हैं मेरे मुख के अन्दर।
‘दृग हों तो दृश्य अकाण्ड देख,
मुझमें सारा ब्रह्माण्ड देख,
चर-अचर जीव, जग, क्षर-अक्षर,
नश्वर मनुष्य सुरजाति अमर।
शत कोटि सूर्य, शत कोटि चन्द्र,
शत कोटि सरित, सर, सिन्धु मन्द्र।
‘शत कोटि विष्णु, ब्रह्मा, महेश,
शत कोटि जिष्णु, जलपति, धनेश,
शत कोटि रुद्र, शत कोटि काल,
शत कोटि दण्डधर लोकपाल।
जञ्जीर बढ़ाकर साध इन्हें,
हाँ-हाँ दुर्योधन! बाँध इन्हें।
‘भूलोक, अतल, पाताल देख,
गत और अनागत काल देख,
यह देख जगत का आदि-सृजन,
यह देख, महाभारत का रण,
मृतकों से पटी हुई भू है,
पहचान, इसमें कहाँ तू है।
‘अम्बर में कुन्तल-जाल देख,
पद के नीचे पाताल देख,
मुट्ठी में तीनों काल देख,
मेरा स्वरूप विकराल देख।
सब जन्म मुझी से पाते हैं,
फिर लौट मुझी में आते हैं।
‘जिह्वा से कढ़ती ज्वाल सघन,
साँसों में पाता जन्म पवन,
पड़ जाती मेरी दृष्टि जिधर,
हँसने लगती है सृष्टि उधर!
मैं जभी मूँदता हूँ लोचन,
छा जाता चारों ओर मरण।
‘बाँधने मुझे तो आया है,
जंजीर बड़ी क्या लाया है?
यदि मुझे बाँधना चाहे मन,
पहले तो बाँध अनन्त गगन।
सूने को साध न सकता है,
वह मुझे बाँध कब सकता है?
‘हित-वचन नहीं तूने माना,
मैत्री का मूल्य न पहचाना,
तो ले, मैं भी अब जाता हूँ,
अन्तिम संकल्प सुनाता हूँ।
याचना नहीं, अब रण होगा,
जीवन-जय या कि मरण होगा।
‘टकरायेंगे नक्षत्र-निकर,
बरसेगी भू पर वह्नि प्रखर,
फण शेषनाग का डोलेगा,
विकराल काल मुँह खोलेगा।
दुर्योधन! रण ऐसा होगा।
फिर कभी नहीं जैसा होगा।
‘भाई पर भाई टूटेंगे,
विष-बाण बूँद-से छूटेंगे,
वायस-श्रृगाल सुख लूटेंगे,
सौभाग्य मनुज के फूटेंगे।
आखिर तू भूशायी होगा,
हिंसा का पर, दायी होगा।’
थी सभा सन्न, सब लोग डरे,
चुप थे या थे बेहोश पड़े।
केवल दो नर ना अघाते थे,
धृतराष्ट्र-विदुर सुख पाते थे।
कर जोड़ खड़े प्रमुदित,
निर्भय, दोनों पुकारते थे ‘जय-जय’!

2.11
श्रीभगवानुवाच
अशोच्यानन्वशोचस्त्वं(म्), प्रज्ञावादांश्च भाषसे।
गतासूनगतासूंश्च, नानुशोचन्ति पण्डिता:॥2.11॥
श्रीभगवान् म्हणाले, हे अर्जुना! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.
भगवंत म्हणतात - ज्यांच्यासाठी शोक करणे योग्य नाही अशांसाठी तू शोक करीत आहेस व विद्वान पंडितांप्रमाणे बोलत आहेस. परंतु विद्वान पंडित ज्यांचे प्राण गेले आहेत किंवा जाणार आहेत अशांबद्दल शोक करीत नाहीत. तुझे बोलणे पंडितांप्रमाणे आहे पण आचरण तसे नाही. तुझे बोलणे अज्ञानपूर्ण आहे. एखादी अंध व्यक्ती भ्रम होऊन जशी दिशाहीनपणे इकडे तिकडे धावते तसेच तुझे होत आहे. जसा तूच या विश्वाचा पालनकर्ता व नाश करणारा आहेस असे तुला वाटते. पण उत्पत्ती व लय हे तर विश्वाचे नियम आहेत. परिवर्तन सतत होतच असते हे जे जाणतात ते शोक करीत नाहीत.
न त्वेवाहं(ञ्) जातु नासं(न्), न त्वं(न्) नेमे जनाधिपाः।
न चैव न भविष्यामः(स्), सर्वे वयमतः(फ्) परम्॥2.12॥
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही.
पूर्वी कधी काळी मी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे लोक नव्हते असे नव्हते व भविष्यातही मी नसेन, तू नसशील किंवा हे राजे लोक नसतील असे नसेल. ही विशेष गोष्ट भगवंत सांगतात. हीच गोष्ट सांगण्यासाठी ज्ञानेश्वर माऊली एक सुंदर दाखला देतात. ते म्हणतात की जसे हवेची एखादी झुळूक येते व त्यामुळे तलावात तरंग उठतात व पाणी हलते तसेच हे शरीर थोड्या काळाकरिता अस्तित्वात येते व नंतर नष्ट होऊन ते पंचतत्त्वांमध्ये विलीन होते. परंतु शरीरातील आत्मा मात्र अनादी व सनातन आहे. पाण्यातील तरंग नाहीसे झाले तरी पाणी तसेच राहते (नष्ट होत नाही) तसेच मृत्यूमुळे शरीर नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. तर अर्जुना, तू शोक कशासाठी करतोस?
देहिनोऽस्मिन्यथा देहे, कौमारं(य्ँ) यौवनं(ञ्) जरा।
तथा देहान्तरप्राप्ति:(र्), धीरस्तत्र न मुह्यति॥2.13॥
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही
देहधारी मनुष्याला बाल्यावस्था, तारुण्य व वृद्धावस्था व शेवटी मृत्यू या चक्रातून जावेच लागते. धैर्यशील व्यक्ती यामुळे विचलित होत नाहीत. परिवर्तन हा या संसाराचा नियमच आहे. मनुष्याच्या शरीराचे असेच आहे, त्यात सतत बदल होत असतात. थोड्याशाच अवधीत शरीरातील अनेक पेशी नष्ट होत असतात व असंख्य नव्या तयार होत असतात. आपण जन्म घेतो, त्यानंतर बाल्यावस्था, तारुण्य, वार्धक्य व मृत्यू हा क्रम चालूच राहणार. यामुळे मोहग्रस्त होण्याचे कारण नाही. हे ज्ञानी लोक जाणतात.
आपण इतिहासात जाऊन पाहिले तर आपल्याला याची चांगली समज येते. अल्लाउद्दीन खिलजीचे आक्रमण जेव्हा झाले तेव्हा राणी पद्मिनीने आपल्या अनेक सख्यांसह जोहार केला. त्या मृत्यूस घाबरल्या नाहीत.
औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचा त्यांनी इस्लाम धर्माचा स्वीकार करावा यासाठी खूप छळ केला. त्यांनी मरण पत्करले परंतु शेवटपर्यंत इस्लाम धर्म स्वीकारला नाही.
पंजाब प्रांतातील बहादूर योद्धयांनी मरणाचे भय ना बाळगता अनेक आक्रमणांचा प्रतिकार केला. गुरु तेगबहादूर, गुरु गोविंदसिंह व त्यांचे पुत्र आनंदपूर किल्ल्यात लढत लढत वीरगतीस प्राप्त झाले. त्यांचे फतेहसिंग व जोरावरसिंग नावाचे आठ व सहा वर्षांचे पुत्र मुघलांच्या हाती लागले. त्यांनाही इस्लाम धर्म स्वीकारण्याची जबरदस्ती करण्यात आली पण त्यांनी ते स्वीकारले नाही. त्यांना भिंती उभारून त्यात चिणून मारण्याची सजा सुनावण्यात आली. छोट्या जोरावरची भिंत आधी तयार झाली. आपल्या मोठ्या भावाच्या डोळ्यात अश्रू बघून त्याने मोठ्या भावास तू मृत्यूस घाबरतोस का असे विचारले तेव्हा मोठ्या भावाने उत्तर दिले की मृत्यूची मला भीती नाही, आपण परत जन्म घेऊन येऊ व शत्रूशी लढू, पण तू लहान असून तुझी भिंत आधी तयार झाली आहे व मृत्यू प्रथम तुला घेऊन जाईल याचे मला दुःख होते आहे. त्या दोन छोट्या वीरांवर बहादुरीचे असे संस्कार होते.

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्णसुखदुःखदाः।
आगमापायिनोऽनित्या:(स्), तांस्तितिक्षस्व भारत॥2.14॥
हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
हे कुंतीनंदन, इंद्रिंयांचे विषय हे जड पदार्थांप्रमाणे आहेत व अनुकूलता आणि प्रतिकूलता याद्वारे सुख किंवा दुःख देतात. ते अनियमितपणे येतात व जातात, त्यांना तू सहन कर. मनुष्य या पंचेंद्रियांच्या अधीन असल्यामुळे त्याला सुखदुःखांचे अनुभव येतात.
कानांनी जर स्तुती ऐकली तर मन प्रसन्न होते पण निंदा ऐकली की दुःख होते. मुलायम व शीतल स्पर्शामुळे सुखद वाटते तर कठीण व उष्ण स्पर्शाने त्रास होतो. कोणतेही सुंदर दृश्य दिसले तर नेत्र सुखावतात तर भयानक दृश्य दिसले तर पाहवत नाही. नाकास सुगंध आल्यास मन प्रसन्न होते तर दुर्गंधी आल्यास दुःख होते. एखादी चविष्ट भाजी जेवणात आली तर जिव्हेस सुख मिळते तर कारल्यासारख्या कडू भाजीने तोंडाची चव जाते. सर्व असत्य गोष्टी नश्वर व अनित्य असतात तर सत्य गोष्टी नित्य असतात, सनातन असतात. तसेच थंड, उष्ण या सापेक्ष गोष्टी आहेत. स्नान करतेवेळी प्रथमच थंड पाण्याचा स्पर्श झाला तर थंडी वाजते पण त्याची सवय झाल्यावर ते चांगले वाटू लागते. तसेच सुख, दुःख हेही सापेक्ष आहेत तर त्यांना आपण समान मानले पाहिजे ही भगवंतांची शिकवण आहे.

यं(म्) हि न व्यथयन्त्येते, पुरुषं(म्) पुरुषर्षभ।
समदुःखसुखं(न्) धीरं(म्), सोऽमृतत्वाय कल्पते॥2.15॥
कारण हे श्रेष्ठ पुरुषा! सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.
हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, सुख दुःखांना जे सम मानतात ते अमरत्व प्राप्तीकरिता योग्य होतात. जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सुटावयाचे असेल तर सुख दुःखांना सम मानले पाहिजे. मृत्यूसमयी आपण दु:खी मन:स्थितीत असलो तर त्याच स्थितीस आपण बरोबर घेऊन जाऊ व पुढील जन्मीही ते आपल्या बरोबर राहील. म्हणून शरीरास होणाऱ्या सुख दुःखांना जास्त महत्व देऊ नये. आपण काही लोकांचे निरीक्षण केले तर आपल्याला असे कळते की काहीजण नेहमी आपलेच रडगाणे गात असतात तर काहीजण आपल्या मस्तीत (आत्मसंतुष्ट) जगत असतात. भगवद्गीता आपणास सुख दुःखात समान भावाने रहाण्यास शिकविते. हे जर साध्य झाले नाही तर "पुनरपि जननं, पुनरपि मरणं" या चक्रात आपण अडकतो.
आदि शंकराचार्यांच्या भजनात खालील ओळी आहेत -
भज गोविन्दं भज गोविन्दं,
गोविन्दं भज मूढ़मते।
संप्राप्ते सन्निहिते काले,
न हि न हि रक्षति डुकृञ् करणे॥१॥
अर्थ: हे मूढबुद्धी, भगवंतांचे स्मरण कर, त्यांचे नाव घे कारण मृत्यूसमयी व्याकरणाचे नियम पाठ करण्याने तुझे रक्षण होणार नाही.
सुख व दुःख हे दोन्ही नश्वर आहेत. आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा जेव्हा मृत्यू होतो तेव्हा पहिले काही दिवस आपण खूप दु:खात असतो. कालांतराने दुःखाची तीव्रता कमी होते. एक दोन वर्षांनी दुःखाचा आपल्याला विसरही पडतो. गीता परिवारातील एका शिक्षिकेच्या पतीचा करोनामुळे मृत्यू झाला, त्यांचा मृत देहही घरी आणणे शक्य झाले नाही पण हे तीव्र दुःख बाजूला ठेऊन ती शिक्षिका समर्पण भावाने गीतेची संथा देत राहिली. हे कसे शक्य झाले असे विचारल्यावर तिने सांगितले की केवळ भगवद्गीतेतील शिकवणीमुळे हे साध्य झाले. भगवद्गीता शिकविताना आपले हे दुःख विसरण्यास तिला मदत झाली.

नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः।
उभयोरपि दृष्टोऽन्त:(स्), त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥2.16॥
असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशारितीने या दोहोंचेही सत्य) स्वरुप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.
जे असत्य असते त्याचा अभाव असतो (ते अस्तित्वात नसते) व जे सत्य असते तिलाच अस्तित्व असते हे तत्त्वज्ञानी लोक जाणतात. राजहंस हा दूध व पाण्याच्या मिश्रणातून दूध जसे वेगळे करू शकतो (नीरक्षीरविवेक), तसेच हे असते. तसेच सोनार सोने तापवून त्यातील अशुद्धी दूर करतो व शुद्ध सोने मिळवितो. गृहिणी ताक घुसळून लोणी काढण्याची कला जाणते. शेतकरी धान्यातील भुस्सा काढून टाकून शुद्ध धान्य वेगळे करतो. तसेच प्रपंचात राहून देखील ज्ञानी लोक ब्रह्मतत्त्वात स्थिर होऊ शकतात. कमळाचे फूल पाण्यात राहून देखील त्यापासून वेगळे असते तसेच आपणही संसारात राहून त्याहून वेगळे असले पाहिजे. एका भजनात याच अर्थाच्या खालील ओळी आहेत -
जो जग में रहूँ तो ऐसे रहूँ,
जैसे जल में कमल का फूल रहे,
मेरे सब गुण दोष समर्पित हों,
भगवान तुम्हारे हाथों में ॥
जो जग में रहूँ तो ऐसे रहूँ,
जैसे जल में कमल का फूल रहे,
मेरे सब गुण दोष समर्पित हों,
भगवान तुम्हारे हाथों में ॥
अविनाशि तु तद्विद्धि, येन सर्वमिदं(न्) ततम्।
विनाशमव्ययस्यास्य, न कश्चित्कर्तुमर्हति॥2.17॥
ज्याने हे सर्व जग - दिसणाऱ्या सर्व वस्तू - व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करु शकत नाही.
हे अर्जुना, जे या संसारात व्याप्त होऊन राहिले आहे ते अविनाशी तत्त्व तू जाण असे भगवंत सांगतात. या तत्त्वाचा कोणी नाश करू शकत नाही. ज्याला ह्याचे ज्ञान झाले तो त्या तत्त्वाला जाऊन मिळतो. संसार हा नाशवंत आहे - उत्पत्ती, स्थिती व लय हे त्याचे नियम आहेत. परिवर्तन हा त्याचा स्थायीभाव आहे. परंतु त्यातील परमात्मतत्त्व हे अविनाशी आहे, सनातन आहे. त्याचा नाश कोणी करू शकत नाही. ते परिवर्तित होऊ शकते पण नाश पावत नाही. जशी ऊर्जा एका स्वरूपातुन दुसऱ्यात जाते परंतु तिचा नाश होत नाही. उदाहरणार्थ, उंचीवर असलेले पाणी खाली पडून वेगवान पंख्यावरून फिरले की त्यातून वीज तयार होते.
अन्तवन्त इमे देहा, नित्यस्योक्ताः(श्) शरीरिणः।
अनाशिनोऽप्रमेयस्य, तस्माध्यस्व भारत॥2.18॥
या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरुप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना! तू युद्ध कर.
अविनाशी, अप्रमेय व नित्य असा आत्मा नाशवंत अशा शरीरात राहतो, म्हणून हे अर्जुना, तू आपल्या सर्व आप्तजनांना कसे मारू हे म्हणतोस तेव्हा असे समज की हे सर्व नाशवंत आहेत पण त्यातील आत्मे अमर आहेत. क्षत्रियधर्मानुसार या पाप्यांना मुक्ती देणे हे तुझे कर्तव्य आहे. युद्धापासून अर्जुन पळ काढू इच्छित होता पण भगवंतांनी त्यास तसे करू दिले नाही.
भगवद्गीता आपल्याला आपले कर्तव्य काय आहे याची जाणीव करून देते व ते करण्यासाठी उद्युक्त करते. स्वधर्माचे रक्षण करण्यासाठी युद्ध करणे हे पाप नव्हे. सीमेवर परकीयांचे आक्रमण रोखण्यासाठी शत्रूसैनिकास मारावे लागले तरी ते पाप होत नाही. "तस्माद्युध्यस्व भारत" असे म्हणून भगवंत अर्जुनास आपल्या कर्तव्याची आठवण करून देतात. भगवद्गीतेचा पूर्वार्ध तरुणांसाठी आहे व वीरता शिकवितो, भक्तियोग हा नंतर १२ व्या अध्यायात येतो. हे शरीर नाशवंत आहे पण त्यातील आत्मा हा नित्य आहे. म्हणून शरीर समाप्त होईल असा विचार करणे बरोबर नाही.

य एनं(व्ँ) वेत्ति हन्तारं(य्ँ), यश्चैनं(म्) मन्यते हतम्।
उभौ तौ न विजानीतो, नायं(म्) हन्ति न हन्यते॥2.19॥
जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो 'हा (आत्मा) मेला' असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही.
जो कोणी या विनाशी शरीरास मारणारा असे मानतो व जो त्यास मेलेला असे मानतो ते दोघेही हे जाणत नाहीत की शरीरातील आत्मा कधी मारत नाही किंवा मारला जात नाही. हे अर्जुना, तू देहाभिमान बाळगणे बरोबर नाही, तुझी दृष्टी फक्त शरीरावर आहे. मी त्यांना मारेन व ते मरतील, असे तुझे विचार आहेत. पण त्यांना मारणारा तू कोण लागून गेलास? ते कधी मरतील, ती घडी निश्चित आहे; ते तुझ्या हाती नाही, असे भगवंत स्पष्ट करतात.
एकदा काही मित्र प्रवासासाठी गेले. दुसरा एक मित्र सर्वांबरोबर एकत्र राहता यावे यासाठी आपली स्वतःची गाडी सोडून मित्रांपैकी एकाच्या गाडीत बसला. नेमका त्या गाडीचा अपघात झाला व हा मृत्युमुखी पडला; गाडीतील बाकीचे वाचले. त्याचा मृत्यू त्यावेळी व्हायचा होता म्हणून त्याला गाडी बदलण्याची बुद्धी झाली असावी. मृत्यू केव्हा व कसा होणार हे जर आधीच ठरले असेल तर त्याची चिंता का करावी असे भगवंतांचे अर्जुनास सांगणे आहे.
अकराव्या अध्यायाच्या चौतिसाव्या श्लोकात भगवंत म्हणतात -
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च
कर्णं तथाऽन्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्।।११.३४।।
भावार्थ: द्रोण, भीष्म, जयद्रथ, कर्ण व इतर योद्धयांना मी आधीच मारले आहे. त्यांना तू निमित्त होऊन मार. तू चिंता करू नकोस व युद्ध कर. तू विजयी होशील.
भगवंतांनी जेव्हा आपले विश्वरूपदर्शन घडविले तेव्हा अर्जुनाने या सर्व योद्धयांना त्यांच्या विक्राळ अशा मुखात जातांना व त्यांच्या दातांमध्ये चिरडत असलेले पाहिले. त्याने भगवंतांचे आग ओकत असलेले मुख पाहिले. जसे दिव्याभोवतीचे किडे दिव्याकडे आकर्षित होऊन त्यावर आपटून मृत्युमुखी पडतात तसेच सर्व योद्धे भगवंतांच्या मुखाच्या दिशेने जाताना त्याने पाहिले. हे सर्व पाहून तो भयभीत झाला होता.

न जायते म्रियते वा कदाचिन्,
नायं (म्) भूत्वा भविता वा न भूयः।
अजो नित्यः(श्) शाश्वतोऽयं(म्) पुराणो,
न हन्यते हन्यमाने शरीरे॥2.20॥
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.
शरीरात निवास करणारा आत्मा हा कधी जन्म घेत नाही किंवा कधी त्याचा मृत्यू होत नाही. तो जन्मरहित, नित्य, निरंतर असणारा, शाश्वत व अनादी आहे. शरीर नष्ट होते पण आत्मा नष्ट होत नाही. म्हणून हे अर्जुना, तुला शोक करण्याचे काही कारण नाही.
वेदाविनाशिनं(न्) नित्यं(य्ँ), य एनमजमव्ययम्।
कथं(म्) स पुरुषः(फ्) पार्थ, कं(ङ्) घातयति हन्ति कम्॥2.21॥
हे पार्था! जो पुरुष, "हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे", हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील?
हे पृथानंदना, जो मनुष्य या आत्म्यास अविनाशी, नित्य, जन्मरहित व अव्यय असा मानत असेल तर तो कोणाला कसे मारील व कोणाकडून कसा मारला जाईल? सावलीवर जर शस्त्राचा वर केला तर ती नष्ट होईल का? पाण्याच्या घड्यात सूर्याचे प्रतिबिंब दिसते. जेव्हा त्यातील पाणी सांडते तेव्हा ते प्रतिबिंब नाहीसे होते, म्हणून सूर्याचा नाश होतो का? सूर्य स्थायी आहे, त्याचा नाश होऊ शकत नाही. घडा फुटून नष्ट होतो पण सूर्याचे प्रतिबिंब त्यामध्येच विलीन होऊन जाते. एखाद्या पाण्याच्या मडक्यात आकाश दिसते (घटाकाश). मडके जर फुटले तर ते आकाश (घटाकाश) बाहेरील मोठ्या आकाशात (मठाकाश) विलीन होते. हे सारे प्रतीकात्मक आहे. तसेच शरीराचे आहे. शरीर जरी नष्ट झाले तरी त्यात वास करणारा आत्मा हा परमतत्त्वात विलीन होऊन जातो (नष्ट होत नाही).
वासांसि जीर्णानि यथा विहाय,
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही॥2.22॥
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
हा एक सुंदर व प्रसिद्ध श्लोक आहे. मनुष्य जेव्हा जुन्या कपड्यांचा त्याग करून नवे कपडे परिधान करतो तेव्हा आनंदाचा अनुभव घेतो. तसेच मृत्यूमधे आनंदाचा अनुभव घेतला पाहिजे कारण आत्मा हा जुन्या जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीरात प्रवेश करीत असतो. हे उदाहरण मनुष्यजातीस लागू पडते म्हणूनच भगवंत "नरोऽपराणि" असा शब्दप्रयोग करतात. अनेक जमातींमधे मृत्यूचा आनंदोत्सव करतात. विशेषतः दीर्घायुष्य झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांच्या अंत्ययात्रेत भजने म्हणणे, टाळ-मृदूंग वाजविणे, पुष्पवृष्टी इत्यादी केले जाते. यामध्ये हेच भाव असतात की आत्म्याचा जुने शरीर टाकून नवीन शरीरात प्रवेश होत आहे.
नैनं(ञ्) छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं(न्) दहति पावकः।
न चैनं(ङ्) क्लेदयन्त्यापो, न शोषयति मारुतः॥2.23॥
या आत्म्याला शस्त्रे कापू शकत नाहीत, विस्तव जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा वाळवू शकत नाही.
या श्लोकात विविध शस्त्रांचा संदर्भ येतो कारण युद्धाची पार्श्वभूमी आहे. शस्त्रें शरीरास कापू शकतात पण आत्म्यास नाही. अग्नीचे अस्त्र टाकले तर तो जळू शकत नाही. वरुणास्त्रामुळे तो भिजू शकत नाही व वायूच्या अस्त्राने तो सुकत नाही असे आत्म्याचे स्वरूप आहे.
अच्छेद्योऽयमदाह्योऽयम्, अक्लेद्योऽशोष्य एव च।
नित्यः(स्) सर्वगतः(स्) स्थाणु:(र्), अचलोऽयं(म्) सनातनः॥2.24॥
कारण हा आत्मा कापता न येणारा, जाळता न येणारा, भिजवता न येणारा आणि निःसंशय वाळवता न येणारा आहे. तसेच हा आत्मा नित्य, सर्वव्यापी, अचल, स्थिर राहणारा आणि सनातन आहे.
या आत्म्यास कापले जाऊ शकत नाही, जाळता येत नाही, ओले करू शकत नाही किंवा सुकवू शकत नाही. कारण हा नित्य, अचल आणि स्थिर आहे व अनादी आहे. मागील श्लोकांतीलच तत्त्व पुन्हा एकदा येथे सांगितले आहे. मंत्र किंवा शापाने त्यावर काही परिणाम होत नाही व औषधीही त्यास ओले करू शकत नाहीत.
मालकंस राग जेव्हा गायला जातो तेव्हा एक वेळ दगडाची शिळा ओली होईल परंतु आत्मा नाही. अगस्ती ऋषींनी समुद्रास देखील शोषून घेतले होते परंतु आत्म्यास असे करण्याचा कोणताही उपाय नाही. आत्म्यासाठी येथे पाच विशेषणे वापरली आहेत - आत्मा नित्य, निरंतर आहे, सर्वगतः म्हणजे कालातीत आहे, अचल म्हणजे स्थिर स्वभाव असलेला आहे, स्थाणु: म्हणजे न हलणारा आहे व सनातन म्हणजे अनादी, अनंत आहे.
आत्म्याचे आणखी वर्णन आपण पुढील सत्रात पाहू.
येथे गुरुचरणी वंदन करून दुसऱ्या सत्राची समाप्ती झाली.
१) कमलेश जी
प्रश्न: प्राण व आत्मा हे वेगळे आहेत काय?
उत्तर: हो, हे दोन्ही वेगळे आहेत. आपण श्वास घेतो तेव्हा त्यास प्राणशक्ती असे म्हणतात. प्राणशक्तीच्या धाग्याने शरीर आत्म्याशी जोडले जाते. हा धागा जेव्हा तुटतो तेव्हा आत्मा शरीरातून मुक्त होतो.
२) रामदास जी
प्रश्न: पितामह भीष्म व गुरु द्रोणाचार्य या महान व्यक्तीही दुर्योधनास युद्धापासून परावृत्त का करू शकल्या नाहीत?
उत्तर: हे प्रारब्धामुळे झाले. सर्वनाश होण्यापूर्वी मनुष्याचा विवेक नाहीसा होतो. दुर्योधनाकडे विवेकबुद्धी नव्हती. भीष्म पितामहांनी आपल्या प्रतिज्ञेस विवेकापेक्षा श्रेष्ठ मानले. गुरु द्रोणाचार्यांनी सिंहासनाची सेवा करताना आपली बुद्धी (विवेक) गहाण टाकली असे म्हटले जाते.
३) स्नेहलता दीदी
प्रश्न: सांख्ययोगाचा अर्थ काय आहे?
उत्तर: द्वैत व अद्वैत असे दोन सिद्धांत आहेत. अद्वैत म्हणजे जेथे दोन राहिले नाही, एकच (परमात्मा) आहे. माझ्यामधे परमात्मा आहे व मी परमात्म्यात आहे, असे अद्वैतवादी म्हणतात. परंतु भक्तियोगात भक्त व परमात्मा असे दोन आहेत, ते वेगळे असल्याशिवाय भक्ती कोणाची करणार असे द्वैतवादी म्हणतात. म्हणजे भक्तीमधे द्वंद्व आहे. परंतु अंतिमतः द्वैत हेही अद्वैताकडेच घेऊन जाते. एकाच गंतव्याकडे जाण्याच्या दोन मार्गांसारखे हे आहे. कोणत्याही शिखरावर जायचे असेल तर विविध दिशांनी जाता येते. हिमालयावर जातांना चीनकडूनही जाता येईल किंवा तिबेटकडूनही. कोण कोठे उभे आहे त्यावर ते ठरेल. शिखर तेच असेल. त्याचप्रमाणे आपण परमात्मतत्त्वाकडे जाण्यासाठी सगुण, साकार किंवा निर्गुण, निराकार यापैकी कोणताही मार्ग निवडू शकतो. सांख्ययोग संख्येशी निगडित आहे व निर्गुण निराकाराच्या भक्तीचा मार्ग सांगतो.
यानंतर समापन प्रार्थनेने सत्राची सांगता झाली.
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।

प्रश्नोत्तरसत्र