विवेचन सारांश
स्थितप्रज्ञाची लक्षणे
परंपरेनुसार प्रारंभिक प्रार्थना व दीप-प्रज्वलन करण्यात आले.
गुरुवंदना करण्यात आली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु र्गुरुर्देवो महेश्वरः । गुरूर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ।।
सर्व साधकांना अभिवादन करून दुसऱ्या अध्यायाच्या अंतिम सत्राची सुरुवात झाली.
मागील सत्रात आपण साठाव्या श्लोकापर्यंत "सांख्ययोग" या दुसऱ्या अध्यायाचे चिंतन केले. आपण मागील ५-६ श्लोकांची परत एकदा उजळणी करूया कारण गीतेतील अतिशय महत्त्वाच्या विषयासंबंधी या श्लोकातून भगवंत उपदेश करतात. जेव्हा भगवद्गीता संक्षेपात कोणी समजून घेऊ इच्छितो तेव्हा त्यांस हे ५-६ श्लोक सांगितलेत तर त्यातील संदेश समजेल. तसेच या अध्यायातील पंचावन्न ते सत्तर ह्या अर्थपूर्ण श्लोकांत आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता आहे.
चोपन्नाव्या श्लोकात अर्जुनाने " स्थितप्रज्ञस्य का भाषा" असे म्हणून स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगण्याची विनंती भगवंतांना केली. आपली युध्दकर्म न करण्याची चूक अर्जुनाच्या लक्षात आली म्हणूनच त्याने असा प्रश्न केला. आपली चूक कबूल करणे ही योग्य दिशेस जात असण्याची पहिली पायरी आहे. अर्जुनाने भगवंतांकडे शरणागती पत्करून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. आता तो त्यांना पृच्छा करतो की परमात्म्यात स्थित अशा स्थिरबुद्धी व्यक्तीची लक्षणे काय असतात. असा मनुष्य कसा बोलतो, कसा चालतो व कसा बसतो? त्यावर भगवंतानी स्थिर बुद्धीचे महत्त्व परत एकदा सांगितले व ती कशी प्राप्त करावी याबद्दल उपदेश केला. अशा व्यक्तीचे आचरण कसे असते हे सांगण्यास प्रारंभ केला. आपल्या मनात विचार येतो की अर्जुनाने भगवंतांकडे जर संपूर्ण शरणागती पत्करली होती तर त्यांनी इतके कष्ट घेऊन अर्जुनास सर्व सविस्तर का सांगितले असावे? ते फक्त त्यास त्याची शस्त्रे घेऊन युद्ध कर व विजय मिळव इतकेच म्हणू शकले असते. घोर युद्ध प्रसंगी हा उपदेश करण्याची त्यांना काय जरूर होती?
एखादा छोट्या वयाचा मुलगा थंडीच्या दिवसात शाळेत जाण्यासाठी बस पकडताना स्वेटर घालण्यास विसरतो व त्याची आई त्याला तो घातल्याशिवाय शाळेत जायचे नाही असे सांगते. कारण विचारल्यावर ती त्याला म्हणते की आत्ता तू स्वेटर घाल, घरी परत आल्यावर मी सर्व काही सांगेन.
अर्जुनाचीही स्थिती त्यावेळी एखाद्या बालकासारखी होती. परंतु भगवंतांनी थोडक्यात उत्तर न देता त्यांचा दीर्घ उपदेश गीतेच्या अठरा अध्यायांमधून दिला. त्यांना माहित होते की हा उपदेश फक्त त्या अर्जुनासाठी नाही तर येणाऱ्या अनेक पिढ्यांतील अर्जुनाना मार्गदर्शन करेल. एखादा तज्ज्ञ जसे मार्गदर्शन करेल तसेच हे होते. काही वेळा काम टाळण्यासाठी आपण काही तरी बहाणा शोधतो पण ते काम करणे का जरुरीचे आहे याचे महत्व आपल्याला समजले तर ते बिनतक्रार आपण करतो. तसेच छोट्या मुलांची मानसिकता समजून त्यांना काही गोष्टी सांगतात, त्या त्यांच्यावर आपण लादू शकत नाही.
गीतामाहात्म्य सांगताना असे म्हंटले आहे -
सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः । पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् ।।६।।
भावार्थ: सर्व उपनिषदरूपी गाईंचे अमृतासमान उपदेशाचे गीतारूपी दूध, भगवान श्रीकृष्ण काढून ते अर्जुनास प्राशन करवितात.
त्या शाळॆत जाणाऱ्या मुलास थर्मामीटर दाखवून त्यातील पारा ठराविक खुणेच्या खाली गेला तर हवा खूप थंड असेल व त्याला थंडी वाजेल असे समजावून सांगितले तर तो टाळाटाळ न करता थंडीच्या दिवसात रोज स्वेटर घालेल. त्याच्यात जबाबदारीची जाणीव येईल. त्याचप्रमाणे भगवंत अर्जुनास जेव्हा संपूर्ण उपदेश देतात तेव्हा त्याला आपल्या कर्तव्याची पूर्ण जाण येते. भगवंतांनी फक्त अर्जुनावरच नाही तर पूर्ण मानवजातीवर हे उपकार केले आहेत. अर्जुनास ते स्वतःच्या पायावर उभे करतात, त्याच्यातील आत्मविश्वास जागवितात कारण त्याचे मन व त्यामुळे बुद्धी डगमगले आहेत. बुद्धी स्थिर कशी करावी याबद्दल ते उपदेश करतात.
पंचावन्नाव्या श्लोकात भगवंत म्हणतात आपण स्वतःमधे संतुष्ट राहण्यास शिकले पाहिजे. बाह्य गोष्टींमधे आपले समाधान शोधू नये. सर्वसामान्य मनुष्याचा संतोष हा बाह्य गोष्टींवर, त्यांच्या अपेक्षा व आकांक्षांवर अवलंबून असतो. जर पायी चालत असलो तर आपल्याकडे दुचाकी असावी असे वाटते, जर ती मिळाली तर आता गाडी पाहिजे अशी इच्छा होते. ह्या इच्छा व अपॆक्षा कधी न संपणाऱ्या आहेत. आपण आपल्या अंतरंगातच आनंदाचा शोध घेतला पाहिजे. असा आनंदच चिरकाल टिकतो. तो बाह्य व्यक्ती, वस्तू किंवा परिस्थिती यावर अवलंबून नसावा कारण ते सर्व बदलणे आपल्या हाती नाही. एखादी अप्रिय व्यक्ती समोरून आली तर तिला आपण टाळण्याचा प्रयत्न करतो परंतु तिला चेहऱ्यावर हास्य ठेऊन सामोरे गेल्यास आपल्यामधील शत्रुत्वभाव नाहीसा होईल. आत्मसंतुष्ट राहण्यामधे विलक्षण ताकद आहे.
छप्पन्नाव्या श्लोकात भगवंत आपणांस मनन करण्याचा सल्ला देतात. आपण बाहेरील अनेक व्यक्तींशी संभाषण करतो परंतु स्वतःसाठी अजिबात वेळ देत नाही. आपण थोडे शांत होऊन, आपण काय चुका करतो याचे आत्मपरीक्षण करावे. सुख आणि दुःख या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. नुसते सुखाच्या पाठीमागे लागलो तर दुःखही पदरात येणार. घरात वातानुकूलित करणारी यंत्रणा बसविली तर थोडे दिवस छान जातील, थंड हवेचे सुख मिळेल पण सतत त्या हवेत राहिल्याने त्रासही होऊ शकतो व तो दुःखास कारणीभूत होईल. लहान घरातून मोठ्या घरात गेल्यावर सुरुवातीस सुख मिळेल परंतु नंतर त्याच्या सफाईसाठी कष्ट घ्यावे लागतील, नोकर-चाकर ठेवावे लागतील, अंतिमतः ते दुःखकारक होईल. आपले शरीर प्रकृतिजन्य आहे व त्रिगुणांच्या मिश्रणाने बनलेले आहे. सुख-दुःखे ही येत-जात राहणार. दु:खांमुळे विचलित होणे म्हणजे त्यांना आपल्या अंतरंगात प्रवेश करू देण्यासारखे आहे. परंतु ती कायम टिकणारी नाहीत. जसे आपल्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू झाल्यास आपल्याला तीव्र दुःख होते परंतु वर्षा-दोन वर्षात आपण ते विसरतो. जे एक-दोन वर्षात घडते ते आपण काही वेळातच का कमी करू नये? त्यासाठी आपल्याला मनाची तयारी करावी लागेल. क्षणिक सुख मिळाले तर आपण हर्षभरित होतो व दु:खी घटना घडल्यास त्यात बुडून जातो, हे अयोग्य आहे. मासे पकडण्यासाठी आपण कणकेच्या गोळ्यास मागे काटा लावून पाण्यात सोडतो. कणकेच्या आकर्षणाने मासा येतो व काट्याला अडकतो. सुख-दुःखे ही त्याप्रमाणे आहेत, त्यांच्याकडे आकृष्ट होऊन आपण त्यात अडकतो. एखाद्या व्यक्तीस आपल्या पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच अतीव दुःख होते व दुसऱ्या व्यक्तीस लॉटरी लागली तरी हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू होतो म्हणजे सुख व दुःख यांचा परिणाम समानच झाला.
भगवंत सांगतात की स्थिरबुद्धीच्या व्यक्ती कशानेही उत्तेजित होत नाहीत. सुख-दुःखांचा प्रभाव फक्त मर्यादित काळाकरिताच असतो हे ते जाणतात. सुख-दुःख अनित्य आहेत व ती कालांतराने नाहीशी होतात याचे त्यांना भान असते. आपण ती कमीतकमी वेळात नाहीशी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे सर्व आपणास समजते पण आचरणात येत नाही. त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. लर्नगीता मधील प्रवास "गीता पढे, पढाये और जीवन में लायें" असा आहे. आपल्या चेहऱ्यावरील स्मितहास्य कधी ढळू देऊ नये असे गीता सांगते. महाभारताच्या कठीण समयी अर्जुन आपली शस्त्रे टाकून हतोत्साहित अवस्थेत बसला होता.ज्याच्या भरवश्यावर भगवंतांनी युद्ध करण्याचा निर्णय घेतला तोच हतबल व आप्तस्वकीयांच्या मोहाने ग्रस्त झाला होता. त्यांनी त्यामुळे क्रोधीत व्हावयास पाहिजे होते परंतु ते शांत होते, त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य ढळले नाही. आपल्या चेहऱ्यावरची प्रसन्नता कायम ठेऊन त्यांनी अर्जुनास उठविले होते व प्रेमाने आपला उपदेश त्यास देऊ केला. आपणही अशीच प्रसन्न वृत्ती ठेऊ शकतो काय?
एका कवितेत म्हटले आहे-
कुछ भी नहीं असंभव जग मे, सब संभव हो सकता है ।
कार्य हेतु यदि कमर बांध लो, तो सब कुछ हो सकता है ।।
कोणतेही कार्य निश्चयात्मक बुद्धी असेल तर होऊ शकते.
सत्तावन्नाव्या श्लोकात भगवंत म्हणतात की ज्याची बुद्धी स्थिर (प्रतिष्ठित) असते, तिचे निर्णय योग्य असतात. जेव्हा क्रोध, निराशा किंवा दुःखामुळे बुद्धी विचलीत होते, तेव्हा योग्य निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. आपल्या मनात जेव्हा नकारात्मक विचार येतात तेव्हा त्यांना लगेच प्रतिसाद देऊ नये, थोडे शांत राहावे कारण आपली बुद्धी तेव्हा स्थिर नसते. बुद्धीची स्थिरता आल्यावर मग निर्णय करावा. अशी स्थिरबुद्धी व्यक्ती शुभ गोष्टीची प्राप्ती झाल्यावर उत्तेजित होत नाही किंवा अशुभाची प्राप्ती झाल्यास त्याचा द्वेष करीत नाही. पुढील श्लोकात ते त्यासाठी सुंदर उदाहरण देतात.
श्लोक ५८ - ज्याप्रमाणे, कासव कोणतेही संकट आल्यावर आपले सर्व अवयव आपल्या कवचात ओढून घेते, तसेच योगी अशा परिस्थितीत, आपल्या इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून दूर ठेवतो व त्यामुळे त्याची बुद्धी स्थिर होते. मंदिरातील गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला कासवाच्या प्रतीकाचे दर्शन होते. कासवास सहा अंगे असतात. चार पाय, शेपूट व मुख. हे सर्व संकट आल्यावर ते आपल्या कवचात सामावून घेते व आपले रक्षण करते. तसेच आपली ५ इंद्रिये व मन आहेत. त्यांच्यावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या षड्रिपूंचे सतत आक्रमण होत असते. त्यांच्यापासून कासवाप्रमाणे आपल्या इंद्रियांचे रक्षण करणे जरुरी आहे. नुसत्या पाच इंद्रियांचेच नव्हे तर मनाचे नियंत्रणही आवश्यक आहे. उदाहरणार्थ, डोळे बंद असले तर दृश्य दिसणार नाही परंतु मनात त्याचा विचार येणे थांबणार नाही किंवा उपासाच्या दिवशी काही खाल्ले नाही तरी भोजनाचा विचार मनातून जाणार नाही. विषयासक्ती जर गेली नाही तर नुसते इंद्रियांवर नियंत्रण असून चालणार नाही. या सर्व सुंदर श्लोकांतून आपल्याला जीवनासाठी उचित उपदेश मिळतो. छोट्या छोट्या गोष्टींतून आपण हे साध्य करू शकतो. जसे रोज चहा पिण्याची सवय असेल तर एके दिवशी तुळशीचे पान गरम पाण्यात टाकून पिण्याचा प्रयोग करून पाहावे व ते शक्य झाल्यास रोज करावे, कदाचित चहाची सवय सुटेल. सकाळी उठल्यावर व्यायाम व योगासने करण्याचा सराव करावा.
एकोणसाठाव्या श्लोकात भगवंत जिव्हा (रसना) हे पाच इंद्रियांत सर्वात प्रभावी इंद्रिय असते हे सांगतात. जिव्हा सतत बोलते व निरनिराळे पदार्थ ग्रहण करते. सर्व रोगांचा आरंभ तेथूनच होतो. आपल्या कटू वाणीमुळे अनेकांना आपण दुःख देतो किंवा त्यांच्याशी शत्रुत्व करतो. जे प्रकृतीसाठी योग्य नाही तेही खातो. म्हणून भगवंत सांगतात की इंद्रियांच्या संयमाचा आरंभ रसनेपासून केला पाहिजे. आठवड्यातील एखादा दिवस निराहार राहण्याचा प्रयत्न करावा. परंतु निराहार केवळ जिव्हेचा नसतो. कानाने ऐकणे, डोळ्यांनी पाहणे हेही त्या त्या इंद्रियांचे आहार आहेत. अष्टांग योगामध्ये "प्रत्याहार" ही पाचवी पायरी आहे त्यामध्ये पाचही इंद्रियांचे संयमन करणे जरुरी आहे. इंद्रियांना विषयांपासून दूर ठेऊ परंतु त्यांचे मनातील चिंतनही दूर केले पाहिजे तरच त्यापासून पूर्ण निवृत्ती होईल. जोपर्यंत परमात्मतत्वात रस येणार नाही तोपर्यंत बाकी रस कमी होणार नाहीत. त्यासाठी (परमात्म्यावर) भक्ती अतिशय उपयुक्त आहे.
साठाव्या श्लोकात भगवंत इंद्रियांच्या प्रमथनशील स्वभावाबद्दल सांगतात, विद्वान व्यक्तीसही त्यांना काबूत ठेवणे कठीण असते. प्रयत्न करून देखील इंद्रिये मनास जबरदस्तीने ओढून विषयांकडे नेतात. एका गुरूंनी आपल्या शिष्यास ध्यान करतेवेळी माकडाचा विचार मनात आणायचा नाही असे सांगितले पण नेमका तोच विचार त्याच्या मनात वारंवार येत राहिला. जी गोष्ट पूर्णपणे मनातून काढून टाकायची आहे तिचे चिंतन करू नये. जर बुद्धी निश्चयात्मक नसेल तर विद्वत्तेचा काही उपयोग नाही.

2.61
तानि सर्वाणि संयम्य, युक्त आसीत मत्परः।
वशे हि यस्येन्द्रियाणि, तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥2.61॥
म्हणून साधकाने त्या सर्व इन्द्रियांना ताब्यात ठेवून, चित्त स्थिर करुन, मनाला माझाच आधार देऊन ध्यानात बसावे. कारण इन्द्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात, त्याची बुद्धी स्थिर होते.
इंद्रियांचे संयमन आणि त्याबरोबर भगवंतांचे चिंतन जरुरी आहे. यम-नियमांबरोबर ध्यान आणि धारणा जरुरी आहेत. ते साध्य करण्यासाठी आसन व प्राणायाम यांची जरुरी आहे. हेच अष्टांगयोगात सांगतात. भगवद्गीता हेही योगशास्त्र आहे. प्रत्येक अध्यायाच्या अखेरीस पुष्पिका असते, त्यात हा उल्लेख येतो. जीवनात उन्नती करण्यासाठीचे हे शास्त्र आहे.
ध्यायतो विषयान्पुंस:(स्), सङ्गस्तेषूपजायते।
सङ्गात्सञ्जायते कामः(ख्), कामात्क्रोधोऽभिजायते॥2.62॥
विषयांचे चिंतन करणाऱ्या पुरुषाची त्या विषयांत आसक्ती उत्पन्न होते. आसक्तीमुळे त्या विषयांची कामना उत्पन्न होते. कामना पूर्ण झाल्या नाहीत की राग येतो.
इंग्रजीत म्हणतात -
Think of the devil and devil is there.
त्याप्रमाणेच आसक्ती व कामना यांचे आहे. जशी एखाद्या गोष्टीची आसक्ती होते, त्याच वेळी मनात त्याच्या प्राप्तीची कामना निर्माण होते. या कामनेची पूर्ती मनासारखी झाली नाही तर क्रोध येतो. क्रोधामुळे मूढभाव किंवा अविवेक निर्माण होतो.

क्रोधाद्भवति सम्मोह:(स्), सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात्प्रणश्यति॥2.63॥
रागामुळे अत्यंत मूढता अर्थात् अविचार उत्पन्न होतो. मूढतेमुळे स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली की बुद्धीचा म्हणजे ज्ञानशक्तीचा नाश होतो. आणि बुद्धीचा नाश झाल्यामुळे माणसाचा अधःपात होतो.
मनात क्रोध निर्माण झाला की आपला मनावर संयम राहत नाही आपण बोलू नये ते बोलतो व नंतर पश्चात्ताप होतो. क्रोध मनातील सुप्तावस्था आहे. तो उफाळून आला की मनुष्य बेहोश व अविवेकी होतो. त्यामुळे त्याला स्मृतिभ्रंश होतो व तो बुद्धिनाशास कारणीभूत होतो. बुद्धिनाशामुळे शेवटी मनुष्याचे पतन होते.
रागद्वेषवियुक्तैस्तु, विषयानिन्द्रियैश्चरन्।
आत्मवश्यैर्विधेयात्मा, प्रसादमधिगच्छति॥2.64॥
परंतु अन्तःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष-रहित इन्द्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अन्तःकरणाची प्रसन्नता प्राप्त करुन घेतो.
कर्मयोगी व्यक्तीचा विषयांशी जरी संबंध आला तरी तिचे स्वतःवर नियंत्रण असते, अंतःकरणाची निर्मळता कायम असते व अशा साधकाची बुद्धी परमात्म्यात स्थिर होते.
प्रसादे सर्वदुःखानां(म्), हानिरस्योपजायते।
प्रसन्नचेतसो ह्याशु, बुद्धिः(फ्) पर्यवतिष्ठते॥2.65॥
अन्तःकरण प्रसन्न असल्यामुळे त्याची सर्व दुःखे नाहीशी होतात. आणि त्या चित्त प्रसन्न असलेल्या कर्मयोग्याची बुद्धी तत्काळ सर्व गोष्टींपासून निवृत्त होऊन एका परमात्म्यामध्येच उत्तमप्रकारे स्थिर होते.
अंतःकरणात जेव्हा निर्मळतेचा स्रोत निर्माण होतो तेव्हा साधकाच्या सर्व दुःखांचा नाश होतो. त्याची बुद्धी परमात्म्यात स्थिर होते. मुक्ती मिळविण्याचा मार्ग बाहेर नाही तर आपल्या अंतरंगात मिळेल. आपण आपला आनंद बाह्य घटनांवर अवलंबून ठेवण्याऐवजी अंतःकरणाच्या प्रसन्नतेत किंवा निर्मळतेत ठेवला तर चित्त प्रसन्न राहील व सर्व दुःखाचे निवारण होईल. आपल्याला अशा अनेक व्यक्ती भेटतात की ज्यांच्याकडे काही नसूनही त्या आनंदी व हसतमुख असतात व काही अशा भेटतात की ज्यांच्याकडे सर्व काही असते तरी त्या चिडचिड्या स्वभावाच्या व असमाधानी असतात. आपल्याकडे नेहमीच काहीतरी कमी व काही जास्त असते. आपली प्रसन्न वृत्ती आपल्यावरच अवलंबून असते. अशी वृत्ती असेल तरच बुद्धीही स्थिर असते.
नास्ति बुद्धिरयुक्तस्य, न चायुक्तस्य भावना।
न चाभावयतः(श्) शान्ति:(र्), अशान्तस्य कुतः(स्) सुखम्॥2.66॥
मन आणि इन्द्रिये न जिंकणाऱ्या पुरुषाच्या ठिकाणी निश्चयात्मक बुद्धी नसते आणि अशा अयुक्त पुरुषाच्या अन्तःकरणात आस्तिक भावही नसतो. तसेच भावशून्य माणसाला शांती मिळत नाही. मग शांती नसलेल्या माणसाला सुख कोठून मिळणार?
येथे भगवंत सुखाचा मार्ग दाखवितात. ज्यांची बुद्धी निश्चयात्मक नसते त्यांच्यामधे कर्तव्यपरायणता नसते व त्यांना शांती मिळत नाही. शांती कर्तव्यभावनेने येते, प्रामाणिकतेने येते. अंतर्बाह्य मी एकच आहे, या भावामुळे आपणास शांती मिळते. ज्यांनी आपला कर्तव्याचा मार्ग सोडला त्यांना मनाची शांती लाभणार नाही व ती नसेल तर सुख कसे मिळेल? आपल्या कर्तव्यपथावर नेहमी चालावे म्हणजे सुख व शांती प्राप्त होईल असे भगवंत सांगतात.
इन्द्रियाणां(म्) हि चरतां(य्ँ), यन्मनोऽनुविधीयते।
तदस्य हरति प्रज्ञां(व्ँ), वायुर्नावमिवाम्भसि॥2.67॥
कारण ज्याप्रमाणे पाण्यात चालणाऱ्या नावेला वारा वाहून नेतो, त्याचप्रमाणे विषयांत वावरणाऱ्या इंद्रियांपैकी मन ज्या इन्द्रियाबरोबर राहते, ते एकच इन्द्रिय या अयुक्त पुरुषाची बुद्धी हिरावून घेते.
बाकी सारी इंद्रिये नियंत्रणात येतील पण मन नियंत्रणात आले नाही तर काही साध्य होणार नाही. मनावर संयम प्रथम आवश्यक आहे. केवळ इंद्रियांवर संयम म्हणजे एखाद्या विषारी वृक्षाची केवळ पाने खुडल्याप्रमाणे आहे, त्याचे मूळ जोपर्यंत नष्ट होत नाही तोवर वृक्ष जिवंत राहील व त्यास नवी पाने फुटतील. इंद्रियरूपी घोड्यांना मन दौडविते. त्याला काबूत ठेवले नाही तर ते आपल्या बुद्धीचे हरण करू शकते इतकी त्याची क्षमता आहे.
तस्माद्यस्य महाबाहो, निगृहीतानि सर्वशः।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्य:(स्), तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता॥2.68॥
म्हणून हे महाबाहो! ज्याची इन्द्रिये इन्द्रियांच्या विषयांपासून सर्व प्रकारे आवरुन धरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर असते.
म्हणून हे महाबाहू अर्जुना, ज्या मनुष्याचा पूर्णरूपाने इंद्रियनिग्रह झाला आहे त्याची बुद्धी स्थिर होते. आपल्या विजयाचा तो सर्वात मोठा मंत्र आहे.
या निशा सर्वभूतानां(न्), तस्यां(ञ्) जागर्ति संयमी।
यस्यां(ञ्) जाग्रति भूतानि, सा निशा पश्यतो मुनेः॥2.69॥
सर्व प्राण्यांच्या दृष्टीने जी रात्रीसारखी असते, अशा नित्य ज्ञानस्वरुप परमानंदाच्या प्राप्तीत स्थितप्रज्ञ योगी जागतो आणि ज्या नाशिवंत सांसारिक सुखाच्या प्राप्तीत सर्व प्राणी जागतात, ती परमात्मतत्त्व जाणणाऱ्या मुनीला रात्रीसारखी असते.
या श्लोकाचा सरळ अर्थ केला तर जेव्हा सर्व लोक झोपलेले असतात तेव्हा मुनी जागत असतात व जेव्हा सर्व लोक जागत असतात तेव्हा मुनी निद्रेत असतात असा होईल पण ते चुकीचे आहे.
आपण व्यवहारातील उदाहरण घेतले तर आपणा सर्वांना भगवद्गीता शिकण्याची उत्सुकता आहे व आपण त्यासाठी आपला बराच वेळ नियमितपणे देतो पण इतर बऱ्याच लोकांमधे ही उत्सुकता जागृत होत नाही. त्यांना हे आपले काम नाही असे वाटते. पारमार्थिक दृष्ट्या असे लोक झोपलेले आहेत असे आपण म्हणू शकतो. परमात्म्यापासून विमुख होणे हे रात्रीसारखे आहे व संयमी मनुष्य अशा वेळी जागा असतो. आपण सर्वजण लर्नगीतेच्या माध्यमातून गीता शिकण्याचा प्रयत्न करीत आहोत म्हणजे आपण जागत आहोत. जे लोक भोगांच्या प्राप्तीमधेच व्यग्र आहेत, ते तत्वतः झोपलेले आहेत. गीताभ्यासामधे आपण व्यग्र असतो तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. आपण इतरांच्या कृतींमुळे आपल्या आनंदावर बाधा येऊ देत नाही.

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं(म्),
समुद्रमापः(फ्) प्रविशन्ति यद्वत्।
तद्वत्कामा यं(म्) प्रविशन्ति सर्वे,
स शान्तिमाप्नोति न कामकामी॥2.70॥
ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी, सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते, त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात, तोच पुरुष परम शांतीला प्राप्त होतो. भोगांची इच्छा करणारा नव्हे.
भोगांची सातत्यपूर्ण कामना जे करतात त्यांना परमशांतीचा अनुभव येऊ शकत नाही.
विहाय कामान्यः(स्) सर्वान्, पुमांश्चरति निःस्पृहः।
निर्ममो निरहङ्कारः(स्), स शान्तिमधिगच्छति॥2.71॥
जो पुरुष सर्व कामनांचा त्याग करुन, ममता, अहंकार आणि इच्छा टाकून राहात असतो, त्यालाच शांती मिळते.
भगवंत येथे तीन गोष्टींबद्दल सांगतात -
स्पृहारहित - असा मनुष्य थोडी आनंददायक गोष्ट जरी घडली तरी त्या खुशीमुळे उत्तेजित होत नाही
ममतारहित - याचा अर्थ ज्याला प्रेम नसते असा नाही तर जो मोहरहित आहे असा होतो (अर्जुनाला आप्तस्वकियांचा मोह झाला होता)
अहंकाररहित - ज्यांचेकडे सतत "मीपणा" चा भाव असतो. हे मी केले, माझ्यामुळे घडले किंवा माझे आहे असे यांचे विचार असतात ते अहंकारी होत. जेव्हा अशा अहंकाराचा त्याग होईल तेव्हाच पूर्ण रूपाने शांती लाभेल.
आपली बुद्धी, रूप, मिळविलेले धन, उत्तम वस्त्रे इत्यादी कायमस्वरूपी नाहीत. आपल्या बरोबरच नष्ट होणार आहेत तर त्यांचा अहंकार बाळगणे योग्य नाही.
अशा अहंकारापासून मुक्त होऊन, मोहातून बाहेर निघून व आशा-आकांक्षांपासून दूर होऊनच आपण शांती प्राप्त करु शकू.

एषा ब्राह्मी स्थितिः(फ्) पार्थ, नैनां(म्) प्राप्य विमुह्यति।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि, ब्रह्मनिर्वाणमृच्छति॥2.72॥
हे अर्जुना! ब्रह्माला प्राप्त झालेल्या पुरुषाची ही स्थिती आहे. ही प्राप्त झाल्याने योगी कधी मोहित होत नाही. आणि अंतकाळीही या ब्राह्मी स्थितीत स्थिर होऊन ब्रह्मानंद मिळवतो.
मृत्युसमयीही आपली मती स्थिर असावी पण ते साध्य करण्यासाठी निरंतर प्रयत्नांची जरुरी आहे. तरच त्या ब्राह्मी स्थितीस आपण पोचू शकू. देह सोडण्याच्या वेळी पीडा तर होणारच पण आपण म्हणजे हे शरीर नव्हे, ही पंचेंद्रिये नव्हे इत्यादी भाव प्रयत्नपूर्वक आत्मसात केले तर ते शक्य होईल. थोड्या वेदनेने देखील आपण कळवळतो किंवा काही लोक कसे चालू आहे असे विचारले तर आपले रडगाणे गातात. आपण दु:खी-कष्टी अवस्थेत जर मृत्यू पावलो तर पुढील जन्मीही तेच दुःख-कष्ट पदरात पडतील. शरीराचे कष्ट म्हणजे आत्म्याचे नव्हेत हे ध्यानात घेतले पाहिजे. आपण अंतःकाळीही स्थिरमती राहून त्या ब्राह्मी स्थितीस प्राप्त होऊ शकू.
येथे दुसऱ्या अध्यायाचे विवेचन संपन्न झाले.
प्रश्नोत्तरसत्र
१) गिरधारीलाल जी
प्रश्न: या अध्यायाचे ६९ व ७० हे श्लोक स्पष्ट करावेत.
उत्तर: श्लोक ६९ - काही लोक भौतिक सुखभोगांच्या मागे धावतात व त्यांना आत्मोद्धार कसा करावा हे समजत नाही परंतु संयमी व्यक्तींना हे सर्व समजते. त्यांची ज्ञानाची अवस्था दिवसाप्रमाणे (प्रकाशाप्रमाणे) असते तर बाकी सर्व अज्ञानरूपी अंधारात किंवा रात्रीत असतात.
श्लोक ७० - ज्याप्रमाणे चारी बाजूंनी नद्या सागरास येऊन मिळतात तेव्हा त्याच्यावर कोणताच परिणाम होत नाही व तो त्याच्या मर्यादेत, अचलपणे राहतो (त्याची पातळी वाढत नाही), त्याप्रमाणे भोग, कामना इत्यादींचा संयमी मनुष्यावर कोणताही परिणाम होत नाही व त्याला परमशांती मिळते.
२) भारती जी
प्रश्न: ध्यान करतांना लक्ष लागत नाही, नको ती दृश्ये दिसतात, यासाठी काय करावे?
उत्तर: ध्यान करतानाची ही प्रथम पायरी आहे, यातून आपल्या मनातील सर्व मळ निघत आहे असे समजावे. या प्रक्रियेतून जसे जसे पुढे जाऊ तसे हे चित्र बदलत जाईल व भगवंताची मूर्ती ध्यानात येईल.
प्रश्न: ६८ व्या श्लोकात "निगृहितानि सर्वशः" याचा अर्थ काय आहे?
उत्तर: याचा अर्थ सर्व इंद्रियांचे मोठ्या निग्रहाने संयमन करणे असा आहे.
३) दलिप जी
प्रश्न: स्थितप्रज्ञाची लक्षणे सांगतांना भगवंत मनातील कामनांचा त्याग करण्यास सांगतात परंतु भगवंतांना आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा यश द्यावे, धन द्यावे, रूप द्यावे इत्यादी मागणी करतो. हे कसे?
उत्तर: भगवंतांची प्रार्थना करताना मागणे म्हणजे त्यांच्यासमोर विनम्र होणे आहे. काही मागणे म्हणजेही धैर्य आहे. त्यासाठी आपल्या अहंकाराचा त्याग करावा लागतो. आपले कर्तव्यकर्म करत असताना आपण काही गोष्टी मागतो जसे आपल्या पुत्राचा विवाह व्हावा हे मागितले तर ते आपले कर्तव्य आहे. पण म्हातारपणी त्याने आपल्याला सांभाळावे हे जर मागितले तर ती कामना होईल. कर्म करतांना फळाच्या अपेक्षेचा त्याग करावा असे भगवंत म्हणतात. चांगल्या कामाचे फळ हे मिळणारच पण अपेक्षित फळ मिळेल अशी कामना करू नये.
यानंतर समापन प्रार्थना होऊन सत्राची समाप्ती झाली.