विवेचन सारांश
अविनाशी आणि शाश्वत आत्मतत्त्वाची ओळख
पारंपारिक पद्धतीने दीप प्रज्वलन करून आणि प्रार्थना म्हणून विवेचन सत्राची सुरुवात झाली. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि सद्गुरूंना वंदन करण्यात आले.
भगवंतांची अत्यंत कृपा आपल्यावर असल्याने आपण आपले जीवन सफल करण्याकरिता आणि त्याला पूर्णत्व देण्यासाठी भगवद्गीतेचे पठण करीत आहोत, तसेच भगवद्गीता दुसऱ्यांना शिकवून ती आचरणात आणण्याच्याही मार्गाला लागलो आहोत.
भगवद्गीतेसारखा महान कल्याणकारी ग्रंथ दुसरा कोणताही नाही हे गेल्या ५३००वर्षात अनेक संत-महात्म्यांनी नि:संदेहपणे सांगितले आहे.
भगवद्गीतेचा पहिला अध्याय 'अर्जुनविषादयोग आहे, ज्यात अर्जुनाला विषाद झाला आहे. अनेक विद्वानांनी भगवद्गीतेचा प्रारंभ दुसऱ्या अध्यायाच्या सातव्या श्लोकापासून मानला आहे. श्री आदि शंकराचार्यांनी तो अकराव्या श्लोकापासून मानला आहे. अकराव्या श्लोकापासून भगवंतांनी अर्जुनाला उपदेश करण्यास सुरुवात केली. जसे एखादा निबंध लिहिताना संदर्भ, प्रसंग आणि भावार्थ असे लिहिले जाते, तसेच पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून दुसऱ्या अध्यायाच्या सातव्या श्लोकापर्यंत भगवद्गीतेचा 'प्रसंग' आहे, आठवा, नववा आणि दहावा श्लोक हा संदर्भ आहे आणि अकराव्या श्लोकापासून भगवद्गीतेचा भावार्थ सुरू होतो.
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात जसा अर्जुनाचा शोक आहे तसेच महाभारतामध्ये धृतराष्ट्राचाही शोक मोठा आहे. परंतु या दोन्हींमध्ये फरक आहे. पहिल्या अध्यायात धृतराष्ट्र म्हणतो, "मामकाः पांडवाश्चैव" म्हणजे धृतराष्ट्र पांडूपुत्रांसाठी आणि 'आपल्या' पुत्रांसाठी शोक करत आहे. अर्जुन मात्र स्वजनांसाठी शोक करत आहे. 'त्यांना कसे मारावे?' असा विचार त्याच्या मनात आहे. 'शोक', 'मोह' आणि भय या तीन वेगवेगळ्या भावना असूनही त्या एकच आहेत. कारण विद्वान म्हणतात, भूतकाळातील घटनांसाठी 'शोक' केला जातो. वर्तमानकाळातील घटनांसाठी 'मोह' असा शब्द वापरतात, तर भविष्यकाळातील घटनांसाठी ते 'भय' असते.
कित्येक वेळेला आपणही आपली अवस्था अर्जुनासारखी झाली आहे असे म्हणतो, परंतु अर्जुनासारखे होण्यासाठी खूप मोठी पात्रता लागते. अर्जुन सतत 'मला हे युद्ध करायचे नाही' असे म्हणतो, परंतु प्रत्यक्षात, भगवंतांकडे मागणी मागताना याच अध्यायाच्या सातव्या श्लोकात अर्जुन म्हणतो,
कार्पण्यदोषोपहतस्वभावः

पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।२.७।।
करुणाव्याप्त दैन्यामुळे ज्याचा मूळ स्वभाव नाहीसा झाला आहे व धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला विचारीत आहे की, जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा कारण मी तुमचा शिष्य आहे. म्हणून तुम्हाला शरण आलेल्या मला उपदेश करा.

माझ्यासाठी काय योग्य आहे आणि अयोग्य आहे ते सांग असे अर्जुन येथे म्हणतो. तो 'माझ्या मनात जे आहे ते करायला सांगा' असे म्हणत नाही. तसेच तो शिष्य भावाने गुरूंना विचारणा करत आहे. आपल्या मनातील भावना आपल्यासाठी कल्याणकारी नाही हे अर्जुनाला कुठेतरी कळले होते आणि तो तेच करू इच्छित होता जे त्याच्यासाठी कल्याणकारी आहे.
आपल्याला मात्र आपल्या मनात जे असेल तेच घडावे असे वाटते. जीवनात श्रेय मिळावे अशी इच्छा केली तर आपण अर्जुन होऊ आणि प्रेय मिळावे असे इच्छिले तर सर्वसामान्य माणूस होऊ. अर्जुनाने श्रेयाची इच्छा केली म्हणूनच भगवंतांनी त्याला भगवद्गीता सांगितली.
पुढे अकराव्या श्लोकात भगवंत म्हणतात,
श्रीभगवानुवाच

अशोच्यानन्वशोचस्त्वं(म्), प्रज्ञावादांश्च भाषसे।
गतासूनगतासूंश्च, नानुशोचन्ति पण्डिता:॥२.११॥
श्रीभगवान् म्हणाले, हे अर्जुना! तू ज्यांचा शोक करु नये, अशा माणसांसाठी शोक करतोस आणि विद्वानांसारखा युक्तिवाद करतोस. परंतु ज्यांचे प्राण गेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेले नाहीत, त्यांच्यासाठीही विद्वान माणसे शोक करीत नाहीत.
येथे भगवंतांनी "प्रज्ञावादांश्च" हा महत्वाचा शब्द वापरला आहे. प्रज्ञावान म्हणजे वाचन, श्रवण व अनुभव या तीन गोष्टींमुळे ज्याची प्रज्ञा जागृत झालेला मनुष्य. आजकाल लोक अनेक ठिकाणांहून माहिती जमा करतात, अनेक पुस्तके वाचतात आणि त्याला ज्ञान म्हणतात. अशा पढतमूर्खांची जगात काही कमतरता नाही असे पूज्य स्वामीजी म्हणतात. ती फक्त माहिती असते, ज्ञान नव्हे. माहिती आणि ज्ञान यात फार मोठा फरक आहे. माहिती दुसरीकडून वाचून, ऐकून गोळा केलेली असते तर ज्ञान आपल्या स्वतःच्या अनुभवावर आधारित असते.
एकदा एका गावात एका मोठ्या उद्योगाची उभारणी सुरु झाली. त्यासाठी एका मोठ्या इमारतीची रचना करावयाच होती. त्या उद्योगाच्या मालकाच्या मित्राचा मुलगा नुकताच स्थापत्यशास्त्रज्ञ झाला होता त्याच्याकडे इमारतीची रचना करण्याचे काम सोपवण्यात आले. आपल्या मिळवलेल्या ज्ञानाचा संपूर्ण उपयोग करत त्याने इमारतीचे काम पूर्ण केले. उद्योगासाठी लागणारे मोठे यंत्र जर्मनीहून मागविण्यात आले. त्याचा आकारच ३०' X ५०' X ५०' इतका मोठा होता. ते इमारतीत ठेवण्यासाठी तेवढ्या आकाराचा खड्डा इमारतीस ठेवण्यात आला. परंतु प्रत्यक्ष यंत्र पाहिल्यावर त्या स्थापत्य शास्त्रज्ञाच्या लक्षात आले की हे मोठे यंत्र इमारतीच्या आतील जागेत असलेल्या खड्ड्यात क्रेन द्वारे उचलून ठेवणे आवश्यक होते आणि त्या संदर्भात त्याने कुठलीही व्यवस्था केली नव्हती. त्याने देश-विदेशातील अनेक तंत्रज्ञांचा सल्ला घेतला. त्यासाठी भरपूर पैसे खर्च केले. परंतु सर्वांचे एकच मत पडले की ही इमारत तोडल्याशिवाय यंत्र आत बसवू शकत नाही. स्थापत्यशास्त्रज्ञ आता खूप घाबरला. त्याचे संपूर्ण करिअर पणाला लागले होते. ह्या सर्व घडामोडी पाहणारा त्या कारखान्यातील एक वृद्ध व अनुभवी मजूर स्थापत्यशास्त्रज्ञास भेटला. त्याने सांगितले की या समस्येवर त्याच्याकडे एक उपाय आहे. फक्त आपले यंत्र पाण्यात बुडाल्यास खराब होईल की नाही तेवढे मला सांगा. यंत्र खराब होणार नाही असे सांगितल्यावर तो म्हणाला जर तुम्ही फक्त पाच लाख रुपयांची व्यवस्था केली तर मी यावर उपाय करू शकेन. स्थापत्यशास्त्रज्ञ ते ऐकून चकित झाला. जे भल्या भल्यांना सुचले नाही ते हा अशिक्षित वृद्ध मजूर काय सांगणार? आता दुसरा कोणताच उपाय नसल्याने मजूरास ते पैसे देण्याचे ठरले. त्यानंतर त्या मजुराने सांगितले की बर्फाच्या भरपूर लाद्या मागवा आणि त्या ह्या खड्ड्यात अशा ठेवा की ज्यामुळे यंत्र बसविण्यासाठी खणलेला हा मोठा खड्डा पूर्णपणे भरून जाईल. त्यानंतर ते यंत्र इमारतीच्या मोठ्या दारातून त्या लाद्यांवर बरोबर बसेल असे सरकवून ठेवा. काही तासांनंतर जसजसा बर्फ वितळू लागेल तसतसे यंत्र खड्ड्यात खाली जाऊ लागेल. खड्ड्यातील पाणी पंपच्या मदतीने काढून टाका. ही अद्भुत कल्पना ऐकताच स्थापत्य शास्त्रज्ञ चकीतच झाला. ही कल्पना आपल्याला किंवा इतर मोठमोठ्या सल्लागारांना कशी सुचली नाही याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याने मजुराला आनंदाने मिठी मारली. ही कल्पना त्याला कशी सुचली, असे विचारताच मजूर म्हणाला की तो काही फार शिकलेला नाही, परंतु अशा प्रकारची उपायोजना गावांमध्ये वर्षानुवर्षे जड वस्तू खड्ड्यात ठेवण्यासाठी केली जात आहे.
आता ह्या गोष्टीमधे खरा "प्रज्ञावान" कोण? पुस्तकी ज्ञान घेतलेले ते तंत्रज्ञ किंवा तो स्थापत्यशास्त्रज्ञ नाही, तर तो अनुभवी गरीब मजूर. शिकलासवरला नसुनही व्यवहारज्ञानामधे हुशार असल्याने त्याने ही युक्ती सांगितली व ती यशस्वी झाली. अशा अनुभवी व्यक्तीसाठी येथे प्रज्ञावान शब्द वापरला आहे.
अर्जुन शोक, मोह व भयग्रस्त झाला आहे.
या श्लोकात पुढे भगवंत 'पंडित' असा शब्द वापरतात. इथे, या शब्दाचा अर्थ 'ब्राह्मण' असा नाही. ब्राह्मण व्यक्ती पंडित असेलच असे नाही. तर 'पठेत् स पंडिता:' असे म्हटले जाते. जो शिकलेला असतो तो पंडित असतो. आपण जेव्हा तीर्थक्षेत्रांना जातो तेव्हा आपल्याला "पंडे" भेटतात. हे त्यांना नुसते आपले गोत्र सांगितल्यास आपल्या पूर्वीच्या दहा पिढ्यांची देखील माहिती आपणास देतात जी आपल्यालाही माहिती नसते.
महाभारतात भगवद्गीता, गजेंद्र मोक्ष, विष्णुसहस्त्रनाम, विदुरनीती अशी पंचरत्ने आहेत. यापैकी विदुरानीतीत विसाव्या श्लोकापासून चौतीसाव्या श्लोकापर्यंत पंडितांची लक्षणे सांगितली गेली आहेत. तसेच मूर्खांची लक्षणे ही सांगितली आहेत.

न त्वेवाहं(ञ्) जातु नासं(न्), न त्वं(न्) नेमे जनाधिपाः।
न चैव न भविष्यामः(स्), सर्वे वयमतः(फ्) परम्॥२.१२॥
मी कोणत्याही काळी नव्हतो, तू नव्हतास किंवा हे राजे नव्हते असेही नाही आणि यापुढे आम्ही सर्वजण असणार नाही, असेही नाही.
या श्लोकतील संकल्पना खालील कथेच्या आधारे समजू शकेल.
एकदा भगवान बुध्दांकडे एक स्त्री आपल्या आठ वर्षांच्या मृत बालकास घेऊन आली. ती खूप आक्रोश करीत होती. भगवान बुद्धाच्या शिष्यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. भगवान बुद्ध माझ्या बालकास जिवंत करू शकतील असे ती सतत म्हणत होती. ती थोडीशी शांत झाल्यावर भगवान बुद्धांनी तिची विनंती एका अटीवर मान्य केली. तिने गावात परत जाऊन, जिथे कोणाचाही मृत्यू झाला नाही अशा पाच घरातून थोडे तांदूळ आणून दिले तर ते त्या बालकास परत जिवंत करतील अशी ती अट होती.
हे ऐकताच ती स्त्री कोणताही विचार न करता, मुलाचा मृतदेह तेथेच ठेऊन गावात पळत गेली व बुद्धांनी सांगितले होती तशी घरे शोधण्यास तिने सुरुवात केली. अनेक घरे हिंडली परंतु तिला तसे घर मिळाले नाही. प्रत्येक घरातून कोणी ना कोणी तरी मृत झालेले होते. शेवटी ती बुध्दांकडे परत गेली व त्यांना सर्व हकीकत सांगितली. बुद्ध तिला म्हणाले की आधी हीच गोष्ट ते तिला सांगण्याचा प्रयत्न करीत होते पण ती ऐकण्यास तयार नव्हती. ज्याचा जन्म झाला तो कधी ना कधी तरी मृत होणारच. मृत्यूनंतर आपले शरीर जाते परंतु आत्मतत्त्व चिरंतन आहे.
या अतिशय सुंदर आणि अद्भुत श्लोकात भगवंत भूत, वर्तमान आणि भविष्य अशा तीन काळांबद्दल बोलतात तसेच, 'मी', 'तू' आणि 'इतर सर्व राजे लोक' अशा तीन प्रकारच्या लोकांबद्दल बोलतात.
या संदर्भात संत कबीरांचे एक सुंदर भजन आहे.

मन फूला फूला फिरे, जगत में कैसा नाता रे ॥
माता कहे यह पुत्र हमारा,बहन कहे बीर मेरा,
भाई कहे यह भुजा हमारी, नारी कहे नर मेरा, जगत में कैसा नाता रे ॥१॥
पेट पकड़ के माता रोवे, बांह पकड़ के भाई,
लपट झपट के तिरिया रोवे, हंस अकेला जाए, जगत में कैसा नाता रे ॥२॥
जब तक जीवे माता रोवे, बहन रोवे दस मासा,
तेरह दिन तक तिरिया रोवे, फेर करे घर वासा, जगत में कैसा नाता रे ॥३॥
चार जणा मिल गजी बनाई, चढ़ा काठ की घोड़ी,
चार कोने आग लगाई, फूंक दियो जस होरी, जगत में कैसा नाता रे ॥४॥
हाड़ जले जस लाकड़ी रे, केश जले जस घास,
सोना जैसी काया जल गई, कोइ न आयो पास, जगत में कैसा नाता रे ॥५॥
घर की तिरिया ढूंढन लागी, ढुंडी फिरि चहु देशा,
कहत कबीर सुनो भई साधो, छोड़ो जगत की आशा, जगत में कैसा नाता रे ॥६॥
मन फूला फूला फिरे, जगत में कैसा नाता रे॥
भावार्थ - या कवितेतून कबीर जीवाचा भ्रम दूर करण्याचा प्रयत्न करतात. आई-वडील' बहिण-भावंडे, नातेवाईक, पत्नी, मुले यांना मनुष्य आपले समजतो. परंतु अंतकाळी यापैकी कोणीही आपल्या कामी येत नाही. आपण गेल्यावर ते थोडे दिवस दुःख करतात, परंतु नंतर आपल्या कामाला लागतात. हे जग सोडून सर्वांना एक न एक दिवशी जायचे आहे. हे समजून सतत भगवंतांचे नामस्मरण करीत राहावे, तोच आपल्या आयुष्याचा सदुपयोग आहे.
देहिनोऽस्मिन्यथा देहे, कौमारं(य्ँ) यौवनं(ञ्) जरा।

तथा देहान्तरप्राप्ति:(र्), धीरस्तत्र न मुह्यति॥२.१३॥
ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बालपण, तारुण्य आणि वार्धक्य येते, त्याचप्रमाणे दुसरे शरीर मिळते. याविषयी धीर पुरुषांना मोह उत्पन्न होत नाही.
मनुष्यमात्रांच्या ४ अवस्था असतात - बालपण, तारुण्य व वार्धक्य व त्यानंतर मृत्यू होऊन ते आत्मतत्त्व दुसऱ्या शरीरात प्रवेश करते. जन्म-मरणाचे हे चक्र सतत चालू असते. आपण जेव्हा रेल्वेने प्रवास करतो तेव्हा मधे बरीच स्थानके येतात व शेवटी गंतव्यस्थान येते. दिल्ली ते मुंबई प्रवासात गाडी भोपाळला येते तेव्हा, मी दिल्ली स्टेशनवर आहे, मी भोपाळला पोहोचलो आहे, मी भुसावळला पोहोचलो आहे, मी मुंबईला पोहोचलो, असे आपण फोनवर घरच्या लोकांना सांगतो. मी दिल्ली झालो, भोपाळ झालो असे म्हणत नाही. पण देहाविषयीची आपली धारणा चुकीची असते. आपल्या शरीरात जीवात्मा वास करून असतो. पण देहाविषयी बोलताना आपण मी तरुण झालो, मी म्हातारा झालो व आता मरणार असे म्हणतो. ज्याप्रमाणे गाडी निरनिराळी स्थानके ओलांडून आपल्या गंतव्यापर्यंत येते त्याप्रमाणे आपला देह ही निरनिराळ्या अवस्था पार करून आपल्या गंतव्यापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत पोहोचतो.
महाभारतात यक्षाने युधिष्ठिरला झाला शंभर प्रश्न विचारले. त्यात एक प्रश्न होता, "किम् आश्चर्यम्?" जगातील सर्वात मोठे आश्चर्य कोणते?
युधिष्ठीर महाराज उत्तर देतात,

शेषा: स्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यमत: परम् ||
रोज अनेकांना मरताना बघून देखील 'मी कधी मरणारच नाही' असे समजून जे लोक मरणाऱ्या व्यक्तीबद्दल शोक करतात, हे मोठे आश्चर्य आहे.
ज्ञानी मनुष्य मात्र हे जाणतो. परंतु तो चिंता करत नाही.
पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम् | हे चक्र अव्याहतपणे चालू असते.
यापुढील १४ व्या श्लोकात मोठा अर्थ भरला आहे. सामान्य नजरेतून हा श्लोक पाहिला तर आपल्याला विशेष अर्थ आढळणार नाही. परंतु ज्याप्रमाणे आपल्या समोरील एखाद्या वस्तूकडे भिंगातून किंवा मायक्रोस्कोप मधून पाहिले तर त्यावरील असंख्य जीवाणू दिसतात, त्याप्रमाणेच संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून भगवद्गीतेतील श्लोकांकडे पाहिले तर त्यात भरलेला महान अर्थ आपल्या लक्षात येईल.ज्ञानी मनुष्य मात्र हे जाणतो. परंतु तो चिंता करत नाही.
पुनरपि जननं, पुनरपि मरणं, पुनरपि जननी जठरे शयनम् | हे चक्र अव्याहतपणे चालू असते.
2.14
मात्रास्पर्शास्तु कौन्तेय, शीतोष्णसुखदुःखदाः।
आगमापायिनोऽनित्या:(स्), तांस्तितिक्षस्व भारत॥2.14॥
हे कुन्तीपुत्रा! इंद्रियांचे विषयांशी संयोग हे थंडी-उष्णता आणि सुख-दुःख देणारे आहेत. ते उत्पन्न होतात व नाहीसे होतात म्हणून अनित्य आहेत. तेव्हा हे भारता! ते तू सहन कर.
या श्लोकात सांगितलेले महत्त्वाचे सूत्र जर आपल्याला समजले तर आपण जीवनातील अनेक दुःखांपासून मुक्त होऊ शकतो. आपण पाच इंद्रियांकडून पाच वेगवेगळे विषय ग्रहण करतो. इथे भगवंत त्यासाठी 'मात्रास्पर्शास्तु' असा शब्द वापरतात. म्हणजे भगवंत म्हणतात की ही इंद्रिये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करतात.
डोळ्यांनी आपण जेव्हा पाहतो तेव्हा आपण दृश्यास स्पर्श करतो. म्हणूनच सूर्याकडे पाहून त्राटक करताना, वेल्डिंग पाहताना डोळ्यांची जळजळ होते.
आपल्या कानांजवळ कोणी मोठा आवाज केला तर आपला कानाचा पडदा फाटण्याची भीती असते. म्हणजे तो आवाज आपल्या कानाला स्पर्श करत असतो.
अत्तराचा सुगंध आपल्याला मोहक वाटतो, परंतु तेच अत्तर आपण खूप जवळून जोरात हुंगले तर मात्र नाकातून झिणझिण्या येतात.
एखाद्या खाद्यपदार्थात खूप जास्त किंवा खूप कमी मीठ घातले तर आपल्याला त्या पदार्थाची चव आवडणार नाही. त्याचप्रमाणे चहात खूप जास्त किंवा खूप कमी साखर घातली, तर आपल्याला त्या चहाची चव आवडणार नाही.
मनुष्य शरीरासाठी २५ डिग्री सेल्सिअस हे सर्वात योग्य तापमान मानले जाते. यापेक्षा कमी किंवा जास्त तापमान झाले तर त्रास होतो.
अशाप्रकारे पाचही इंद्रिये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत असतात. ती किती मात्रेत स्पर्श करतात ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे. जर खूप जास्त प्रमाणात जर तिला स्पर्श केला तर अडचण उद्भवते किंवा त्रास संभवतो.
रूपवान, धनवान किंवा बलवान व्यक्ती नेहमी करता आहे तशी राहिलंच असे नाही. रूप, धन आणि बल ही येते आणि जाते.
पुढे भगवंत 'शीतोष्ण' तसेच 'सुखदुःख' असे शब्द वापरतात. शीतोष्ण याचा अर्थ व्याधी आणि सुखदुःख म्हणजे आधि.
येथे विवेचकांनी त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग सांगितला. ते नैनितालला गेले असताना खूप थंडी होती. त्यांनी लोकरी कपडे, टोपी परिधान केली होती. परंतु तेथील काही स्थानिक माणसे शेकोटीच्या जवळ अगदी साध्या कपड्यात बसली होती. "शेकोटी पेटवून ते दिवसभर बसतात का?" असे विचारताच ते म्हणाले, "नाही, ही शेकोटी तर एक तासाभराने विझून जाईल. सतत शेकोटी आणि लाकडे जाळण्यासाठी आमच्याकडे एवढे पैसेही नाहीत." मग त्यानंतर थंडीपासून रक्षण होण्यासाठी काय करता असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की फार थंडी वाजायला लागली की ते प्रथम अंगातील कपडे काढून टाकतात. त्यामुळे त्यांचे सर्व शरीर गारठून जाते. सहन होईपर्यंत ते तसेच राहतात आणि त्यानंतर ते वस्त्र घालतात. मग त्या एका वस्त्राने देखील अंगात उब येते.
तिबेट मधील लामा लोकही अतिशय कडाक्याच्या थंडीत फक्त एक पातळ चादर अंगावर लपेटून राहतात. ही थंडी ते सहन करू शकतात याचे कारण त्यांच्याकडील एका विशिष्ट पद्धतीत आहे. तिबेट मध्ये नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बर्फाच्या पाण्याने स्नान घालतात. काही अर्भके दगावतात, परंतु जी वाचतात त्यांची प्रतिकारशक्ती मजबूत होते. अशाप्रकारे लामा लोक आपली शरीर त्या थंडीत टिकून मजबूत राहावे म्हणून विशेष प्रयत्न करतात. म्हणजेच प्रत्येकाची थंडी सहन करण्याची 'मात्रा' वेगवेगळी असते.
सुखाचेही तसेच आहे. समजा, भगवंत आपल्यासमोर प्रकट झाले आणि किती पैसे मिळाले तर तू संतुष्ट होशील असे विचारले, तर प्रत्येक जण वेगवेगळे उत्तर देईल. काहीजण दहा-वीस हजार रुपये मिळाले तरी खूष होतील, काही जणांना त्यासाठी पन्नास लाख रुपये लागतील, तर काहींना पन्नास कोटी! अंबानींसारखे मोठे उद्योगपती कदाचित २०-२५ हजार कोटी मागतील. याचा अर्थ प्रत्येकाची सुख मिळण्यासाठी आवश्यक विषयमात्रा वेगळी असते. दहा हजार रुपयांची अपेक्षा असणाऱ्याला पन्नास हजार कोटी मिळाले तर तो आनंदातिरेकाने वेडा होईल. परंतु अंबानींसारखा कोणी दहा हजार रुपये मिळाले तर त्याकडे ढुंकूनही बघणार नाही. म्हणजे धनाची एकच मात्रा सर्वांना सारख्या प्रमाणात सुख देणार नाही.
या श्लोकात वापरलेल्या 'शीत' आणि 'उष्ण' या शब्दांचे अर्थ अनुक्रमे अनुकूलता आणि प्रतिकूलता असे होतात. भगवंतांनी "आगमापायिनो" असा दुसरा शब्द वापरला आहे. या दोन्ही गोष्टी कायम न राहणाऱ्या आहेत असे भगवंत येथे सांगतात.
मुल्ला नसिरुद्दीन हा तुर्की फकीर होता. एकदा त्याने एका माणसाला शोक करत असताना पाहिले. त्याच्या सोबत असलेला त्याचा साथीदार त्याची समजूत काढीत होता. मुल्लाने त्यांच्याजवळ जाऊन काय झाले आहे हे विचारले. त्यावर त्या साथीदाराने सांगितले की त्याच्या मित्राला त्याच्या पत्नीने पाचशे रुपये देऊन भाजी व आणखी काही वस्तू आणण्यास सांगितले होते. त्याने जेमतेम १०० रुपयाचे सामान घेतले, परंतु उरलेले चारशे रुपये त्याच्याकडून हरवले. तो त्याच्या पत्नीला खूप घाबरत होता. तिने सांगितलेल्या सर्व गोष्टी जर आणल्या नाहीत तर ती त्याला मारेल अशी त्याला भीती होती. म्हणून तो रडत होता व आत्महत्या करण्याचाही विचार करीत होता. मुल्लाने मित्राला त्याचे रडणे थांबवण्याचा प्रयत्न करून बघतो असे सांगितले.
खेळाडू उत्तम बनण्यासाठी तसेच खेळ खेळताना अतिशय मेहनत घेतो. कडक ऊन, घाम त्याला सहन करावे लागते. परंतु उत्कृष्ट खेळाडू हे कष्ट अगदी सहजतेने करतो.
उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असताना आपल्यालाही कष्ट घ्यावे लागतात. व्यापारउदीम करतानाही नफा नुकसान सहन करण्याची प्रतीक्षा करावी लागते.
ही सारी अनुकूलता आणि प्रतिकूलता मिळालेल्या मात्रेवर अवलंबून असते असे या श्लोकात सांगितले आहे. प्रतिकूलता सहजतेने सहन करण्याची तितिक्षा अंगी आली तर जीवन घडते.
सहन करणे आणि तितिक्षा यामधील अजून एक फरक म्हणजे सहन करण्यामागे नाईलाज असतो परंतु तितिक्षेमध्ये तसे नाही. पडणारे कष्ट मनुष्य आनंदाने सहन करतो. तितीक्षेमध्ये सहजता, स्वाभाविकता, अपरिहार्यता आहे. ते सुख आणि दुःखाच्या पलीकडचे आहे. ते अतिशय नैसर्गिक आहे. जेव्हा विषयांमध्ये अशी स्वाभाविकता येते तेव्हा सुख आणि दुःख समाप्त होते. दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर दुःख समाप्त होते.
आपल्याकडे साधू होण्यापूर्वी गुरु त्याच्या तितिक्षेची परीक्षा घेतो. तहानभूक सहन करण्याची तितिक्षा त्याच्या ठाई आहे की नाही हे तपासले जाते. आपल्याकडे उपवास, मौन वगैरे व्रतांमागे तितीक्षा हेच कारण आहे. थंडी, उष्णता सहन केल्याने शरीराने मन मजबूत होते. परंतु काही व्यक्तींना मात्र प्रत्येक मोसमात अनेक अडचणी वाटतात.
विवेकचुडामणी मध्ये आदी शंकराचार्यांनी ज्ञानाचे चार स्तंभ सांगितले आहेत. विवेक, वैराग्य, षट्संपत्ती आणि मुमुक्षु. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान ह्या त्या सहा षट्संपत्ती आहेत. तितिक्षेशिवाय कोणतीही साधना शक्य होत नाही. म्हणूनच जीवनातील कष्ट, दुःख सहजतेने आणि आनंदाने सहन केले पाहिजेत.
सीताराम सीताराम सीताराम कहिए।
जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए।।
ज्याप्रमाणे आपल्याला प्रभू श्री राम ठेवतील त्याप्रमाणे आपण सिताराम सीताराम असा जप करत आनंदाने राहिले पाहिजे.
होइहि सोइ जो राम रचि राखा।
को करि तर्क बढ़ावै साखा॥
जीवनात प्रभू श्रीराम ठरवतील तेच होईल मग आपण तर्कवितर्क करून आपली चिंता का वाढवावी?

मुल्लाने त्या रडणाऱ्या व्यक्तीकडील थोडे सामान असलेली पिशवी खेचून घेतली व दूर धावत सुटला. तो माणूस ओरडू लागला आणि मुल्लाच्या पाठीमागे धावू लागला. खूप वेळ धावल्यानंतर मुल्ला एके ठिकाणी थांबला. हातातील पिशवी त्याने खाली ठेवली व स्वतः लपून बसला. पाठलाग करत धावणाऱ्या व्यक्तीने आपली पिशवी तेथे पडलेली पाहिली. त्याबरोबर त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ती पिशवी लगेचच उचलली आनंदात, काही वेळापूर्वी आपण खूप रडत होतो हे विसरून, घराकडे धावत सुटला.
म्हणजे काही गमावल्याने किंवा कमावल्याने दुःख किंवा सुख होत नाही, तर सुख आणि दुःख हे आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. त्या व्यक्तीलाही आधी सर्व काही गेले म्हणून दुःख झाले होते व आता पिशवी मिळाल्याचा आनंद त्याला मिळाला.
भगवंत पुढे अर्जुनास सांगतात, 'तांस्तितिक्षस्व भारत'
तितिक्षा हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. सामान्यतः तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहन करणे असा होतो. परंतु महात्मा लोक याचा असा साधा अर्थ घेत नाहीत. उदाहरणार्थ आपण थंडी सहन करतो किंवा उपवासात भूक सहन करतो यासाठी तितिक्षा हा शब्द आपण वापरू शकत नाही. त्या कष्टात जेव्हा सहजता येते तेव्हा तिला तितिक्षा म्हणतात. बालकाला जन्म दिल्यानंतर माता त्याला वाढवताना अपार कष्ट सहन करते परंतु त्या कष्टात सहजता असते.
विद्यार्थी विद्यार्थ्यांना करताना खूप मेहनत घेतो. लहानपणी आपण ऐकले आहे, "काक चेष्टा बको ध्यानम् श्वान निद्रा तथैव च" कावळ्याप्रमाणे कष्ट, बदकाप्रमाणे एकाग्रता, कुत्र्याप्रमाणे सावध झोप, मिताहार आणि गुरुकुलात शिक्षण (घराचा त्याग करून) घेण्याची तयारी ही आदर्श विद्यार्थ्यांची पाच लक्षणे आहेत. म्हणजे काही गमावल्याने किंवा कमावल्याने दुःख किंवा सुख होत नाही, तर सुख आणि दुःख हे आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. त्या व्यक्तीलाही आधी सर्व काही गेले म्हणून दुःख झाले होते व आता पिशवी मिळाल्याचा आनंद त्याला मिळाला.
भगवंत पुढे अर्जुनास सांगतात, 'तांस्तितिक्षस्व भारत'
तितिक्षा हा अत्यंत महत्त्वपूर्ण शब्द आहे. सामान्यतः तितिक्षा या शब्दाचा अर्थ सहन करणे असा होतो. परंतु महात्मा लोक याचा असा साधा अर्थ घेत नाहीत. उदाहरणार्थ आपण थंडी सहन करतो किंवा उपवासात भूक सहन करतो यासाठी तितिक्षा हा शब्द आपण वापरू शकत नाही. त्या कष्टात जेव्हा सहजता येते तेव्हा तिला तितिक्षा म्हणतात. बालकाला जन्म दिल्यानंतर माता त्याला वाढवताना अपार कष्ट सहन करते परंतु त्या कष्टात सहजता असते.
खेळाडू उत्तम बनण्यासाठी तसेच खेळ खेळताना अतिशय मेहनत घेतो. कडक ऊन, घाम त्याला सहन करावे लागते. परंतु उत्कृष्ट खेळाडू हे कष्ट अगदी सहजतेने करतो.
उदरनिर्वाहासाठी नोकरी करत असताना आपल्यालाही कष्ट घ्यावे लागतात. व्यापारउदीम करतानाही नफा नुकसान सहन करण्याची प्रतीक्षा करावी लागते.
ही सारी अनुकूलता आणि प्रतिकूलता मिळालेल्या मात्रेवर अवलंबून असते असे या श्लोकात सांगितले आहे. प्रतिकूलता सहजतेने सहन करण्याची तितिक्षा अंगी आली तर जीवन घडते.
सहन करणे आणि तितिक्षा यामधील अजून एक फरक म्हणजे सहन करण्यामागे नाईलाज असतो परंतु तितिक्षेमध्ये तसे नाही. पडणारे कष्ट मनुष्य आनंदाने सहन करतो. तितीक्षेमध्ये सहजता, स्वाभाविकता, अपरिहार्यता आहे. ते सुख आणि दुःखाच्या पलीकडचे आहे. ते अतिशय नैसर्गिक आहे. जेव्हा विषयांमध्ये अशी स्वाभाविकता येते तेव्हा सुख आणि दुःख समाप्त होते. दुःखाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला तर दुःख समाप्त होते.
आपल्याकडे साधू होण्यापूर्वी गुरु त्याच्या तितिक्षेची परीक्षा घेतो. तहानभूक सहन करण्याची तितिक्षा त्याच्या ठाई आहे की नाही हे तपासले जाते. आपल्याकडे उपवास, मौन वगैरे व्रतांमागे तितीक्षा हेच कारण आहे. थंडी, उष्णता सहन केल्याने शरीराने मन मजबूत होते. परंतु काही व्यक्तींना मात्र प्रत्येक मोसमात अनेक अडचणी वाटतात.
विवेकचुडामणी मध्ये आदी शंकराचार्यांनी ज्ञानाचे चार स्तंभ सांगितले आहेत. विवेक, वैराग्य, षट्संपत्ती आणि मुमुक्षु. शम, दम, तितिक्षा, उपरती, श्रद्धा आणि समाधान ह्या त्या सहा षट्संपत्ती आहेत. तितिक्षेशिवाय कोणतीही साधना शक्य होत नाही. म्हणूनच जीवनातील कष्ट, दुःख सहजतेने आणि आनंदाने सहन केले पाहिजेत.
सीताराम सीताराम सीताराम कहिए।
जाहि विधि राखे राम ताहि विधि रहिए।।
ज्याप्रमाणे आपल्याला प्रभू श्री राम ठेवतील त्याप्रमाणे आपण सिताराम सीताराम असा जप करत आनंदाने राहिले पाहिजे.
होइहि सोइ जो राम रचि राखा।
को करि तर्क बढ़ावै साखा॥
जीवनात प्रभू श्रीराम ठरवतील तेच होईल मग आपण तर्कवितर्क करून आपली चिंता का वाढवावी?
यं(म्) हि न व्यथयन्त्येते, पुरुषं(म्) पुरुषर्षभ।
समदुःखसुखं(न्) धीरं(म्), सोऽमृतत्वाय कल्पते॥2.15॥
कारण हे श्रेष्ठ पुरुषा! सुख-दुःख समान मानणाऱ्या ज्या धीर पुरुषाला हे इंद्रियांचे विषयांशी संयोग व्याकुळ करीत नाहीत, तो मोक्षाला योग्य ठरतो.
2.15 writeup
नासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः।
उभयोरपि दृष्टोऽन्त:(स्), त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः॥2.16॥
असत् वस्तूला अस्तित्व नाही आणि सत् वस्तूचा अभाव नसतो. अशारितीने या दोहोंचेही सत्य) स्वरुप तत्त्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे.
ज्ञानमार्गासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा श्लोक आहे.
हे दृष्य जग सतत बदलत असते आणि म्हणूनच ते असत् असते. आपले शरीर सतत बदलते पण आत्मतत्त्व नाही. न दिसणारे परमात्मतत्त्व कधीही बदलत नाही आणि ते सत् असते.
इंग्रजीमधे असे म्हणतात, "Death is a change of name, dress and address" मृत्यू हा नाव, कपडे व पत्ता यांतील बदल आहे.

अविनाशि तु तद्विद्धि, येन सर्वमिदं(न्) ततम्।
विनाशमव्ययस्यास्य, न कश्चित्कर्तुमर्हति॥2.17॥
ज्याने हे सर्व जग - दिसणाऱ्या सर्व वस्तू - व्यापल्या आहेत, त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करु शकत नाही.
आत्मतत्त्व अविनाशी असते, त्याचा कधीही विनाश होऊ शकत नाही.
अन्तवन्त इमे देहा, नित्यस्योक्ताः(श्) शरीरिणः।
अनाशिनोऽप्रमेयस्य, तस्माध्यस्व भारत॥2.18॥
या नाशरहित, मोजता न येणाऱ्या, नित्यस्वरुप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत, असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना! तू युद्ध कर.
2.18 writeup
य एनं(व्ँ) वेत्ति हन्तारं(य्ँ), यश्चैनं(म्) मन्यते हतम्।
उभौ तौ न विजानीतो, नायं(म्) हन्ति न हन्यते॥2.19॥
जो या आत्म्याला मारणारा असे समजतो, तसेच जो 'हा (आत्मा) मेला' असे मानतो, ते दोघेही अज्ञानी आहेत. कारण हा आत्मा वास्तविक पाहता कोणाला मारीत नाही आणि कोणाकडून मारला जात नाही.
2.19 writeup
न जायते म्रियते वा कदाचिन्,
नायं (म्) भूत्वा भविता वा न भूयः।
अजो नित्यः(श्) शाश्वतोऽयं(म्) पुराणो,
न हन्यते हन्यमाने शरीरे॥2.20॥
हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि मरतही नाही. तसेच हा एकदा उत्पन्न झाल्यावर पुन्हा उत्पन्न होणारा नाही. कारण हा जन्म नसलेला, नित्य, सनातन आणि प्राचीन आहे. शरीर मारले गेले तरी हा मारला जात नाही.
येथे भगवंत एक अत्यंत महत्त्वाचे तत्त्व सांगत आहेत.
वेदाविनाशिनं(न्) नित्यं(य्ँ), य एनमजमव्ययम्।
कथं(म्) स पुरुषः(फ्) पार्थ, कं(ङ्) घातयति हन्ति कम्॥2.21॥
हे पार्था! जो पुरुष, "हा आत्मा नाशरहित, नित्य, न जन्मणारा व न बदलणारा आहे", हे जाणतो, तो कोणाला कसा ठार करवील किंवा कोणाला कसा ठार करील?
आत्मतत्त्वांमध्ये असलेली चेतनेची सहा स्वरूपे भगवंतांनी येथे सांगितली आहेत.
- उत्पन्न होणे, अस्तित्वात येणे, वाढणे, घटणे, वंशवृद्धी होणे व मरणे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय,
नवानि गृह्णाति नरोऽपराणि।
तथा शरीराणि विहाय जीर्णा-
न्यन्यानि संयाति नवानि देही॥2.22॥
ज्याप्रमाणे माणूस जुनी वस्त्रे टाकून देऊन दुसरी नवी वस्त्रे घेतो, त्याचप्रमाणे जीवात्मा जुनी शरीरे टाकून दुसऱ्या नव्या शरीरात जातो.
भगवद्गीतेतील सर्वात प्रसिद्ध श्लोकांपैकी एक असलेला हा श्लोक आहे.
जीर्ण झालेली वस्त्रे आपण शिवून दुरुस्त करतो, त्याला रफू करतो, बटणे तुटली असतील तर ती परत लावतो. परंतु सतत दुरुस्त केल्यानंतर एक वेळ अशी येते की ज्यावेळी त्या वस्त्राची आणखी दुरुस्ती करणे शक्य नसते. त्यानंतर आपण ते टाकून देतो. त्याचप्रमाणे आपण शरीराचीही अनेक प्रकारे काळजी घेतो. आजार आले तर औषधोपचार करून ते ठीक करण्याचा प्रयत्न करतो. परंतु काही काळानंतर एक वेळ अशी येते की हे शरीर दुरुस्तीच्या पलीकडे जाते. त्यावेळी आत्मा शरीर टाकून देऊन नवीन शरीर धारण करतो.
'हरी शरणम, हरी शरणम' ही धुन म्हणून विवेचनाची सांगता झाली.
प्रश्न उत्तरे
पुष्पलता दीदी- श्रेय आणि प्रेय म्हणजे काय?
उत्तर - श्रेय म्हणजे कल्याणकारी. आपली बुद्धी आपल्याला जे करावयास सांगते ते श्रेय असते. प्रेय म्हणजे आपल्याला जे प्रेय असते ते होय. आपले मन आपल्याला जे करायला सांगते ते प्रेय असते.
माधुरी दीदी- या जन्मी सर्वसामान्य बुद्धीमत्ता असलेली व्यक्ती पुढच्या जन्मातही तशीच सामान्य बुद्धीची होते का?
उत्तर - पुरुषार्थाने बुद्धीची तीव्रता या जन्मातही बदलता येते. विवेचकांनी त्यांचे स्वतःचे उदाहरण देऊन सांगितले की अतिशय कमी बुद्धीमत्तेचा, वर्गात जेमतेम उत्तीर्ण होणारा मुलगा प्रयत्न केल्याने आणि उत्तेजन मिळाल्यामुळे बोर्डाच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवू शकतो आणि तो पुढेही सातत्याने टिकवू शकतो.
ब्रिजमोहन भैया- १८ व्या श्लोकात वापरलेल्या अप्रमेय या शब्दाचा अर्थ काय होतो?
उत्तर - अप्रमेय म्हणजे ज्याची दुसऱ्या कशाशीही तुलना होऊ शकणार नाही असा.
प्रश्न - कामना, इच्छा, वासना, तृष्णा आणि स्पृहा यात काय फरक आहे?
उत्तर - सर्वप्रथम एखाद्या वस्तूबद्दल मनात स्फुरण निर्माण होते म्हणजे मनात विचार येतो. त्यातून पुढे स्पृहा निर्माण होते आणि त्यानंतर मनात इच्छा जागृत होते. त्यानंतर कर्म निर्माण होते. कर्मानंतर वासना उत्पन्न होते आणि वासनेमुळे आपण ते कर्म वारंवार करू लागतो. ते केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही ही तृष्णा झाली.
शाळीग्राम भैय्या -आत्मा आणि जीवात्मा यात काय फरक आहे?
उत्तर - आत्मा शरीरधारी नसतो. जेव्हा तो शरीर धारण करतो तेव्हा तो जीवात्मा होतो.
स्मिता दीदी- मृत्यूनंतर माणसाला कोणती योनी मिळते?
उत्तर - मनुष्याला त्याच्या कर्मानुसार तसेच अंतकाळी तो जे चिंतन करत असेल त्याप्रमाणे योनी मिळते. मनुष्य ही एकमेव कर्मयोनी आहे. बाकीच्या सर्व योनी या भोगयोनी आहेत.
प्रश्न - आपण म्हणतो की आत्मा जन्म घेत नाही किंवा मृत्यूही पाहत नाही तर मग जगाची लोकसंख्या कशी वाढत आहे हे नवीन आत्मे कसे निर्माण होत आहेत?
उत्तर - आपण लोकसंख्येमध्ये फक्त मनुष्याची लोकसंख्या विचारात घेत आहोत सध्या जगाची लोकसंख्या ७.२ अब्ज आहे. परंतु एवढे जीव तर आपल्या एका डोळ्याच्या पापणीवर असतात. तो प्रत्येक जीव म्हणजे एक आत्मा आहे. आपण मनुष्य आपल्या सीमित बुद्धीमुळे संख्येचा विचार करत असतो, परंतु ईश्वराकडे हे संख्येचे बंधन नसते. परमेश्वराकडे सर्व गोष्टी अनंत असतात.
देवव्रत भैय्या - आपला प्रत्येकाचा काही व्यक्तिगत धर्म असतो आणि त्या धर्माप्रमाणे जर आपण हिंसा करणे योग्य नाही असे मानत असू तर आपल्या मानसिक स्तरावर ते धर्मपालन कसे शक्य होईल?
उत्तर - जस जसे आपण मानसिक दृष्ट्या उत्क्रांत होतो तसतसे आपल्यातील रजोगुण कमी होतो आणि सत्त्वगुण वाढीस लागतो. त्यामुळे मानसिक हिंसा आपोआपच कमी होते. अहिंसा प्रथम शारीरिक स्तरावर मग वाचिक स्तरावर आणि त्यानंतर मानसिक स्तरावर होते.
सुमनलता भय्या - कधी कधी मनुष्ययोनीत जन्म घेऊनही अतिशय दुराचरणी कुटुंबात किंवा परधर्मात जन्म मिळू शकतो. मग मनुष्ययोनीचे इतके महत्त्व का आहे?
उत्तर - याचे कारण मनुष्ययोनी ही कर्मयोनी आहे. आपल्या कर्माने मनुष्य कुठल्याही परिस्थितीत जन्माला आला तरी स्वतःची उन्नती करू शकतो. हिरण्यकश्यपूच्या घरी जन्माला येऊनही भक्त प्रल्हादाने स्वतःची प्रगती केली.
शमा दीदी -एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर दुराचरण केले आणि अंतसमयी भगवंतांचे स्मरण केले तर त्यांना पुढचा जन्म चांगला मिळू शकतो का?
उत्तर - आयुष्यभर आपण ज्या गोष्टींचे स्मरण करतो तीच गोष्ट आपल्याला अंतसमयी आठवते जर आयुष्यभर दुर्वतन केले असेल तर अंतसमयी भगवंतांचे स्मरण होऊ शकत नाही.
रेणू दीदी -आपल्याकडून अजाणतेपणे अनेक छोट्या जीवजंतूंची हत्या होत असते. त्या पापाचे परिमार्जन कसे करावे?
उत्तर - जप, तप, दान इत्यादी करून आपण अशा पापांचे परिमार्जन करू शकतो.
ग्यानप्रकाश भय्या - मी रोज भगवद्गीतेचा पाठ करतो परंतु त्याचा अर्थ मला कळत नाही तर त्याचे पुण्य किंवा फळ मला मिळेल का?
उत्तर - भगवद्गीतेचा अर्थ समजावून घेण्यासाठी पूर्ण जन्म अभ्यास करावा लागेल, परंतु अर्थ समजला नाही तरीही मंत्राचा पाठ केल्याने त्याचे पूर्ण आणि फळ निश्चित मिळते.
उर्मिला दीदी - आपण भाजी चिरतानाही कधी कधी त्यात काही कीडे, जीवजंतू बसतात आणि आपल्या हातून नकळत त्यांची हत्या होत असते याबद्दल आपण काय करू शकतो? तसेच वनस्पतींनाही जीव असतो. मग आपण त्या कशा खाऊ शकतो?
उत्तर - मनुष्यशरीरात पंचकोश असतात - अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय. आपल्या आजूबाजूच्या सर्व जड गोष्टी ज्या श्वसन करत नाहीत त्या अन्नमय कोशाचा भाग असतात. वनस्पती झाडे इत्यादी श्वसन करतात आणि त्या प्राणमय कोशाचा भाग असतात. मासे वगैरें सारखे प्राणी ज्यांना गती असते परंतु बुद्धी नसते ते मनोमयकोशाचा भाग असतात. सर्व पशु पक्षांना थोड्या प्रमाणात बुद्धी असते आणि ते विज्ञानमय कोशाचा भाग असतात. पाचवा आनंदमयकोश हा फक्त मनुष्यामध्ये असतो. ध्यान करणे, मी कोण आहे याचा शोध घेणे हे या कोशामुळे शक्य होते जे केवळ मनुष्यामध्येच असते. पहिल्या दोन कोशातील वस्तूंचे सेवन आपण खाद्यपदार्थ म्हणून करू शकतो इतर तीन कोशांतील गोष्टी खाणे निषिद्ध मानले गेले आहे.
समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसा म्हणून विवेचन सत्राची सांगता झाली.