विवेचन सारांश
श्रद्धेने जीवन घडते.
सुमधुर प्रार्थना आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची छान सुरुवात झाली. परमपूज्य गुरुगोविंद देवगिरी महाराजांना वंदन केले गेले व सर्व साधकांना अभिवादन करून आजच्या सत्राची सुरुवात झाली.
चार वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजेच २३ जून २०२० ला कोविड महामारीच्या काळात पूज्य स्वामीजींच्या प्रेरणेने या निष्काम यज्ञाचा प्रारंभ झाला. या यज्ञास सुरुवात झाली त्यावेळी कल्पनाही केली नव्हती एवढा त्याचा विस्तार आज पहावयास मिळतो आहे. हजारो साधक आणि निष्काम सेवा करणारे कर्मनिष्ठ गीता सेवी यामुळेच हे फलित प्राप्त आहे.
भगवद्गीता मंत्रमयी आहे आणि त्याचा निरंतर अनुभव आपण सर्वच जण घेत आहोत. या कलियुगात प्रत्यक्ष भगवंत गीतेच्या रूपात विराजमान आहेत. भगवंतांनीच म्हटले आहे की गीता माझे हृदय आहे. भगवंतांची आपणा सर्वांवर ही अद्भुत कृपाच आहे की आपण या यज्ञामध्ये सम्मिलित आहोत.
यापूर्वी आपण १६ व्या अध्यायाचे विवेचन पाहिले. अध्यायातील २३ व्या व २४ व्या श्लोकात भगवंत शास्त्रविधी बद्दल म्हणतात-
य: शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारत: |

न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् || २३||
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ |
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि || २४||
जो मनुष्य शास्त्राचे नियम सोडून स्वतःच्या मनाला वाटेल तसे वागतो त्याला सिद्धी मिळत नाही, परमगती मिळत नाही आणि सुखही मिळत नाही. म्हणून हे अर्जुना कर्तव्य आणि अकर्तव्य यांचे पालन करताना शास्त्रच प्रमाण आहे हे जाणून तू शास्त्रविधीने नेमलेले कर्मच करणे योग्य आहे.

भगवद्गीतेत यापूर्वी अनेक ठिकाणी भगवंतांनी श्रद्धेचे महत्त्व अर्जुनाला सांगितले आणि आता मात्र शास्त्रविधीचा उल्लेख केला. ते ऐकून अर्जुनाला प्रश्न पडला की जे लोक शास्त्र जाणत नाहीत त्यांनी काय करावे? आणि म्हणून या सतराव्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाने हाच प्रश्न भगवंतांना विचारला.
17.1
अर्जुन उवाच
ये शास्त्रविधिमुत्सृज्य, यजन्ते श्रद्धयान्विताः|
तेषां(न्) निष्ठा तु का कृष्ण, सत्त्वमाहो रजस्तमः||17.1||
अर्जुन म्हणाला, हे कृष्णा! जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देव देविकांचे पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामस?
अर्जुनाने शास्त्रांचा अभ्यास केलेला आहे. परंतु जे सामान्य लोक आहेत त्यांच्यासाठी अर्जुनाने हा प्रश्न भगवंतांना विचारला. शास्त्र विधींचे ज्ञान नसलेले काही लोक असतात. परंतु काही लोक शास्त्रविधींचे ज्ञान असूनही उत्सृज्य म्हणजेच त्यांचा त्याग करून परंतु पूर्ण श्रद्धायुक्त भावाने भगवंतांचे पूजन करतात, त्यांची स्थिती काय असते? त्यांना सात्विक म्हणावे, राजसी म्हणावे की तामसी म्हणावे?
या अध्यायाचे नावच श्रद्धात्रयविभागयोग असे आहे. श्रद्धा या शब्दाला विस्तृत अर्थ आहे. श्रद् म्हणजे सत्य आणि ध म्हणजे मार्ग. सत्याकडे जाणारा मार्ग असे श्रद्धा या शब्दाचे वर्णन करता येईल. श्रद्धा या शब्दाचा उलट अर्थ बघायचा झाला तर तो शंका असा होईल.
चौथ्या अध्यायात भगवंत म्हणतात-
श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः |
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति || ३९||
जितेंद्रिय, साधनतत्पर आणि श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवतो आणि ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत्प्राप्तीरूप परमशांतीला प्राप्त होतो.
श्रद्धा आणि शंका या दोन गोष्टी एकमेकांबरोबर कधीच नसतात जेथे श्रद्धा असते तेथे शंकेला जागा नसते. जेथे शंका असते तेथे श्रद्धा राहू शकत नाही. एका शायरने म्हटलेच आहे-
संदेह करके तिल तिल मरने से अच्छा है यकीन करके बेवफाई से मर जा।
मनुष्याचे जीवन विश्वासाने जोडले गेले आहे. मनुष्याला सावधान तर राहिले पाहिजे परंतु विश्वासी सुद्धा असले पाहिजे.
रामायणामध्ये चित्रकूट येथील प्रसंगात लक्ष्मणाने भरताच्या हेतू विषयी शंका घेतली होती. श्री रामचंद्र लक्ष्मण आणि सीतेसह वनवासाला निघाले तेव्हा बंधू भरत अयोध्येत नव्हता. त्यांचा पहिला मुक्काम चित्रकूट येथे होता. भरत जेव्हा अयोध्येत परतला आणि त्याला ही वनवासाची वार्ता समजली तेव्हा तो रामाला परत आणण्यासाठी सारे आयोध्या निवासी व चतुरंग सेना यांना एकत्र करून चित्रकूट येथे निघाला. जेव्हा लक्ष्मणाला ही बातमी समजली तेव्हा त्याच्या मनात संदेह उत्पन्न झाला. त्याला वाटले भरत सेना घेऊन येत आहे म्हणजे त्याला रामावर विजय मिळवून अयोध्येचा राजा बनायचे आहे. त्याच्या मनात हाही विचार आला की कदाचित कैकेयी मातेने रामाला वनवासात पाठवण्याचे कृत्य भरताच्या सांगण्यावरून तर केले नसेल? ही शंका बोलून दाखवण्यासाठी तो रामाजवळ गेला व रामाला त्याने सांगितले की भरत सेना घेऊन येत आहे तेव्हा श्रीराम हसले आणि म्हणाले, "तू भरताला ओळखत नाहीस. त्याला ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे पद जरी मिळाले तरी ते तो स्वीकारणार नाही, तर अयोध्येच्या राज्याची काय गोष्ट? मी तुझी आणि वडिलांची शपथ घेऊन सांगतो की भरतासारखा पवित्र भाऊ जगात दुसरा कोणी नसेल."
या अर्थाची एक ओवी रामचरितमानसमध्ये आहे-
तिमिरु तरुन तरनिहि मकु गिलई।

गगनु मगन मकु मेघहिं मिलई॥
गोपद जल बूड़हिं घटजोनी।
सहज छमा बरु छाड़ै छोनी॥
मसक फूँक मकु मेरु उड़ाई।
होइ न नृपमदु भरतहि भाई॥
लखन तुम्हार सपथ पितु आना।
सुचि सुबंधु नहिं भरत समाना॥
एक वेळ हे शक्य आहे की अंधार सूर्याला गिळून टाकेल, आकाश ढगांमध्ये गुंडाळले जाईल, पृथ्वी कदाचित आपली क्षमाशीलता सोडून देईल किंवा एखाद्या डासाच्या फुंकरीने सुमेरू पर्वत उडून जाईल, परंतु हे लक्ष्मण! भरताला राज्याचा लोभ कधीच होऊ शकत नाही.
गांधीजींना एकदा एका वामपंथीने विचारले की तुम्ही इतके शिकलेले आहात, लंडनहून बॅरिस्टर बनून आला आहात. रामायण भगवद्गीता यातील गोष्टी तुम्हाला खऱ्या वाटतात का? हे सर्व कथानक तुम्हाला काल्पनिक वाटत नाही का? त्यावर गांधीजींनी उत्तर दिले की अशाच ग्रंथातील एका व्यक्तीरेखेच्या संबंधातील काही घटना पाहून आणि ऐकून मी सत्यवादी झालो. अगदी लहानपणी गांधीजींनी राजा हरिश्चंद्र यांची चित्ररूप कथा पाहिली होती. सत्यवादी हरिश्चंद्राचा प्रभाव अगदी लहानपणीच त्यांच्या बालमनावर पडला होता.
गांधीजींच्या श्रद्धेविषयी अजून एक गोष्ट आहे.-
गांधीजी जेव्हा लंडनला शिकावयास जात होते त्यावेळी त्यांना जहाजातून जायचे होते. आठ दिवसांचा प्रवास होता. त्याकाळी हा प्रवास देखील खडतर होता. एका विमा एजंटाने त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी विमा घेण्याची शिफारस केली. त्याचे म्हणणे पटून गांधीजींनी पाच हजार रुपयांचा विमा काढला. जहाजातून त्यांचा प्रवास सुरू झाला. परंतु लगेचच त्यांच्या मनात विचार आला की मी हे अत्यंत चुकीचे काम केले. मी माझ्या भावंडांवर विश्वास दाखवला नाही. प्रवासात माझे जर काही बरे वाईट झाले तर माझे भाऊ माझ्या परिवाराकडे लक्ष देणार नाहीत असे मला वाटलेच कसे? विमा काढून मी माझ्या परिवाराचा विश्वासघात केला आहे. लंडनला पोचल्यावर त्यांनी पहिले काम कोणते केले असेल तर भावाला तार केली व त्याला कळवले की मी जो विमा काढला आहे तो ताबडतोब रद्द करावा.
श्रद्धा आणि विश्वास हे दोन शब्द सारख्याच अर्थाचे वाटतात पण त्यात सूक्ष्म फरक आहे.
आप्तवचन आणि शास्त्रवचन यांवर आपला जो विश्वास असतो ती श्रद्धा. महापुरुष, संत, आचार्य हे जे काही सांगतात ते आप्तवचन.
रामायण महाभारत आदी शास्त्रांमध्ये जे लिहिलेले आहे ते शास्त्रवचन.
आप्त आणि शास्त्रवचन यांचा आपल्याला प्रत्यक्ष जेव्हा अनुभव येतो तेव्हा त्यांच्या प्रति असलेली श्रद्धा ही विश्वासात बदलते.
रामचरितमानस मध्ये या श्रद्धा आणि विश्वास यांचा सुंदर प्रयोग गोस्वामी तुलसीदासजींनी केला आहे.-
भवानीशंकरौ वन्दे श्रद्धाविश्वासरूपिणौ।
याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धाः स्वान्तःस्थमीश्वरम्॥
भावार्थ:-श्रद्धा आणि विश्वास यांचे स्वरूप श्री पार्वतीजी आणि श्री शंकरजी यांना मी प्रणाम करतो ज्यांच्या शिवाय सिद्धजन आपल्या अंतःकरण स्थित ईश्वराला बघू शकत नाहीत.
गुरु विश्वासाचे प्रतीक आहे आणि पार्वती शिष्या रूपामध्ये आहे. श्रद्धा म्हणजे शिष्य आणि गुरु म्हणजे विश्वास. विश्वासाने श्रद्धेला रामायण ऐकवले अशा रूपामध्ये रामचरितमानस लिहिले गेले आहे.
गोस्वामीजी सुरुवातीला जगत जननी भवानीला वंदन करतात-
संग सती जगजननी भवानी।

पूजे रिषि अखिलेश्वर जानी।।
नंतर बालकांडामध्ये एक कथा येते.-
शिवजी हे राम भक्त आहेत. रामकथेचे रसिक आहेत. रामकथा ते सतत ऐकत व ऐकवीत असतात. एकदा ते अगस्ती मुनींच्या आश्रमामध्ये येतात. बरोबर सती देखील असते. अगस्ती मुनींना आनंद होतो. ते त्यांचे पूजन करतात. स्वागत करतात. त्यानंतर शिवजी अगस्ती मुनींना रामकथा सांगण्याची विनंती करतात. शिवजी अत्यंत श्रद्धेने रामकथा ऐकतात. परंतु सतीला मात्र या गोष्टीचा तितका आनंद होत नाही. तिच्या मनात विचार येतो की मी साक्षात महादेवांची पत्नी आहे आणि ही कथा अगस्ती मुनींकडून मी कशासाठी ऐकत आहे? शिवजींच्या ही गोष्ट लक्षात येते परंतु ते काही बोलत नाहीत. कथा संपल्यानंतर दोघे कैलासाला जाण्यास निघतात.
त्यावेळी पृथ्वीवर त्रेतायुगामध्ये भगवंतांची रामलीला चालू होती. सीतेचे अपहरण झाले होते आणि रामजी सीतेच्या विरहाने व्याकूळ होऊन वनात भटकत होते. त्यावेळी शिवजी आणि सती आकाशमार्गे चालले होते. ही घटना पाहून शिवजी थांबले. त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वाहू लागले. त्यांच्या मनात आले मी आत्ताच रामकथा ऐकली आणि मला भगवंतांचे दर्शन झाले. शिवजी श्रीरामांचे परमभक्त आहेत. शिवजींनी भगवान श्रीरामांना लांबूनच तीन वेळा 'जय सच्चिदानंद' असे म्हणून प्रणाम केला. सतीला मात्र वाटले की शिवजी हे काय करीत आहेत? हा तर एक साधा मनुष्य वनात सीता सीता करत भटकत आहे आणि शिवजी त्याला प्रणाम करीत आहेत. सतीच्या मनातील संदेह ओळखून शिवजींनी तिला सांगितले की हे साधारण मनुष्य नसून हे परब्रह्म परमात्मा आहेत. त्यांचीच कथा आपण आत्ता अगस्ती मुनींच्या आश्रमात ऐकली. तरीही सतीचा विश्वास बसला नाही तेव्हा शिवजी म्हणाले तुला जर माझ्यावर विश्वास नाही तर तू त्यांची परीक्षा घेऊ शकतेस. सतीने खरोखरच रामाची परीक्षा घेण्याचे ठरवले. ती सीतेचे रूप घेऊन वनात पोचली. ज्या रस्त्याने रामजी आणि लक्ष्मण चालले होते त्या रस्त्यात मार्गात जाऊन उभी राहिली. परंतु राम आणि लक्ष्मणाने सतीला बरोबर ओळखले व दोन्ही हात जोडून त्यांनी तिला प्रणाम केला व विचारले-
जोरी पाली प्रभु कीमत नाहू ।

पिता समेत लीन निज नामु ।
गए बहुरी कहा वृष केतु
विपन अकेली फिरहीं कही हेतु।
श्रीरामांनी स्वतःची ओळख सतीला सांगितली व तिला विचारले की भगवान महादेव कुठे आहेत? आणि तुम्ही एकट्याच या जंगलात का फिरत आहात? ते ऐकून सती खजील झाली.
मैं संकर कर कहा न माना।
निज अग्यानु राम पर आना॥
जाइ उतरु अब देहउँ काहा।
उर उपजा अति दारुन दाहा॥
मी शिवजींचे ऐकले नाही आणि रामावर संदेह केला. आता मी परत जाऊन त्यांना काय उत्तर देऊ? सती अत्यंत दुःखी झाली व परत जाण्यास निघाली. परंतु ज्या ज्या मार्गाने तिने जाण्याचा प्रयत्न केला तेथे समोर तिला राम लक्ष्मण आणि सीता दिसू लागले. ती जेव्हा एका जागी स्थिर उभी राहिली तेव्हा तिने पाहिले की प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू आणि महेश रामजींची सेवा करीत आहेत आणि स्तुती करीत आहेत. भगवंतांची ही लीला पाहून तिने आपले डोळे मिटून घेतले. साक्षात श्रीरामांनी आपला प्रभाव तिला दाखवला होता. त्यांचे काम झाले होते. आता जेव्हा सतीने डोळे उघडले तेव्हा ही सारी माया समाप्त झाली होती. सती परत शिवजींकडे आली. शिवजी रामनामाचा जप करत होते. सती काहीच बोलली नाही. परंतु अंतर्ज्ञानाने शिवजींनी सारे ओळखले होते. शिवजी तिला म्हणाले की तू जानकी मातेचे रूप घेऊन श्रीरामांसमोर गेलीस. आता मी तुला पत्नी म्हणून कसे स्वीकार करू?
या घटनेच्या वर्णनानंतर गोस्वामी तुलसीदासजींनी त्याच जगत जननीला दक्षकुमारी म्हणून संबोधले आहे-
मुनि संग बिदा मागि त्रिपुरारी।

चले भवन! संग दच्छ कुमारी।।
पुढे काही दिवसांनी सतीचे पिता दक्ष यांच्याकडे यज्ञ कर्म होते तेव्हा न बोलावता देखील सती तेथे गेली. त्यावेळी देखील तिने शिवजींच्या इच्छेचा भंग केला. यज्ञप्रसंगी सतीने पाहिले की शिवजींचा भाग ठेवलेला नाही. सतीला हा भयंकर घोर अपमान वाटला व तिने योगाग्नीने आपले शरीर तेथेच भस्म केले. यज्ञाचा विध्वंस झाला. शिवाजी तेथे प्रकट झाले. त्यांनी सतीची रक्षा उचलली व कैलासाकडे निघाले. वाटेत जेथे जेथे तिची रक्षा सांडली तेथे तेथे शक्तीपीठे निर्माण झाली. नंतर सतीने पार्वतीच्या रूपात जन्म घेतला व शिवजींच्या प्राप्तीसाठी कठोर तप केले. महादेव प्रसन्न झाले. शिवपार्वतीचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर पार्वती शिवजींना म्हणाली की मागील जन्मात माझी फार मोठी चूक झाली होती. मी राम कथा ऐकली नाही. आता मी पूर्ण श्रद्धेने रामकथा ऐकण्यासाठी आपल्याजवळ उपस्थित आहे. आता मला आपण रामकथा ऐकवावी. यानंतर शिवजींनी रामकथा प्रारंभ केली. हेच ते रामचरितमानस जे गोस्वामी तुलसीदासजींनी पंधराव्या शतकामध्ये आमच्यासाठी लिहिले.
श्रद्धेचा नाश झाल्यामुळे सतीचे पतन झाले आणि श्रद्धेमुळेच पार्वतीने आपले पूर्वस्थान पुन्हा प्राप्त केले. हा आहे श्रद्धेचा महिमा.
श्रीभगवानुवाच
त्रिविधा भवति श्रद्धा, देहिनां(म्) सा स्वभावजा|
सात्त्विकी राजसी चैव, तामसी चेति तां(म्) शृणु||17.2||
श्री भगवान म्हणाले, मनुष्यांची ती शास्त्रीय संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा तीन प्रकारचीच असते . ती तू माझ्याकडून ऐक.
तीन कारणांनी मनुष्य शास्त्रविधींचा त्याग करतो.
अज्ञता - अजाणतेपणाने शास्त्रविधीचे पालन केले जात नाही. हवन करताना यज्ञात कोणते लाकूड वापरावे याची माहिती नसल्याने जे मिळाले ते वापरले तर ते क्षम्य असते.
उपेक्षा - शास्त्रविधी चे नियम माहित असतात. तरीही त्यांचे पालन केले जात नाही. उदाहरणार्थ यज्ञात हवनासाठी आंब्याचे लाकूड आणण्यास सांगितले परंतु काय फरक पडतो असा विचार करत दुसरेच कुठले तरी लाकूड आणून ठेवले व त्याचे हवन केले. ही शास्त्रविधीची उपेक्षा झाली. अशाप्रकारे केलेले कर्म हे फलहीन होऊन जाते.
विरोध - शास्त्रविधी माहित आहेत. यज्ञासाठी आंब्याचे लाकूड लागते हे माहित आहे. तरी देखील गुरुजींना काय समजते असे म्हणून आपल्या मनाने दुसऱ्या कुठल्या तरी लाकडाचे हवन केले तर हा शास्त्रविधीला विरोध होतो व हा विरोध दंडपात्र असतो.
भगवंत म्हणतात श्रद्धा तीन प्रकारांनी उत्पन्न होते. -
स्वभावजा - पूर्व जन्माच्या कारणाने, कुलपरंपरेने व आई वडिलांच्या कारणाने आपल्यात जी श्रद्धा उत्पन्न होते ती स्वभावजा श्रद्धा.
शास्त्रजा - भक्त प्रल्हाद हिरण्यकश्यपूच्या घरात जन्मला परंतु त्याने शास्त्रांचा अभ्यास केला आणि त्याच्या मनात भगवान नारायणांबद्दल श्रद्धा निर्माण झाली. घरात कोणतीही पूर्वपरंपरा नसताना त्या घरातील लोक जेव्हा रामायण महाभारत श्रीमद् भागवत कथा ऐकतात तेव्हा त्याच्या मनात श्रद्धा उत्पन्न होते ती शास्त्रजा श्रद्धा.
संगजा - सज्जन लोकांच्या सहवासात राहून जी श्रद्धा उत्पन्न होते ती संगजा श्रद्धा. अशी श्रद्धा उत्पन्न होण्यासाठी काही वेळ जाऊ द्यावा लागतो. एका उदाहरणाने हे स्पष्ट होईल.-
एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडेसे तेल टाका व नंतर त्यात एक बोट बुडवा. तुमच्या असे लक्षात येईल की बोटाचा फक्त वरचा भाग तेलकट झालेला आहे. हे पाणी पंधरा दिवस असेच ठेवा व पंधरा दिवसानंतर पुन्हा त्यात बोट बुडवा. त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की बोटाचा संपूर्ण बुडवलेला भाग तेलकट झाला आहे. पंधरा दिवसांमध्ये पाण्याच्या प्रत्येक कणांमध्ये तेल व्याप्त झाले आहे.
आपल्याला वाटते की थोडीशी गीता काय वाचली, थोडेसे विवेचन काय ऐकले की आपला सत्संग झाला. परंतु या गोष्टी दीर्घकाळ कराव्या लागतात तेव्हाच श्रद्धा उत्पन्न होते.

सत्त्वानुरूपा सर्वस्य, श्रद्धा भवति भारत|
श्रद्धामयोऽयं(म्) पुरुषो, यो यच्छ्रद्धः(स्) स एव सः||17.3||
हे भारता! सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानूरुप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धेने युक्त आहे तो स्वतःही तोच आहे. (अर्थात त्या श्रद्धेनुसार त्याचे स्वरुप असते.)
येथे भगवंत एक महत्त्वाचे सूत्र सांगतात. ज्याची जशी श्रद्धा असते तसे त्याचे व्यक्तिमत्व बनते. प्रत्येकाचे श्रद्धास्थान वेगवेगळे असते. सर्व मनुष्यांना दोन डोळे दोन कान एक नाक दोन हात दोन पाय मिळालेले आहेत. अशी ही समानता असून देखील सर्वांची श्रद्धा वेगवेगळी असते. एखाद्याची श्रद्धा ऐकण्यामध्ये जास्त असते तो जास्त श्रवण करतो. ज्याची वाचनामध्ये श्रद्धा असते तो सतत शास्त्राग्रंथांचे वाचन करीत राहतो. सतत काम करण्यामध्ये एखाद्याची श्रद्धा असते तो सतत काम करीत राहतो. तसेच ज्याची संपत्तीमध्ये श्रद्धा आहे तो फक्त पैसा कमावण्याच्या मागे पूर्ण जीवन धावत राहतो. आपल्या परिवाराला सुखी करण्याची ज्याची श्रद्धा आहे तो आपल्या परिवारातच सुखी असतो. या संबंधातच एका मूर्तिकाराची कथा आहे जो मूर्ती बनवण्यापूर्वी दगडाचा स्वभाव जाणून घेत असे.-
एका राजाने या प्रसिद्ध मूर्तिकाराला बोलवून घेतले व व द्वारकाधीशाची एक सुंदर मूर्ती घडवण्याची विनंती केली. मूर्तिकाराच्या सांगण्यावरून राजाच्या सेवकांनी चारी दिशांकडून शेकडो दगड आणून ठेवले. सर्व दगडांची परीक्षा करून त्याने चार दगड निवडले. मूर्ती बनवण्यासाठी मूर्तिकाराने त्यातील एका दगडावर छिन्नीने घाव घालण्यास सुरुवात केली तोच त्याला आवाज ऐकू आला की बास कर. मी आहे असाच खूश आहे. तेव्हा तो दगड त्याने बाजूला ठेवून दिला. दुसऱ्या दगडावर काम सुरू केले. सहा महिने त्या दगडावर त्याने काम केले. त्यानंतर मात्र त्याला जाणवले की या दगडाला देखील घाव सहन होत नाहीयेत, तेव्हा त्याने तिसरा दगड घेतला व तिसऱ्या दगडावर सुमारे वर्षभर काम केले. परंतु तो दगड देखील म्हणाला की मला सोडून दे, आता माझ्याच्याने हे सहन होत नाही. तेव्हा मूर्तिकाराने तो घडवलेला दगडही बाजूला ठेवून दिला व चौथा दगड मूर्ती बनवण्यासाठी घेतला. या चौथ्या दगडाला स्पर्श करताच त्याला एक अद्भुत अनुभव आला. जणू तो दगड म्हणत होता की मी तडपत होतो, तू मला कधी हात लावशील म्हणून! मी पूर्णपणे समर्पित आहे. तुझ्या छिन्नीचे घाव पडले तरी मी उफ् देखील करणार नाही. या दगडावर दिवस-रात्र मेहनत करून मूर्तिकाराने द्वारकाधीशाची अतिशय सुंदर मूर्ती घडवली. ती पाहून तो स्वतः अत्यंत प्रसन्न झाला. नुकतीच आपण जशी अयोध्येतील श्रीरामाची मूर्ती पाहिली तशीच ती सुंदर मूर्ती होती. राजा देखील खूप खूश झाला. त्याने आपल्या गळ्यातील कीमती हार मूर्तिकाराला तिथल्या तिथे बक्षीस दिला. पुढे मोठा उत्सव झाला. मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. दूरदूरच्या देशातून लोक तेथे द्वारकाधीशाच्या दर्शनासाठी येऊ लागले.
एक सामान्य दगड आपल्या समर्पण भावाने भगवान बनून गेला. बाकीच्या दगडांपैकी ज्याच्यावर सुमारे वर्षभर काम झाले होते त्याला सिंहाचा आकार देऊन मंदिराच्या दाराशी ठेवले गेले. ज्या दगडावर सहा महिने काम झाले होते तो दगड मंदिराच्या पायऱ्यांसाठी वापरला गेला व पहिला दगड जो होता त्याचा चुरा करून मात्र मंदिराच्या मार्गामध्ये टाकला गेला.
जो श्रद्धावान होता तो स्वतः भगवत्स्वरूप होऊन गेला. कोणी संत सुद्धा अशा प्रकारे देवत्व प्राप्त करतात. असे संत सर्वांसाठी पूजनीय ठरतात.
आपल्याला आपले जीवन कसे बनवायचे असते ते आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. सामान्य व्यक्तीची श्रद्धा भोगामध्ये असते. संतांची श्रद्धा भावामध्ये असते आणि ज्ञानी मनुष्याची श्रद्धा तत्त्वांमध्ये असते.

यजन्ते सात्त्विका देवान्, यक्षरक्षांसि राजसाः|
प्रेतान्भूतगणांश्चान्ये, यजन्ते तामसा जनाः||17.4||
सात्विक माणसे देवांची पूजा करतात. राजस माणसे यक्ष-राक्षसांची तसेच जी इतर तामस माणसे असतात, ती प्रेत व भूतगणांची पूजा करतात.
आपण पाहतो की ज्यांची भगवान शंकरांवर श्रद्धा असते ते सोमवारचे व्रत करतात. ज्यांची गणपतीवर श्रद्धा असते ते मंगळवारचा उपवास करतात. प्रत्येक मनुष्य आपल्या आवडीनुसार आपल्या श्रद्धेनुसार देवतेचे पूजन करतो. स्थूल शरीर जरी सर्वांचे एकसारखे असले तरी प्रत्येकाचे मन वेगळे असते. जशी आपली श्रद्धा असते तसे आपले मन बनते. एक प्रसिद्ध भजन आहे.-
तोरा मन दर्पण कहलाए |
तोरा मन दर्पण कहलाए |
भले बुरे सारे कर्मों को देखें और दिखाएं।
मन एक आरसा आहे. जशी आपली श्रद्धा तसे आपले मन आणि तसेच आपले जीवन.

अशास्त्रविहितं(ङ्) घोरं(न्), तप्यन्ते ये तपो जनाः|
दम्भाहङ्कारसंयुक्ताः(ख्), कामरागबलान्विताः||17.5||
जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्या कल्पनेप्रमाणे घोर तप करतात तसेच दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळाचा अभिमान यांनी युक्त असतात,
तपस्या रावणाने व हिरण्यकश्यपूने सुद्धा केली होती. दोघांनाही भगवंत प्रसन्न झाले परंतु त्यांनी भक्ती मागितली नाही. त्यांच्या आसुरी स्वभावामुळे हजारो वर्षांची तपस्या सुद्धा भक्तिहीन ठरली व त्यांच्या जीवनाचा नाश झाला.
आपण पाहतो की नवरात्री आणि गणपतीउत्सवामध्ये मोठमोठे मंडप उभारले जातात. काही वेळेस मूर्तीपेक्षाही मोठा असा नेत्याचा फोटो तेथे लावलेला असतो व फिल्मी गाणी वाजवली जात असतात. अशा गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवले पाहिजे.

कर्शयन्तः(श्) शरीरस्थं(म्), भूतग्राममचेतसः|
मां(ञ्) चैवान्तः(श्) शरीरस्थं(न्), तान्विद्ध्यासुरनिश्चयान्||17.6||
जे शरीराच्या रुपात असलेल्या भूतसमुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक आसुरी स्वभावाचे आहेत, असे तू जाण.
17.6 writeup
आहारस्त्वपि सर्वस्य, त्रिविधो भवति प्रियः|
यज्ञस्तपस्तथा दानं(न्), तेषां(म्) भेदमिमं(म्) शृणु||17.7||
भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे तीन प्रकारचे प्रिय असते. आणि तसेच यज्ञ, तप आणि दानही तीन प्रकारची आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक.
मनुष्याचा आहार जो त्याला अत्यंत प्रिय असतो तो देखील त्याच्या श्रद्धेनुसार बनतो. त्याचप्रमाणे यज्ञ दान आणि तप हे देखील तीन प्रकारचे असतात जे मनुष्याच्या श्रद्धेवरच अवलंबून असतात.
आयुः(स्) सत्त्वबलारोग्य, सुखप्रीतिविवर्धनाः|
रस्याः(स्) स्निग्धाः(स्) स्थिरा हृद्या, आहाराः(स्) सात्त्विकप्रियाः||17.8||
आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढविणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावत: मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात.
सात्विक भोजनाची सहा लक्षणे भगवंतांनी या श्लोकात सांगितली आहेत. सात्विक भोजनात मूगडाळीचा अंतर्भाव अधिक असतो. तूरडाळ ही राजसी समजली जाते तर उडीदडाळ ही शक्तीवर्धक असून देखील तामसी आहे. भोजनामध्ये या डाळींच्या वापराची मात्रा ज्या प्रमाणात असेल त्याप्रमाणे हे भोजन सात्विक राजसी व तामसी ठरते.
सात्विक प्रवृत्तीचे लोक आपल्या भोजनामध्ये दूध केळे फळांचा रस अशा पदार्थांचा अंतर्भाव करतात. हे सर्व पदार्थ आयु वाढवणारे आहेत. केळे बल वाढवणारे आहे. आमरस हा सुखप्रीती वर्धक आहे. दूध हा रसाहार आहे. त्यातही देशी गायीचे तूप अत्यंत स्वास्थ्यवर्धक आहे. राजसी आणि तामसी लोक असा आहार पसंत करीत नाहीत. ते चहा कॉफी कोल्ड्रिंक प्रोटीन शेक अशा गोष्टी पसंत करतात. हा सर्व आहार अस्थिर आहे. तो काही काळासाठीच बल देतो.
याव्यतिरिक्त आणखी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपल्या भुकेनुसारच आहार घेतला पाहिजे. अन्यथा सात्विक आहार देखील तामसी होऊन जातो.
तसेच आहार घेण्याच्या वेळा देखील पाळल्या गेल्या पाहिजेत. आयुर्वेदानुसार सकाळी पाणी, दुपारी ताक आणि रात्री दूध घ्यावे. याच्या उलट केल्यास हाच आहार तामसी होऊ शकतो.
आहार बनवताना भावदृष्टी महत्त्वाची असते. रागद्वेषाचा भाव मनात ठेवून बनवलेले सात्विक जेवण देखील तामसी होऊन जाते.
आहार घेताना तत्त्वदृष्टी देखील महत्त्वाची असते. या संबंधात गुरुनानक आणि त्यांचे दोन शिष्य बाला आणि मर्दाना यांची एक कथा आहे-
गुरुनानकजींचा एक नियम होता की ते जेथे जातील तेथे गावाबाहेरच थांबत. एक रात्री पेक्षा अधिक कोठेच थांबत नसत. जर कोणी गावातून भोजन आणून दिले तर ते खात असत. अन्यथा उपाशी झोपून जात. एकदा दोन दिवस त्यांना कुठेच भिक्षा मिळाली नाही.
त्या दिवशी मात्र ते ज्या गावाबाहेर थांबले होते तेथील जमीनदाराने तीन चांदीची ताटे पक्वान्नांनी भरून जेवण पाठवले. शिष्यांना खूप आनंद झाला. परंतु गुरुजींच्या आदेशाशिवाय कसे खाणार म्हणून त्यांनी गुरुजींना विचारले, तेव्हा गुरुनानकजींनी त्यांना थोडे थांबावयास सांगितले.
थोड्या वेळानंतर एक गरीब मुलगी आपल्या हातात तीन रोट्या घेऊन आली व तिने मोठ्या प्रेमाने ते गुरुनानकांना अर्पण केले व आईचा निरोप सांगितला आणि प्रणाम केला. गुरुनानकजींनी मोठ्या प्रसन्नतेने ते स्वीकारले. तिला आशीर्वाद देऊन तिला जाण्यास सांगितले.
गुरुनानकजींनी शिष्यांना सांगितले की ही रोटी खाण्यास हरकत नाही. शिष्यांना आश्चर्य वाटले एवढी पक्वान्न भरलेली ताटे सोडून ही कोरडी रोटी का बरे खायची? हे ऐकून गुरुनानकजींनी एका मुठीत रोटी पकडली व दुसऱ्या मुठीत चांदीच्या ताटातील पक्वान्न पकडले व दोन्ही मुठी जोरात दाबल्या तेव्हा पहिल्या मुठीतून दूध निघाले व दुसऱ्या मुठीतून रक्त. ते पाहून शिष्य घाबरले व आश्चर्यचकीत झाले. गुरुजी म्हणाले रोटी ही शुद्ध धनाच्या कमाईतून बनवलेली आहे. दुधासारखीच ती पवित्र आहे. कष्टाने बनवलेली आहे. त्यामुळे ती खाण्यास काहीच हरकत नाही. परंतु चांदीच्या ताटातील पक्वान्ने मात्र इतरांवर अन्याय करून कमावलेल्या धनातून बनवलेले आहेत. त्यामुळे ती विष समान आहेत.
हरिनाम संकीर्तनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तर सत्र सुरू झाले.
प्रश्नोत्तरे
संजिला भट जी - तुळशीपत्र तोडू नये असे म्हणतात ते खरे आहे का?
रविवार आणि एकादशीच्या दिवशी तुळशीपत्र तोडू नये. त्या दिवशी लागणारी तुळशीपत्र आदल्या दिवशी काढून ठेवावीत. तुळशीचे पान कधीही तोंडात ठेवून चावू नये. त्यामध्ये पारा असतो त्यामुळे ते हानिकारक असते. चहामध्ये टाकून पिण्यास हरकत नाही.
प्रेमनाथ जी - मी सत्य बोलण्याचा संकल्प केला आहे. प्रयत्न करीत आहे.
हे करताना कधी चूक झाली तरी सुद्धा घाबरून जाऊ नका. वेळ लागतो. हळूहळू सावधानता राखून संकल्प पूर्ण करा.
चंद्रकांता जी - घरामध्ये भगवंतांच्या किती मूर्ती ठेवाव्यात?
मंदिर हे काही स्टोअर रूम करू नये. मंदिरामध्ये केवळ पूजितमूर्ती ठेवाव्यात. गिफ्ट मिळालेल्या मूर्ती शोकेसमध्ये ठेवून द्याव्या किंवा इतरांना भेट द्याव्या.
सुमित जी - मृत्युभोज हे काय असते?
या काहीतरी वाईट प्रथा समाजामध्ये पाडल्या गेल्या आहेत. मृत्युभोज हे फक्त निकटच्या परिवारातील लोकांसाठी असते. इतरांनी ते खाऊ नये त्याने पुण्याचा नाश होतो.
नीरूजी - वाळलेल्या तुळशीच्या काड्या मी डब्यात भरून ठेवल्या आहेत व त्या चहा मध्ये वापरते. ते चालते का?
काहीच हरकत नाही. फक्त मनात आदरभाव ठेवून त्याचा वापर करावा.
यानंतर समापन प्रार्थनेने आणि हनुमान चालीसाच्या पठणाने कार्यक्रमाची सांगता झाली.
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥