विवेचन सारांश
कर्मयोगाची लक्षणे आणि कर्मसंन्यासयोगाचे वर्णन
परंपरेनुसार प्रारंभिक प्रार्थना, दीप प्रज्वलन आणि गुरु चरणांना वंदन करून विवेचनाचा शुभारंभ झाला. भगवंताची महान कृपा आपल्यावर असल्याने आपण भगवद्गीतेचे मनन चिंतन, भगवद्गीतेचा अभ्यास, भगवद्गीतेचे विवेचन ऐकण्यासाठी प्रवृत्त झालो आहोत. भगवद्गीता आपल्या जीवनात येण्यासाठी आपण मागच्या जन्मी काही पुण्य केले असेल किंवा संत महात्म्यांच्या कृपेमुळे हे आपल्याला शक्य झालेले आहे.
आज आपण पाचव्या अध्यायाचे चिंतन करीत आहोत. हा अध्याय कर्मसंन्यासयोग या नावाचा आहे. गीतेचे तीन, चार, पाच हे तिन्ही अध्याय कर्मयोगाचे आहेत. हे तिन्ही अध्याय मिळते जुळते आहेत. अतिशय ज्ञानी महात्मे सुद्धा या तीन अध्यायातील सूक्ष्म फरक जाणून घेताना गडबडतात. या अध्यायांमध्ये थोडा थोडा फरक आहे. तिसरा अध्याय कर्मयोगाचा आहे. कर्म म्हणजे काहीतरी करणे आणि योग म्हणजे परमात्म्याशी जोडणे. सर्वभूतहितेरता: ही दृष्टी ज्याची झाली आणि सर्वांप्रति समतेची भावना असली तर अशा योग्यासाठी राग, द्वेष, मान, अपमान, सुखदुःख यामध्ये कोणतेही अंतर नसते. असा योगी आपले आयुष्य भगवंताने दुसऱ्यांचे कल्याण करण्यासाठी दिले आहे असे मानतो आणि त्याच भावनेने सर्व कर्म करतो. समत्व आणि सर्वभूतहितेरता: या दोन गोष्टी त्याच्यात असतात. माझ्याकडून सर्वांचे कल्याण व्हावे ती त्याची दृष्टी असते. काही लोक सर्व कल्याणकारी कामे करीत असतात पण ते भगवंताची पूजाअर्चा, ग्रंथ वाचन वगैरे करत करत नाही. तरीही त्यांचे सर्व कर्म म्हणजे कर्मयोगच म्हणावे.
भगवद्गीतेचा चौथा अध्याय ज्ञानकर्मसंन्यासयोग आहे. या ठिकाणी ज्ञान, कर्म, संन्यास, सांख्य, योग इत्यादी शब्द येतात. ज्ञानी कोण आणि संन्यासी कोण याचे गीतेत विस्ताराने वर्णन केले आहे. संन्यासी म्हणजे भगवे वस्त्र परिधान करणारा, हिमालयात राहणारा, गृहस्थधर्माचा त्याग करणारा असे आपण समजतो. भगवान हे मानत नाहीत. असे संन्यासी तर असतात पण त्याहीपेक्षा संन्यासी या शब्दाची व्याख्या विस्तृत आहे. त्यागी मनुष्य, अद्वैतमार्गाने मनाची आसक्ती सोडणारा जो असतो, त्याला संन्यासी म्हणावे. असा मनुष्य घरात राहणारा असतो, जिलबी खाणारा असतो, आपल्या मुलांबरोबर खेळणारा असतो, गृहस्थधर्मीय असतो पण कशातही आसक्त नसतो. कोणत्याही गोष्टीविषयी आसक्ती म्हणजे मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही, मला ते मिळण्याची इच्छा आहे, मला ती गोष्ट तीव्रतेने हवी आहे. मात्र संन्यासी मनुष्य जिलबी खाण्यात आणि सुके चणे खाण्यात अंतर मानत नाही. तो कोणत्याही गोष्टीत समानतेने राहतो. त्याचे मन नेहमी शांत असते. तो प्रत्येक वेळी ज्ञानदृष्टीने वैराग्य धारण करतो.
पाचवा अध्याय कर्मसंन्यासयोग यामध्ये कर्म करुन सुद्धा त्याचे कर्तेपण स्वतःकडे घेतले जात नाही. मी काम करणार पण त्यात माझे कर्तुत्व नाही. मला भूक लागली याचा अर्थ शरीराला भूक लागली. त्यावेळी खाण्यासाठी हात उचलला जातो, मुखापर्यंत जातो आणि अन्न ग्रहण केले जाते. हे सगळं मी न करता माझ्या शरीराकडून केले जाते ही भावना असणारा कर्मसंन्यासी असतो.
एकोणिसाव्या शतकात विवेकानंदांचे समकालीन स्वामी रामतीर्थ होते. ते ज्ञानी होते. त्यांचे अध्यात्माचे ज्ञान अद्भुत होते. ते लाहोर मध्ये गणिताचे प्राध्यापक होते. त्यांनी उर्दूत केलेल्या गझल आणि शायरी अध्यात्मावर आधारित आहेत. मी जे काही करतो आहे ते मी करत नाही तर ते माझ्या शरीराकडून केले जाते असा दृढ भाव त्यांच्या ठायी होता. त्यांच्या जीवनातील एक मजेदार प्रसंग आहे.
जीवनाच्या अंतिम क्षणी ते उत्तराखंडमधील टिहरी या क्षेत्रात गेले. ते तिथे जंगलात राहून साधना करत होते. त्या जंगलाजवळच गंगा वाहत होती. एकदा एका झाडाखाली ते बसले होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने त्यांना लिंबाचे सरबत पिण्याची इच्छा निर्माण झाली. अर्ध्या तासाने एक शेठजी रामतीर्थांना त्यांच्या दिशेने येताना दिसले. शेठजींच्या हातात एक पिशवी होती. हे टिहरीजवळील एका गावात राहणारे शेठजी त्यांना भेटायला नेहमी येत. रामतीर्थ मोठे महात्मा आहेत हे शेठजींना माहित होते. त्या दिवशी जेव्हा शेठजी रामतीर्थांकडे आले तेव्हा त्यांच्या पिशवीत त्यांनी स्वामीजींसाठी लिंबे आणि साखर आणली होती. त्या दिवशी का कोणास ठावुक पण शेठजींना स्वामीजींसाठी सरबत करुन देण्याची इच्छा झाली होती. त्यांनी त्यांची इच्छा स्वामींना बोलून दाखवली आणि म्हणून ते लिंबू आणि साखर घेऊन आल्याचे त्यांनी सांगितले. स्वामी रामतीर्थ मनातल्या मनात सर्व ओळखून चुकले. आपल्याला सरबत पिण्याची इच्छा होते काय आणि भगवंत त्याची सोय शेठजींमार्फत करतो काय. त्यांना वाटले आपली एक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भगवंतांमार्फत शेठजींना कामाला लावले. रामतीर्थांनी शेठजींना लिंबे आणि साखर तेथेच ठेवून परत जाण्यास सांगितले. मी सरबत करुन घेईन आपण गेलात तरी चलेल असे सांगितल्यावर शेठजी परत गेले.
रामतीर्थांनी पिशवीतून एक एक लिंबू बाहेर काढले, त्या लिंबाकडे बघत ते म्हणाले, "अरे मना, तुला सरबत प्यायचे आहे ना. हे घे पी". असे म्हणून त्यांनी ते लिंबू गंगेत विसर्जित केले. एक एक करत सर्व लिंबे त्यांनी गंगेला अर्पण केली. मनात उठणाऱ्या संकल्पाचा त्यांनी अशा रीतीने त्याग केला. माझ्या मनात संकल्प निर्माण करणारा, त्याची पूर्ती करण्याची व्यवस्था करणारा तो भगवंत आहे, कर्ता मी नाही असा त्यांचा दृढ भाव होता. हा कर्मसंन्यास होय.
भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायात समोर बांधव गुरुजनांना बघून अर्जुनाच्या मनात विषाद उत्पन्न झाला. भगवंताशी बोलता बोलता तो म्हणाला की मी संन्यास घेतो, जंगलात जातो पण युद्ध करत नाही. कुटुंबीयांना गुरुजनांना मारून मी भोग भोगणार नाही. अर्जुनाला राज्य नको होते असे नव्हते तर त्याला आप्तांची हत्या करुन राज्य मिळवायचे नव्हते. यावर भगवान त्याला म्हणाले तू एकीकडे भोग भोगण्याची भाषा करतोस आणि दुसरीकडे संन्यास घेतो असेही म्हणतोस हे दोन्ही कसे शक्य आहे? भगवंतांना त्याच्या मनातील द्वंद्वाची संपूर्ण उकल करायची आहे. इथून भगवान त्याला उपदेश करतात.
भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायात ३६, ३७, ३८ आणि ४२ या चार श्लोकातून ते त्याला ज्ञानमार्ग सांगतात. ३६ व्या श्लोकात ते म्हणतात "ज्ञानप्लवेनैव" - जरी तू इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पाप करणारा असलास, तरीही तू ज्ञानरूपी नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून तरुन जाशील. ३७ व्या श्लोकात ते म्हणतात ज्याप्रमाणे पेटलेला अग्नी इंधनाची राख करतो, तसाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मांची राखरांगोळी करतो. ३८ व्या श्लोकात ते म्हणतात - न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते। या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे दुसरे काहीही नाही. ४२ व्या श्लोकात समापन करताना ते अर्जुनाला म्हणतात, छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत - या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेकाने, ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर रहा आणि युद्धाला तयार हो.
ज्ञानप्राप्तीसाठी संन्यास घेऊन सर्वसंगपरित्याग हे अर्जुनाला परिचयाचे होते. अर्जुनाला राज्य मिळवायचे होते पण त्यासाठी स्वजनांची हत्या करणे त्याला पटत नव्हते. त्यामुळे तो संन्यासाची भाषा करत होता. राज्यभोग आणि संन्यास या परस्पर विरोधी गोष्टी त्याच्या मनात चालू होत्या. यातील द्वंद्व आणि भेद भगवंतांना त्याला दाखवून द्यायचा होता. त्यामुळे त्यांनी त्याला ज्ञानाचा उपदेश दिला. आता ज्ञानाचा उपदेश झाल्यावर पुन्हा भगवंत त्याला तू युद्धास उभा राहा म्हणतात हे ऐकल्यावर अर्जुन गोंधळात पडला आणि त्याने पुन्हा एकदा भगवंतांनी त्याला त्याचे कल्याण कशात आहे ते निश्चितपणे सांगावे अशी विनंती केली. अर्जुनाने हेच दुसऱ्या अद्यायाच्या सातव्या श्लोकात भगवंतांना सांगितले होते.
आता हीच गोष्ट पाचव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात आलेली आहे.

कार्पण्यदोषोपहतस्वभावः
पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।२.७।।
अत्यंत दया आणि करुणेमुळे ज्याचा मुळ स्वभाव नाहीसा झाला आहे आणि धर्माधर्माचा निर्णय करण्याविषयी ज्याची बुद्धी असमर्थ आहे, असा मी तुम्हाला प्रश्न विचारत आहे की जे साधन खात्रीने कल्याणकारक आहे, ते मला सांगा. मी तुमचा शिष्य असून शरण आलो आहे तेव्हा मला उपदेश करा असे अर्जुन म्हणतो. पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः।
यच्छ्रेयः स्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे
शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम्।।२.७।।
आता हीच गोष्ट पाचव्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकात आलेली आहे.
5.1
अर्जुन उवाच
सन्न्यासं(ङ्) कर्मणां(ङ्) कृष्ण, पुनर्योगं(ञ्) च शंससि।
यच्छ्रेय एतयोरेकं(न्), तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्॥5.1॥
अर्जुन म्हणाला - हे कृष्णा! तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरुन कर्मयोगाची प्रशंसा करता! तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन असेल, ते सांगा.
अर्जुन म्हणतो भगवान एकाच वेळेस तुम्ही संन्यास आणि कर्मयोग दोन्ही सांगता त्यामुळे तुम्ही मला साशंक तर करत नाही ना? मला माझे कल्याण करायचे आहे. मला श्रेयापर्यंत जायचे आहे. मी जे काही करतो आहे ते माझे कर्तव्य आहे. त्यामुळे तन्मे ब्रूहि सुनिश्चितम् l माझ्यासाठी निश्चित कल्याणकारक असे तुम्ही सांगा. तुम्ही जो उपदेश मला द्याल तो परिपूर्ण २४ कॅरेट सोन्यासारखा सच्चा आणि निश्चित कल्याणकारी द्या असे अर्जुन भगवंतांना सांगतो. त्याचे उत्तर भगवद्गीतेतून भगवान देतात.
भगवद्गीता इतर शास्त्रांपेक्षा अद्भुत ग्रंथ आहे. कपिल मुनी आणि देवाहुती यांचा संवाद सांख्ययोगापर्यंत सीमित आहे. नारद भक्तीसूत्र यात भक्तिमार्ग सांगितला आहे. यात भक्ती सोडून दुसरे काहीही नाही. शंकराचार्यांचा अद्वैत वेदांत, ब्रह्मसूत्रे यात एकोहं द्वितीयो नाSस्ति हे सांगितले आहे. विष्णुपुराणात विष्णूची स्तुती आढळते. देवीपुराण, गणेशपुराण यात देवीचे, गणेशाचे महात्म्य वर्णन केले आहे. हे सर्व आपापल्या जागी श्रेष्ठ ग्रंथ आहेत. पण हे सगळे ग्रंथ एकेक विषय घेऊन सीमित राहिले. मात्र भगवद्गीता हा असा एकच ग्रंथ आहे की तो सर्व मार्गांविषयी वर्णन करणारा आहे. ज्याला ज्या मार्गाने जायचे त्या मार्गाने तो जाऊ शकतो आणि भगवंताला प्राप्त करू शकतो याचे वर्णन भगवंत करतात.
रामभक्त हनुमान हे सुरुवातीला ज्ञानयोगी होते. ते रामाचे भक्त होते. त्यांच्या इतका ज्ञानी आज पर्यंत कोणीही झाला नाही. त्यांनी वेदांचा आणि व्याकरणाचा खूप अभ्यास केला होता. जेव्हा प्रभू रामाची आणि हनुमंतांची प्रथम भेट झाली तेव्हा श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, "मी हनुमंतांसारखा दुसरा पंडित पाहिला नाही." प्रत्यक्ष प्रभुंनी त्यांच्या पांडित्याचे कौतुक केले.
पुढे सीतेचा शोध घेण्यासाठी वानरसैन्य निघाले. समुद्रतटावर बसून पलीकडे कसे जायचे याविषयी चिंतेत ते बसले होते. माझे वय झाल्याने आता माझ्याकडून हे कार्य होणार नाही असे जांबुवंतांचे मत होते. जाता येईल पण परत येण्याविषयी खात्री वाटत नसल्याचे अंगदाने सांगितले. त्यावेळी हनुमंत एका कोपऱ्यात गप्प बसून होते. जांबुवंत त्यांना म्हणाले -
हनुमानजी बिभीषणाला म्हणाले, " तुमच्या दर्शनाने माझे मन प्रेमाने उचंबळुन आले आहे. तुम्ही नक्कीच कोणी हरिभक्त आहात. " बिभीषणाने हनुमंतांना माता सीता अशोकवाटिकेत असल्याचे सांगितले. हनुमंत म्हणाले, माझ्याकडे पिताजी आहेत आणि तुझ्याकडे माताजी आहे ". आपण त्यांची भेट घडवू. बिभीषण भेटल्यावर हनुमंतांचा भक्तियोग जागृत झाला.
संसारातील समस्त संप्रदाय मार्गाचे आग्रही आहेत. ते दया करू नये करुणा करू नये असे म्हणत नाहीत. जीवनातील सर्व सद्गुणांना ते मानतात. साधनांनी सद्गुण आत्मसात करायचे असतात. प्रत्येक संप्रदायाचा साधनामार्ग भिन्न आहे इतकेच. त्यांचा वाद मार्गांमध्य आहे. पूजा कशी करायची याबद्दल त्यांच्यात दुमत आहे. भगवद्गीता मात्र म्हणते की कुठलाही मार्ग असो कर्ममार्ग, ज्ञानमार्ग किंवा भक्तिमार्ग कोणत्याही मार्गाने तुम्ही गेलात आणि मनापासून भक्ती केलीत तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल.
भगवंतांनी उद्धवाला ज्ञान देण्यासाठी गोकुळात पाठवले होते. त्यांना खरे तर त्याला ज्ञान ग्रहणासाठी पाठवायचे होते. तसेच झाले. उद्धव ज्ञान देण्यासाठी गेले आणि भक्ती शिकून आले.

का चुप साधि रहेऊ बलवाना
तुम्ही गप्प का आहात. तुम्ही पवनपुत्र आहात, तुम्ही जाऊ शकता असे सांगून त्यावेळी जांबुवंतांनी त्यांच्यात असलेले सुप्त तेज जागवले.मोरें हृदय परम संदेहा। सुनि कपि प्रगट कीन्हि निज देहा॥
कनक भूधराकार सरीरा। समर भयंकर अतिबल बीरा॥
यावेळी त्यांच्यातील कर्मयोगी जागा झाला. त्यांनी लंकेसाठी उड्डाण केले. कनक भूधराकार सरीरा। समर भयंकर अतिबल बीरा॥
राम काज कीन्हें बिनु, मोहि कहाँ विश्राम
लंकेत पोहोचल्यावर त्या राक्षसनगरीत हनुमंतांना एका घरात सात्त्विक भावाचे दर्शन झाले. रामायुध अंकित गृह सोभा बरनि न जाइ।
नव तुलसिका बृंद तहँ देखि हरष कपिराई॥
ते घर प्रभू रामचंद्रांच्या धनुष्य बाणाच्या चिन्हांनी अंकित होते. त्यात अनेक शुभ चिन्हे होती. ते पाहून हनुमंतांना अत्यंत आनंद झाला. ते घर रावणाचा भाऊ बिभिषणाचे होते. हनुमंतांनी बिभीषणाला हरिचिंतन करताना बघितले. त्यांनी त्याला हृदयाशी धरले. नव तुलसिका बृंद तहँ देखि हरष कपिराई॥
की तुम्ह हरि दासन्ह महँ कोई। मोरें हृदय प्रीति अति होई॥
की तुम्ह रामु दीन अनुरागी। आयहु मोहि करन बड़भागी॥
की तुम्ह रामु दीन अनुरागी। आयहु मोहि करन बड़भागी॥
हनुमानजी बिभीषणाला म्हणाले, " तुमच्या दर्शनाने माझे मन प्रेमाने उचंबळुन आले आहे. तुम्ही नक्कीच कोणी हरिभक्त आहात. " बिभीषणाने हनुमंतांना माता सीता अशोकवाटिकेत असल्याचे सांगितले. हनुमंत म्हणाले, माझ्याकडे पिताजी आहेत आणि तुझ्याकडे माताजी आहे ". आपण त्यांची भेट घडवू. बिभीषण भेटल्यावर हनुमंतांचा भक्तियोग जागृत झाला.
संसारातील समस्त संप्रदाय मार्गाचे आग्रही आहेत. ते दया करू नये करुणा करू नये असे म्हणत नाहीत. जीवनातील सर्व सद्गुणांना ते मानतात. साधनांनी सद्गुण आत्मसात करायचे असतात. प्रत्येक संप्रदायाचा साधनामार्ग भिन्न आहे इतकेच. त्यांचा वाद मार्गांमध्य आहे. पूजा कशी करायची याबद्दल त्यांच्यात दुमत आहे. भगवद्गीता मात्र म्हणते की कुठलाही मार्ग असो कर्ममार्ग, ज्ञानमार्ग किंवा भक्तिमार्ग कोणत्याही मार्गाने तुम्ही गेलात आणि मनापासून भक्ती केलीत तर परमात्म्याची प्राप्ती होऊ शकेल.
भगवंतांनी उद्धवाला ज्ञान देण्यासाठी गोकुळात पाठवले होते. त्यांना खरे तर त्याला ज्ञान ग्रहणासाठी पाठवायचे होते. तसेच झाले. उद्धव ज्ञान देण्यासाठी गेले आणि भक्ती शिकून आले.
ये तो प्रेम की बातें है ऊधो, बन्दगी तेरे बस की नहीं है।
यहाँ प्रेंम के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है।।
भगवत गीतेच्या चौथ्या अध्यायात भगवान म्हणतात यहाँ प्रेंम के होते हैं सौदे, आशिकी इतनी सस्ती नहीं है।।
ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम्।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।४.११।।
हे अर्जुना! जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसेच भजतो कारण सर्वच मानव सर्वच प्रकारे माझ्या मार्गाचे अनुसरण करतात. थोडक्यात तुमच्यात सद्गुण जागृत व्हायला हवे. सत्य, प्रेम, दया,करुणा हे सद्गुण प्राप्त करण्यासाठी कोणत्याही मार्गाने भक्ती केली तरी त्याचे फळ मिळेलच. भगवंताचा जप करणारे, ध्यान करणारे लोक थोड्या फायद्यासाठी अनेक वेळा खोटे बोलतात. हे चूक आहे, यात दंभ आहे. गीता अंतिम ध्येयासाठी आग्रही आहे. मार्गासाठी नाही हेच भगवंताला सांगायचे आहे.मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः।।४.११।।
श्रीभगवानुवाच
सन्न्यासः(ख्) कर्मयोगश्च, निःश्रेयसकरावुभौ।
तयोस्तु कर्मसन्न्यासात्, कर्मयोगो विशिष्यते॥5.2॥
श्रीभगवान म्हणाले - कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत. परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
भगवान अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देतांना म्हणतात - सन्न्यासः कर्मयोगश्च नि:श्रेयसकरावुभौ कर्मसंन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परमकल्याण करणारे आहेत. मात्र कर्मसंन्यासात् कर्मयोग: विशिष्यते संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपा असल्याने श्रेष्ठ आहे.
ज्ञेयः(स्) स नित्यसन्न्यासी, यो न द्वेष्टि न काङ्क्षति।
निर्द्वन्द्वो हि महाबाहो, सुखं(म्) बन्धात्प्रमुच्यते॥5.3॥
हे अर्जुना! जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाची अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा. कारण राग - द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसारबंधनातून मुक्त होतो.
हे अर्जुन! जो पुरुष कोणाचाही द्वेष करत नाही आणि कोणाकडून कोणतीही अपेक्षा करत नाही, अशा पुरुषाला संन्यासी म्हणावे. संन्यासी पुरुषांनी जंगलात जावे आणि साधना करावी असे नाही. तू जिथे उभा आहेस तिथे राहून जीवनातील सर्व सुखदुःख, मानापमान यापासून विमुक्त होशील, त्या सर्वांना समान मानशील तर असा कर्मयोगी संन्यासीच असतो.
साङ्ख्ययोगौ पृथग्बालाः(फ्), प्रवदन्ति न पण्डिताः।
एकमप्यास्थितः(स्) सम्यग्, उभयोर्विन्दते फलम्॥5.4॥
वर सांगितलेले संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारे आहेत, असे मूर्ख लोक म्हणतात; पण्डित नव्हेत . कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा उत्तमप्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचे फलस्वरुप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो.
पृथग्बालाः याचा अर्थ इथे बालबुद्धी असा घेतला आहे. भगवान म्हणतात अर्जुना तू लहान मुलांसारखा बोलतो आहेस. जो कर्मयोग आणि संन्यास वेगळे मानतो तो बालबुद्धीचा आहे. पंडित ज्ञान प्राप्त केल्याने हे समजून घेतो. जो ज्ञानी पंडित असतो तो या दोघांनाही समान मानतो. एका उदाहरणाने हे स्पष्ट केले आहे. मला ऋषिकेशला जायचे आहे. मी विमानाने, रेल्वेने, बसने स्वतःच्या कारने तिथे जाऊ शकतो. कोणत्याही वाहनाने मी गेलो तरी तिथे पोहोचणारच आहे. त्याचप्रमाणे आपले सगळ्यांचे गंतव्य एकच आहे. परमात्म्याशी एकरूप होणे. कोणत्याही मार्गाने जाऊन आपण ते प्राप्त करू शकतो.
शबरीची कथा सगळ्यांना माहिती आहे. तिने कुठूनही ज्ञान प्राप्त केले नव्हते. तिचा शास्त्रांचा अभ्यास नव्हता. अध्ययनासाठी ती कुठल्याही शाळेत गेलेली नव्हती किंवा ज्ञानप्राप्तीसाठी गुरुकडेही गेलेली नव्हती. मात्र योगाग्नीने तिने आपले शरीर भस्म केले. ही विद्या तिला कुठून मिळाली याविषयी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे - शबरीने अतिशय प्रेमपूर्वक रसाळ स्वादिष्ट कंदमुळे आणि फळे प्रभू श्रीरामांना दिली. ती त्यांनी वारंवार प्रशंसा करत खाल्ली. यानंतर हात जोडून शबरी श्रीरामांना म्हणाली मी तुमची स्तुती कशी करू?
आद्य शंकराचार्य वेदांताचे ज्ञानी होते. अद्वैताचा अभ्यास करता करता त्यांना सिद्धी प्राप्त झाली, मनात भक्तिभाव जागा झाला. त्यांनी श्रीकृष्णाष्टकम लिहिले, गंगालहरी लिहिले.
एक सुंदर भजन आहे, ते म्हणुया -
कबीरदास म्हणतात, एक मार्ग धरावा, तेव्हा ध्येय साध्य होते. एक मार्ग, एक नामजप याने शांती मिळते. सतत मार्ग बदलले तर शांती प्राप्त होत नाही. जीवनाच्या अंतिम क्षणी रामनाम घेणे अद्भुत आहे. भक्तिमार्ग असो किंवा ज्ञानमार्ग असो सगळ्यांनाच अंतिम ध्येयापर्यंत जाता येते. आपण दररोज जप करतो, ध्यान करतो, ग्रंथ वाचतो तरीही आपल्याला शांती मिळत नाही. जीवनात ध्येयाचा एक मार्ग स्वीकारावा आणि यासाठी गुरू आपल्याला मार्गदर्शन करतात.
शबरीची कथा सगळ्यांना माहिती आहे. तिने कुठूनही ज्ञान प्राप्त केले नव्हते. तिचा शास्त्रांचा अभ्यास नव्हता. अध्ययनासाठी ती कुठल्याही शाळेत गेलेली नव्हती किंवा ज्ञानप्राप्तीसाठी गुरुकडेही गेलेली नव्हती. मात्र योगाग्नीने तिने आपले शरीर भस्म केले. ही विद्या तिला कुठून मिळाली याविषयी रामचरितमानसमध्ये म्हटले आहे - शबरीने अतिशय प्रेमपूर्वक रसाळ स्वादिष्ट कंदमुळे आणि फळे प्रभू श्रीरामांना दिली. ती त्यांनी वारंवार प्रशंसा करत खाल्ली. यानंतर हात जोडून शबरी श्रीरामांना म्हणाली मी तुमची स्तुती कशी करू?
पानि जोरि आगें भइ ठाढ़ी। प्रभुहि बिलोकि प्रीति अति बाढ़ी॥
केहि बिधि अस्तुति करौं तुम्हारी। अधम जाति मैं जड़मति भारी॥
ती श्रीरामांसमोर हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली मी तुमची स्तुती कशी करू? मी नीच जातीची आणि अत्यंत मूढ बुद्धीची आहे. त्यावर प्रभू म्हणाले मी जातपात धर्म काहीही बघत नाही. माझा फक्त भक्तीशी संबंध आहे. त्यांनी तिला नवविधा भक्ती समजावून सांगितली. ते म्हणाले तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तिने तिच्या हृदयात त्यांच्या चरण कमलांना धारण केले आणि योगग्नीने देह त्याग करून श्रीहरीपदात लीन झाली.केहि बिधि अस्तुति करौं तुम्हारी। अधम जाति मैं जड़मति भारी॥
आद्य शंकराचार्य वेदांताचे ज्ञानी होते. अद्वैताचा अभ्यास करता करता त्यांना सिद्धी प्राप्त झाली, मनात भक्तिभाव जागा झाला. त्यांनी श्रीकृष्णाष्टकम लिहिले, गंगालहरी लिहिले.
एक सुंदर भजन आहे, ते म्हणुया -
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले
गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले ll
श्री गंगा जी का तट हो, यमुना का वंशी वट हो l
मेरा सावरा निकट हो
जब प्राण तन से निकले ll
श्री वृंदावन स्थल हो, मेरे मुख में तुलसी दल हो,
विष्णू चरण का जल हो
जब प्राण तन से निकले ll
सन्मुख सावरा खडा हो, वंशी का स्वरभरा हो,
तिरछा चरण धरा हो
जब प्राण तन से निकले ll
मेरे प्राण निकले सुख से, प्रभू का नाम निकले मुख से,
बच जाऊ घोर दुखसे
जब प्राण तन से निकले ll
उस वक्त जल्दी आना नही शाम भूल जाना,
राधे को संग मे लाना
जब प्राण तन से निकले ll
यह नेक सी अरज है मानो तो क्या हरज है,
कुछ आपका फरज है
जब प्राण तन से निकले ll
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले ll

यत्साङ्ख्यैः(फ्) प्राप्यते स्थानं(न्), तद्योगैरपि गम्यते।
एकं(म्) साङ्ख्यं(ञ्) च योगं(ञ्) च, यः(फ्) पश्यति स पश्यति॥5.5॥
ज्ञानयोग्यांना जे परम धाम प्राप्त होते; तेच कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत, असे पाहतो, तोच खऱ्या अर्थाने पाहतो.
यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं जे ज्ञान योग्यांना परमधाम प्राप्त होते तद्योगैरपि गम्यते ते स्थान कर्मयोग्यांनाही प्राप्त होते. कोणत्याही मार्गाने गेले तरी त्याचे फळ एकच मिळेल. या अर्थाने मनुष्याने बघायला हवे.
सन्न्यासस्तु महाबाहो, दुःखमाप्तुमयोगतः।
योगयुक्तो मुनिर्ब्रह्म, नचिरेणाधिगच्छति॥5.6॥
परन्तु हे अर्जुना! कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये व शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत्स्वरुपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो.
या ठिकाणी भगवान दुसरी गोष्ट सांगतात. ते म्हणतात की जोपर्यंत आपण भोगाची आसक्ती सोडत नाही तोपर्यंत परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. भगवंताने माझ्यासाठी प्रत्येक गोष्ट पाठवली आहे, तिचा भोग मी घेतलाच पाहिजे असे म्हणून मनुष्य आसक्ती सोडत नाही. आसक्तीचा नाश म्हणजे वैराग्य. संन्यासवृत्तीशिवाय कर्मयोगात कर्तेपणाचा त्याग होऊ शकत नाही.
योगयुक्तो विशुद्धात्मा, विजितात्मा जितेन्द्रियः।
सर्वभूतात्मभूतात्मा, कुर्वन्नपि न लिप्यते॥5.7॥
ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इन्द्रियनिग्रही आणि शुद्ध अन्तः करणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरुप परमात्माच ज्याचा आत्मा आहे असा कर्मयोगी कर्मे करुनही अलिप्त राहतो.
योगयुक्त- याचा अर्थ त्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे असा.
विशुद्धात्मा- शुद्ध अंत:करणाचा
विजितात्मा - आत्म्यावर विजय प्राप्त करणारा
जितेंद्रिय - ज्याने इंद्रियांवर विजय प्राप्त केला आहे
सर्वभूतात्मभूतात्मा - सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे या सर्व गुणांनी युक्त असणारा कर्मयोगी कर्म करूनही अलिप्त राहतो.
बिभीषणाच्या मनात छलकपट नाही म्हणूनच भगवान त्याला जवळ करतात. जो असत्य बोलणारा, षडयंत्र करणारा असतो तो भगवंताला अप्रिय असतो.

मोहि कपट छल छिद्र न भावा, निर्मल मन जन सो मोहि पावा
महाभारतातील एक प्रसंग आहे. युद्धानंतरच्या परिस्थितीत श्रीकृष्ण पद्मासनात बसून ध्यान करत होते. धर्मराज युधिष्ठिर हे बघून आश्चर्यचकित झाले. त्यांनी विचारले, "भगवान तुम्ही कोणाचे ध्यान करता?" यावर, "मी पितामह भीष्म यांचे ध्यान करतो आहे", असे उत्तर भगवंतांनी दिले. हे ऐकून युधिष्ठिर चकीत झाले. महाभारताच्या सहाव्या खंडात श्रीकृष्णाने भीष्मांच्या ममतेचे वर्णन केले आहे. शरशय्येवर असूनही भीष्मपितामह माझेच ध्यान करत होते म्हणूनच मी पण त्यांचे ध्यान करतो असे भगवंतांनी त्यांच्या ध्यानाचे कारण सांगितले. जे भक्त भगवंतांचे चिंतन करतात त्यांच्यावर भगवंत मनापासून प्रेम करतात.
नैव किञ्चित्करोमीति, युक्तो मन्येत तत्त्ववित्।
पश्यञ्शृण्वन्स्पृशञ्जिघ्रन्, नश्नन्गच्छन्स्वपञ्श्वसन्॥5.8॥
सांख्ययोगी तत्त्ववेत्त्याने पाहात असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता,
5.8 writeup
प्रलपन्विसृजन्गृह्णन्, नुन्मिषन्निमिषन्नपि।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु, वर्तन्त इति धारयन्॥5.9॥
बोलत असता, टाकीत असता, घेत असता तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहेत, असे समजून निःसंशय असे मानावे की, मी काहीच करत नाही.
पाचव्या अध्यायातील आठवा आणि नववा हे दोन्ही श्लोक उच्चारासाठी खूप कठीण आहे. त्यातील प्रत्येक शब्द खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक गोष्ट शरीराने करत असतानाही मी काहीच करीत नाही इंद्रिये त्यांच्या विषयात वावरत आहेत हे जाणावे. पश्यन् म्हणजे बघत असता, श्रुण्वन् म्हणजे ऐकत असता, स्पृशन् म्हणजे स्पर्श करताना, जिघ्रन् म्हणजे वास घेत असता, अश्नन् म्हणजे अन्नग्रहण करत असता, गच्छन् म्हणजे चालत असताना, स्वपन् म्हणजे झोपत असताना, श्वसन् म्हणजे श्वासोच्छ्वास करत असताना, प्रलपन् म्हणजे बोलत असताना, विसृजन् म्हणजे टाकीत असताना, गृह्णन् म्हणजे घेत असताना तसेच उन्मिषन् म्हणजे डोळे उघडताना, निमिषन् डोळे बंद करत असताना अशा प्रकारे सर्व इंद्रिये आपापली कामे करीत वावरत आहेत मी मात्र काहीच करीत नाही असा भाव कर्मयोग्याचा असतो.
ब्रह्मण्याधाय कर्माणि, सङ्गं(न्) त्यक्त्वा करोति यः꠰
लिप्यते न स पापेन, पद्मपत्रमिवाम्भसा॥5.10꠱
जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करुन आणि आसक्ती सोडून कर्म करतो, तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पापाने लिप्त होत नाही.
जो पुरुष आपली सर्व कर्मे परमेश्वराला अर्पण करतो आणि आसक्ती सोडून राहतो त्याला कमलपत्राची सुंदर उपमा दिली आहे. कमलपत्र हे विशेष पान आहे. भगवंताच्या अवयवाचे वर्णन करताना कमळाची उपमा दिली जाते. पदपंकज कमळासारखे पाय, मुखकमल कमळासारखे मुख, नेत्रकमल कमळासारखे डोळे. कमळाला पवित्र मानलेले आहे. कमळाची उत्पत्ती जलातून होते. जल कमळाचे जनक आहे. पाण्यासाठी जे जे समानार्थी शब्द आहेत त्या सर्वांना ज लावल्यावर त्याचा अर्थ कमळ असा होतो. उदाहरणार्थ वारीज,जलज, अंबुज, नीरज, तोयज इत्यादी.
विष्णूच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली. विष्णूची पत्नी लक्ष्मी, तिचे दुसरे नाव कमला आहे. या ठिकाणी भगवान कमळाची उपमा का देतात याचे विशेष कारण आहे कारण कमळाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे देठ पाण्यामध्ये असते आणि पाने आणि फुले वर असतात. पाण्यातून निर्माण होऊ न सुद्धा कमळाच्या पानावर किंवा फुलावर पाण्याचा थेंबही नसतो. म्हणूनच संत म्हणतात
रामायणात राम जानकीला पहिल्यांदा बघतात तेव्हा ते तिला बघतच राहतात. लक्ष्मणाला राम म्हणतात मी आजपर्यंत कोणत्याही स्त्रीचे कधी चिंतन केले नाही. आज पहिल्यांदाच मी जानकीचे चिंतन करीत आहे.
राम कृष्ण परमहंस विजीतात्मा होते. त्यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांचे हाल विवेकानंदांना बघवत नव्हते. ते एकदा त्यांना म्हणाले, तुम्ही काली मातेला का सांगत नाही की माझ्या वेदना कमी कर. किंवा तुम्ही ध्यान लावून स्वतःच स्वतःचे दुखणे बरे करू शकाल. तुम्हाला तर तुमच्या घशामुळे काहीच खाता येत नाही. त्यावर ठाकूर हसले आणि म्हणाले बेटा नरेंद्र तू बरोबर सांगतोस. पण मी रोग बरा करण्यासाठी ध्यान लावणार नाही, कारण रोगावर ध्यान केंद्रीत करण्यासाठी मला माझे भगवंतापाशी लागलेले ध्यान हटवावे लागेल. ते होणे नाही. खाण्याचे म्हणशील तर तू चिंता करू नकोस. तुम्हा सर्व भक्तांच्या मुखातून मी सगळ्या गोष्टी खातो. गुरुदेव सामान्य नव्हते. ते व्यष्टी मधून समष्टी पर्यंत पोहोचले होते. कर्मयोगी असाच असतो. तो नेहमी समष्टीचा विचार करतो. मी काहीच करत नाही ही त्याची वृत्ती असते.
हरी शरणम् या नामसंकीर्तनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.
उत्तर- सांख्ययोगात संख्येचा विचार केलेला असतो. ज्ञानयोगात एका तत्त्वापासून एकोणतीस तत्त्वांपर्यंत, भगवंतांना, जगताला, समष्टीला समजावणारे, परमात्मतत्त्वाचे विश्लेषण आहे. एकतत्त्व अर्थात् एकोब्रह्म द्वितीयो नास्ति तात्पर्य ब्रह्म एकच आहे, दुसरे काही नाही. दोन तत्त्वे अर्थात एक प्रकृती तर दुसरा परमात्मा होय. तीन तत्त्व अर्थात एक प्रकृती, एक पुरुष आणि एक परमात्मा आहे. मग यात पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, पंच महाभूते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी समाविष्ट केल्यावर तेवीस तत्त्वे झाली. अशा प्रकारे गणना करीत संख्येद्वारा तत्त्वांचे विवेचन करण्याच्या विधीला सांख्ययोग म्हटले आहे. महापुरुषांनी संख्येच्या दृष्टीने एक ते एकोणतीस तत्त्वांचे जे विश्लेषण केले आहे त्याला सांख्ययोग म्हणतात.
२- बजरंग भैया - आपण कर्म करतो परंतु प्रत्येक वेळी ते कर्मयोगाच्या योग्यतेचे नसते. गृहस्थाश्रमातील कर्मे यज्ञ समजून करत राहिल्यास स्वर्ग मिळू शकेल का?
उत्तर- नक्कीच चांगले कर्म केल्यास स्वर्गप्राप्ती होऊ शकेल.
३- बिना दीदी - संजयने दिव्य दृष्टिने युद्धाचे वर्णन केले हे आधी माहीत होते. विवेचन ऐकताना संजय युद्धाच्या दहाव्या दिवशी हस्तीनपुरला आल्याचे समजले तर मग दहा दिवसानंतर आलेला संजय पहिल्या दिवसापासूनच युद्धाचा वृत्तांत कसा कथन करू शकला?
उत्तर - युद्ध चालू झाले तेव्हा संजय युद्धभूमीवरच होता. दहाव्या दिवशी जेव्हा पितामह भीष्म शरशय्येवर पडले तेव्हा ही वार्ता सांगण्यासाठी तो हस्तीनपुरला परत गेला. त्यावेळी धृतराष्ट्राने त्याला युद्धाचा अथपासून वृत्तांत कथन करण्यास सांगितले. यावेळी संजयला प्राप्त झालेल्या दिव्य दृष्टीने तो भूतकाळातील सर्व घटनांचे जसेच्या तसे वर्णन करू शकला.
४- मोनिकाजी - १२ व्या अध्यायात भगवान म्हणतात की तुम्ही मला मन आणि बुद्धी अर्पण करा. आपले मन आणि बुद्धी भगवंतांना समर्पित झाली आहे अथवा नाही हे कसे ओळखावे?
उत्तर - आपल्या मनात उठणारा कोणताही संकल्प माझा नाही तर भगवंतांचा आहे हे जाणावे. जेव्हा बुध्दीत कोणती गोष्ट येते तेव्हा त्याने आपली प्रशंसा होऊ नये. जे काही घडते आहे ते भगवंतांच्या इच्छेने घडते आहे असा विचार करावा. अशा मनात, बुध्दीत वाईट विचार येत नाहीत. जेव्हा असे वाटू लागेल तेव्हा मन आणि बुद्धी भगवंतांना अर्पण झाली आहे असे समजावे. जोवर मनात संकल्प, विकल्प उठतात, इच्छा, वासना, कामना निर्माण होतात तोवर बुध्दीचे समर्पण झालेले नाही.
५- देवीजी - विष्णुसहस्त्रनामात गीतेचे बरेच श्लोक येतात हे कसे?
उत्तर- भगवंताच्या १००० नावांनी भीष्म पितामह यांनी शरशय्येवर असताना विष्णूची स्तुती केली आहे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण तेथेच होते. यामुळे याला विष्णुसहस्त्रनाम असे नाव पडले. याचे वर्णन महाभारताच्या शांतीपर्वात येते.
६- वंदनाजी - शबरीची गोष्ट सांगताना तुम्ही तिच्या अबोधतेचे वर्णन केले. आमच्यात हा गुण का येत नाही?
उत्तर- आपल्यात श्रद्धा अधिक असली तरच भक्ती होऊ शकते. शबरीमध्ये श्रद्धा आणि भक्ती दोन्ही होत्या. आपण शिक्षणामुळे प्रत्येक गोष्ट तर्काने तपासून बघतो. यामुळे श्रद्धा कमी होते. नेहमी सत्संगात राहिल्यास आपल्यातही अबोधता येऊ शकेल. आपली भक्ती वाढेल.
प्रश्नोत्तरानंतर समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसा ने विवेचनाचा समारोप झाला.
। । श्रीकृष्णार्पणमस्तु । ।
विष्णूच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती झाली. विष्णूची पत्नी लक्ष्मी, तिचे दुसरे नाव कमला आहे. या ठिकाणी भगवान कमळाची उपमा का देतात याचे विशेष कारण आहे कारण कमळाच्या झाडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे देठ पाण्यामध्ये असते आणि पाने आणि फुले वर असतात. पाण्यातून निर्माण होऊ न सुद्धा कमळाच्या पानावर किंवा फुलावर पाण्याचा थेंबही नसतो. म्हणूनच संत म्हणतात
जग मे रहू तो ऐसे रहूं l
जो जल मे कमल का फूल रहे ll
संत मंडळींच्या जीवनात वासनांचा स्पर्शही नसतो. ते सर्व भोगांपासून अलिप्त असतात.जो जल मे कमल का फूल रहे ll
रामायणात राम जानकीला पहिल्यांदा बघतात तेव्हा ते तिला बघतच राहतात. लक्ष्मणाला राम म्हणतात मी आजपर्यंत कोणत्याही स्त्रीचे कधी चिंतन केले नाही. आज पहिल्यांदाच मी जानकीचे चिंतन करीत आहे.
रघुबंसिन्ह कर सहज सुभाऊ l मनु कुपंथ पगु धरइ न काऊ ll
मोहि अतिसय प्रतीती मन केरी l जेहिं सपनेहूँ परनारि न हेरी ll
रघुवंशी यांचे वैशिष्ट्य असे आहे की ते कधी कुमार्गावर जात नाही. माझा माझ्यावर एवढा विश्वास आहे मी स्वप्नात सुद्धा कधी परनारीचा विचार केला नाही. राम म्हणतो की आज मात्र माझे जानकीकडे लक्ष जाते आहे.मोहि अतिसय प्रतीती मन केरी l जेहिं सपनेहूँ परनारि न हेरी ll
राम कृष्ण परमहंस विजीतात्मा होते. त्यांना घशाचा कर्करोग झाला होता. त्यांचे हाल विवेकानंदांना बघवत नव्हते. ते एकदा त्यांना म्हणाले, तुम्ही काली मातेला का सांगत नाही की माझ्या वेदना कमी कर. किंवा तुम्ही ध्यान लावून स्वतःच स्वतःचे दुखणे बरे करू शकाल. तुम्हाला तर तुमच्या घशामुळे काहीच खाता येत नाही. त्यावर ठाकूर हसले आणि म्हणाले बेटा नरेंद्र तू बरोबर सांगतोस. पण मी रोग बरा करण्यासाठी ध्यान लावणार नाही, कारण रोगावर ध्यान केंद्रीत करण्यासाठी मला माझे भगवंतापाशी लागलेले ध्यान हटवावे लागेल. ते होणे नाही. खाण्याचे म्हणशील तर तू चिंता करू नकोस. तुम्हा सर्व भक्तांच्या मुखातून मी सगळ्या गोष्टी खातो. गुरुदेव सामान्य नव्हते. ते व्यष्टी मधून समष्टी पर्यंत पोहोचले होते. कर्मयोगी असाच असतो. तो नेहमी समष्टीचा विचार करतो. मी काहीच करत नाही ही त्याची वृत्ती असते.
हरी शरणम् या नामसंकीर्तनाने विवेचनाची सांगता झाली आणि प्रश्नोत्तरांना सुरुवात झाली.
प्रश्नोत्तरे :-
१- मुरली भैय्या - सांख्ययोगाविषयी विस्ताराने सांगा.उत्तर- सांख्ययोगात संख्येचा विचार केलेला असतो. ज्ञानयोगात एका तत्त्वापासून एकोणतीस तत्त्वांपर्यंत, भगवंतांना, जगताला, समष्टीला समजावणारे, परमात्मतत्त्वाचे विश्लेषण आहे. एकतत्त्व अर्थात् एकोब्रह्म द्वितीयो नास्ति तात्पर्य ब्रह्म एकच आहे, दुसरे काही नाही. दोन तत्त्वे अर्थात एक प्रकृती तर दुसरा परमात्मा होय. तीन तत्त्व अर्थात एक प्रकृती, एक पुरुष आणि एक परमात्मा आहे. मग यात पाच कर्मेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये, पंच महाभूते, मन, बुद्धी, चित्त, अहंकार इत्यादी समाविष्ट केल्यावर तेवीस तत्त्वे झाली. अशा प्रकारे गणना करीत संख्येद्वारा तत्त्वांचे विवेचन करण्याच्या विधीला सांख्ययोग म्हटले आहे. महापुरुषांनी संख्येच्या दृष्टीने एक ते एकोणतीस तत्त्वांचे जे विश्लेषण केले आहे त्याला सांख्ययोग म्हणतात.