विवेचन सारांश
निरंतर भगवंताचे नामस्मरण | बनते मुक्तीचे साधन ||
अत्यंत सुंदर दीपप्रज्वलन आणि गुरुवंदनेने सत्राची सुरुवात झाली.
भगवंताच्या कृपेने आपल्या सर्वांचा भाग्योदय झाला आहे, ज्यामुळे आपण आपल्या मनुष्यजीवनाचे सार्थक करण्यासाठी गीतेच्या पथावर मार्गस्थ झालो आहोत. आपले या जन्मीचे, पूर्वजन्मीचे किंवा आपल्या पूर्वजांचे पुण्यफळ असावे. किंवा एखाद्या जन्मी एखाद्या संत महात्म्याची कृपादृष्टी आपल्यावर झाली असावी, त्यामुळे आपण गीतेचा अभ्यास करण्यासाठी निवडले गेलो आहोत. आज आपण आठव्या अध्यायाचे चिंतन करणार आहोत. अर्थ समजेपर्यंत हा अध्याय थोडा क्लिष्ट वाटू शकतो. पण एकदा जाणून घेतला तर अतिशय आनंददायी आहे.
भगवंतांनी सातव्या अध्यायात ज्ञानविज्ञानयोग सांगण्यास प्रारंभ केला आणि तिसाव्या श्लोकात काही विलक्षण संकल्पना मांडल्या.
साधिभूताधिदैवं मां साधियज्ञं च ये विदु: |
प्रयाणकालेऽपि च मां ते विदुर्युक्तचेतस: || ७.३०||
जे पुरुष अधिभूत, अधिदैव व अधियज्ञ यांसह (सर्वांच्या आत्मरूप अशा) मला अंतकाळीही जाणतात, ते युक्त चित्ताचे पुरुष मला जाणतात, म्हणजे मला येऊन मिळतात.
भगवंतांनी इथे काही नव्या संज्ञा मांडल्या. आता अर्जुनाची जिज्ञासा जागृत झाली आणि त्याने अधिभूत, अधिदैव आणि अधियज्ञ यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी विचारणा केली. त्यातूनच या आठव्या अध्यायाचा प्रारंभ झाला.

8.1
अर्जुन उवाच
किं(न्) तद्ब्रह्म किमध्यात्मं(ङ्), किं(ङ्) कर्म पुरुषोत्तम ।
अधिभूतं(ञ्) च किं(म्) प्रोक्तम्, अधिदैवं(ङ्) किमुच्यते ॥8.1॥
अर्जुन म्हणाला, हे पुरुषोत्तमा! ते ब्रह्म काय आहे? अध्यात्म काय आहे? कर्म काय आहे? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे? आणि अधिदेव कशाला म्हणतात ?
8.1 writeup
अधियज्ञ:(ख्) कथं (ङ्) कोऽत्र, देहेऽस्मिन्मधुसूदन ।
प्रयाणकाले च कथं (ञ्), ज्ञेयोऽसि नियतात्मभिः ॥ 8.2॥
हे मधुसूदना! येथे अधियज्ञ कोण आहे? आणि तो या शरीरात कसा आहे? तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हाला कसे जाणतात?
अर्जुन आणि भगवंतांनी भगवद्गीतेत एकमेकांना ज्या विलक्षण संबोधनांनी पुकारले आहे त्यावरदेखील एक वेगळे विवेचन शक्य आहे. ते प्रत्येक संबोधन केवळ पुकारण्यासाठी वापरलेले नाही तर प्रत्येक नावामागे काही ना काही कारण आहे. अर्जुनाला त्याच्या शक्तीची आठवण करून देताना भगवंत त्याला महाबाहो म्हणतात. त्याच्याविषयी मनात प्रेम दाटून येते तेव्हा त्याला पार्थ म्हणतात. त्याचप्रमाणे अर्जुन प्रेमाने त्यांना कृष्ण म्हणतो.
पंधराव्या अध्यायात भगवंतांनी घोषणा केली की, मी पुरुषोत्तम आहे. त्याच पुरुषोत्तम नावाने अर्जुन येथे त्यांना संबोधत आहे.
अर्जुन प्रश्न करतो की, ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म काय असते? कर्म कशाला म्हणतात? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव काय असते? अधियज्ञ म्हणजे काय? आणि अंतिम क्षणी तुम्हाला कसे जाणून घेता येते.
या सात प्रश्नांपैकी पहिल्या सहाची उत्तरे पुढील दोन श्लोकात आली आहेत. कारण भगवंत उत्तम वक्ता आहेत. कोणत्या विषयाचा व्यास आणि कोणत्याचा समास करावा अर्थात कोणत्या विषयाला अधिक विस्ताराने समजावून देण्याची गरज आहे आणि कोणते संक्षेपात सांगितले तरी चालेल याचे त्यांना उत्तम ज्ञान आहे. सातव्या प्रश्नाचे उत्तर या अध्यायात विस्ताराने आले आहे. जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंताला वेगवेगळ्या योगमार्गाद्वारे कसे जाणून घेता येते हे अर्जुनाच्या निमित्ताने सगुण साकार आणि निर्गुण निराकार भक्ती करणार्या समस्त मानवजातीला जाणून घेता येते.

श्रीभगवानुवाच
अक्षरं(म्) ब्रह्म परमं(म्), स्वभावोऽध्यात्ममुच्यते ।
भूतभावोद्भवकरो, विसर्गः(ख्) कर्मसञ्ज्ञितः ॥ 8.3॥
श्री भगवान म्हणाले, परम अक्षर ' ब्रह्म ' आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा ' अध्यात्म ' नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो कर्म या नावाने संबोधला जातो.
अर्जुनाचा पहिला प्रश्न - ब्रह्म म्हणजे काय याचे उत्तर देताना भगवंत म्हणतात, परम अक्षर 'ब्रह्म' आहे. एवढ्या एका वाक्यात दिलेले उत्तर सामान्य बुद्धीला समजणार नाही. विद्वानांच्या दृष्टीने समजून घेतले तरच समजेल. अक्षर म्हणजे ज्याचा क्षय होत नाही, ज्यात त्रिकाल परिवर्तन होत नाही- काल, आज आणि उद्या देखील जे समान असते.
नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा |
क्षर पदार्थाच्या उत्पत्ती, स्थिती आणि लय या तीन अवस्था असतात. कोणताही नाशवंत पदार्थ कधीतरी निर्माण होतो, एखाद्या अवस्थेत काही काळ टिकतो आणि कधीतरी त्याची ती अवस्था नष्ट होते. भगवंत म्हणतात, माझे ब्रह्मांड अव्यय आहे. याचा अर्थ सर्व क्षर पदार्थांचे मूळ अक्षर आहे. म्हणजे काय? तर एखादा कागद कधीतरी निर्माण झाला, आज तो कागद स्वरुपात आपल्याला दिसतो आणि कधीतरी नष्ट होईल हे त्याचे क्षर स्वरूप आहे. मग त्याचे अक्षर स्वरूप काय? तो कागद नष्ट केल्यास दहा लाखाचे बक्षीस मिळेल असे सांगितले तर ते करणे अवघड नाही असे वाटू शकते. सामान्यतः असे वाटेल की, त्याचे फाडून बारीक तुकडे करूया. म्हणजे कागद नष्ट होईल. मात्र असे करण्याने केवळ त्याचे स्वरूप बदलेल. कागदाचे कपटे बनतील. कागद नष्ट होणार नाही. त्याला पाण्यात टाकले तर केवळ त्याचा लगदा बनेल. तो नष्ट होणार नाही. त्याला जाळले तर कार्बन बनेल. त्याचप्रमाणे या संसारात काहीच नष्ट होत नाही. करोना काळात अनेक लोक मृत्यूमुखी पडले तरी पृथ्वीवरील भार कमी झाला असे नाही. वैज्ञानिकांच्या मते, लोकसंख्या वाढली किंवा घटली तरी पृथ्वीचे वजन एक ग्राम देखील कमी जास्त होत नाही. केवळ प्रत्येकाचे स्वरूप बदलते. Everything just keeps changing form. केवळ रूप परिवर्तन होत असते. परमात्म्याच्या अक्षर स्वरूमात मात्र रूप परिवर्तन नसते. संसारातील अपरा प्रकृती परिवर्तनशील आहे. मात्र तिच्या मूळ स्थानी केवळ ब्रह्म आहे, त्याशिवाय दुसरे काहीच नाही. हा मुद्दा उपनिषदांमधील भिन्न उदाहरणांद्वारे जाणून घेऊया.
समुद्रातील तीव्र वेगाने येणार्या, उंच, शुभ्र अशा लाटांची कल्पना करा. त्या लाटांमधून पाणी वजा केले तर काय शिल्लक राहील? काहीच नाही. पाण्याशिवाय त्या लाटेचे अस्तित्व शून्य आहे. सोन्याचे विविध आभूषण – हार, बांगड्या, इ. मधून सोने वजा केले तर काही उरेल का? डोळ्यांना दिसणार्या त्या दागिन्यांची आकृती हा काही भास नाही. त्याच्या मुळाशी सुवर्ण आहे. ब्रह्म देखील असेच आहे.
स्वतः ला ‘मी’, ‘माझे शरीर’ असे मानून त्याची काळजी घेतली जाते. त्याचे वाढदिवस साजरे केले जातात. कपडे, दागिने, पावडर, क्रीम, तेल, मालिश यावर भरमसाठ खर्च आणि जीव वाचवण्यासाठी तर कितीही खर्च आला तरी करण्याची तयारी असते. मात्र एकदा जीव गेला, ब्रह्म निघून गेले तर उरलेले शरीर म्हणजे शून्य असते. त्यातील अवयव जसेच्या तसे शिल्लक असले तरी त्यांचा उपयोग नसतो. मग ती आपली कितीही प्रिय व्यक्ती असली तरी तिचा चैतन्यहीन देह जपून ठेवला जात नाही. तो त्वरित नष्ट केला जातो. ब्रह्मांडामधून ब्रह्म गेले तर शून्य उरते.
ब्रह्म कसे आहे याचा विस्तार करताना गोस्वामी तुलसीदास म्हणतात,
बिनु पद चलइ सुनइ बिनु काना। कर बिनु करम करइ बिधि नाना॥
आनन रहित सकल रस भोगी। बिनु बानी बकता बड़ जोगी॥
ब्रह्म काय आहे? ज्याला पायाशिवाय गती आहे. जो कानाशिवाय ऐकतो, बिना हाताने काम करतो, कानांशिवाय आवाज ग्रहण करतो, जो वाणीशिवाय वक्ता आहे. जो त्वचेविना स्पर्श करू शकतो, विना डोळ्यांनी बघतो. नाकाविना वास घेतो. त्या ब्रह्माची करणी अलौकिक आहे. वेद ज्याची महिमा गातात, मुनी ज्याचे ध्यान करतात, तेच परब्रह्म श्रीरामाच्या रूपात आले.
येथे कारण उपस्थित नाही तरीही कार्य घडत आहे. सर्वांचे मूळ कारण ब्रह्म आहे. जसे वीजेमुळे सर्व उपकरणे चालतात. वीज नसली तर उपकरण असूनही त्याचा उपयोग नसतो. त्याचप्रमाणे ब्रह्मांडात होणारी हालचाल त्या ब्रह्मचेतनेमुळे होते. मात्र तिन्ही लोकात कोणीही वैज्ञानिक त्या चैतन्याला सिद्ध करू शकत नाही. कारण जड बुद्धी सीमित असते ती असीम चैतन्याची परिभाषा करू शकत नाही. सर्व जण मानतात की ब्रह्मांड अनंत आहे. पण अनंत म्हणजे नक्की काय आणि किती याची व्याख्या करणे शक्य नाही. ते आपल्या बुद्धी क्षमतेच्या बाहेर आहे. ब्रह्मांडामध्ये किती आकाशगंगा असतील? एक… दहा... हजार...लक्ष... करोड...अब्ज ...पुढे काय? आपली सीमित बुद्धी एखाद्या गोष्टीचा प्रारंभ आणि अंत एवढेच जणू शकते. अनंताला जाणण्याचे सामर्थ्य आपल्यात नाही. परमात्मा सनातन आहे, धर्म सनातन आहे असे आपण ऐकतो, मानतो. सनातन म्हणजे जे कधी निर्माण झालेच नाही, जे नेहमीच अस्तित्वात आहे असे - Which is there since always. ही संकल्पना समजणे अवघड आहे. जसे आपण जन्माला येतो तसेच हा संसारदेखील पहिल्यांदा निर्माण झालाच असेल असे वाटू शकते. तो नेहमीच कसे काय अस्तित्वात असू शकेल? भगवंतांनी पहिल्यांदा कधी तरी आत्मा निर्माण केले असणार, त्यांनी पहिल्यांदा शरीर धारण केले असेल असे वाटू शकते.
ममैवांशो जीवलोके जीवभूत: सनातन: |
हे अचिंत्य, अप्रमेय आहे- त्याची कशाशी तुलना होऊ शकत नाही. दही दुधापासून बनते मात्र दही बनले की त्यातून पुन्हा दूध मिळत नाही. दही दुधापासून बनले आहे हे ज्याला माहीत नाही तो हे मानणार नाही.
हे सारे ब्रह्मांड त्याच ब्रह्मतत्त्वापासून बनले जे अक्षर आहे, तेच परम अक्षर आहे.
अध्यात्म म्हणजे आपले स्वरूप, स्वभाव- स्वतःचा भाव. स्व म्हणजे मी. मी कोण आहे याची शोधयात्रा म्हणजे अध्यात्म.
कर्म म्हणजे भूत भावना उत्पन्न करणारा त्याग. ही संकल्पना समजण्यास थोडी अवघड आहे. खालील उदाहरणामधून हे जाणून घेऊया.
पाकिस्तानने भारतावर हल्ला केला. त्याला प्रत्युत्तर दिले जाईल असा विचार पंतप्रधानांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडला. मात्र या विचाराने कर्म पार पडले नाही. केवळ भाव जागृत झाला आहे, कर्म घडले नाही. मंत्रीमंडळाने आपला निर्णय राष्ट्रपतींकडे मांडला. राष्ट्रपतींनी तिन्ही सेना अध्यक्षांना निर्णय कळवला. पंतप्रधानांनी आपल्या भावनेचा त्याग राष्ट्रपतींकडे आणि राष्ट्रपतींनी तिन्ही सेना अध्यक्षांकडे केला. मात्र अजूनही कर्म घडले नाही. त्यानंतर हल्ल्याची योजना बनवून सेना तुकडीने हल्ला केला. प्रत्यक्षात हल्ला करणारे कोण? तर तुकडीतील सैनिक. मात्र बातमी काय असेल की, पंतप्रधान आणि राष्ट्रपतींच्या आदेशाने भारताने हल्ला केला. सैनिकांनी हल्ला केला असे कधीच म्हटले जात नाही. यात कर्म करणारा त्या कर्माचा अधिकारी मानला जात नाही. तर ज्याने सर्व प्रथम हल्ला करण्याच्या आपल्या भावनेचा त्याग केला हे कर्म त्याचे मानले जाईल.
रस्त्याने जाताना मिठाईच्या दुकानात जिलेबी दिसली तर खावीशी वाटते. मात्र नुसते वाटून खाण्याचे कर्म घडत नाही. दुकानात जाऊन आपण ती विकत घेतो, त्या भावनेचा त्याग केला तेव्हा कर्म घडले. भाव असल्याने कर्माचे निर्माण होत नाही. जेव्हा त्या भावनेचा त्याग होतो तेव्हा कर्माची उत्पत्ती होते.
प्रकृतीमध्ये जेव्हा ब्रह्माजी भावनेचा त्याग करतात,तेव्हा ब्रह्मांडाचे निर्माण होते.

अधिभूतं(ङ्) क्षरो भावः(फ्), पुरुषश्चाधिदैवतम् ।
अधियज्ञोऽहमेवात्र, देहे देहभृतां(म्) वर ॥ 8.4॥
उत्पत्ति- विनाश असलेले सर्व पदार्थ 'अधिभूत' आहेत. हिरण्यमय पुरुष 'अधिदैव' आहे आणि देहधारी यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना! या शरीरात मी वासुदेवच अंतर्यामी रूपाने 'अधियज्ञ' आहे.
तुलसीदासजी म्हणतात -
गो गोचर जहँ लगि मन जाई। सो सब माया जानेहु भाई॥
जिथपर्यंत आपल्या दृष्टी, बुद्धी आणि कल्पनेची धाव आहे ती सर्व माया आहे. Whatever we see, imagine and experience is Maya. हे सर्व अधिभूत आहे.
परा प्रकृती म्हणजे चैतन्य. जे डोळ्यांना दिसत नाही आणि त्याचा अनुभवही करता येत नाही.
अपरा म्हणजे जे दृश्य ब्रह्मांड आहे किंवा ज्याचा अनुभव करता येतो. मन आणि बुद्धी दिसत नाही, मात्र त्यांचा अनुभव करता येतो. मन, बुद्धी, चित्त, अहम सर्वांचा अनुभव घेता येतो. जे काही जाणता येते, ते सर्व अधिभूत आहे. मात्र आत्मतत्त्वाला अनुभवता येत नाही. कारण ते परा आहे.
अधिदैव – प्रत्येक इंद्रियाची भिन्न देवता असते. त्या देवतांच्या प्रभावामुळे इंद्रिये आपली कार्ये करतात.
डोळ्यांची देवता सूर्य, नाकाची देवता पृथ्वी, हातांची देवता इंद्र आणि पायांची देवता विष्णू मानली जाते. मोठ्यांना नमस्कार करताना त्यांचा पदस्पर्श याचसाठी केला जातो कारण पायात विष्णूचा निवास असतो.
इंद्री द्वार झरोखा नाना। तहँ तहँ सुर बैठे करि थाना॥
थाना म्हणजे अड्डा. प्रत्येक इंद्रियावर एक एक देवतेचा अड्डा आहे. त्या इंद्रियाचे विषय समोर आले की त्यांचा रस प्राप्त करण्यासाठी देवता इंद्रियांचे द्वार उघडतात.
अधिदैव म्हणजे या सर्व इंद्रियांच्या देवतांचे स्वामी ब्रह्मदेव, ज्यांनी सृष्टी आणि देवतांचे निर्माण केले.
अधियज्ञ- भगवंत म्हणतात, अंतर्यामी रूपात मूळ अधियज्ञ मीच आहे. मात्र त्या परमात्म्याला ज्या रूपात आवाहन केले जाते – जसे की विष्णू, लक्ष्मी, गणेश, नवग्रह, कृष्ण किंवा नैमित्तिक देव ते त्या ठिकाणी अधियज्ञ बनतात.
अशाप्रकारे अर्जुनाच्या सहा प्रश्नांची उत्तरे भगवंतांनी दिली. सातव्या प्रश्नाचे उत्तर देण्यास पुढील श्लोकापासून प्रारंभ केला.

अन्तकाले च मामेव, स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
यः(फ्) प्रयाति स मद्भावं(म्), याति नास्त्यत्र संशयः॥ 8.5॥
जो पुरुष अंतकाळी ही माझे स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही.
अंतकाळी माझे स्मरण करत करत जो देहत्याग करतो तो थेट मला प्राप्त होतो. यालाच मोक्ष, निर्वाण किंवा कैवल्य असे म्हटले आहे.
मग जे असे करत नाही त्यांचे काय होते?
मग जे असे करत नाही त्यांचे काय होते?
यं(म्) यं(म्) वापि स्मरन्भावं(न्), त्यजत्यन्ते कलेवरम् ।
तं(न्) तमेवैति कौन्तेय, सदा तद्भावभावितः ॥ 8.6॥
हे कुंतीपुत्र अर्जुना! हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो.
जो ज्या भावात जीवन व्यतीत करतो त्याचा तोच भाव मृत्युसमयी असतो. जो आयुष्यभर प्रपंचाची चिंता करतो तो त्याच विषयांचे चिंतन करत देहत्याग करतो. या उलट जो भगवंताच्या स्मरणात आयुष्य घालवतो त्याला मृत्युसमयी भगवंताचे स्मरण होते. आपल्याला वाटते पूर्ण आयुष्य मौजमस्ती मध्ये घालवले आणि केवळ अंतिम समयी भगवंताचे नामस्मरण केले तर काम होईल पण तसे होणार नाही. कारण हे इतके सहज घडत नाही. उपनिषदांचे सिद्धांत सांगतात की, एखाद्या घराची जीर्ण भिंत पडण्याआधी एका दिशेला झुकते. जेव्हा पडण्याची वेळ येते तेव्हा ती ज्या दिशेला झुकलेली असते त्याच दिशेला पडते. विरुद्ध दिशेला पडणे शक्य नाही. आयुष्यभर ज्या भावनेत जीवन जगले तोच भाव अखेरीसही मनाला व्यापतो.
गुरुनानक यांचे शिष्य तिलोचन म्हणतात,
अरी बाई गोबिद नामु मति बीसरै
अंति कालि जो इसत्री सिमरै ऐसी चिंता महि जे मरै ॥ बेसवा जोनि वलि वलि अउतरै ||
अंति कालि जो लड़िके सिमरै ऐसी चिंता महि जे मरै ॥ सूकर जोनि वलि वलि अउतरै ||
अंति कालि जो मंदर सिमरै ऐसी चिंता महि जे मरै ॥ प्रेत जोनि वलि वलि अउतरै ||
अंति कालि नाराइणु सिमरै ऐसी चिंता महि जे मरै ॥ बदति तिलोचनु ते नर मुकता पीत्मबरु वा के रिदै बसै ||
जो मरताना लक्ष्मीचे स्मरण करतो त्याला सर्पयोनी प्राप्त होते, स्त्रीचे स्मरण केले तर वेश्या, मुलाबाळांचे स्मरण केल्यास डुक्कर, घराचे स्मरण केले तर पालयोनी, मालमत्तेचे स्मरण केले तर प्रेतयोनी मिळते. आणि जो नारायणाचे स्मरण करतो तो नारायण बनतो.
आपल्याकडे विचित्र परंपरा आहे. एखाद्याचा अंतिम क्षण जवळ आला असेल तर सर्व नातेवाईकांना गोळा केले जाते. मरणारा भगवंताचे चिंतन करण्याचा प्रयत्न करू लागला तरी नातेवाईकांना बघून मन त्यांच्यात गुंतते. सेठ जयदयाल गोयंका म्हणाले होते, "अशा वेळी जाणार्याला केवळ भगवंताचे स्मरण करून द्या. इतर व्यवधाने दूर ठेवा. आयुष्यभर तो नातेवाईकांमध्येच राहिला आहे. आता त्याला यातून सोडवा. त्यांच्यात गुंतवू नका."
एक स्त्री आयुष्याच्या काही क्षणांची सोबती होती. तिला रडताना पाहून तिच्या पतीने दुःखाचे कारण विचारले. ती म्हणाली, “माझ्याकडे दहा हजार साड्या आहेत. मी गेल्यावर त्या सगळ्या माझ्या जावेला मिळतील याचे मला वाईट वाटत आहे.”
असाच एक वृद्ध मरणाच्या द्वारी उभा होता. आयुष्यभर त्याने दुकान, व्यवसाय यापलीकडे काहीच केले नव्हते. तो काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होता. मात्र शक्ती क्षीण झाल्याने शब्द फुटत नव्हते. त्याच्या मुलांना वाटले. काहीतरी महत्त्वाचे सांगायचे असेल. कदाचित जीवनभर कमावलेल्या धनाचा ठावठिकाणा सांगणार असतील. डॉक्टर म्हणाले, माझ्याकडे एक पाच हजाराचे इंजेक्शन आहे. ते छातीत दिले तर तुमचे वडील काही मिनिटांसाठी बोलू शकतील. मुलांना वाटले महत्त्वाची माहिती मिळणार असेल तर इतके पैसे खर्च करायला काही हरकत नाही. त्यांच्या सांगण्यावरून डॉक्टरने इंजेक्शन दिले. इंजेक्शन दिल्याबरोबर म्हातारा बोलला, "अरे गाढवांनो, बाहेर जाऊन बघा जरा, गाय सगळा चारा खाते आहे."
जीवनभर जे केले तशीच वृत्ती शेवटी पण असेल. हे लक्षात ठेवा. ही केवळ विनोदासाठी घेण्याची गोष्ट नाही. जीवनभर ज्यात मन रमवले - मुले, स्त्री, धन, म्युचुअल फंड, शेअर, प्रतिष्ठा, पद तर शेवटी कितीही श्लोक आठवायचा प्रयत्न केला तरी गीता आठवणार नाही.
गांधीजींना गोळी लागली तरी मरताना त्यांच्या मुखातून राम नाम निघाले कारण पूर्ण जीवनभर त्यांनी रामनाम जपले होते.
किष्किंधाकांडातील प्रसंग आहे. वालीचा वध केल्यावर श्रीराम त्याला मांडीवर घेऊन बसले होते. तो म्हणाला,
मैं बैरी सुग्रीव पिआरा। अवगुन कवन नाथ मोहि मारा॥
आमचे भावाभावांचे भांडण होते. तुम्ही मात्र सुग्रीवाला मित्र आणि मला शत्रू मानून मारले. हे योग्य केले नाही.
अनुज बधू भगिनी सुत नारी। सुनु सठ कन्या सम ए चारी॥
इन्हहि कुदृष्टि बिलोकइ जोई। ताहि बधें कछु पाप न होई॥
श्रीराम म्हणाले, अरे मूर्खा, धाकट्या भावाची बायको, बहीण, पुत्राची बायको किंवा कन्या यांना समदृष्टीने पाहावे. यांच्याकडे जो वक्रदृष्टीने बघतो त्याचा वध करण्यात कसलेच पाप नाही. कौशल देशाचा राजा या न्यायाने मी तुला दंडित केले.
वालीने सुग्रीवाच्या पत्नीचे हरण केले होते त्यामुळे त्याचा वध योग्यच होता.
स्मितहास्य करत वाली म्हणाला,
सुनहु राम स्वामी सन चल न चातुरी मोरि। प्रभु अजहूँ मैं पापी अंतकाल गति तोरि॥
हे भगवंता, तुमच्यापुढे माझी चतुराई काही चालणार नाही. अंतकाळी मी तुम्हाला शरण आलो आहे, तरीही मी पापीच आहे का?
इथे वाली म्हणतो आहे की अंतकाळी प्रभूचे दर्शन ज्याला होते तो पापमुक्त होतो असे मी ऐकले आहे. ते जर खरे असेल तर मी पापी कसा.
निरुत्तर होऊन भगवंत म्हणाले, तू योग्य बोलत आहेस.
सुनत राम अति कोमल बानी। बालि सीस परसेउ निज पानी॥
अचल करौं तनु राखहु प्राना। बालि कहा सुनु कृपानिधाना॥
भगवंत वालीच्या मस्तकाला स्पर्श करतात आणि म्हणतात, मी तुझा देह अचल करुन तुला प्राणदान देतो. त्यावर वाली म्हणतो हे कृपानिधान ऐका
वाली म्हणतो,
जन्म जन्म मुनि जतनु कराहीं। अंत राम कहि आवत नाहीं॥
जासु नाम बल संकर कासी। देत सबहि सम गति अबिनासी॥
मुनिजन अंतिम समयी तुमचे नाम यावे म्हणून जन्मोजन्मी तपस्या करतात. इतकी साधना करून देखील अंतिम समयी 'राम' नाम मुखी येणे कठीण असते. या नामाच्या उच्चारणाने शंकर काशीत सर्वाना समान मुक्ती देतात आणि माझे इतके सौभाग्य की तुमच्या हाताने मला मुक्ती प्राप्त होत आहे, तुम्हाला बघत मी प्राण त्यागू शकत आहे. मी पुन्हा प्राणयाचना का करेन?
मम लोचन गोचर सोई आवा। बहुरि कि प्रभु अस बनिहि बनावा॥
असे भगवान श्रीराम माझ्या दृष्टीसमोर आहेत. असा योग पुन्हा कधी येणार?
भगवतांनी प्रसन्न होऊन त्याला मुक्ती प्रदान केली. अंतकाळी जो त्यांचे स्मरण करतो त्याचे सर्व पाप ते नष्ट करतात.

तस्मात्सर्वेषु कालेषु, मामनुस्मर युध्य च ।
मय्यर्पितमनोबुद्धि:(र्), मामेवैष्यस्यसंशयम् ॥ 8.7॥
म्हणून हे अर्जुना! तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशाप्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निसं:शय मलाच मिळशील.
भगवंत म्हणतात, निरंतर माझे स्मरण कर. दैनंदिन कर्मे करताना आणि युद्धासारख्या जीवघेण्या परिस्थितीत देखील मला नित्य ध्यानात ठेव. आपण सामान्य लोक नित्य नेमाने पूजाअर्चना तर करतो. दिवसभर मात्र त्याचे स्मरण देखील करत नाही. पुन्हा दुसर्या दिवशी सकाळीच भगवंताला आठवतो. भगवंत म्हणतात, असे चालणार नाही. प्रत्येक क्षणी माझे स्मरण करावे. माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू नि:संशय मलाच मिळशील.
एके ठिकाणी कुंभमेळा भरला होता. शिव पार्वती तेथून विहार करत होती. मेळा पाहून पार्वतीला मनात आले, गंगास्नान करण्याने तर पापे नष्ट होतातच पण कुंभाच्या पुण्याने तर सर्व जन्माची पापे नष्ट होतात. मग जो इथे येतो त्या सर्वांना मुक्ती मिळते का? शिव म्हणाले, “नाही. असे होत नाही. सर्वांना मुक्ती मिळाली तर संसार कसा चालेल?” मग हे खोटे आहे आहे का असे पार्वतीने विचारल्यावर शिव म्हणाले, “त्यांना मुक्ती मिळत नाही कारण पापांपासून मुक्ती मिळेल या गोष्टीवर लोकांचा विश्वास नाही.” पार्वतीला काही हे पटले नाही. लोक एवढ्या लांबून चालत प्रवास करत येतात ते विश्वास असल्याशिवाय का येतील. शिव म्हणाले, “चल आपण परीक्षा करू. मी कुष्ठरोगी बनतो. आणि तू माझी सुंदर पत्नी बन. मी खड्ड्यात पडेन. जो पापी नसेल त्यानेच माझ्या मदतीसाठी यावे. अन्यथा त्याला देखील माझ्या स्पर्शाने रोग होईल असे तू सांग.”
त्यांच्या लीलेने तिथे खड्डा निर्माण झाला. शिव त्यात रोगी बनून पडले. पार्वती काठावर उभे राहून लोकांना मदतीसाठी बोलावू लागली. लोक मदतीसाठी पुढे येत मात्र तिची अट ऐकून मदत न करता पुढे निघून जात. सकाळपासून संध्याकाळ झाली. शिव म्हणाले, “बघ. कोणालाच विश्वास नाही. सगळे गंगा स्नान करून आलेत. पण कोणीच हिंमत करत नाही.” तेवढ्यात एक युवक धावत आला आणि पार्वती तिच्या अटी सांगेपर्यंत त्याने खड्ड्यात उडी मारली. आणि म्हणाला, “मला माहीत आहे, जो पापी नाही त्यानेच यांना मदत कराची आहे. मी आताच स्नान करून आलोय. माझे पाप नष्ट झालेत. आणि मी दुसरे कोणतेच कर्म केले नाही त्यामुळे नवीन पाप माझ्या वाटेला आलेले नाही. त्यामुळे मी यांना मदत करू शकतो.”
मुद्दा हा आहे की, शास्त्रांमधील सर्व फलश्रुती सत्य होते फक्त त्यावर आपला दृढ विश्वास हवा. वालीचा विश्वास दृढ होता. आपला विश्वास मात्र तकलादू असतो. आपण तर श्रीरामांच्या मांडीवर डोके ठेवून देखील मुक्ती मिळेल यावर विश्वास ठेवणार नाही. श्रद्धारूपी विश्वास बुद्धीत प्रगाढ होत नाही तोपर्यंत संशय समाप्त होत नाही आणि उपरती होत नाही.
स्वयंपाक, व्यापार, नोकरी जी काही कामे कराल भगवंताचे स्मरण करत करा. खेळ, युद्ध काहीही करा, त्याच्या प्रसन्नतेसाठी करा.

अभ्यासयोगयुक्तेन, चेतसा नान्यगामिना ।
परमं (म्) पुरुषं (न्) दिव्यं (म्), याति पार्थानुचिन्तयन् ॥ 8.8॥
हे पार्था! असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यास रुपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणाऱ्या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो.
भगवंत म्हणतात, हे सर्व अभ्यासाने शक्य आहे.
एकदा एका शिष्याने दीक्षा देण्याची गुरूंना विनंती केली. गुरूंनी त्याला एक मंत्र दिला. एवढ्याशा मंत्राने माझे कल्याण कसे होईल असे विचारल्यावर गुरू म्हणाले, हा साधारण नाही तर गुरुमंत्र आहे. शिष्य म्हणाला, 'श्रीराम जय राम जय जय राम' हा मंत्र तर मला माहीत आहे. शेजारी पिंपळाच्या झाडाचे बीज पडले होते. गुरूंनी विचारले, पावसाळयाचे दिवस आहेत. तर हे बीज रुजवले तर झाड नक्की उगवेल ना! शिष्य म्हणाला, काही खात्री नाही. कदाचित उगवेल. गुरुजी म्हणाले, याचे कारण मी सांगतो. पिंपळाच्या बीजाचे आवरण टणक असते. ते लवकर रुजत नाही. मात्र त्याची विशेषता आहे. तेच बीज पक्ष्याने खाल्ले तर तो ते आवरण फोडून खातो. त्याच्या पोटात जठराग्नीमध्ये ते व्यवस्थित भाजते, त्याचे पचन होते. त्यानंतर ते पक्ष्याच्या विष्ठेतून घराच्या कौलावर किंवा सिमेंटच्या भिंतीवर जरी पडले तरी त्यातून झाड उगवू शकते. त्याला मातीची गरज पडत नाही.
कोणताही मंत्र साधारण असतो. मात्र गुरु त्याचे आपल्या साधनेच्या उदरात आवरण फोडून पचन करतात आणि शिष्यावर कृपा करून त्याला देतात तेव्हा तो मंत्र फलित मंत्र बनतो. साधारण 'श्रीराम जय राम जय जय राम' मंत्राचा जप केला तर त्याचा जो परिणाम असेल त्याच्या कित्येक पटींनी अधिक प्रभाव जेव्हा तोच मंत्र गुरुमंत्र बनतो तेव्हा होतो.
घोड्याला चारही बाजूंचे दिसते त्यामुळे तो गोंधळू नये म्हणून त्याला डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना झापड लावली जातात. त्यामुळे त्याची नजर समोर राहते आणि तो एका दिशेत चालतो. भगवंत म्हणतात, मनाला इकडे तिकडे जाऊ देऊ नका. त्याला साधनेचे, नियमांचे झापड लावा. किती वाजता उठावे, केव्हा झोपावे, काय खावे – काय नाही, काय करावे, काय करू नये सर्व नियम नक्की करा. अन्यथा मन धावत राहते.
कबीर मन तो एक है, भावै तहाँ लगाव ।
भावै गुरु की भक्ति करूं, भावै विषय कमाव ।।
मन एकच आहे. त्याला हरी भजनात लावा किंवा विषयांमध्ये लावा.
नळातून सोडलेली पाण्याची धार वरून खाली येईपर्यंत मोठी होऊन पसरते. त्यामुळे पेल्यात ते पाणी घेण्याचा प्रयत्न केल्यास थोडे पाणी इकडेतिकडे सांडते. मात्र तेवढ्याच उंचीवरून तेलाची धार धरल्यास खाली बारीक होत जाते. त्यामुळे पाण्याच्या तुलनेत तेलाला एका बाटलीतून दुसर्यात सहज टाकता येते. साधकाची दृष्टी या तेलधारेवत असावी. इकडेतिकडे सांडणारी, भटकणारी नसावी.

कविं(म्) पुराणमनुशासितारम्,
अणोरणीयांसमनुस्मरेद्यः।
सर्वस्य धातारमचिन्त्यरूपम्,
आदित्यवर्णं (न्) तमसः (फ्) परस्तात्॥ 8.9॥
जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वांचा नियामक, सूक्ष्म यापेक्षाही अतिसूक्ष्म, सर्वांचे धारण पोषण करणारा, अतर्क्य स्वरूप सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाश रूप आणि अविद्येच्या अत्यंत पलिकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो,
येथे भगवंतांनी परमात्म्याला कोणत्या नावाने पुकारा हे सांगितले नाही तर त्याचे गुण, त्याची सर्व लक्षणे सांगितली आहेत.
येथे कवि म्हणजे त्रिकालज्ञ. कविता करणारा नव्हे. कवीनामुशना कवि: (१०.३७) सर्व विचारवेत्त्यांमध्ये शुक्राचार्य हे श्रेष्ठ आहेत कारण ते त्रिकालज्ञ होते.
भगवंत म्हणतात, या सर्व गुणांचे चिंतन त्याच्या कोणत्याही रूपात करा.

प्रयाणकाले मनसाऽचलेन,
भक्त्या युक्तो योगबलेन चैव ।
भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक्,
स तं(म्) परं(म्) पुरुषमुपैति दिव्यम् ॥ 8.10॥
तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळी सुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्य रूप परमपुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो.
शबरीने कोणते शास्त्र, कोणता योगाभ्यास केला होता ? कोणताही नाही. मात्र गुरुभक्तीच्या प्रभावाने योगसिद्धीमार्फत तिने देहत्याग केला. तुम्ही कोणत्याही मार्गाचा अभ्यास करा, अंतकाळी योगिक चेतना उपलब्ध होईल यासाठी भगवंताची भक्ती करावी लागते.
यदक्षरं(म्) वेदविदो वदन्ति,
विशन्ति यद्यतयो वीतरागाः ।
यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं(ञ्) चरन्ति,
तत्ते पदं(म्) सङ्ग्रहेण प्रवक्ष्ये ॥ 8.11॥
वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंदघनस्वरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्नशील संन्यासी महात्मे ज्यांच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्मचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो.
भगवंत म्हणतात निर्गुण सगुण दोन्ही उपासना पद्धतींमुळे माझी प्राप्ती होऊ शकते.
सर्वद्वाराणि संयम्य, मनो हृदि निरुध्य च ।
मूर्ध्न्याधायात्मनः(फ्) प्राणम्, आस्थितो योगधारणाम् ॥ 8.12॥
सर्व इंद्रियांची दारे अडवून, मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून, नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून, परमात्म्यासंबंधी योग्य धारणेत स्थिर होऊन जो पुरुष 'ॐ' या एक अक्षर रूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थ स्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी, त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो.
8.12 writeup
ओमित्येकाक्षरं(म्) ब्रह्म, व्याहरन्मामनुस्मरन् ।
य:(फ्) प्रयाति त्यजन्देहं(म्), स याति परमां (ङ्) गतिम् ॥ 8.13॥
अंतिम क्षणी जो माझ्या निर्गुण स्वरूपाचे चिंतन करतो तो स्वतःमध्ये स्वतःला स्थित करतो.
अंतकाळी स्थिती कशी असावी याबद्दल सेठजी जयदयाल गोयंका (गीता प्रेसचे संस्थापक) यांनी सांगितले होते की, गेलेल्या, किंवा मरणासन्न व्यक्तीची परमसेवा करावी. शक्य असेल तर त्याला गंगाकिनारी घेऊन जावे. तेथे रेतीवर झोपवावे. किंवा घरी गंगेची रेती आणून त्यावर रामनाम लिहावे. त्यावर त्या व्यक्तीला झोपवावे. तुळशीची कुंडी शेजारी ठेवावी. धूप लावावा. त्याची मुखात तुळशीचे पान, गंगाजल घालावे. गीतेचे पुस्तक त्याच्या छातीवर ठेवावे. इष्टदेव किंवा चतुर्भुज विष्णूचा फोटो त्याच्या डोळ्यासमोर ठेवावा. सर्वांनी कीर्तन गावे. गीता ऐकवावी. कारण कान शक्तीशाली असतात. प्राण गेले तरी कर्णेंद्रियांचे प्रयाण सर्वात शेवटी होते. त्यामुळे गीता ऐकवावी कारण कान शेवटपर्यंत जीवित असतात.

येथे प्राण सुखाने जावे याचा अर्थ वेदना होऊ नये असा नाही. तर केवळ मरणाच्या दुःखात गुरफटून न राहता तुझा नामजप करण्याची शक्ती मिळावी असा आहे.
अंतिम क्षणी सर्वांची इच्छा असते की आपले कुटुंबीय जवळ असावेत. मला घरी घेऊन चला, मला हे दाखवा, ते दाखवा. असे चिंतन करू नये. हे कामी येणार नाही. ज्या भावात देहत्याग केला तशीच पुढची योनी प्राप्त होते. म्हणून जे काही मी करेन त्याने अंतिम क्षणी केवळ त्या भगवंताचे स्मरण होईल याची संपूर्ण आयुष्य काळजी घ्यायला हवी.

अनन्यचेताः(स्) सततं(म्), यो मां(म्) स्मरति नित्यशः ।
तस्याहं(म्) सुलभः(फ्) पार्थ, नित्ययुक्तस्य योगिनः ॥ 8.14॥
हे अर्जुना! जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्या ला मी सहज प्राप्त होणारा आहे.
भगवंत म्हणतात, आपण सर्व काही करतो, भक्तीदेखील करतो मात्र ती अनन्य नसते. अनन्य शब्दाचा चुकीचा अर्थ घेतला जातो. लोकांना वाटते, अनन्य भक्ती म्हणजे मी तर कृष्णभक्त किंवा रामभक्त आहे त्यामुळे अन्य देवतांची भक्ती मी करणार नाही. हा चुकीचा समज आहे. सर्व देवतांची उपासना करून आपल्या इष्टदेवाची भक्ती प्रगाढ करणे म्हणजे अनन्य भक्ती. अनन्यता कशात असावी तर संसारात मन गुरफटण्याऐवजी भगवंतामध्ये रमावे. असे अनन्यचित्त होऊन निरंतर त्याचे स्मरण करावे.
कर से कर्म करै विधि नाना।
मन राखो जहां कृपा निधाना।।
हातांनी निरंतर कर्म करावे. मात्र मनात आपल्या इष्टदेवाचे स्मरण असावे.
सर्व कर्मे त्याच्यासाठी असावी. चालण्याचा व्यायाम देखील याच भावनेने करावा की, हे शरीर स्वस्थ राहून त्याचे चिंतन करता यावे.
शरीर येत जात असते. त्याची चिंता करू नये.
एकदा एका झाडावरील पानाने विचारले काल तर या झाडावर अकरा पाने होती. आज नऊच का शिल्लक आहेत?
तरुवर पात सों यों कहै, सुनो पात एक बात
या घर याही रीति है, एक आवत एक जात || - संत कबीर
कोणी तरी जन्माला येईल, कोणीतरी जाईल ही या धरेची रीत आहे.
त्यामुळे कोणाच्या जाण्याचा शोक करू नये. सर्वांना जायचे आहे. जाण्याची तयारी मात्र चांगली करावी. अशी तयारी करावी की उद्या जावे लागले तरी चिंता नाही.
हरी नामसंकीर्तन करून विवेचनाची सांगता झाली.
हरी शरणम् हरी शरणम्|
प्रश्न – प्रत्येक अध्यायावरील तुमचे विवेचन उपलब्ध आहे का?
विवेचक - https://vivechan.learngeeta.com/ यावर कोणत्याही अध्यायाचे, कोणत्याही विवेचकाचे विवेचन तुम्ही ऐकू शकता.
जया ताई
प्रश्न – दुधापासून दही बनते. त्याचप्रमाणे शरीरात आत्मा आल्यामुळे शरीर जीवंत बनते का (Living being).
विवेचक – नाही. आत्मा निर्लेप आहे. हवेत गुलाल उडवला तर हवा नेहमी गुलाबी होणर नाही. वायू फक्त त्याचे वहन करतो, ग्रहण करत नाही. तसेच आत्म्याचे आहे.
सुवर्णा ताई
प्रश्न – कवी म्हणजे काय?
विवेचक – कवी म्हणजे शुक्राचार्य यांच्याप्रमाणे त्रिकालज्ञ.
प्रश्न - भूतभावोद्भवकरो, विसर्गः(ख्) कर्मसञ्ज्ञितः याचा अर्थ नीट समजला नाही.
विवेचक – याचा अर्थ समजण्यास थोडा अवघड आहे. विवेचन आणखी दोन –तीन वेळा ऐकावे.
प्रश्न - देवाची आरती केल्यावर दिव्यावरून हात ओवाळून आपण चेहर्यावर का फिरवतो?
विवेचक - देवाला अग्नी दाखवली तर देवाचे चैतन्य त्या अग्नीत येते. ते चैतन्य आपण चेहर्यावर हात फिरवून ग्रहण करतो.
पुष्पलता ताई
प्रश्न – माझे वय सत्तर वर्षे आहे. माझी दिनचर्या कशी असावी, जेणेकरून अंतिम समयी प्रभूचे स्मरण सहज होईल?
विवेचक - आपण आपला जास्तीत जास्त वेळ सात्त्विक वृत्तीमध्ये घालवावा. प्रभूचे नाम, रूप, लीला, धाम यांचे चिंतन करावे. दुसरे म्हणजे ते करताना माझी वृत्ती त्यात स्थिर आहे की दुसर्याच कशात मन गुंतले आहे हे पहावे. जप करणे ही केवळ यांत्रिक क्रिया असू नये. दिवसेंदिवस भगवंताप्रती प्रेम वाढावे. यासाठी अभ्यास आणि वैराग्य महत्त्वाचे आहे. भोगांचा हळूहळू त्याग करावा. अचानक सर्व भोगांचा त्याग करू नये, नाही तर निभावता येत नाही. जे जे शक्य असेल ते भोग कमी करावे. आहारातील गोडाचे प्रमाण, आवडणार्या पदार्थांचा त्याग, जेवणात रोज ठराविक तीन ते चारच पदार्थ, दिवसभरात थोडा वेळ विना पंखा, विना गादीचे जमिनीवर बसणे यांची सवय हळूहळू लावावी. वृत्ती काबूत आणून जिथे मन फसते, तिथून मनाला बाहेर काढावे. तिथून काढले नाही तर भगवंतामध्ये लागणार नाही. यालाच अनन्य भक्ती म्हणतात.
धीरज दादा
प्रश्न - मी लेवल चारमध्ये शिकत आहे. परीक्षा देता येईल का?
विवेचक - दोघांचा काहीच संबंध नाही. https://learngeeta.net/exam/ किंवा learngeeta ऐप वर परीक्षेसाठी अर्ज करू शकता. दर महिन्याच्या पहिल्या रविवारी गीता जिज्ञासू, दुसर्या रविवारी गीता पाठक, तिसर्या रविवारी गीता पथिक आणि चौथ्या रविवारी गीताव्रती परीक्षा आयोजित करण्यात येते.
देवेंद्र दादा-
प्रश्न – जर अंतिम समयी ॐ चे उच्चारण आणि भगवंताचे नामस्मरण केल्यास जन्ममरणाच्या फेर्यांमधून मुक्ती मिळते. तर एखाद्याने जन्मभर यापैकी काहीच केले नाही आणि अंतिम समयी यांचे मानसिक उच्चारण केले तर?
विवेचक – भगवंत नवव्या श्लोकात सांगतात की हे शक्य नाही. जो नेहमी ज्या भावनेत स्थित असतो तोच भाव अंतकाळी त्याच्या मनात येतो.
मोहिंदर दादा-
प्रश्न - माझे लेवल चार संपत आले आहे. लेवल एक ला पुन्हा प्रवेश हवा आहे.
विवेचक - हेल्पलाइन क्रमांक 18002036500 यावर मदत मिळेल.
प्रश्न – गीतेचे श्लोक पाठ होत नाहीत.
विवेचक – गीता पाठांतर वर्गात https://kk.learngeeta.com/ सहभागी होऊ शकता.
देवेंद्र दादा-
प्रश्न – कर्माची व्याख्या करताना विसर्ग शब्दाचा जो अर्थ जो सांगितला तो नीट समजला नाही. मनातले भाव प्रकट करण्याला त्याग कसे म्हणता येईल?
विवेचक – त्याग म्हणजे एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे. मनात संकल्प आला, तो मनाने बुद्धीकडे दिला. एकाच्या मनात विचार आला तो त्याने दुसर्याकडे त्यागला आणि त्याने तो ग्रहण केला. याला त्याग म्हणतात.
सुषमा ताई –
प्रश्न – गीतेतील श्लोकांचा अर्थ जाणून घेण्यासाठी कोणते पुस्तक वाचावे?
विवेचक – गीता प्रेस प्रकाशन यांची अन्वय गीता क्रमांक १७.
वीणा ताई –
प्रश्न - अंतिम क्षणी देवाचे नामस्मरण नाही झाले तर त्याचा काय परिणाम काय होईल?
विवेचक – मनात जसे भाव असतील तशी योनी प्राप्त होईल. आयुष्यभर गीतापठण केले असेल तर मनुष्यजन्म नक्की मिळेल. त्याला त्यागू नका.
समारोपाची प्रार्थना आणि हनुमान चालीसेने सत्राची सांगता झाली.

प्रश्न उत्तरे
गोपाल प्रसाद दादा- प्रश्न – प्रत्येक अध्यायावरील तुमचे विवेचन उपलब्ध आहे का?

।।श्रीकृष्णार्पणमस्तु ।।