विवेचन सारांश
कृतार्थ अर्जुनाने केलेले विश्वरूपदर्शनाचे वर्णन
प्रार्थना, दीपप्रज्वलन, गुरुवंदना, कृष्णवंदना आणि भारतमाता एकात्मता स्तोत्र यांचे पठण करत सत्राचा आरंभ झाला.
श्रीमद्भगवद्गीतेचा नववा अध्याय राजविद्याराजगुह्ययोग हा गीतेचा मध्यस्थित अध्याय आहे. या नवव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला परम गुह्य, दिव्य ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्ण हे परमात्म्याचे सगुण साकार रूप आहेत ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आली. अर्जुनाच्या मनात भगवंतांच्या विभूती जाणण्याची इच्छा जागृत झाली. त्याप्रमाणे दहाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला त्यांच्या दिव्य विभूतींचे वर्णन करून सांगितले. या विभूतींचे ज्ञान देण्यामागचे भगवंतांचे प्रयोजन असे होते जे जे काही चांगले आहे ते ते सारे परमात्म्याचे रूप आहे हे अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना समजावे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात्परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंदविग्रहम्।
पूर्णब्रह्मपरानंदमीशमाळन्दिवल्लभम्॥
कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने।
प्रणत: क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम:॥
रत्नाकराधौतपदां हिमालयकिरीटिनीम्।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ्यां वन्दे भारतमातरम्॥
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीमष्टादशाध्यायिनीं
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्॥
यानंतर परमपूजनीय गोविंददेव गिरीजी महाराजांना प्रणिपात करून आणि सर्व साधकांना अभिवादन करून विवेचनाला सुरुवात झाली.
श्रीमद्भगवद्गीतेचा नववा अध्याय राजविद्याराजगुह्ययोग हा गीतेचा मध्यस्थित अध्याय आहे. या नवव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला परम गुह्य, दिव्य ज्ञान दिले. भगवान श्रीकृष्ण हे परमात्म्याचे सगुण साकार रूप आहेत ही गोष्ट अर्जुनाच्या लक्षात आली. अर्जुनाच्या मनात भगवंतांच्या विभूती जाणण्याची इच्छा जागृत झाली. त्याप्रमाणे दहाव्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला त्यांच्या दिव्य विभूतींचे वर्णन करून सांगितले. या विभूतींचे ज्ञान देण्यामागचे भगवंतांचे प्रयोजन असे होते जे जे काही चांगले आहे ते ते सारे परमात्म्याचे रूप आहे हे अर्जुनाला आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना समजावे.
त्याप्रमाणे जरी अर्जुनाचे अज्ञान नाहीसे झालेले असले तरी तो एक जिज्ञासू भक्त असल्यामुळे आता त्याला भगवंतांचे विश्वरूप पाहण्याची इच्छा झाली आणि अकराव्या अध्यायात त्याने जर त्याची विश्वरूपाचे दर्शन घेण्याची योग्यता असली तर भगवंतांनी त्याला त्यांच्या विश्वरूपाचे दर्शन द्यावे अशी विनंती केली.
भगवंतांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली आणि अर्जुनाला विश्वरूपदर्शन दिले. संपूर्ण सृष्टी ईश्वरामध्ये स्थित असल्यामुळे आणि ईश्वर संपूर्ण सृष्टीच्या प्रत्येक कणात स्थित असल्यामुळे सृष्टीत जे जे चांगले आहे त्यात ईश्वराला पहा, तसेच सृष्टीत जे जे काही वाईट आहे त्यातही ईश्वराला पहा, हा संदेश देण्यासाठी बघता बघता ते रूप उग्र होऊ लागले. अर्जुनाने भगवंतांचे अनेक ज्वलंत चेहरे पाहिले. त्यांच्या त्या विशाल आणि भयंकर मुखांमध्ये अनेक योद्धे अगदी घाईघाईने जाऊ लागले. अर्जुनाने भगवंतांच्या दातांमध्ये योद्धे पाहिले, इतकेच नव्हे तर भगवंतांना त्या योद्ध्यांचे चूर्ण करतानाही पाहिले, त्यांच्या मस्तकांचे चूर्ण होत असल्याचे एक भयावह रूप अर्जुनाला दिसले. युद्ध सुरू होण्यापूर्वीच अर्जुन युद्धाचे भविष्य पहात होता. भगवंतांनी अर्जुनाला युद्धात घडणारे जे दृश्य दाखवले ते पाहून अर्जुन भयभीत झाला.
11.28
यथा नदीनां(म्) बहवोऽम्बुवेगाः(स्),
समुद्रमेवाभिमुखा द्रवन्ति।
तथा तवामी नरलोकवीरा,
विशन्ति वक्त्राण्यभिविज्वलन्ति॥11.28॥
ज्याप्रमाणे नद्यांचे पुष्कळसे जलप्रवाह स्वाभाविकच समुद्राच्याच दिशेने धाव घेतात अर्थात समुद्रात प्रवेश करतात त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर आपल्या धडाडून पेटलेल्या तोंडात शिरत आहेत.
(यथा नदीनाम् बहवः अम्बुवेगाः समुद्रम् एव अभिमुखाः द्रवन्ति) ज्याप्रमाणे नद्यांचे भरपूर जलप्रवाह समुद्राकडेच संमुख होऊन धावतात (तथा अमी नरलोकवीराः (अपि) तव वक्त्राणि विशन्ति अभिविज्वलन्ति) त्याप्रमाणे ते नरलोकाचे श्रेष्ठ वीरसुद्धा तुमच्या मुखांमध्ये प्रवेश करीत पेट घेत आहेत.
ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक जलप्रवाह नैसर्गिकरित्या समुद्राच्या दिशेनेच धाव घेतात आणि समुद्रात प्रवेश करतात, त्याचप्रमाणे ते मनुष्यलोकातील वीर भगवंतांच्या सर्व बाजूंनी जळत असलेल्या मुखांमध्ये प्रवेश करीत पेट घेत असलेले अर्जुनाने पाहिले. ते वीर विश्वरूपाच्या मुखात प्रवेश करून कुठे लुप्त होत आहेत ते कळत नव्हते.

यथा प्रदीप्तं(ञ्) ज्वलनं(म्) पतङ्गा,
विशन्ति नाशाय समृद्धवेगाः।
तथैव नाशाय विशन्ति लोका:(स्),
तवापि वक्त्राणि समृद्धवेगाः॥11.29॥
जसे पतंग मोहाने मरुन जाण्यासाठी पेटलेल्या अग्नीत अतिशय वेगाने धावत शिरतात, तसेच हे सर्व लोकही स्वतःच्या नाशासाठी आपल्या तोंडात अतिशय वेगाने धावत प्रवेश करीत आहेत.
(यथा पतङ्गा: नाशाय समृद्धवेगाः प्रदीप्तम् ज्वलनम् विशन्ति) ज्याप्रमाणे पतंग नष्ट होण्यासाठी अतिवेगाने झेप घेत प्रज्वलित अग्नीमध्ये प्रवेश करतात (तथा एव (एते) लोकाः अपि नाशाय समृद्धवेगाः तव वक्त्राणि विशन्ति) त्याचप्रमाणे हे सर्व लोकसुद्धा स्वतःचा नाश करून घेण्यासाठी अतिवेगाने धावत तुमच्या प्रज्वलित मुखांमध्ये प्रवेश करीत आहेत.
पावसाळ्याच्या आसपास कित्येकदा अनेक पतंग (छोट्या पाकोळ्या), दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित होऊन स्वतःचाच नाश करून घेण्यासाठी तिच्यावर अतिशय वेगाने झेपावतात, तसेच स्वतःलाच समाप्त करून घेण्यासाठी हे वीर भगवंतांच्या मुखात प्रवेश करताना अर्जुनाला दिसत होते.

लेलिह्यसे ग्रसमानः(स्) समन्ताल्,
लोकान्समग्रान्वदनैर्ज्वलद्भिः।
तेजोभिरापूर्य जगत्समग्रं(म्),
भासस्तवोग्राः(फ्) प्रतपन्ति विष्णो॥11.30॥
आपण त्या सर्व लोकांना प्रज्वलित तोंडांनी गिळत गिळत सर्व बाजूंनी वारंवार चाटत आहात. हे विष्णो! आपला प्रखर प्रकाश सर्व जगाला तेजाने पूर्ण भरुन तापवीत आहे.
(ज्वलद्भिः वदनैः समग्रान् लोकान् ग्रसमानः समन्तात् लेलिह्यसे) प्रज्वलित मुखांचे द्वारा संपूर्ण लोकांना ग्रास करीत त्यांना जिभल्या चाटत सर्व बाजूंनी वारंवार गिळत आहात. (विष्णो तव उग्राः भासः समग्रम् जगत् तेजोभिः आपूर्य प्रतपन्ति) हे विष्णू, तुमचा उग्र प्रकाश संपूर्ण जगाला तेजाच्या द्वारा परिपूर्ण करून तापवत आहे.
सामान्य माणसाने अन्नाचा एकेक घास गिळावा त्याप्रमाणे भगवंत प्रज्वलित मुखांनी एक एक माणसाचा एक एक घास बनवून सर्व बाजूंनी सर्व लोकांना गिळंकृत करत होते आणि एवढेच नाही तर ज्याप्रमाणे जेवताना अन्नाचा कण ओठावर राहिला तर जीभेने चाटून खाल्ला जातो, त्याप्रमाणे ते सर्वांना चाटून खात होते. जिभल्या चाटत सर्व लोकांना गिळत असणाऱ्या भगवंतांचा प्रखर प्रकाश जगाला तेजाने पूर्ण भरून तापवत होता.
भगवंतांची भूक होती तरी कशी? ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात,

सागराचा घोट घेतोस । पर्वताचा गिळतोस घास ।
दाढेखाली रगडतोस । अवघा ब्रह्मकटाह हा ॥
सर्व समुद्रच पिऊन टाकावा की काय किंवा पर्वतच गट्ट करावा की काय अथवा हे संपूर्ण विश्वच दाढेखाली घालावे की काय?
दिशा सगळ्याच गिळाव्या । चांदण्या चाटून घ्याव्या ।
अशी लोलुपता दिसते । तुझ्या भुकेमध्ये ॥
सगळ्या दिशाच गिळून टाकाव्या अथवा चांदण्या चाटून पुसून घ्याव्यात, अशी ही देवा तुझी हाव दिसत आहे.
विश्वरूप भगवंतांचे मुख किती प्रचंड आहेत याचे वर्णन करताना माऊली म्हणतात,
विश्वरूप भगवंतांचे मुख किती प्रचंड आहेत याचे वर्णन करताना माऊली म्हणतात,
तुझे तोंड एवढे प्रचंड । की त्यात जिह्वाग्री हे ब्रह्माण्ड ।
भासे वणव्यामध्ये कवठ । पडले आहे ॥
एकच तोंड पण कसे व केवढे पसरले आहे? ज्याप्रमाणे वडवानळामधे कवठ घालावे त्याप्रमाणे हे तिन्ही लोक तुझ्या जिभेच्या टोकालाच लागलेले दिसतात.
आख्याहि मे को भवानुग्ररूपो,
नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं(न्),
न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्॥11.31॥
मला सांगा की भयंकर रुप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा! आपणाला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो. कारण आपली ही करणी मला कळत नाही.
(मे आख्याहि उग्ररूपः भवान् कः) मला तुम्ही सांगा की उग्ररूप असणारे तुम्ही कोण आहात? (देववर ते नमः अस्तु) हे देवांमध्ये श्रेष्ठा! तुम्हाला नमस्कार असो! (प्रसीद आद्यम् भवन्तम् विज्ञातुम् इच्छामि) तुम्ही प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा तुम्हांस विशेषरूपाने जाणून घेण्याची मला इच्छा आहे. (हि तव प्रवृत्तिम् न प्रजानामि) कारण तुमची प्रवृत्ती मला कळत नाही.
जरी घाबरलेला असला तरीही अर्जुनाची जिज्ञासा वृत्ती पूर्णपणे शमली नव्हती. भगवंत काय करायला प्रवृत्त झाले होते हे त्याला समजत नव्हते आणि ते त्याला जाणून घ्यायचे होते. ज्ञानेश्वर माऊली असाच प्रश्न विचारतात,

व्हावया आपले समाधान । सहज विचारले विश्वरूपाचे ध्यान ।
तो तू सारे हे त्रिभुवन । गिळतची उठलास ॥
माझे समाधान व्हावे म्हणून मी विश्वरूपाचे ध्यान विचारले आणि इतक्यात एकदम तू सर्व त्रैलोक्यसंहारच करीत सुटलास.
तरी तू कोण एवढा विलक्षण । इतकी भेसूर मुखे का केलीस धारण ।
असंख्य हाती ही शस्त्रे तीक्ष्ण। घेतलीस कशासाठी ॥
तेव्हा तू आहेस तरी कोण? व इतकी भेसूर मुखे कशाकरता धारण केली आहेस? या सर्वच हातात शस्त्रे कशाकरता धारण केली आहेस ?
श्रीभगवानुवाच
कालोऽस्मि लोकक्षयकृत्प्रवृद्धो,
लोकान् समाहर्तुमिह प्रवृत्तः।
ऋतेऽपि त्वां(न्) न भविष्यन्ति सर्वे,
येऽवस्थिताः(फ्) प्रत्यनीकेषु योधाः॥11.32॥
श्रीभगवान म्हणाले, मी लोकांचा नाश करणारा वाढलेला महाकाल आहे. यावेळी या लोकांच्या नाशासाठी मी प्रवृत्त झालो आहे. म्हणून शत्रूपक्षीय सैन्यात जे योद्धे आहेत, ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार.
(श्रीभगवान उवाच लोकक्षयकृत् प्रवृद्धः कालः अस्मि) भगवान श्रीकृष्ण म्हणाले, लोकांचा नाश करणारा वाढलेला असा महाकाल मी आहे. (इह लोकान् समाहर्तुम् प्रवृत्तः ये प्रत्यनीकेषु अवस्थिताः योधाः) या समयी या लोकांना नष्ट करण्यासाठी मी प्रवृत्त झालो आहे, म्हणून जे प्रतिपक्षीयांच्या सैन्यामध्ये स्थित असणारे योद्धे लोक आहेत, ते (सर्वे त्वाम् ऋते अपि न भविष्यन्ति) सर्व तुझ्याशिवायही (तू युद्ध केले नाहीस तरीसुद्धा) राहाणार नाहीत म्हणजे त्या सर्वांचा नाश होऊन जाईल.
अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना भगवंत म्हणाले, "मी लोकांचा नाश करणारा महाकाळ आहे आणि त्यांचा अंत मीच ठरवला आहे. म्हणूनच शत्रुपक्षात जे योद्धे आहेत, त्यांचं आयुष्य तू युद्ध केले नाहीस तरीसुद्धा भविष्यात समाप्तच होणार आहे.”
भगवंत महाकाळ आहेत. हा काळाचा प्रवाह सदैव वाहत आहे. या काळाच्या प्रवाहात कोण कोण आले कोण कोण गेले! काळाच्या उदरात कोण कुठे गडप झाले, कुणाचाही काहीही पत्ता नाही! परंतु या निमित्ताने भगवंत अर्जुनाचा अहंकार नष्ट करत आहेत की तू लढलास नाही लढलास तरीही मी यांना नष्ट केलेले आहे. तसेच भगवंत अर्जुनाला हेही आश्वासन देत आहेत की या संहारात तुला यश मिळणार आहे. तुम्ही पांडव सुरक्षित राहणार आहात. ज्ञानेश्वर माऊली सांगतात,
हे ऐकून काही लोक नकारात्मक विचार करतात की जर भगवंत सगळे काही करणार असले तर मला कशाला काही करायला हवे? मी काहीही न करता सर्व काही होणारंच आहे! मराठीत वाक्प्रचार आहे ना, असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी! पण ही तर निष्क्रियता आहे. वास्तविक पाहता मनुष्यजन्म ही कर्मयोनी आहे, कर्म करून स्वतःचा उद्धार करून घेण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. त्याचा लाभ घेऊन माणसाने आळशीपणा सोडून आपले विहित कार्य ओळखून त्या भगवत्कार्यात सहभागी झाले पाहिजे.

या आताच्या संहारात । तुम्ही पांडव राहाल सुरक्षित ।
हे ऐकताच जीवात । जीव आला पार्थाच्या ॥
तर आताच्या या संहाररूपी संकटात फक्त तुम्ही पांडव सुरक्षित आहात, असे भगवंत बोलल्यावर अर्जुनाच्या जीवात जीव आला.
हे ऐकून काही लोक नकारात्मक विचार करतात की जर भगवंत सगळे काही करणार असले तर मला कशाला काही करायला हवे? मी काहीही न करता सर्व काही होणारंच आहे! मराठीत वाक्प्रचार आहे ना, असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी! पण ही तर निष्क्रियता आहे. वास्तविक पाहता मनुष्यजन्म ही कर्मयोनी आहे, कर्म करून स्वतःचा उद्धार करून घेण्याचे स्वातंत्र्य माणसाला आहे. त्याचा लाभ घेऊन माणसाने आळशीपणा सोडून आपले विहित कार्य ओळखून त्या भगवत्कार्यात सहभागी झाले पाहिजे.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व,
जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं(म्) समृद्धम्।
मयैवैते निहताः(फ्) पूर्वमेव,
निमित्तमात्रं(म्) भव सव्यसाचिन्॥11.33॥
म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची! तू फक्त निमित्तमात्रच हो.
(तस्मात् त्वम् उत्तिष्ठ यशः लभस्व शत्रून् जित्वा समृद्धम् राज्यम् भुङ्क्ष्व) म्हणून तू ऊठ, यश प्राप्त करून घे आणि शत्रूंना जिंकून संपन्न असे राज्य उपभोग. (एते पूर्वम् मया एव निहताः सव्यसाचिन् निमित्तमात्रम् एव भव) हे सर्व शूरवीर अगोदरच माझ्याकडूनच मारले गेलेले आहेत हे सव्यसाची अर्जुना, तू केवळ निमित्तमात्र हो.
आपण स्वतः काळ आहोत असे भगवंतांनी सांगितले. काळासाठी भूतकाळ काय, वर्तमानकाळ काय आणि भविष्य काय!! जे घडले, घडत आहे आणि घडणार आहे ते सर्व भगवंत जाणतात. वैज्ञानिक दृष्टी मानणार्या लोकांना हे पटणार नाही. जे घडलेच नाही ते कोणी कसे काय जाणू शकतो? याचे उत्तर आईन्स्टाईनने दिलेल्या उदाहरणातून जाणून घेऊ.
प्रकाशाच्या वेगाचे सूत्र - E = mc²
पुढे भगवंत सांगतात, “तू केवळ निमित्त बन. या सर्व लोकांना समाप्त करणारा मी आहे. ते मी आधीच केले आहे. तू केवळ बाण चालवून त्यांना मारणारा निमित्त बन. मग ते कार्य केल्याचे श्रेय तुला प्राप्त होईल.
जपानच्या एका राजाची गोष्ट आहे. अत्यंत शूर वीर योद्धा असलेल्या त्याच्या मुख्य सेनापतीचा देहांत झाला. ही गोष्ट शत्रूला समजताच शत्रूने त्याच्यावर निकराचा हल्ला केला. राजाचे इतर योद्धे हताश, हतबल झाले. त्यावेळी एक संन्यासी तेथे आला आणि त्याने राजाला चिंतेचे कारण विचारले. राजाचे बोलणे ऐकून संन्याशाने त्याच्यापाशी युद्धाचे नेतृत्व करण्याची इच्छा प्रगट केली. राजाला आश्चर्य वाटले पण त्याने त्याचे बोलणे मान्य केले. संन्याशाने योद्ध्याचा वेश धारण केला. त्याने नंतर सर्व सैन्यासमोर जाऊन सांगितले की आपली जीत निश्चित आहे. तुम्ही फक्त युद्ध करा. परंतु सैनिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. मग संन्याशाने त्यांना मंदिरात जाऊन देवाचा कौल घेण्यास सुचवले. त्याप्रमाणे सर्वजण मंदिरात गेले. मग संन्याशाने एक नाणे आकाशात उडवले आणि म्हणाला जर इथे छापा आला तर आपला विजय सुनिश्चित आहे. नाणे खाली पडल्यावर सर्वांना छापा दिसला. सर्व सैनिकांमध्ये जोश संचारला. परंतु काही जण मात्र अजूनही साशंक होते. मग त्यांच्या सांगण्यावरून संन्याशाने परत नाणेफेक केली. परत छापा पडला. आता मात्र सर्वजण आपल्या विजयाबद्दल निःशंक झाले. सर्वजण शत्रूवर तुटून पडले आणि शत्रूला पळवून लावले.
त्यामुळे युद्धात किंवा खेळातही मी हरणार आहे या भावनेने कधीही सुरुवात करू नये. इथे भगवंतांनी अर्जुनाला हाच विश्वास दिला होता.

m = mass of matter, वस्तुमान
c = velocity of light, प्रकाशाची गती
ऊर्जा ही प्रकाशाच्या वर्गाच्या गतीच्या वस्तुमानाच्या पटीने असते, असे हा सिद्धान्त सांगतो.
c = velocity of light, प्रकाशाची गती
ऊर्जा ही प्रकाशाच्या वर्गाच्या गतीच्या वस्तुमानाच्या पटीने असते, असे हा सिद्धान्त सांगतो.
प्रकाशाची गती २९, ९७, ९२, ४५८ मीटर प्रति सेकंद इतकी असते.
कल्पना करा, एक खूप मोठी ट्रेन आहे, इतकी लांब की तिची लांबी दोन प्रकाश महिने इतकी आहे, म्हणजेच तिच्या गार्डाच्या डब्यापासून इंजिनापर्यंत प्रकाश जाण्यासाठी दोन महिने लागतात. एका सेकंदात प्रकाश साधारण तीन लाख किलोमीटर जाऊ शकतो. तर दोन महिन्यात प्रकाशाचा प्रवास जितका होईल तेवढी गाडीची लांबी आहे. आपण अशा ठिकाणी आहोत जिथून आपण पूर्ण ट्रेन बघू शकतो. त्यामुळे आपल्याला गार्ड आणि इंजिन दोन्हीही एकाच वेळी दिसत आहेत. समजा, गार्डने हिरवा सिग्नल दाखवला हे आपल्याला लगेच दिसू शकते. ड्रायव्हरने तो पाहिला हे ही आपल्याला ते लगेच दिसू शकते. आणि आता ही ट्रेन चालू होणार आहे हे सर्व आपण या क्षणी जाणतो. परंतु ड्रायव्हरपर्यंत तो प्रकाश पोहोचण्यास दोन महिने लागणार आहेत. म्हणजेच आपण भविष्य पाहिले असे होते, नाही का? त्यामुळे जो सर्वव्याप्त, सर्वत्र असणारा काळ आहे, त्याच्यासाठी भूत, भविष्य असा भेद नसतो. त्याला एकाच वेळेस सर्व दिसत आहे. भगवंत अर्जुनाला तेच दाखवत आहेत.
भगवंत म्हणाले, “हे सव्यसाची, उठ!” हे सव्यसाची संबोधन महत्त्वाचे आहे. डाव्या हाताने धनुष्य धरून उजव्या हाताने धनुष्याची प्रत्यंचा सर्वच धनुर्धर खेचतात, मात्र अर्जुन दोन्ही हातांपैकी कोणत्याही हातात धनुष्य धरून दुसऱ्या हाताने धनुष्याची प्रत्यंचा खेचून बाण चालवू शकत होता. उजव्या हाताने धनुष्य धरून डाव्या हातानेही धनुष्याची प्रत्यंचा ओढून बाण चालवू शकत होता म्हणून तो सव्यसाची. हे संबोधन वापरून भगवंतांनी अर्जुनाचे अजूनही एक कौशल्य त्याच्या निदर्शनास आणून त्याला प्रोत्साहन दिले होते.
पुढे भगवंत सांगतात, “तू केवळ निमित्त बन. या सर्व लोकांना समाप्त करणारा मी आहे. ते मी आधीच केले आहे. तू केवळ बाण चालवून त्यांना मारणारा निमित्त बन. मग ते कार्य केल्याचे श्रेय तुला प्राप्त होईल.
भगवंत सुंदर बासरी वाजवतात. आपण जर ती बासरी बनलो तर सुंदर सूर त्या बासरीतून निघतील. मात्र ती काढणारे भगवंत असतील. मात्र त्यासाठी आपल्याला भगवंताची बासरी बनावे लागेल. बासरी बनण्यासाठी आपल्या आतील अहंभाव त्यागून, रिते होऊन स्वतःला त्याच्यापाशी सोपवावे लागेल. एखादे कार्य 'मी केले', 'मी करणार आहे' हा अहंभाव त्यागावा. हे भगवत्कार्य आहे आणि ते करण्यासाठी निमित्त होण्याची संधी मला मिळाली आहे असा विचार करून जेव्हा आपण आपल्या समोर आलेले प्रत्येक कार्य केले तर ते कार्य पार पडेलच. कारण ते कार्य भगवंतच करतात. आपण केवळ निमित्त म्हणून त्यांच्या हातातील साधन बनतो. असे झाले तर भगवत्कार्य करण्याचा आनंद प्राप्त होऊ शकतो. येथे कार्य म्हणजे कोणतेही कर्म नाही तर जे करण्यास योग्य आहे ते कर्म म्हणजे कार्य.
कार्यं कर्म समाचर॥
गीतापरिवाराचे कार्य हे भगवत्कार्यच आहे. त्यात हातभार लावणार्या सर्व कार्यकर्त्यांनी हा अनुभव घेतला असेलच. एक विवेचन सुरू असताना विवेचनकर्त्याव्यतिरिक्त पडद्यामागे मोठी यंत्रणा काम करत असते. हे सर्व अज्ञात कार्यकर्ते भगवत्कार्य करण्याचा आनंद प्राप्त करत आहेत. गीता जीवनात आणणे याचा अर्थ हाच आहे की, प्रत्येक कार्य जे कर्तव्यरूपात आपल्या समोर येते, ते दायित्व पूर्ण करण्यासाठी भगवंतांनी माझी निवड केली आहे हे मानून ते त्याला अर्पण करावे. असे केले तर आनंदप्राप्ती नक्की ! भगवंत हेच सांगत आहेत, “तू निमित्त तर बन. मी सर्व केले आहे. तू धनुष्य तर उचल.”
शेवटी गीतेची फलश्रुती काय आहे? चक्रवर्ती सम्राट असलेल्या राजा धृतराष्ट्राला त्याचा सारथी संजय स्पष्टपणे सांगतोय, यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः ।
तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ॥
जिथे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ आहेत तिथेच वैभव, विजय, नीती आहे असे माझे स्पष्ट मत आहे. (मात्र तो धनुर्धारी पार्थ असावा, निष्क्रिय नसावा, हे महत्त्वाचे!) आडवळणाने एक सारथी चक्रवर्ती राजाला स्पष्ट सांगतोय, “महाराज, तुम्हाला विजय मिळणार नाही.” ही हिंमत, ही निर्भयता संजयाकडे गीतेचे तत्त्वज्ञान ऐकून आली आणि ही निर्भयता, ही स्पष्टता हीच गीतेची फलश्रुती आहे. व्यवस्थित अभ्यास केला असता लक्षात येईल की भगवंतांची ही भगवद्गीता मनोधैर्य वाढविणारी आहे. खच्चीकरण करणारी नाही.
जपानच्या एका राजाची गोष्ट आहे. अत्यंत शूर वीर योद्धा असलेल्या त्याच्या मुख्य सेनापतीचा देहांत झाला. ही गोष्ट शत्रूला समजताच शत्रूने त्याच्यावर निकराचा हल्ला केला. राजाचे इतर योद्धे हताश, हतबल झाले. त्यावेळी एक संन्यासी तेथे आला आणि त्याने राजाला चिंतेचे कारण विचारले. राजाचे बोलणे ऐकून संन्याशाने त्याच्यापाशी युद्धाचे नेतृत्व करण्याची इच्छा प्रगट केली. राजाला आश्चर्य वाटले पण त्याने त्याचे बोलणे मान्य केले. संन्याशाने योद्ध्याचा वेश धारण केला. त्याने नंतर सर्व सैन्यासमोर जाऊन सांगितले की आपली जीत निश्चित आहे. तुम्ही फक्त युद्ध करा. परंतु सैनिकांचा त्यावर विश्वास बसला नाही. मग संन्याशाने त्यांना मंदिरात जाऊन देवाचा कौल घेण्यास सुचवले. त्याप्रमाणे सर्वजण मंदिरात गेले. मग संन्याशाने एक नाणे आकाशात उडवले आणि म्हणाला जर इथे छापा आला तर आपला विजय सुनिश्चित आहे. नाणे खाली पडल्यावर सर्वांना छापा दिसला. सर्व सैनिकांमध्ये जोश संचारला. परंतु काही जण मात्र अजूनही साशंक होते. मग त्यांच्या सांगण्यावरून संन्याशाने परत नाणेफेक केली. परत छापा पडला. आता मात्र सर्वजण आपल्या विजयाबद्दल निःशंक झाले. सर्वजण शत्रूवर तुटून पडले आणि शत्रूला पळवून लावले.
त्यामुळे युद्धात किंवा खेळातही मी हरणार आहे या भावनेने कधीही सुरुवात करू नये. इथे भगवंतांनी अर्जुनाला हाच विश्वास दिला होता.
द्रोणं(ञ्) च भीष्मं(ञ्) च जयद्रथं(ञ्) च,
कर्णं(न्) तथान्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं(ञ्) जहि मा व्यथिष्ठा,
युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्॥11.34॥
द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिऊ नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील. म्हणून युद्ध कर.
(द्रोणम् च भीष्मम् च जयद्रथम् च कर्णम् तथा अन्यान् अपि मया हतान्) द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह तसेच जयद्रथ आणि कर्ण तसेच आणखीसुद्धा बरेचसे माझ्याकडून मारले गेले आहेत. त्या (योधवीरान् त्वम् जहि मा व्यथिष्ठाः रणे सपत्नान् जेतासि युध्यस्व) शूरवीर योद्ध्यांना तू ठार कर. भिऊ नकोस, युद्धामध्ये वैऱ्यांना तू निःसंदेहपणे जिंकशील, म्हणून युद्ध कर.
हे पितामह भीष्म, हे गुरु द्रोण, हे जयद्रथ, ज्यांच्याशी अर्जुन युद्ध करायला बिचकत होता आणि त्यांना कसे मारायचे याचा विचार करत होता, त्यांना व इतर अनेकांना भगवंतांनी स्वतः मारलेले होते. आता अर्जुनाला ते न भीता युद्ध करायला प्रोत्साहन देत होते, त्याला नि:संदेह यश प्राप्त होईल अशी खात्री पटवून देत होते. कारण आता हे सर्व शत्रू पक्षातील योद्धे काळाच्या प्रभावाखाली आले होते.
गरुडपुराणातील एका कथेतून हा मुद्दा समजून घेता येईल.
भगवंत अर्जुनाला हेच सांगत आहेत की, माझ्या मुखात प्रवेश करणारे तुझ्या शत्रुपक्षातील योद्धे समाप्त होणार आहेत. तू त्यांना मारले नाहीस तरीही हे घडणार आहे कारण त्यांचा काळ समीप आला आहे. त्यामुळेच तू कर अथवा करू नकोस, जे जे नियत आहे ते ते घडणारच आहे असे भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले.
श्री भगवानांनी आपल्या सर्वांसाठीही हे सांगितले आहे. जर आपण भगवंतांनी सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या उपदेशानुसार कार्यरत राहिलो तर आपल्याला निश्चित यश मिळणार आहे.
भगवंतांचे विश्वरूप पाहून आणि भगवंतांचे हे कथन ऐकून अर्जुनाची काय अवस्था झाली होती? पुढील श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत.

एकदा सर्व देवी देवतांची सभा भरली होती. सर्व देव आपआपल्या वाहनांवरून सभेसाठी आले. भगवान विष्णू गरुडावर बसून आले. यमराजही आले. तेथे एका झाडावर दोन पक्षी हसत खेळत गप्पा मारताना गरुडदेवाने पाहिले. यमराजांचीही नजर त्यांच्याकडे गेली. यमराजांची दृष्टी आपल्यावर पडल्याचे पाहून पक्षी घाबरले. त्यांना वाटले आपली घटिका आता भरली आहे. त्यांनी गरुडाजवळ दयायाचना केली आणि यमराजापासून वाचण्यासाठी दूर कुठेतरी नेण्याची विनंती केली. गरुडदेवाला त्यांची दया आली. त्याने पक्ष्यांना आपल्या पाठीवर बसवून दूरवर हिमालयात नेऊन सोडले आणि ते परत आले. सभा संपल्यावर यमराज बाहेर आले. त्यांना झाडावर पक्षी दिसले नाहीत. त्यामुळे त्यांनी गरुडाकडे विचारणा केली. गरुडदेवाने सत्यवदन करत सांगितले की, पक्षी तुम्हाला पाहून घाबरले होते. म्हणून मी त्यांना हिमालयात सोडून आलो. यमराज म्हणाले, “बरे केले. मी विचारच करत होतो की त्यांचा मृत्यू हिमालयात होणार आहे. तर ते इथे काय करत आहेत? ज्यांचा मृत्यू जिथे नियत आहे तिथेच होईल. तो कोणीही टाळू शकत नाही.”
भगवंत अर्जुनाला हेच सांगत आहेत की, माझ्या मुखात प्रवेश करणारे तुझ्या शत्रुपक्षातील योद्धे समाप्त होणार आहेत. तू त्यांना मारले नाहीस तरीही हे घडणार आहे कारण त्यांचा काळ समीप आला आहे. त्यामुळेच तू कर अथवा करू नकोस, जे जे नियत आहे ते ते घडणारच आहे असे भगवंतांनी अर्जुनाला स्पष्टपणे सांगितले.
श्री भगवानांनी आपल्या सर्वांसाठीही हे सांगितले आहे. जर आपण भगवंतांनी सांगितलेल्या श्रीमद्भगवद्गीतेच्या उपदेशानुसार कार्यरत राहिलो तर आपल्याला निश्चित यश मिळणार आहे.
भगवंतांचे विश्वरूप पाहून आणि भगवंतांचे हे कथन ऐकून अर्जुनाची काय अवस्था झाली होती? पुढील श्लोकात संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत.
सञ्जय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं(ङ्) केशवस्य,
कृताञ्जलिर्वेपमानः(ख्) किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं(म्),
सगद्गदं(म्) भीतभीतः(फ्) प्रणम्य ॥11.35॥
संजय म्हणाला, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरुनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करुन भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला.
(सञ्जय उवाच केशवस्य एतत् वचनम् श्रुत्वा) संजय म्हणाले, “केशवांचे हे वचन ऐकल्यावर (किरीटी कृताञ्जलिः वेपमानः नमस्कृत्वा भूयः एव भीतभीतः प्रणम्य कृष्णम् सगद्गदम् आह) किरीटी अर्जुन हात जोडून कापत कापत नमस्कार करून पुनःसुद्धा अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णाला गद्गद वाणीने म्हणाला,”
संजय वर्णन करताना सांगत होता, “यामुळे अर्जुनाचा अहंकार नष्ट झाला. त्याने हात जोडून भयकंपित होत भगवंतांना पुनः पुन्हा नमस्कार केला. त्याला काही शब्दच सुचत नव्हते.”
संजय वर्णन करताना सांगत होता, “यामुळे अर्जुनाचा अहंकार नष्ट झाला. त्याने हात जोडून भयकंपित होत भगवंतांना पुनः पुन्हा नमस्कार केला. त्याला काही शब्दच सुचत नव्हते.”
येथे अर्जुनाला किरीटी म्हटले आहे कारण अर्जुनाला हा मुकुट इंद्राने दिला होता. अर्जुन अत्यंत भयभीत होऊन भगवान श्रीकृष्णांना पुढच्या श्लोकात म्हणतो,
अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या,
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति,
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा:॥11.36॥
अर्जुन म्हणाला, हे अन्तर्यामी! आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करु लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय.
(अर्जुन उवाच हृषीकेश स्थाने तव प्रकीर्त्या जगत् प्रहृष्यति च अनुरज्यते) अर्जुन म्हणाला, “हे अंतर्यामी श्रीकृष्णा, योग्य ठिकाणी तुमच्या नाम-गुण आणि प्रभाव यांच्या कीर्तनाने जग अतिहर्षित होत आहे आणि अनुरागसुद्धा प्राप्त करून घेत आहे, तसेच (भीतानि रक्षांसि दिशः द्रवन्ति च सर्वे सिद्धसङ्घाः नमस्यन्ति) भयभीत राक्षसलोक दिशादिशात पळू लागले आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय नमस्कार करीत आहेत.
भगवंतांचे रौद्ररूप बघून कोण घाबरतात आणि कोण हर्षभरीत होतात? ज्यांच्या मनात दानवी प्रवृत्ती आहे किंवा जे अज्ञानी आहेत ते घाबरून पळून जातात. पण योग्य ठिकाणी भगवंतांच्या नावाने लोक हर्षभरित होतात. भगवंत आपल्या हृदयातच वसलेले आहेत, ज्यांनी त्यांना ओळखले, ते भगवंतांच्या रौद्ररूपालाही नमस्कार करतात. नरसिंह अवतार बघून हिरण्यकश्यपू घाबरला असला तरी पण भक्त प्रल्हाद आनंदित झाला होता. भगवंताच्या नावाचा महिमा जिथे असतो, तिथे राक्षसी वृत्ती थांबत नाही. त्यामुळेच अर्जुन भगवंताचे स्तोत्र म्हणजे स्तुती गात आहे.

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्,
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे।
अनन्त देवेश जगन्निवास,
त्वमक्षरं(म्) सदसत्तत्परं(म्) यत्॥11.37॥
हे महात्मन! ब्रह्मदेवाचेही आदिकारण आणि सर्वांत श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता! हे देवाधिदेवा! हे जगन्निवासा! जे सत्, असत् व त्यापलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदघन ब्रह्म आहे, ते आपणच आहात.
(महात्मन् ब्रह्मणः अपि आदिकर्त्रे च गरीयसे ते कस्मात् न नमेरन्) हे महात्मन ब्रह्मदेवाचासुद्धा आदिकर्ता आणि सर्वात मोठा अशा तुम्हाला ते कसा बरे नमस्कार करणार नाहीत? कारण (अनन्त देवेश जगन्निवास यत् सत् असत् (च) तत्परम् अक्षरम् (तत्) त्वम्) हे अनंता! हे देवेशा! हे जगन्निवासा! जे सत, असत आणि त्यांच्या पलीकडे अक्षर म्हणजे सच्चिदानंदघन ब्रह्म आहे ते तुम्हीच आहात.
ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली परंतु तेच ब्रह्मदेव भगवंतांच्या नाभीकमलातून जन्मलेले आहेत, त्यामुळे भगवंत ब्रह्मदेवांचेही निर्माते आहेत. म्हणूनच भगवंत सर्वश्रेष्ठ आहेत.
स्थळ आणि काळ बदलल्यावरही जसेच्या तसे रहाते ते 'सत्' असते, तर जे परिवर्तनशील आहे (ज्यात प्रत्येक क्षणी बदल होत असतो) ते असत् असते. ही सृष्टी सदैव बदलत असते. सारे ग्रह, तारे परिक्रमा करत आहेत. मानवी शरीरात देखील प्रत्येक क्षणी बदल घडतात. जुन्या पेशी मरून नवीन जन्माला येतात. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे.
आपल्या आजूबाजूला बाकी सर्व गोष्टी बदलत असतात. आपण एका जागी स्थिर बसलेलो असतो तरी पृथ्वी फिरत आहे. त्यामुळे प्रत्यक्षात आपण स्थिर नसतो. आपल्या शरीरातील पेशीही सतत मृत होत असतात आणि नव्या पेशी जन्माला येत असतात. त्यामुळे आपले शरीरही सतत बदलत असते. एका पाश्चिमात्य तत्त्वज्ञाचे एक फार सुंदर वाक्य आहे. You cannot wash your hands in the same river again. नदीचे पाणी सतत वाहत असते. त्यामुळे त्याच नदीच्या त्याच पाण्यात पुन्हा पुन्हा हात धुता येत नाहीत.

या सृष्टीत बदल हीच गोष्ट नित्य आहे. आत्मतत्त्व मात्र बदलत नाही. ते सत् असते. भगवंत सत् आणि असत् दोन्ही आहेत. शिवाय सत् आणि असत् यांच्याही परे असलेले कधीही क्षर न पावणारे परम ब्रह्म आहेत.
त्वमादिदेवः(फ्) पुरुषः(फ्) पुराण:(स्),
त्वमस्य विश्वस्य परं(न्) निधानम्।
वेत्तासि वेद्यं(ञ्) च परं(ञ्) च धाम,
त्वया ततं(म्) विश्वमनन्तरूप॥11.38॥
आपण आदीदेव आणि सकाम पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच. परमधामही आपणच आहात. हे अनंतरुपा! आपण हे सर्व विश्व व्यापले आहे.
(आदिदेवः (च) पुराणः पुरुष: त्वम्) आदिदेव आणि सनातन पुरुष तुम्ही आहात. (अस्य विश्वस्य परम् निधानम् त्वम्) या जगाचे परम आश्रय तुम्ही आहात (च वेत्ता च वेद्यम् (च) परम् धाम असि) आणि जाणणारा तसेच जाणण्यास योग्य आणि परम धाम तुम्ही आहात. (अनन्तरूप विश्वम् त्वया ततम्) हे अनंतरूपा, हे सर्व जग तुमच्याकडून व्याप्त म्हणजे परिपूर्ण आहे.
सातव्या अध्यायात भगवंतांनी पुरुष आणि प्रकृति यामधील भेद स्पष्ट करून सांगितला आहे. येथे पुरुष म्हणजे पूर्वमेव आसि स पुरुष:। पूर्वीपासूनच आहे तो पुरुष किंवा पुरी शेते इति पुरुषः। जे शरीरात निवास करते ते सनातन असे चैतन्यतत्त्व म्हणजे पुरुष! भगवंत असे सनातन पुरुष आहेत.
भगवंतच संपूर्ण विश्वाचे आश्रयस्थान आहेत. हे संपूर्ण विश्व परमेश्वराच्या आश्रयाने राहत आहे. आपण पृथ्वीच्या आश्रयाने राहत असतो. परंतु पृथ्वी अवकाशात अधांतरी लटकत आहे. ती परमात्म्याच्या आश्रयाने राहते. वैज्ञानिक म्हणतात ती सूर्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे राहते. पण मग प्रश्न येतो की सूर्य कोणाच्या आश्रयाने राहतो? तसेच या असंख्य आकाशगंगा आहेत त्या कोणाच्या आश्रयाने राहतात? हे सर्व परमात्म्याच्या आश्रयाने राहतात. भगवंतांना भगवंतच जाणू शकतात. तसेच ज्यांना जाणले पाहिजे तेही भगवंतच आहेत. सागराची खोली कदाचित मोजता येईल मात्र आकाश किती अथांग आहे हे केवळ आकाशच जाणते. परमात्मा कसा आहे, किती मोठा आहे, कुठे आहे हे परमात्माच जाणतो. त्याला तत्त्वतः जाणण्यासाठी त्याच्यासोबत एकरूप व्हावे लागेल. त्याच्या कार्यात एक साधन बनून त्याच्याशी एकरूपता साधता येते. म्हणूनच योगसाधनेचे महत्त्व आहे, योगाचा अर्थच मुळी परमात्म्याशी एकरूपता असा आहे. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा अशा योग साधनेतून आत्मसंयम साधत समाधी अवस्थेप्रत जात परमात्म्याशी एकरूप होणे हाच योग आहे.
ईश्वरचरणी वंदन करून हे विवेचन ईश्वरालाच अर्पण करून विवेचन समाप्त झाले.
प्रश्नोत्तर सत्र
प्रश्न
गौरी जी:- त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींना आपण कसे समजून घ्यावे? जर सर्व काही भगवंताच्या दैवी इच्छेचा भाग असेल तर अशा आपत्तीजनक घटना का घडतात?
उत्तर:- या अध्यायातील शिकवण आपल्याला भौतिक जगाच्या नश्वरतेचा स्वीकार करण्यास आणि तत्त्वज्ञान आत्मसात करून घेण्यास मार्गदर्शन करतात. त्सुनामी, भूकंप आणि वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती मानवी नियंत्रणाबाहेरील निसर्गाच्या आत्यंतिक शक्तींचे प्रकटीकरण आहेत. भगवद्गीता आपल्याला भीती किंवा निराशेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यात लवचिकता विकसित करण्यास आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते.
प्रश्न
रुक्मिणी जी:- देव किंवा देवी ‘अंगात येते’ असे म्हणतात, या प्रकारात काही तथ्य आहे का?
उत्तर:- देव अंगात वेगळा येण्याची आवश्यकता आहे काय? देव आपल्यामध्ये आहेच. पण अज्ञानामुळे आपल्याला त्याचे दर्शन होत नाही. त्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली संपत्ती म्हणजे आपले ज्ञान आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी भगवद्गीता अंगामध्ये आणावी (तिच्यामधील ज्ञान आत्मसात करावे). ते ज्ञान आपल्या विचारांचा, शब्दांचा आणि कृतींचा अविभाज्य भाग बनू द्यावा. जेव्हा मन आध्यात्मिक अभ्यासाद्वारे शुद्ध आणि शिस्तबद्ध होते, तेव्हा आपल्यातील देवत्व आपल्याला उमजेल.
प्रश्न
उपेंद्रनाथ जी:- भगवद्गीता हे प्रत्यक्ष वर्णन आहे की नंतर केलेले कथन आहे?
उत्तर:- भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक पहा!
धृतराष्ट्र उवाच
यानंतर समापन प्रार्थनेने कार्यक्रमाची सांगता झाली.
||श्रीकृष्णार्पणमस्तु||

एकरूपता परमात्म्याशी, साधावी हो या उद्देशी
मुनिजन अवघे ध्यान लावीती, मांडूनी पद्मासन
करा हो नियमित योगासन
हे जनार्दन योगाभ्यासी मंडळाचे योगगीत आहे.
सर्वांना जाणणारे तसेच सर्वांकडून जाणण्यास योग्य आणि सर्वांचे परमधाम भगवंतच आहेत अशी अर्जुन स्तुती करत होता, करत राहिला. त्या स्तुतीचे पुढील श्लोकांमध्ये वर्णन आले आहे. तसेच मग त्याला जाणीव झाली की जे विश्वरूप मी पाहत आहे, जे सर्वत्र सर्वव्यापी आहे, तो तर माझा मित्र श्रीकृष्ण आहे. त्याच्यासोबत आपण कसा व्यवहार केला हे आठवून त्याचे भाव बदलले आणि तो काय म्हणाला ते ही पुढील विवेचनात जाणून घेऊ. आज इथेच विराम घेऊ या.
सर्वांना जाणणारे तसेच सर्वांकडून जाणण्यास योग्य आणि सर्वांचे परमधाम भगवंतच आहेत अशी अर्जुन स्तुती करत होता, करत राहिला. त्या स्तुतीचे पुढील श्लोकांमध्ये वर्णन आले आहे. तसेच मग त्याला जाणीव झाली की जे विश्वरूप मी पाहत आहे, जे सर्वत्र सर्वव्यापी आहे, तो तर माझा मित्र श्रीकृष्ण आहे. त्याच्यासोबत आपण कसा व्यवहार केला हे आठवून त्याचे भाव बदलले आणि तो काय म्हणाला ते ही पुढील विवेचनात जाणून घेऊ. आज इथेच विराम घेऊ या.
ईश्वरचरणी वंदन करून हे विवेचन ईश्वरालाच अर्पण करून विवेचन समाप्त झाले.
प्रश्नोत्तर सत्र
प्रश्न
गौरी जी:- त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्तींना आपण कसे समजून घ्यावे? जर सर्व काही भगवंताच्या दैवी इच्छेचा भाग असेल तर अशा आपत्तीजनक घटना का घडतात?
उत्तर:- या अध्यायातील शिकवण आपल्याला भौतिक जगाच्या नश्वरतेचा स्वीकार करण्यास आणि तत्त्वज्ञान आत्मसात करून घेण्यास मार्गदर्शन करतात. त्सुनामी, भूकंप आणि वादळे यासारख्या नैसर्गिक आपत्ती मानवी नियंत्रणाबाहेरील निसर्गाच्या आत्यंतिक शक्तींचे प्रकटीकरण आहेत. भगवद्गीता आपल्याला भीती किंवा निराशेवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्यात लवचिकता विकसित करण्यास आणि वर्तमानावर लक्ष केंद्रित करण्यास प्रोत्साहित करते.
या घटना का घडतात यावर प्रश्न विचारण्याऐवजी, गीता आपल्याला हे विचारण्यास शिकवते की या क्षणी आपले कर्तव्य काय आहे? जर आपण सुरक्षित अवस्थेत असलो, तर आपण पीडितांना कशी मदत करू शकतो? जर आपल्याला दुखापत झाली असेल तर आपण आपले आत्मबल कसे राखू शकतो?
"चरैवेती चरैवेती" (पुढे चालत राहा) हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की जीवन सतत बदलत असते. जगाच्या क्षणभंगुर स्वरूपाचा स्वीकार करा, तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा आणि अढळ श्रद्धेने पुढे जा.
प्रश्न
रुक्मिणी जी:- देव किंवा देवी ‘अंगात येते’ असे म्हणतात, या प्रकारात काही तथ्य आहे का?
उत्तर:- देव अंगात वेगळा येण्याची आवश्यकता आहे काय? देव आपल्यामध्ये आहेच. पण अज्ञानामुळे आपल्याला त्याचे दर्शन होत नाही. त्यासाठी आपल्याला आवश्यक असलेली संपत्ती म्हणजे आपले ज्ञान आणि ते ज्ञान मिळवण्यासाठी भगवद्गीता अंगामध्ये आणावी (तिच्यामधील ज्ञान आत्मसात करावे). ते ज्ञान आपल्या विचारांचा, शब्दांचा आणि कृतींचा अविभाज्य भाग बनू द्यावा. जेव्हा मन आध्यात्मिक अभ्यासाद्वारे शुद्ध आणि शिस्तबद्ध होते, तेव्हा आपल्यातील देवत्व आपल्याला उमजेल.
जयतु जयतु गीता वाङ्गमयी कृष्णमूर्ति।
श्रीमद्भगवद्गीता हे भगवंतांचे वाङ्गमयीन रूप आहे, वैदिक ज्ञानाचे मूर्त स्वरूप आहे, जे साधकांना मुक्तीकडे घेऊन जाते. ते ज्ञान आपले मार्गदर्शक प्रकाश असू द्यावे.
प्रश्न
उपेंद्रनाथ जी:- भगवद्गीता हे प्रत्यक्ष वर्णन आहे की नंतर केलेले कथन आहे?
उत्तर:- भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील पहिला श्लोक पहा!
धृतराष्ट्र उवाच
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः।
मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय॥१-१॥
येथे किम् अकुर्वतमध्ये, अकुर्वत हा भूतकाळातील शब्द आहे. धृतराष्ट्राने विचारले की माझ्या आणि पांडूच्या मुलांनी काय केले? ते मला सांग. संजयने युद्धभूमीवर घडलेल्या सर्व गोष्टी धृतराष्ट्राला सांगितल्या. धृतराष्ट्राने जे विचारले आहे आणि संजयने जे सांगितले ते भूतकाळात घडलेल्या घटनांचे वर्णन आहे. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद महर्षी वेदव्यास यांनी लिहून ठेवला होता. आधी झालेला संवाद आपल्याला वेद व्यासांनी भगवद्गीतेच्या रूपात दिला आहे.
कथन भूतकाळापासून सुरू झाले आणि नंतर वर्तमानात गेले. संजयने धृतराष्ट्राला सरळ गोष्ट सांगितली आहे. मात्र सर्वात शेवटी संजयने असे म्हटले की जिथे भगवान श्रीकृष्ण उपस्थित आहेत आणि धनुर्धर अर्जुन उपस्थित आहे तिथे विजय निश्चित आहे. संजयने युद्ध संपण्यापूर्वीच हे सांगितले होते, म्हणून हे विधान वर्तमानातील होते.