विवेचन सारांश
महती जाणा दानाची आणिक व्याख्या 'ॐ तत् सत्' ची
दीपप्रज्वलन आणि सुमधुर प्रार्थना यासह विवेचन सत्राची सुरुवात झाली.
आपल्या मनाला प्रसन्न ठेवणे याला भगवंतांनी 'मनाचे तप' म्हटले आहे हे मागील विवेचनसत्रात आपण पाहिले. हे तप कोण कोणत्या प्रकारे आपण करू शकतो हे आपण पाहिले. तसेच आपली वाणी कशी असावी, शारीरिक तप कसे असले पाहिजे हेही पाहिले. सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारच्या तपांचे शारीरिक, मानसिक आणि वाचिक यातील रूपात भगवंतांनी केलेले वर्णन पाहिले.
भगवंतांच्या मंगलमय आणि असीम अशा कृपेमुळे आपला भाग्योदय झाला आहे. आपण आपले मानवी जीवन सुफल करण्यासाठी, जीवनाचे परमोच्च लक्ष्य गाठण्यासाठी भगवद्गीता शिकण्यास, शिकवण्यास आणि त्यातील तत्वे जीवनात आचरणात आणण्यास सुरुवात केली आहे. आपले या जन्मीचे अथवा पूर्वजन्माचे पुण्य किंवा आपल्या पूर्वजांचे पुण्यफळ अथवा एखाद्या जन्मात झालेली संत महात्म्याची कृपादृष्टी यामुळेच हे शक्य झाले आहे. भगवद्गीतेचे अध्ययन करणे ही गोष्ट आपण निवडलेली नसून भगवद्गीतेने आपली निवड केली आहे यावर आपण नेहमीच आढळ विश्वास ठेवला पाहिजे.
भगवद्गीते समान दुसरा कोणताही कल्याणकारी ग्रंथ नाही. गीताप्रेसचे संस्थापक परम श्रद्धेय जयदयाळजी गोयंदका म्हणतात, "अनेक शास्त्रांचे अवलोकन केल्यानंतर आणि महापुरुषांची वचने ऐकल्यानंतर जगात श्रीमद्भगवद्गीतेसारखा कल्याणकारी दुसरा कुठलाही ग्रंथ नाही या निर्णयाप्रत मी आलो आहे."
भगवद्गीते समान दुसरा कोणताही कल्याणकारी ग्रंथ नाही. गीताप्रेसचे संस्थापक परम श्रद्धेय जयदयाळजी गोयंदका म्हणतात, "अनेक शास्त्रांचे अवलोकन केल्यानंतर आणि महापुरुषांची वचने ऐकल्यानंतर जगात श्रीमद्भगवद्गीतेसारखा कल्याणकारी दुसरा कुठलाही ग्रंथ नाही या निर्णयाप्रत मी आलो आहे."
आपल्या मनाला प्रसन्न ठेवणे याला भगवंतांनी 'मनाचे तप' म्हटले आहे हे मागील विवेचनसत्रात आपण पाहिले. हे तप कोण कोणत्या प्रकारे आपण करू शकतो हे आपण पाहिले. तसेच आपली वाणी कशी असावी, शारीरिक तप कसे असले पाहिजे हेही पाहिले. सात्विक, राजस आणि तामस अशा तीन प्रकारच्या तपांचे शारीरिक, मानसिक आणि वाचिक यातील रूपात भगवंतांनी केलेले वर्णन पाहिले.
आता पुढील विसाव्या श्लोकापासून भगवंत दानाचे वर्णन करण्यास सुरुवात करीत आहेत.
17.20
दातव्यमिति यद्दानं(न्), दीयतेऽनुपकारिणे|
देशे काले च पात्रे च, तद्दानं(म्) सात्त्विकं(म्) स्मृतम्||17.20||
दान देणेच कर्तव्य आहे', ह्या भावनेने जे दान देश, काळ आणि पात्र मिळाली असता उपकार न करणाऱ्याला दिले जाते, ते दान सात्विक म्हटले गेले आहे.
धर्माच्या चार चरणांचे वर्णन करताना गोस्वामी तुलसीदास लिहितात,
प्रगट चारि पद धर्म के कलि महुँ एक प्रधान।
जेन केन बिधि दीन्हें दान करइ कल्यान॥
भावार्थ- धर्माचे भागवतात वर्णन केलेले सत्य, दया, तप आणि दान हे चार चरण प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये कलियुगात दानरूपी चरणच सर्वात प्रमुख आहे कोणत्याही स्वरूपात दिले गेलेले दान हे कल्याणकारीच आहे.
सत्ययुगात धर्माचे वरील चारही चरण अस्तित्वात असतात.
त्रेतायुगात सत्याचा ऱ्हास होतो परंतु उर्वरित तिन्ही चरण अस्तित्वात असतात.
द्वापारयुगात सत्य आणि दया या दोन्हीचा ऱ्हास होतो आणि तप व दान शिल्लक राहते.
कलियुगात तपाचाही ऱ्हास होतो आणि धर्माचा केवळ एकच चरण (दान) शिल्लक राहतो.
म्हणूनच मनुस्मृतीत म्हटले आहे,
दानमेकं कलौ युगे
कलियुगात दान हे धर्माचे एकमेव पद आहे.
आपल्याकडे धर्मशतक नावाचा एक अतिशय सुंदर ग्रंथ आहे. यातील चतुरांशातील २५ प्रकारची दाने आपण पाहूयात.
अर्थदान- दानाच्या रूपातील सर्वात प्रचलित असलेले दान. यात सोने, चांदी यांच्या दानांचाही समावेश होतो.
भूमीदान- मंदिर, विद्यालय, इस्पितळ बांधण्यासाठी, एखाद्या संस्थेचे कार्य करण्यासाठी दान केलेली जमीन म्हणजे भूमी दान.
अन्नदान- याला महादान म्हणतात. या दानासाठी कोणीही कुपात्र नाही. बाकीच्या दानांबद्दल मात्र देश, काल आणि पात्रता या तीन गोष्टींचा विचार करावा लागतो. कोणत्याही भुकेल्या व्यक्तीला आपण हे दान देऊ शकतो. एखादी व्यक्ती कितीही वाईट, गुंड प्रवृत्तीची असली तरी ती अन्न आणि औषधे यासाठी पात्र असते. अशी व्यक्ती उपाशी असेल तर तिला अन्नदान केले पाहिजे.
वस्त्रदान- अमावस्या, एकादशी अथवा पर्वकाळी ब्राह्मणांना, गरिबांना वस्त्रदान करू शकतो.
प्राणदान- हे दान केवळ राजा देऊ शकतो.
यशाचे दान- आपण काम करून त्याचे श्रेय दुसऱ्याला देणे हे यशाचे दान आहे.
प्रसन्नतेचे दान- दुसऱ्याला भेटताना चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवून भेटण्याने, त्याच्याशी सकारात्मक बोलण्याने प्रसन्नतेचे दान होते. यामुळे ती व्यक्तीही प्रसन्न होते. यासाठी धन अथवा वेळ आवश्यक नसते.
अधिकाराचे दान- जिथे जिथे आपल्या अधिकार आहे ते दुसऱ्यांना देणे म्हणजे अधिकाराचे दान. याने जीवन सुखकारक होते, पारिवारिक संबंध मधुर होतात, संघर्ष टळतात, प्रेमभावना वाढते.
प्रज्ञाचक्षु स्वामी शरणानंदजी महाराज या शतकातील सर्वश्रेष्ठ चिंतकांपैकी एक आहेत. ते म्हणतात, "जर तुम्हाला नेहमीच प्रेम आणि उत्तम परिवार पाहिजे असेल तर 'दुसऱ्याच्या अधिकाराचे रक्षण आणि स्वतःच्या अधिकाराचा त्याग' हे एकमेव सूत्र पाळले पाहिजे."
अधिकार मागण्याने पारिवारिक संबंध बिघडतात. अशा व्यक्तीपासून सर्वजण दूर राहतात. अधिकारांचा त्याग केल्याने नातेवाईक आपल्या जवळ येतात आणि दृढ स्नेहबंध निर्माण होतात.
ज्ञानदान- गीता परिवारामध्ये १२००० स्वयंसेवक टेक्निकल असिस्टंट, ग्रुप कॉर्डिनेटर यासारख्या १३६ विभागांमधून, पडद्याच्या पाठीमागे राहून, निष्काम भावाने ज्ञानदान करत आहेत. याच्या बदल्यात त्यांना 'धन्यवाद' असे बोलणेही अपेक्षित नसते. ते केवळ सेवाभावाने काम करत असतात.
भक्तीचे दान- दुसरी व्यक्ती आपल्याला भेटल्यानंतर आपण 'जय श्रीकृष्ण' किंवा 'राम राम' असे म्हणतो. त्यामुळे त्या व्यक्तीलाही प्रत्युत्तरादाखल तसे म्हणावे लागते. हे भक्तीचे दान होय. दुसऱ्याला आपल्याबरोबर सत्संगाला अथवा मंदिरात घेऊन जाणे, भगवद्गीतेचा अभ्यास करावयास उद्युक्त करणे हे भक्तीचे दान आहे.
संतोषदान- आपल्याकडे जे आहे त्यात संतुष्ट राहणे आणि एखादी व्यक्ती आपल्याला काही देऊ इच्छित असेल तर त्याला शांततेने आणि सन्मानाने नकार देणे म्हणजे संतोषाचे दान.
विद्यादान- आपण प्राप्त केलेल्या विद्येचे दान. उदाहरणार्थ, टेक्निकल असिस्टंट आपल्याकडील तंत्र विद्येचे दान करतात.
मंत्रदान- विविध प्रसंगी म्हणावयाच्या मंत्रांचे दान.
दीक्षादान- हे दान सद्गुरु आपल्या शिष्याला देतात.
पुत्रदान- जगाच्या कल्याणासाठी आपल्या पुत्राला संन्यासी बनवणे, गुरुला दान देणे अथवा कुठल्या तरी सेवेसाठी समर्पित करणे म्हणजे पुत्रदान.
कन्यादान- कन्येच्या विवाहाच्या वेळी आपण कन्येला तिच्या गोत्राचे दान करतो.
दातव्यमुक्तीदान- एखाद्याने आपल्याकडून घेतलेले कर्ज माफ करणे म्हणजे दातव्यमुक्तीदान होय. हे अतिशय श्रेष्ठ दान आहे. परम श्रद्धेय शेठ जयदयाळजी म्हणत साधकाने कधीही कर्ज घेऊ नये. कारण कर्ज घेतल्यानंतर जर मृत्यू आला तर त्याला दुर्गती प्राप्त होते. तसेच कोणी आपल्याकडून कर्ज घेतले असेल आणि त्याची परतफेड करण्याची पात्रता नसेल तर ते कर्ज माफ करावे.
या संदर्भातील एक घटना ऐकण्यासारखी आहे.
बंगळुरूमधील एका परिवारातील एका तरुण मुलाला कॅन्सर झाला. त्याने स्वतःची अंतिम इच्छा म्हणून सर्वांना असे पत्र पाठवण्यास सांगितले की "ज्यांनी ज्यांनी माझ्याकडून कर्ज घेतले आहे त्यांचे कर्ज मी माफ केले आहे." तो म्हणाला, "मला पुढच्या जन्मी त्यांच्याकडून काहीही घेण्यासाठी परत यायचे नाही."
सत्कारदान- दुसऱ्याला मान सन्मान देणे हेही एक दानच आहे. हे दान घेणाऱ्या व्यक्तीच्या पद, परिस्थिती अथवा योग्यतेप्रमाणे न देता, आपल्या योग्यतेप्रमाणे आणि परिस्थितीप्रमाणे दिले पाहिजे. या प्रकारच्या दानामुळे आपले जीवन सुवर्णाप्रमाणे चमकते. अशी व्यक्ती यशस्वी आणि सर्वांची आवडती होते. उदाहरणार्थ, अगदी आपल्या घरी दूध घालण्यासाठी येणारा भैयाचाही आपण सन्मान केला पाहिजे.
आसनदान- आपण बसलेलो असताना समोर एखादी व्यक्ती उभी असेल तर आपण बसून राहणे चुकीचे आहे. उभी असलेली व्यक्ती जर आपल्यापेक्षा वयाने मोठी असेल तर असे करणे म्हणजे अपराध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर वर्णन केलेले सर्व मापदंड दुसऱ्यासाठी नसून आपल्या स्वतःसाठी आहेत हे सर्वप्रथम लक्षात ठेवले पाहिजे. म्हणजे आपण मोठे असताना आपल्याला सर्वांनी सर्वप्रथम बसावयास द्यावे अशी अपेक्षा ठेवू नये. दान घेण्यापेक्षा दान देण्याचा विचार केला गेला पाहिजे.
प्रेयदान- व्यक्तीला प्रिय असलेल्या वस्तूचे दान.
श्रेयदान- एखाद्या व्यक्तीला कल्याणकारक असलेल्या वस्तूचे दान त्याला देणे म्हणजे श्रेयदान होय. उदाहरणार्थ, भगवद्गीता देणे, जपमाळ देणे इत्यादी.
सुखाचे दान- ज्या व्यक्तीला ज्यापासून सुख प्राप्त होते त्याचे दान देणे.
ब्रह्मदान- हे दान सद्गुरु देऊ शकतात.
रामचरितमानस मध्ये प्रभू श्रीराम म्हणतात,
मम दरसन फल परम अनूपा।
जीव पाव निज सहज सरूपा॥
भावार्थ- माझ्या दर्शनाचे अत्यंत अनुपम फळ हे आहे की जीवाला आपले सहज स्वरूप प्राप्त होते.
परमदान- अंतिम श्वास घेत असलेल्या व्यक्तीस भगवंतांचे नाम संकीर्तन ऐकवणे, भगवद्गीता, रामायण यासारखे ग्रंथ ऐकवणे हे शेवटचे पंचविसावे आणि अतिशय महत्त्वाचे दान आहे. यामुळे त्या व्यक्तीचे मन भगवत चरणी लागते. याहून श्रेष्ठ दान दुसरे कोणतेही नाही.
'दान करणे हे माझे कर्तव्य आहे', या भावनेने (अनुपकारणे) दिले गेलेले दान सात्विक असते. दुसऱ्यावर उपकार करण्याच्या भावनेने केलेले दान राजस असते. ज्याच्याकडे 'कमी' आहे त्याला आवश्यकतेनुसार देता यावे म्हणूनच भगवंतांनी मला 'जास्त' दिले आहे अशी भावना आपल्यामध्ये असली पाहिजे. बृहस्पतीनीतीनुसार आपल्या उत्पन्नाचा दशमांश म्हणजे दहावा भाग दान करावा असे सांगितले आहे. उदाहरणार्थ आपले वार्षिक उत्पन्न एक लाख असेल तर आपण दहा हजार रुपये दान करावे. नातेवाईकांना केलेली मदत ही दान ठरत नाही. शुक्रनीतीमध्ये आपल्या उत्पन्नाचा २०% हिस्सा दान करावा असे म्हटले आहे. दान दिल्यानंतर त्या बदल्यात आपल्याला काय मिळेल याचा विचार करणे योग्य नाही. असा विचार दानाची सात्विकता नष्ट करतो.
दान देताना देश, काल, पात्र यांचा विचार केला पाहिजे असे भगवंत म्हणतात.
देश- कोणत्या ठिकाणी दान द्यावे? - उदाहरणार्थ कुंभ स्नानासाठी जाऊन केलेले दान.
काल - कोणत्या समयी दान द्यावे? - उदाहरणार्थ कोरोना सारख्या महामारीच्या काळात केलेले अन्न आदींचे दान.
पात्र - कोणाला दान द्यावे? आपण दिलेल्या दानाचा सदुपयोग करणाऱ्या व्यक्तीला किंवा त्या दानाची आवश्यकता असलेल्या व्यक्तीला दान द्यावे. धर्मनीतीच्या उपदेशात आज्ञा केल्याप्रमाणे त्या त्या व्यक्तींना दान द्यावे.
संत म्हणतात आपल्या दिवसातील २१६०० श्वासांपैकी दहा टक्के श्वास म्हणजे २१६० श्वास किंवा २ तास २५ मिनिटांचा काळ भगवंतांच्या स्मरणासाठी दान केला पाहिजे.
आपल्या योग्यतेनुसार दान केले पाहिजे.
एकदा एका राज्यात दुष्काळ पडला. धार्मिक, सात्विक आणि प्रजाहितदक्ष राजाने कुलगुरूंच्या सल्ल्याप्रमाणे एक हजार कुंडांचा विशाल यज्ञ आयोजित करण्याबद्दल राज्यात दवंडी पिटवली. त्या यज्ञामुळे देवता प्रसन्न होऊन पावसाचा वर्षाव करतील असे सर्वांचे मत होते. भव्य यज्ञासाठी राजकोषातून व्यवस्था केली जाणार होती. यज्ञाच्या आयोजनात मदतीसाठी प्रजादेखील हिरीरीने पुढे आली. मोठ्या व्यापार्यांनी आपल्याकडील संपत्ती यज्ञासाठी देऊ केली. इतर लोक अन्य सेवा देण्यासाठी पुढे आले. महिनाभराच्या यज्ञानंतर त्याच्या पूर्णाहुतीला पावसाचा वर्षाव होऊन यज्ञ सफल झाला. यज्ञभूमीवरील महिन्याभराच्या मुक्कामानंतर प्रसाद घेऊन वेगवेगळ्या गावातून जमलेले लोक एकत्रित परतू लागले. भर दुपारची वेळ होती. त्या जमावातील एका साधूला असे जाणवले की, आजूबाजूला ऊन आहे मात्र एक ढग आपल्या डोक्यावर सावली देत आपल्यासोबत येत आहे. आपल्या समूहातील कोणाच्यातरी सेवेवर यज्ञदेवता प्रसन्न झाले असतील असे त्यांनी सर्वांना सांगितले.
साधू असल्याने तुमच्याचमुळे असे होत असणार असे सर्व लोक म्हणाले. मात्र त्याची सत्यता बघण्यासाठी साधू महाराज जमावापासून लांब जाऊन उभे राहिले. त्यांच्या डोक्यावर ऊन होते कारण आकाशातला ढग जमावाच्याच डोक्यावर स्थिर होता. मग लोकांना वाटले की, ज्या व्यापार्याने सर्वात अधिक, पेटीभर सुवर्णाचे दान केले होते, त्याची पुण्याई असणार. लोकांच्या आग्रहाखातर तो देखील जमावापासून दूर उभा राहिला. मात्र ढग त्याच्या मागे आला नाही. हळूहळू लोक आपापल्या घरी परतू लागले. सुरवातीच्या शंभर दीडशे लोकांमधील मोजके काही शिल्लक राहिले. मात्र सावली देणारा ढग अजूनही त्यांच्या डोक्यावर होता. त्यांच्या मनात उत्कंठा जागृत झाली. आपल्यामध्ये कोण पुण्यशील आहे हे माहीत करून घेण्यासाठी त्यांनी एकेक करून गटापासून लांब उभे राहण्याचा प्रयोग केला.
शेवटी एक वृद्धाच शिल्लक राहिली. सर्वांच्या आग्रहावरून ती अनिच्छेनेच लांब जाऊन उभे राहिली. त्याबरोबर तो सावली देणारा ढग तिच्या डोक्यावर सरकला. वृद्धाच पुण्यशील आहे हे कळताच सर्वांनी तिला प्रणाम केला. तिने यज्ञात काय अर्पण केले असे साधू महाराजांनी तिला विचारले. भांबावून ती गरीब वृद्धा म्हणाली, “मला सांगताना देखील लाज वाटते. माझ्याजवळ काहीच नव्हते. मग काही तरी हातभार लागावा म्हणून घरातील एक फुटकी कवडी दान दिली. यज्ञस्थळी दिवसभर जे काम पडेल ते करून जो प्रसाद मिळत असे, तो अर्धा ग्रहण करून उरलेला प्रसाद यज्ञस्थळाबाहेरील पशुपक्ष्यांना मी खाऊ घालत असे. याव्यतिरिक्त मी काहीच केले नाही.” साधू म्हणाला, “फुटकी कवडी किंवा तुझ्या जेवणातला अर्धा हिस्सा एवढेच तुझे योगदान होते असा विचार करू नकोस. हा व्यापारी, ज्याने एक सुवर्ण पेटी दान केली, त्याच्या घरी अशा अजून शंभर पेट्या असतील मात्र तू तर तुझे सर्वस्व अर्पण केलेस. तुझ्याकडची एकमेव फुटकी कवडीही तू अर्पण केलीस. जेवण देखील अर्धे दान केलेस. यामुळे यज्ञनारायण प्रसन्न का होणार नाही?”
आपण किती दिले यापेक्षा आपण आपल्या पात्रतेप्रमाणे दिले की नाही हे महत्त्वाचे आहे. मंदिरात शेकडो हजारो रुपयांचे दान करणारे खूप असतात. पण त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीपैकी तो अगदी थोडा हिस्सा असतो. कुंभमेळ्यात १०० रुपयासाठी ब्राह्मणांशी भांडणाऱ्या श्रीमंतापेक्षा तेथे स्वतः अनवाणी चालत असताना ब्राह्मणाला ११, २१ रुपये दान देणाऱ्या गरीबाचे दान श्रेष्ठ असते. किती दान दिले यापेक्षाही दान देण्यामागची भावना जास्त महत्त्वाची असते.
यासंदर्भात गौतम बुद्धांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. ते भिक्षा मागण्यासाठी जात असत. गावात एक अतिशय भांडकुदळ वृद्ध स्त्री राहत होती. गावातील इतर लोक गौतम बुद्धांना भिक्षा देत परंतु ती स्त्री मात्र भगवान बुद्ध भिक्षा मागण्यासाठी येताच अद्वातद्वा बोलत असे. तरीही गौतम बुद्ध रोज तिच्याकडे भिक्षा मागण्यासाठी जात. शिष्यांनी त्यांना याचे कारण विचारले. भगवान बुद्ध म्हणाले, "तिचे वाईट साईट बोलणे घेण्यासाठीच मी तिच्याकडे जातो. सगळीकडे भिक्षा म्हणून अन्नच मिळाले पाहिजे असे नाही."
आठ दिवस सतत हा प्रकार चालू होता. नवव्या दिवशी गौतम बुद्ध भिक्षा मागण्यासाठी येताच घरातील चूल साफ करत असलेली ती वृद्धा अतिशय संतापली. तिने गौतम बुद्धांना भिक्षा म्हणून आपल्या चूलीतील राख दिली. ते पाहून भगवान बुद्ध अतिशय आनंदित झाले. त्यांचा आनंद पाहून शिष्य मात्र आश्चर्यचकित झाले. त्यांनी भगवान बुद्धांना त्यांचे आनंदाचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले, "काहीही झाले तरी आज राख देण्याच्या निमित्ताने का होईना, त्या वृद्धेचा हात तर वर उचलला गेला!" ते ऐकून ती वृद्ध स्त्री लज्जित झाली. तिचे डोळे उघडले. दुसऱ्या दिवशी भगवान बुद्ध भिक्षेसाठी येताच तिने त्यांना भिक्षा घातली.
'किती दिले' हे महत्त्वाचे नसते, तर आपल्या हाताला आणि स्वभावाला देण्याची सवय लागणे महत्त्वाचे असते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपण काहीतरी देत जावे. कोणाला प्रसन्नता, कोणाला स्वच्छता, तर कोणाला सत्कार द्यावा. वर सांगितलेल्या २५ दानांपैकी कोणते ना कोणते दान देत जावे.
कर्तव्यभावनेने, त्या बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता दान देत जावे.

यत्तु प्रत्युपकारार्थं(म्), फलमुद्दिश्य वा पुनः|
दीयते च परिक्लिष्टं(न्), तद्दानं(म्) राजसं(म्) स्मृतम्||17.21||
परंतु जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने किंवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते राजस दान म्हटले आहे.
या श्लोकात भगवंत राजस दानाबद्दल सांगतात.
काही कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा करायला दाराशी आलेल्या लोकांशी घासाघीस करून दिले गेलेले दान (परिक्लिष्ट- क्लेशपूर्वक दिलेले) राजस दान असते.
दानाच्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळावे या अपेक्षेने दिलेले दान (प्रत्युपकारार्थम्) राजस दान असते.
अर्थात, अजिबात दान न देणाऱ्या व्यक्तीपेक्षा अशा व्यक्तीने दिलेले दान श्रेष्ठ असते हेही लक्षात घेतले पाहिजे.
अदेशकाले यद्दानम्, अपात्रेभ्यश्च दीयते|
असत्कृतमवज्ञातं(न्), तत्तामसमुदाहृतम्||17.22||
जे दान सत्काराशिवाय किंवा तिरस्कारपूर्वक अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, ते दान तामस म्हटले गेले आहे.
गरीबाच्या अंगावर पैसे फेकून दिले गेलेले दान, आपल्या घरात काम करणाऱ्या कामवालीच्या अंगावर फेकून दान दिलेली साडी, दान घेणाऱ्याचा अपमान करून दिले गेलेले दान तामस दान ठरते.
गोस्वामी तुलसीदास जी म्हणतात,
“तुलसी पंछिन के पिये, घटे न सरिता नीर।
दान दिये धन ना घटे, जो सहाय रघुवीर”
भावार्थ- पक्ष्यांनी नदीचे पाणी प्यायल्याने नदीचे पाणी कमी होत नाही. त्याचप्रमाणे दान दिल्याने कधीही आपले धन कमी होत नाही. दान देणाऱ्या व्यक्तीला ईश्वराचे सहाय्यच मिळते.
पानी बाढ़े नाव में, घर में बाढ़े दाम।
दोऊ हाथ उलीचिए, यही सयानो काम ||
भावार्थ- ज्याप्रमाणे नावेमधे पाणी भरले तर ते काढून टाकले गेले पाहिजे त्याप्रमाणे घरात जर भरपूर पैसे आले तर ते दोन्ही हातांनी दान केले पाहिजेत हेच शहाण्या व्यक्तीचे लक्षण आहे.
कद ऊंचा तो कर लिया,ऊंचे रखो विचार ।
दान धर्म जो न किया,जीवन है बेकार ।।
भावार्थ- शारीरिक उंचीत वाढ होण्यापेक्षा वैचारिक उंची वाढवणे योग्य असते जीवनात दानधर्म न केल्यास संपूर्ण जीवन निरर्थक ठरते.
वर उल्लेख केलेल्या २५ दानांव्यतिरिक्त जे काही दान करणे आपल्याला शक्य असते ते ते करावे.
दूर जाऊन अनोळखी लोकांना दान देणे सोपे असते परंतु आपल्या जवळपासच्या, आजूबाजूच्या गरीब व्यक्तींना, घरातील काम करणाऱ्या कामवालीला दान देणे कठीण असते. कामवालीला साडी दान देताना तिने सुट्टी घेऊ नये अशी अपेक्षा असते किंवा साडी देण्याच्या बदल्यात तिच्याकडून जास्तीचे काम करून घेण्याची अपेक्षा असते.
ॐ तत्सदिति निर्देशो, ब्रह्मणस्त्रिविधः(स्) स्मृतः|
ब्राह्मणास्तेन वेदाश्च, यज्ञाश्च विहिताः(फ्) पुरा||17.23||
ॐ' , तत्, सत् अशी तीन प्रकारची सच्चिदानंदघन ब्रह्माची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत.
श्लोक क्रमांक २३,२४,२५ आणि २६ या चार श्लोकात भगवंतांनी 'ॐ तत् सत्' याची व्याख्या केली आहे. ॐकाराविषयीच्या पूर्ण माहितीसाठी खालील तक्ता अत्यंत उपयुक्त आहे.
ॐ- ॐ मूलतः वर्ण नाही. आपल्या शब्दांना ब्रह्म असे म्हटले आहे. अ, ऊ आणि म अशी तीन अक्षरे मिळून 'ॐ' हे अक्षर बनते. प्रणव, ब्रह्म, निर्गुण, सगुण, साकार, निराकार, ईश्वर, माया, ओंकार हे सर्व ॐ चे समानार्थी शब्द आहेत. मंदिरात घंटा वाजवल्यानंतर त्याचा नाद काही काळ तसाच राहतो आणि नंतर तो हळूहळू कमी होत नष्ट होतो. ॐचा उच्चार करतानाही 'म' या अक्षराचा ध्वनी असाच काही काळ राहून, हळूहळू कमी होऊन नष्ट होतो.
या संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचे प्रथम कारण हा ॐकार आहे.
बायबल मध्ये म्हटले गेले आहे, "In the beginning of the world there was only the word. Then the word is converted into the world. Word is hidden into the world."
आकाश हे पंचमहाभूतांमध्ये सर्वप्रथम येते. त्याची तन्मात्रा शब्द आहे. शब्दाची उत्पत्ती आघातापासून होते. आकाश आणि वायू यांच्या घर्षणापासून शब्द निर्माण होतो. आकाश आणि वायू यांच्या मंथनापासून जल निर्माण होते.
यात जेव्हा शब्दाची टक्कर होते तेव्हा अग्नी निर्माण होतो. अशाप्रकारे सर्व सृष्टीचे निर्माण होते.
ॐकारात अ, ऊ, म आणि हलन्त असे चार वर्ण आहेत.
१) अकार- अकार म्हणजे वैखरी. जो कंठानी बोलला जातो आणि जो बोललेला ऐकू येतो तो 'अकार' आहे. त्याचे रूप स्थूल असून त्याची देवता ब्रह्मा आहे.
२) उकार- उकार 'मध्यमा' मुळे होतो. त्याची उत्पत्ती हृदयापासून होते. आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी नेहमी वाणीच आवश्यक असते असे नाही. कधी कधी डोळ्यातील भाव सुद्धा 'बोलून' जातात. अनेकदा बोलण्यासाठी स्पर्शाचाही उपयोग केला जातो. उदाहरणार्थ एखादी व्यक्ती बोलत असताना केवळ तिचा हात दाबून तिला बोलणे थांबवण्याचे सांगितले जाते.
उकार हे सूक्ष्म रूप आहे.
३) मकार -याचे स्थान नाभी आहे, शब्द पश्यंती आहे. याच्या केवळ संकल्पनेनेच घटना घडतात. स्वामी रामतीर्थ नावाचे एक महान साधू जंगलात राहत होते. जंगलात त्यांना लिंबाचे सरबत पिण्याची इच्छा निर्माण झाली. इतक्यात एक श्रीमंत व्यक्ती पिशवीत लिंबू साखर आणि एक लोटा घेऊन येताना त्यांना दिसली. ते म्हणाले, "आज मला आपल्याला लिंबू सरबत पाजण्याची इच्छा निर्माण झाली." स्वामी रामतीर्थ म्हणाले, माझ्या मनात अनावश्यक असे भोगाचे संकल्प येतात. त्याचा त्रास दुसऱ्यांना होतो. यापुढे असे होऊ देता कामा नये. शेटजी गेल्यानंतर त्यांनी एक एक लिंबू उचलून गंगेमध्ये फेकले.
अशा प्रकारे केवळ संकल्पाने मकाराची सिद्धी होते. 'भगवद्गीता शिकण्याची इच्छा मनात येताच त्वरित वर्गाची लिंक यावी' हा मकार आहे. याची देवता शंकर असून स्थिती सुषुप्ति आहे.
४) हलन्त- याचा शब्द परा आहे. हा संकल्पाहून वेगळा आहे.
रामचरितमानसात तुलसीदास म्हणतात,
अनुभव गम्य भजहिं जेहि संता॥
जे केवळ अनुभवाने जाणून घेता येते आणि संत ज्याचे भजन करतात.
जेव्हा चांगदेव महाराज ज्ञानेश्वरांना भेटण्यासाठी वाघावर बसून आले तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी निर्जीव भिंतीला आदेश देऊन ती चालवली. ही परा स्थिती आहे. ही व्यापक आहे. तिची देवता ब्रह्म असून तुरीय स्थिती आहे.
ॐकार अत्यंत महत्त्वाचा आहे. तो सर्व शब्द आणि वर्णांपेक्षा प्राचीन आहे. हा शब्द, वर्ण आणि ब्रह्म आहे. या श्लोकात भगवंत म्हणतात, 'ॐ तत् सत्' असे तीन प्रकारच्या सच्चिदानंद ब्रह्माचे नाव आहे. भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवान वेद व्यासांनी लिहिलेली एक पुष्पिका येते. या पुष्पिकेत 'ॐ तत् सत् इति' असे लिहिले आहे. कोणतेही कार्य केल्यानंतर जर 'ॐ तत् सत्' असे म्हटले तर त्या कामात राहिलेली कमतरता देवता पूर्ण करतात. म्हणूनच सर्व संत महात्मे आपले प्रवचन पूर्ण करताना शेवटी 'ॐ तत् सत्' असे म्हणतात.
तस्मादोमित्युदाहृत्य, यज्ञदानतपः(ख्) क्रियाः|
प्रवर्तन्ते विधानोक्ताः(स्), सततं(म्) ब्रह्मवादिनाम्||17.24||
म्हणून वेदमंत्रांचा उच्चार करणाऱ्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेल्या यज्ञ, दान व तपरुप क्रियांचा नेहमी 'ॐ' या परमात्म्याच्या नावाचा उच्चार करुनच प्रारंभ होत असतो.
इंग्रजी वर्णमालेमध्ये A, B, C, D अशी २६ अक्षरे येतात. जर कोणी म्हणाले की मी केवळ H ला अक्षर मानतो इतरांना नाही तर ते मूर्खपणाचे ठरेल. त्याचप्रमाणे 'मी केवळ गणेशाला मानतो', 'मी केवळ शिवाला मानतो', 'मी केवळ दुर्गामातेला मानतो' असे म्हणणे योग्य नाही. गजेंद्रमोक्ष प्रसंगी जेव्हा गजेंद्राने प्रार्थना केली तेव्हा 'तत्' असा शब्द वापरला. तेथे 'विष्णू' असा शब्द नाही. परंतु तेव्हा भगवान विष्णू प्रकट झाले. कारण गजेंद्राच्या मनात 'तत्' हा शब्द उच्चारताना विष्णु भगवान यांचा विचार होता.
उपनिषदांनी 'तत्'ची व्याख्या केली.
अनेक उपनिषदांमध्ये पहिला मंत्र ॐ असतो.
'ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥
पूर्णामध्ये पूर्ण मिळवले तरीही पूर्ण राहते. पूर्णामधून पूर्ण काढून टाकले तरीही पूर्णच राहते.
त्याचप्रमाणे ॐ मधून काहीही काढले तरी ॐ राहते.
आपण ज्याची कल्पना करू तो आकार तत् होतो. तो निराकार असू शकतो अथवा साकार असू शकतो. तो गणेश, विष्णू, शिव, राम, कृष्ण, दूर्गा यापैकी ज्याला आपण मानत असाल तो तत् असतो. तत् म्हणजे त्या संपूर्णकडे इशारा करणारा संकेत आहे. भगवान शंकराचार्य म्हणतात,
एको ब्रह्म, द्वितीयो नास्ति
एकच ब्रह्म आहे दुसरे काहीही नाही.
सत्- सत् या शब्दाचे दोन अर्थ आहेत.
१) Everlasting - जो कधीही कमी जास्त होत नाही. ज्या स्थितीत असतो त्या स्थितीत कायम तसाच राहतो.
२) सत्य
'ॐ तत् सत्' हे म्हटल्यानंतर काहीही शिल्लक राहत नाही.
तदित्यनभिसन्धाय, फलं(म्) यज्ञतपः(ख्) क्रियाः|
दानक्रियाश्च विविधाः(ख्), क्रियन्ते मोक्षकाङ्क्षिभि:||17.25||
तत्' या नावाने संबोधिल्या जाणाऱ्या परमात्म्याचेच हे सर्व आहे, या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप व दानरुप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात.
17.25 writeup
सद्भावे साधुभावे च, सदित्येतत्प्रयुज्यते|
प्रशस्ते कर्मणि तथा, सच्छब्दः(फ्) पार्थ युज्यते||17.26||
सत्' या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था! उत्तम कर्मातही 'सत्' शब्द योजला जातो.
चांगल्या व्यक्तींसोबत बोलल्याने आपल्या मनात 'आज सत्संग घडला' अशी भावना निर्माण होते. चांगले कर्म केल्यावर आपण 'सत्कर्म' घडले असे म्हणतो. सर्व चांगल्या भावनांना आपण 'सत्' शी जोडू शकतो (सद्भावना).
यज्ञे तपसि दाने च, स्थितिः(स्) सदिति चोच्यते|
कर्म चैव तदर्थीयं(म्), सदित्येवाभिधीयते||17.27||
तसेच यज्ञ, तप व दान यांमध्ये जी स्थिती (आस्तिक बुद्धी) असते, तिलाही सत् असे म्हणतात आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने 'सत्' असे म्हटले जाते.
17.27 writeup
अश्रद्धया हुतं(न्) दत्तं(न्), तपस्तप्तं(ङ्) कृतं(ञ्) च यत्|
असदित्युच्यते पार्थ, न च तत्प्रेत्य नो इह||17.28||
हे अर्जुना! श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व 'असत्' म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत ना परलोकात.
श्रद्धेविना केले गेलेले दान, यज्ञ व तप फळ देत नाहीत. त्यामुळे असे कर्म लाभदायक ठरत नाही म्हणूनच प्रत्येक कर्मामध्ये श्रद्धा महत्वाची आहे. श्रद्धेशिवाय सत् सुद्धा असत् मध्ये बदलते.
यानंतर 'हरी शरणम्' च्या नामसंकीर्तनाने विवेचनाची सांगता झाली व प्रश्न उत्तर सत्रास सुरुवात झाली.
प्रश्न उत्तर
मलय भैय्या
प्रश्न- आपण अन्नदान करत असताना एखाद्याने मांसाहारी भोजन मागितले तर ते देता येईल का?
उत्तर - नाही त्याने पाप लागेल. अन्नदान हे फक्त क्षुधापूर्तीसाठी केले जाते चवीसाठी किंवा ऐषोआरामासाठी नाही.
प्रश्न- ॐ कारात अकारामध्ये ब्रह्मा उकारामध्ये विष्णू आणि मकारामध्ये महेश आहे असे विवेचनात सांगितले. याचा अर्थ काय?
उत्तर - आपल्याकडे प्रत्येक गोष्टीत एक अधिष्ठान देवता असते. त्याचप्रमाणे येथे प्रत्येक अक्षराची एक अधिष्ठान देवता आहे. ॐकारामध्ये चार वर्णांमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश आणि परब्रह्म परमात्मा या चार प्रकृतीच्या मूळ नियंता देवतांचे अधिष्ठान आहे. उत्पत्ती, स्थिती, लय आणि या प्रत्येक स्थितीच्या मधली स्थिती ॐकारात प्रतिष्ठित आहे.
मनोज भैय्या
प्रश्न- कोणी आपली प्रशंसा केल्यावर आपल्याला अहंकार येतो. त्याला कसे टाळावे?
उत्तर - प्रशंसा केल्यावर आपल्याला बरे वाटते हे सहाजिक आहे. कारण आपण गुणातीत अवस्थेला आता लगेच पोहोचू शकत नाही. पण अहंकार जास्त प्रमाणात नसावा आणि कोणी आपली प्रशंसा करावी म्हणून आपण ते काम करू नये. जास्त प्रमाणातला अहंकार राजस होतो आणि कमी प्रमाणातला सात्विक. आपल्या प्रशंसेत जास्त वेळ फसू नये. त्यावेळी आपण मनातल्या मनात 'ॐतत्सत्' असे म्हणू शकतो.
योगेश भैय्या
प्रश्न- जन्माला आलेल्या जीवाचा मृत्यू निश्चित आहे आणि त्यानंतर त्याच्या कर्मांनुसार पुनर्जन्म निश्चित आहे. तर मग मोक्षप्राप्ती कशी होईल?
उत्तर- मोक्ष केवळ मनुष्यजन्मात प्राप्त होऊ शकतो. ज्ञानमार्ग किंवा भक्तिमार्गाने आपल्या कर्मफळांना समाप्त केले तर मोक्षप्राप्ती होऊ शकते.
गीता देवकी दीदी-
प्रश्न- आंबवलेले अन्न कशा प्रकारचे असते?
उत्तर - ते राजस व तामस प्रकारचे असते. सात्विक नाही. आपल्या जीवनात संपूर्णपणे सात्विक पदार्थांचा समावेश असावा असे नाही. कधीतरी थोड्या प्रमाणात राजस आणि तामस पदार्थांचा समावेश असू शकतो.
नलिनी दीदी-
प्रश्न- व्रताचे उद्यापन करताना आपण सर्वांना भोजनासाठी आमंत्रित करतो. परंतु संकल्पासाठीचा आकडा मोजताना ब्राह्मण, कुमारिका आणि सवाष्ण यांचीच मोजणी करावी का?
उत्तर - होय.
प्रश्न- स्त्रियांनी ॐकाराचा जप करावा का?
उत्तर - ॐकाराचा उच्चार करण्यास हरकत नाही. परंतु जप करू नये.
राजकुमारी दीदी
प्रश्न- एखादी व्यक्ती आपल्याशी चुकीचा पद्धतीने वागली आणि ते आपल्या कुटुंबीयांना व नातेवाईकांना आपण सांगितले तर ती निंदा होईल का?
उत्तर - नाही. पण ती गोष्ट वारंवार सांगणे आणि त्याचे वर्णन करण्याचा आनंद घेणे ही मात्र निंदा होईल.
रेणू दीदी
प्रश्न- भगवद्गीतेचा कोणता अध्याय रोज पठण करावा?
उत्तर - आपल्याला जो आवडेल तो अध्याय आपण रोज पठण करू शकता.
मीनाक्षी दीदी
प्रश्न- गरिबांना लुटून गोळा केलेले धन दान केल्यास ते धन दान होते का?
उत्तर - नाही. त्याला दान मानले जात नाही.
समापन प्रार्थना व हनुमान चालीसा म्हणून विवेचनसत्राची सांगता झाली.
II श्रीकृष्णार्पणमस्तु II
II श्रीकृष्णार्पणमस्तु II