विवेचन सारांश
भगवंताचे उग्र विश्वरूप पाहून अर्जुनाची प्रार्थना
सत्राच्या सुरुवातीला हनुमान चालीसाचे पठण झाले. त्यानंतर परंपरेप्रमाणे दीपप्रज्वलन आणि आरंभीची प्रार्थना झाली.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः||
ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने |
प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम: ||
नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् |
पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमाळन्दिवल्लभम् ||
रत्नाकराधौतपदां हिमालय किरीटिनीम् ।
ब्रह्मराजर्षिरत्नाढ़यां वन्दे भारतमातरम् ।।
ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं
व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् ।
अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम्- अष्टादशाध्यायिनीम्
अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्- गीते भवद्वेषिणीम् ॥
नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र ।
येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः ।।

परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांच्या चरणी वंदन करून आणि सर्व गीताप्रेमी साधकांचे स्वागत करून आजच्या विवेचनाला सुरुवात झाली.
ज्या परमात्म्याचे दर्शन प्रत्येक जीवाला करायचे असते, जो परमात्मा विश्वाच्या प्रत्येक कणाकणात सामावलेला आहे त्याच्या विशेष अनुभूतीची स्थाने कोणती आहेत ती जाणण्याची अर्जुनाला इच्छा झाली. तसे त्याने भगवंताला विचारल्यावर भगवंतांनी त्याला अनेक विभूती सांगितल्या. तरीही अर्जुनाने उत्सुकतेपोटी भगवंताचे विश्वरूप पहायची इच्छा व्यक्त केली. भगवंतांनी अर्जुनाची ही प्रार्थना मान्य केली आणि त्याला आपले विश्वरूप दर्शन घडवले. हे दर्शन करत असताना भगवंताच्या त्या एका शरीरामध्येच सगळे विश्व सामावले आहे हे अर्जुनाला जाणवले.
दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
सर्वाश्चर्यमयं देवमनन्तं विश्वतोमुखम् ॥ ११.११ ॥दिव्यमाल्याम्बरधरं दिव्यगन्धानुलेपनम् ।
दिव्य माळा आणि वस्त्रे धारण केलेल्या, तसेच दिव्य गंधाने विभूषित, सर्व प्रकारच्या आश्चर्यांनी युक्त, अनंतस्वरुप, असे असंख्य मुख, नेत्र, उदर, हात आणि पाय असलेले भगवंताचे उग्र रूप अर्जुनाने पाहिले.
द्यावापृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः ।
दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् ॥ ११.२० ॥
असे पृथ्वीपासून आकाशापर्यंत व्यापून राहिलेले रूप दाखवताना भगवंताने पुढे काय होणार आहे ते ही सांगितले. युद्धानंतर हे सर्व योद्धे कशा प्रकारे काळाच्या मुखात जाणार आहेत ते भगवंताने आपल्या भयंकर रुपात दर्शविले आणि ते पाहून अर्जुन भयभीत झाला.
आख्याहि मे को भवानुग्ररूपो, नमोऽस्तु ते देववर प्रसीद।
विज्ञातुमिच्छामि भवन्तमाद्यं न हि प्रजानामि तव प्रवृत्तिम्॥ ११.३१ ॥
तेंव्हा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला मला सांगा की भयंकर रुप धारण करणारे आपण कोण आहात? हे देवश्रेष्ठा! आपणाला नमस्कार असो. आपण प्रसन्न व्हा. आदिपुरुष अशा आपल्याला मी विशेष रीतीने जाणू इच्छितो. कारण आपली ही करणी मला कळत नाही. त्याचे उत्तर भगवंत एका वाक्यात देतात-
कालोऽस्मि |
मी काळ आहे. ज्याच्या ओघात सगळं नष्ट होते आणि नवीन निर्मिती होते, तो काळ मी आहे.
क्षयकृत् प्रवृत्त: | आणि या समयी मी सगळ्यांचा नाश करण्यासाठी प्रवृत्त झालो आहे. जर तुला असे वाटत असेल की तू युद्ध करणार नाहीस, बाण चालवणार नाहीस, तर अर्जुना, हे लक्षात ठेव-
ऋतेऽपि त्वां न भविष्यन्ति सर्वे येऽवस्थिताः प्रत्यनीकेषु योधाः॥ ११.३२ ॥
ते सर्व तुझ्याशिवायही राहणार नाहीत. म्हणजेच तू युद्ध केले नाहीस, तरी या सर्वांचा नाश होणार.
जे व्हायचे ते होणारच आहे, असे म्हणून निष्क्रिय बसून राहणे योग्य नाही. तर जे होणारच आहे त्या कार्यामध्ये आपण आपला सर्वोत्तम हातभार काय लावू शकतो याची शिकवण देण्यासाठी भगवंताने असे म्हटले आहे.
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व, जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धम्।
मयैवैते निहताः पूर्वमेव, निमित्तमात्रं भव सव्यसाचिन्॥ ११.३३ ॥
म्हणूनच तू ऊठ. यश मिळव. शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची! तू फक्त निमित्तमात्र हो.
असे सांगून भगवंताने अर्जुनाला भविष्यात जे होणार आहे त्याची सूचनाच दिली आहे. त्याचप्रमाणे या जगात जी काही चांगली कामे होणारच आहेत, त्यासाठी आपल्यालाही निमित्त बनायला हवे. भगवंताच्या कार्यात हातभार लावणे यापेक्षा मोठा आनंद नाही.
द्रोणं च भीष्मं च जयद्रथं च कर्णं तथान्यानपि योधवीरान्।
मया हतांस्त्वं जहि मा व्यथिष्ठा युध्यस्व जेतासि रणे सपत्नान्॥ ११.३४ ॥
द्रोणाचार्य आणि पितामह भीष्म तसेच जयद्रथ आणि कर्ण त्याचप्रमाणे माझ्याकडून मारल्या गेलेल्या इतरही पुष्कळ शूर योद्ध्यांना तू मार. भिऊ नकोस. युद्धात खात्रीने तू शत्रूंना जिंकशील म्हणून युद्ध कर.
छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून सगळे स्वराज्य निर्माण केले पण "हे सगळे मी केले आहे" असे त्यांनी कधीही म्हटले नाही. ‘हे राज्य व्हावे, ही तो श्रींची इच्छा !’ हेच त्यांचे प्रसिद्ध अधिष्ठान आहे. भगवंत अर्जुनाला हेच सांगत आहेत की हे सर्व माझेच काम आहे तू फक्त निमित्त हो ! भगवान श्रीकृष्णांनी गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. त्यांचे सर्व मित्र गोपगोपी यांनीही आपले हात आणि काठ्या लावून हातभार लावला. आपल्यामुळे पर्वत उचलला गेला हा आनंद त्यांना लाभला. तो आनंद आपणही घेऊ शकतो. भगवंताचे कार्य ते स्वतःच करणार आहेत. मात्र त्यात आपला वाटा असेल तर कार्यपूर्तीचा आनंद मिळतो. भगवंत अर्जुनाला सांगतात, हा आनंद तू प्राप्त कर. तू जिंकणार आहेसच. भगवंताच्या या बोलण्यामुळे अर्जुन भावुक झाला. त्याची अवस्था कशी झाली हे सांगताना संजय म्हणतात-
11.35
सञ्जय उवाच
एतच्छ्रुत्वा वचनं(ङ्) केशवस्य,
कृताञ्जलिर्वेपमानः(ख्) किरीटी ।
नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं(म्),
सगद्गदं(म्) भीतभीतः(फ्) प्रणम्य ॥11.35॥
संजय म्हणाला, भगवान केशवांचे हे बोलणे ऐकून किरीटी अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला आणि फिरुनही अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करुन भगवान श्रीकृष्णांना सद्गदित होऊन तो म्हणाला.
केशवस्य एतद् वचनं श्रुत्वा - भगवंताचे हे बोलणे ऐकून,
वेपमानः कृताञ्जलि किरीटी नमस्कृत्वा - अर्जुन कापू लागला आणि त्याने हात जोडून नमस्कार केला. भगवंताचे उग्र रूप पाहून अर्जुन भयभीत झाला आणि थरथर कापू लागला.
भीतभीतः एव भूय: प्रणम्य कृष्णं सगद्गदं आह - अर्जुन वारंवार हात जोडून घाबरत घाबरत भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करू लागला आणि सद्गदित होऊन म्हणाला,’ असे संजय धृतराष्ट्राला सांगत आहेत.

अर्जुन उवाच
स्थाने हृषीकेश तव प्रकीर्त्या,
जगत्प्रहृष्यत्यनुरज्यते च।
रक्षांसि भीतानि दिशो द्रवन्ति,
सर्वे नमस्यन्ति च सिद्धसङ्घा:॥11.36॥
अर्जुन म्हणाला, हे अन्तर्यामी! आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने जग अतिशय आनंदित होते व तुमच्यावर अतिशय प्रेम करु लागते. तसेच भ्यालेले राक्षस दशदिशांत पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपल्याला नमस्कार करीत आहेत, हे योग्यच होय.
हृषीकेश तव प्रकीर्त्या - हृषीक म्हणजे इंद्रिये आणि ईश म्हणजे स्वामी. अर्जुन भगवंताला म्हणत आहे, "हे हृषीकेशा, आपली जी कीर्ती, स्तुती मी ऐकली आहे -
जगत् प्रहृष्यति च अनुरज्यते - आपल्या किर्तीमुळे, स्तुतीमुळे आणि प्रभावामुळे सारे जग आनंदित होत आहे आणि प्रेमही निर्माण होते."
भीतानि रक्षांसि दिश: द्रवन्ति - पण सगळ्यांच्याच मनात अनुराग उत्पन्न होतो असे नाही. जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक आहेत, राक्षस आहेत, ते दाही दिशांना घाबरून पळून जात आहेत.
सर्वे सिद्धसङ्घा: नमस्यन्ति स्थाने - आणि सारे सिद्ध, ऋषी-मुनींचे समुदाय आपल्याला नमस्कार करत आहेत, हे योग्यच आहे.
अशा प्रकारे अर्जुन भगवान श्रीकृष्णाची स्तुती करत आहेत.

कस्माच्च ते न नमेरन्महात्मन्,
गरीयसे ब्रह्मणोऽप्यादिकर्त्रे।
अनन्त देवेश जगन्निवास,
त्वमक्षरं(म्) सदसत्तत्परं(म्) यत्॥11.37॥
हे महात्मन! ब्रह्मदेवाचेही आदिकारण आणि सर्वांत श्रेष्ठ अशा आपल्याला हे नमस्कार का बरे करणार नाहीत? कारण हे अनंता! हे देवाधिदेवा! हे जगन्निवासा! जे सत्, असत् व त्यापलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंदघन ब्रह्म आहे, ते आपणच आहात.
महात्मन् गरीयसे च ब्रह्मण: अपि आदिकर्त्रे - हे महात्मा, गुरूंचे गुरू आपण तर ब्रह्मदेवाचेही आदि कारण आहात. ज्या ब्रह्मदेवांनी सगळ्या सृष्टीला निर्माण केले, त्या ब्रह्मदेवांना सुद्धा आपणच निर्माण केले आहे. आपण श्रेष्ठ आहात.
ते कस्मात् न नमेरन् - ! आपल्याला कोण बरे प्रणाम करणार नाही?
जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरियसि|
गरिमा म्हणजे श्रेष्ठत्व. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत. त्याचप्रमाणे अर्जुन भगवंताला श्रेष्ठ म्हणतो आहे.
अनन्त देवेश जगन्निवास - आपण अनंत आहात, आपला कोणताही आदी नाही आणि अंतही नाही. आपण देवेश अर्थात देवांचे ईश, देवांचे शासनकर्ता आहात. हे सगळे विश्व आपल्यातच निवास करते, आपण या विश्वाचे धर्ता आहात.
त्वम् अक्षरम् जे नष्ट होते, ज्याचे क्षरण होते, ते क्षर आणि जे नष्ट होत नाही, ज्यात न्यूनता येत नाही, ते अक्षर ! अर्जुन भगवंताला अक्षर म्हणजेच अविनाशी म्हणतो आहे.
सत् - स्थान आणि काळ बदलल्यावरही ज्यात परिवर्तन होत नाही ते सत् आहे. म्हणजेच सत्य आहे.
असत् – ज्यात प्रत्येक क्षणी परिवर्तन होत असते. जसे हा संसार जो सदैव बदलत आहे. परिवर्तन संसाराचा नियम आहे. जे परिवर्तनशील आहे ते असत् आहे. हा असत् संसार तुमचेच प्रकट रूप आहे. तुम्ही सत् आणि असत् दोन्ही आहात.
तत् परं यत्- या सत् आणि असत् यांच्यापलीकडेही जे काही आहे ते ही आपणच आहात असे म्हणून अर्जुन भगवंताची स्तुती करतो आहे.

त्वमादिदेवः(फ्) पुरुषः(फ्) पुराण:(स्),
त्वमस्य विश्वस्य परं(न्) निधानम्।
वेत्तासि वेद्यं(ञ्) च परं(ञ्) च धाम,
त्वया ततं(म्) विश्वमनन्तरूप॥11.38॥
आपण आदीदेव आणि सकाम पुरुष आहात. आपण या जगाचे परम आश्रयस्थान आहात. जग जाणणारेही आपणच व जाणण्याजोगेही आपणच. परमधामही आपणच आहात. हे अनंतरुपा! आपण हे सर्व विश्व व्यापले आहे.
त्वम् आदिदेवः च पुराण: पुरुषः - आपणच साऱ्या देवतांचे आदिदेव आहात. अर्थात आपणच सनातन पुरुष आहात. येथे स्त्री पुरुष मधला पुरुष नव्हे तर सनातन असे चैतन्यतत्त्व तुम्ही आहात असे सांगितले आहे.
त्वम् अस्य विश्वस्य परं निधानम् - या विश्वाचे परम आश्रयस्थान आपण आहात.
वेत्ता वेद्यं च परं धाम असि - वेद म्हणजे जाणणे. वेद्य अर्थात जे जाणून घेण्यायोग्य आहे ते आणि वेत्ता म्हणजे ज्याने सर्वकाही जाणून घेतले आहे. तुम्हाला तुम्हीच जाणू शकता(वेत्ता) आणि ज्याला जाणावे (वेद्य) तेही तुम्हीच आहात. साऱ्या विश्वाचे निवासस्थान आपणच आहात.
अनन्तरूप त्वया विश्वं ततम् ॥ या संपूर्ण विश्वाला आपणच व्याप्त केले आहे. या विश्वाच्या कणाकणात आपणच आहात.

त्यामुळेच संतांची अवस्था कशी होते?
जे जे भेटे भूत | ते ते मानी भगवंत ||
जे कोणी त्यांना दिसते, त्यात संतांना परमात्मा भगवंताची अनुभूती होते. बाह्य रूपाने ते विचलित होत नाहीत तर त्यांना प्रत्येक प्राणीमात्रात परमात्म्याचे रूप दिसते. या विश्वाला भगवंतानेच व्याप्त केले आहे. तुमच्याशिवाय या विश्वात दुसरे काहीच नाही हे मी जाणले आहे असे.अर्जुन म्हणतो

वायुर्यमोऽग्निर्वरुणः(श्) शशाङ्क:(फ्),
प्रजापतिस्त्वं(म्) प्रपितामहश्च।
नमो नमस्तेऽस्तु सहस्रकृत्वः(फ्),
पुनश्च भूयोऽपि नमो नमस्ते॥11.39॥
आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवाचेही जनक आहात. आपल्याला हजारो वेळा नमस्कार. नमस्कार असो! आपणांला आणखीही वारंवार नमस्कार! नमस्कार असोत!
वायु: यम: अग्नि: वरुणः शशाङ्क: प्रजापति: त्वं प्रपितामह: च - भगवंताचे उग्र रूप पाहून अर्जुन भयभीत झाला आहे आणि कापत असताना भगवंताची स्तुती करतो आहे. वायुचा स्पर्श झाल्याची जाणीव झाल्यावर अर्जुन म्हणतो, "आपणच वायू आहात. अग्नी, वरुण, यमराज, प्रजापती अर्थात ब्रह्मदेवही आपणच आहात. आपणच या विश्वाचे प्रपितामह आहात."
भगवान शंकराच्या विवाहातील एक प्रसंग आहे. भगवान शंकरांचा विवाह माता पार्वतीशी निश्चित झाला आणि देवगुरु बृहस्पती पुरोहित बनले. त्या प्रसंगी वराला आपल्या पिढ्यांची नावे सांगावी लागतात अशी रीत आहे. त्यावेळेस शंकरांना त्यांच्या वडिलांचे नाव विचारले. आता जे साऱ्या विश्वाचे पिता आहेत त्यांचे वडील कोण असणार? तरीही त्यांनी सांगितले की विष्णु माझे पिता आहेत. आजोबा कोण आहेत? पणजोबा कोण आहेत? तेंव्हा शंकरांनी सांगितले की माझे पिता, पितामह आणि प्रपितामह हे सगळे भगवान विष्णुच आहेत.

तसेच अर्जुन भगवान श्रीकृष्णाला, आपणच माझे पिता, पितामह आणि प्रपितामह आहात, असे म्हणतो आहे.
सहस्रकृत्वः नम: अस्तु , नम: च पुन: अपि ते भूय: नम: नम: त्यामुळे मी वारंवार, हजारो वेळा आपल्याला नमस्कार करतो, असे म्हणत अर्जुन भगवान श्रीकृष्णाची स्तुती करतो आहे.

नमः(फ्) पुरस्तादथ पृष्ठतस्ते,
नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व।
अनन्तवीर्यामितविक्रमस्त्वं(म्),
सर्वं(म्) समाप्नोषि ततोऽसि सर्वः॥11.40॥
हे अनंत सामर्थ्यशाली! आपल्याला पुढून व मागूनही नमस्कार! हे सर्वात्मका! आपल्याला सर्व बाजूंनीच नमस्कार असो. कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे. म्हणून आपण सर्वरुप आहात.
अर्जुन भगवंताला म्हणतो - तू ही है सर्वत्र व्याप्त हरी. मी तुम्हाला आता कसा नमस्कार करू. तुम्ही माझ्यापुढे आहात मागेही आहात. तुम्हाला समोरून बघतो आहे की मागून बघतो आहे मला काही समजत नाही. सगळ्या दिशाच समाप्त झाल्या आहेत. दिशांचे भान मला राहिले नाही म्हणून
ते नमः पुरस्तात् - मी तुम्हाला पुढून नमस्कार करतो.
अथ पृष्ठस्त: ते - आता तुम्ही मागून दिसता म्हणून मी तुम्हाला मागून नमस्कार करतो.
सर्वत: एव नम: अस्तु - तुम्ही समोर असा किंवा मागे असा मी तुम्हाला सर्व बाजूंनी नमस्कार करतो.
तुम्ही सर्व विश्वच व्याप्त केलेले आहे. आपण जेव्हा पृथ्वीचा विचार करतो तेव्हा आपल्यासाठी पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या दिशा असतात. एकदा सर्व विश्व व्याप्त केल्यावर दिशा कुठून राहणार? म्हणून अर्जुन ईश्वराला म्हणतो नमोऽस्तु ते सर्वत एव सर्व। जिथे तुम्ही जसे असाल तिथे मी तुम्हाला प्रणाम करतो.
अनंतविर्य अमितविक्रम: - तुमची शक्ती केवढी आहे? तुमच्या सामर्थ्याची कल्पना पण करवत नाही.
भगवंतांच्या सामर्थ्याची करायचीच असेल तर विज्ञानाच्या दृष्टीने विचार करता येईल. एक परमाणु बनवण्यासाठी किती ऊर्जा लागते? जितकी त्या परमाणुचा विस्फोट करण्यासाठी लागते तेवढीच ऊर्जा परमाणु बनवण्यासाठी लागते. आईन्स्टाईनने E = mc^2 असे समीकरण मांडले. E म्हणजे एनर्जी किंवा ऊर्जा. M म्हणजे मॅटर किंवा वस्तुमान आणि c म्हणजे प्रकाशाची गती. वस्तुमान आणि प्रकाशाच्या गतीचा वर्ग एवढी ऊर्जा एक परमाणु बनवण्यासाठी लागते. आपल्या शरीरामध्ये किती परमाणु आहेत याचा विचार आपण करा. एका शरीराबद्दल आपण सांगू शकत नाही तर या पृथ्वी मध्ये किती जीव आहे त्यांच्याविषयी आपण काय सांगू शकणार? ही एक पृथ्वी पूर्ण विश्वात एका धुलीकणासारखी आहे. ग्रहगोल आणि तारे मिळून केवढे मोठे वस्तुमान आहे. हे वस्तुमान निर्माण होण्यासाठी केवढी ऊर्जा लागली असेल. हे सगळे आपल्या कल्पनाशक्ती बाहेरचे आहे म्हणून त्याच्यासाठी आपण एकच शब्द वापरू शकतो अनंत !
अर्जुन भगवंतांना म्हणतो, आपले सामर्थ्य अनंतवीर्य आहे. एवढे सर्व विश्व निर्माण केल्यावरही आपली ऊर्जा कमी झाली आहे का? नाही. ती ऊर्जा जशीच्या तशी आहे. ती शक्ती तेवढीच आहे. अमितविक्रम - तुमच्या पराक्रमाची गणना होऊ शकत नाही.
त्वं सर्वं समाप्नोषि तत: सर्व: असि - या सर्व विश्वाला तुम्ही व्याप्त केलेले आहे. म्हणून जे काही आहे ते तुम्हीच आहात.
तू ही है सर्वत्र व्याप्त हरि।
तुझसे यह सारा संसार।।
इसी भावना से अन्तर्मन।
रहा सभी से तुझे निहार।।
म्हणून भगवंताला जर बघायचे असेल तर इकडे तिकडे जाण्याची गरज नाही. तो सगळीकडेच व्याप्त आहे. असे सांगितल्यावर लोकांच्या मनात प्रश्न येतो की जे दृष्ट लोक आहेत त्यांच्यातही परमात्मा आहे का? त्यांच्याकडे बघताना व्यवहार भिन्न असू शकतो पण दृष्टी समान असायला हवी. समदृष्टीने सर्वत्र परमात्म्याला बघायचे आहे. व्यवहार जसा करायचा तसा आपण करू शकतो. व्यवहार वेगळा असू शकतो पण दृष्टी मात्र सारखीच असावी.
आईची दोन मुले असतात. एक धष्टपुष्ट असतो आणि दुसरा अशक्त असतो. शरीराने धष्टपुष्ट असतो तो व्यायाम करतो. आई त्याला बदामाचे लाडू खाऊ घालते. त्याला दूध पिण्यासाठी देते आणि जो अशक्त असतो त्याला म्हणते की तू तांदूळ आणि डाळीचे पाणी पी. आई दोघांबरोबर वेगळा व्यवहार करते पण तिचे दोघांवरही सारखेच प्रेम असते. तिची दृष्टी समान असते. त्याचप्रमाणे दुष्ट लोकांबरोबरचा व्यवहार वेगळा आणि सज्जनांबरोबरचा व्यवहार वेगळा असतो पण तरीही सगळ्यांमध्ये तोच परमात्मा आहे ही गोष्ट समजून घ्यायची आहे.
तुझ मे है सारा संसार ही भावना असावी. या सर्व गोष्टी समजल्यानंतर अर्जुनाच्या मनामध्ये विचार आला, हा परमात्मा माझा मित्र आहे, भाऊ आहे. याच्याबरोबर मी लहानपणी कसा व्यवहार केला? त्याला आपले सर्व बालपण आठवले. त्यामुळे अर्जुनाच्या मनात कशी भावना निर्माण झाली हे पुढील श्लोकात सांगितले आहे.

सखेति मत्वा प्रसभं (म्) यदुक्तं(म्),
हे कृष्ण हे यादव हे सखेति।
अजानता महिमानं(न्) तवेदं(म्),
मया प्रमादात्प्रणयेन वापि॥11.41॥
आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे, आपण माझे मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी 'हे कृष्णा! हे यादवा! हे सख्या!" असे जे काही विचार न करता मुद्दाम म्हटले असेल,
अर्जुन भगवंताला म्हणतो,
तव इदं महिमानम् अजानता - तुमचा हा प्रभाव न जाणल्यामुळे
सखा इति मत्वा - मी आतापर्यंत तुम्हाला माझा सखा म्हणजे मित्र समजत होतो. भगवंता तू माझा एक मोठा भाऊ आहेस. तू एक मित्र आहे असे समजून मी तुझ्याबरोबर वेगळा व्यवहार केला.
मया प्रमदात् वा प्रणयेन अपि प्रसभम् - माझ्याकडून प्रमादाने अथवा प्रेमानेही हट्टीपणाने
हे कृष्ण हे यादव हे सखे इति यत् उक्तम् - हे कृष्ण, हे यादव, हे मित्र अशा प्रकारे जे काही म्हटले
अर्जुनाने कधी नावाने बोलवले तर कधी उपनावाने बोलवले. तो म्हणतो, "अरे मित्रा मी तुझ्याबरोबर असा व्यवहार करत होतो पण मला माहिती नव्हते की तू इतका महान आहेस."
कल्पना करा आपल्या लहानपणचा मित्र आपल्याला कितीतरी वर्षांनी भेटतो. अनेक वर्षानंतर रेल्वे स्टेशनवर तो समोरून येतांना दिसला. दोघे आनंदित होऊन एकमेकांना आलिंगन देण्यासाठी पुढे झाले इतक्यात चार पाच बॉडीगार्ड आले आणि त्यांनी तुम्हाला दूर करून त्याच्याभोवती ते उभे राहिले. तुम्हाला हे सर्व काय आहे असे वाटेल. आता तो मोठा ऑफिसर झाला आणि त्याच्याभोवती सिक्युरिटी गार्ड्स आहेत हे तुम्हाला माहीत नसल्याने तुम्हाला तसे वाटेल.
ज्याला आपण लहान समजत होतो तो आता किती मोठा झाला आहे, किती मोठ्या पदावर आहे हे जेव्हा समजते तेव्हा आपली अशी अवस्था होते मग अर्जुनाची अवस्था काय झाली आहे याचा जरा विचार करावा. त्याचा मित्र म्हणजे सामान्य व्यक्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे. साऱ्या विश्वाला व्याप्त करणारा भगवंत आहे. अजानता महिमानं तव इदम् तुमचा महिमा मी जाणत नव्हतो म्हणून मया प्रमादात प्रणयेन वापि l अर्जुनाला फार दुःख झाले. परमाम्या बरोबर मी कसा व्यवहार केला. एक मित्र समजून मी कधी कधी तुमच्याबरोबर चेष्टा मस्करी पण केली. तुला चिडवले, कधी मस्ती केली.

यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि,
विहारशय्यासनभोजनेषु।
एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं(न्),
तत्क्षामये त्वामहमप्रमेयम्॥11.42॥
आणि हे अच्युता! माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसलो असताना आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा त्या मित्रांच्या समक्ष जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधांची अचिंत्य प्रभावशाली अशा आपणांकडे मी क्षमा मागत आहे.
अर्जुन म्हणतो, हे अच्युता विहारशय्यासनभोजने्षु माझ्याकडून विनोदासाठी, फिरताना, झोपताना, भोजनाच्या वेळी मी तुमचा किती वेळा अपमान केला आहे हे मला समजत नाही. अर्जुन आणि भगवान कृष्णाचे किती प्रेम होते. धृतराष्ट्राने आपला दूत अर्जुनाकडे पाठवला होता. तो म्हणाला की तुम्ही तर समजदार आहात आणि माझा मुलगा दुर्योधन हा अज्ञानी आहे. तो असमंजस आहे . तेव्हा तुम्ही युद्ध टाळा.
दूत परत आला. धृतराष्ट्राने त्याला विचारले, "अर्जुनासोबत कोण होते?" त्यावर दूताने उत्तर दिले, "तिथे श्रीकृष्ण होता." धृतराष्ट्राने विचारले, "ते दोघे काय करत होते?" दूताने उत्तर दिले, "अर्जुनाने आपले पाय श्रीकृष्णाच्या मांडीवर ठेवले होते आणि तो तसा झोपला होता." भगवान कृष्ण त्याचे पाय दाबत होते. म्हणून अर्जुन म्हणतो की मी झोपतांना तुमचा किती वेळा अपमान केला. मी तुमच्या मांडीवर पाय ठेवले आणि तुम्ही माझे पाय सुद्धा दाबून दिलेत. या व्यवहाराने आता अर्जुनाला दुःख होते आहे. यच्चावहासार्थ मी मजेमजेत तुम्हाला काहीही म्हटले. खेळतांना, फिरतांना, जेवणाच्या वेळी, झोपतांना मी किती वेळा तुमचा अपमान केला असेल.
पण मित्राबरोबर मस्ती मस्तीत तसं केलं जातं ना.एक: अथवा तत्समक्षम् - आपण दोघे एकांतात असताना किंवा सर्वांच्या समोर माझ्याकडून तुमचा अपमान झाला असेल पण तुम्ही अप्रमेय म्हणजे ज्याला मोजता येत नाही असे आहात. तुम्ही प्रभावशाली आहात पण दोस्त म्हणून मी हे सगळे जर केले असेल तर
तत् त्वाम् अहं क्षामये - मी आपल्याकडे क्षमा मागतो आहे.
हे सर्व असे का झाले कारण मी तुम्हाला सखा समजलो. मी तुम्हाला जाणत नव्हतो. आता मला समजले तुम्ही परमात्मा आहात. म्हणून अर्जुन वारंवार त्याची क्षमा मागतो.

पितासि लोकस्य चराचरस्य,
त्वमस्य पूज्यश्च गुरुर्गरीयान्।
न त्वत्समोऽस्त्यभ्यधिकः(ख्) कुतोऽन्यो,
लोकत्रयेऽप्यप्रतिमप्रभाव॥11.43॥
आपण या चराचर जगताचे जनक आहात. तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात. हे अतुलनीयप्रभावा! त्रैलोक्यात आपल्या बरोबरीचाही दुसरा कोणी नाही. मग आपल्याहून श्रेष्ठ कसा असू शकेल?
त्वम् अस्य लोकस्य चराचरस्य पिता असि - संपूर्ण चराचर जगताचे आपण पिता आहात.
पूज्य: च गऱीयान् गुरु: -. गरीयन् हा शब्द यापूर्वी आपण ऐकला आहे. अर्जुन म्हणतो तुम्ही सर्वश्रेष्ठ गुरु आहात. श्रेष्ठांहून श्रेष्ठ म्हणजे सर्वात मोठे गुरु आहात. गुरु: गरीयान्. तुम्ही पूज्यही आहात. पूजनीय आहात सर्व जगत तुमची पूजा करतो.
त्वत्सम: अपि अन्य: न अस्ति - तुझ्यासारखा अन्य कोणी नाही.
अधिक: कुत: तुझ्या समान जर कोणी नाही तर तुझ्यापेक्षा अधिक कोण असू शकेल? तुमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ असेल अशी कल्पनाही करवत नाही.
अप्रतिम प्रभाव लोकत्रये - या तिन्ही लोकांत तुमच्या बरोबरीचा ही दुसरा कोणी नाही मग तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसा असू शकेल? हे सारे विश्व तुमच्या प्रभावात आहे. असे असताना मी तुमच्याबरोबर कसा व्यवहार केला ! भगवान मला क्षमा करा.

तस्मात्प्रणम्य प्रणिधाय कायं(म्),
प्रसादये त्वामहमीशमीड्यम्।
पितेव पुत्रस्य सखेव सख्युः(फ्),
प्रियः(फ्) प्रियायार्हसि देव सोढुम्॥11.44॥
म्हणूनच हे प्रभो! मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करुन स्तुत्य अशा आपण ईश्वराने प्रसन्न व्हावे, म्हणून प्रार्थना करीत आहे. हे देवा! वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात.
ज्ञानेश्वर महाराज याचे अतिशय सुंदर वर्णन करतात. अर्जुनाने भगवंताबरोबर जो मित्राचा भाव ठेवून व्यवहार केला आहे त्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
हे फारच वाईट घडले काय I अमृताने संमार्जन केले I
परिसाचा डोंगर मिळाला I तो फोडून आम्ही पायात घातला II
अरे आम्हाला अमृत मिळाले होते पण आम्हाला काय माहिती आम्ही त्या अमृताचा उपयोग अंगणात शिंपडण्यासाठी केला. एक परीस मिळाला तर आम्हाला काय मिळाले असे वाटते इथे तर परीस फोडून त्याचा रस्ता बनवला.
भगवंतांच्या दृष्टीने हे समोर ठाकलेले युद्ध म्हणजे किती लहान गोष्ट आहे. पण येथ दिले तुज सारथीपण आपण परब्रह्म आहात पण मी तुम्हाला घोड्याचे सारथ्य करण्यास लावले.
पण हे झाले अज्ञानात I शपथ तुला पायाशी I
मी शपथ घेऊन सांगतो की हे सगळे माझे अज्ञानातून घडलेले पाप आहे.
ऐसे अर्जुनाने म्हटले I तात्काळ दंडवत घातले I
अर्जुनाने भगवंताला दंडवत प्रणाम केला.
नमस्काराचे अनेक प्रकार आहेत. चरणस्पर्श करतात. डोके चरणावर ठेवून नमस्कार करतात. कधी साष्टांग प्रणिपात करतात आणि सर्वात उच्च स्थिती म्हणजे दंडवत प्रणाम !
तस्मात् इड्यम् त्वाम् ईशम् अहं कायं प्रणिधाय प्रणम्य - स्तुती करण्यायोग्य अशा आपण ईश्वराला मी देहाने दंडवत प्रणाम करतो. अर्जुनाने संपूर्ण शरणागती पत्करून संपूर्ण शरीराने भगवंतांना लोटांगण घातले.
प्रसादये त्वामहमीशमिड्यम इड्यम् याचा अर्थ आहे की ज्याची स्तुती करण्यालायक आहे असा. तुम्ही स्तुती करण्यालायक आहात म्हणून मी तुमची स्तुती करतो. प्रसादये तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हावे म्हणून मी तुम्हाला दंडवत घालतो. माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत. खूप पाप घडले आहे म्हणून मी हे करत आहो. बालक जेव्हा वडिलांना शरण जातो तेव्हा पिता त्याला सहन करतोच ना. त्याला क्षमा करतोच ना.
पितेव पुत्रस्य सखेव सख्यु: - ज्याप्रमाणे वडील मुलाला क्षमा करतात, मित्र आपल्या मित्राला क्षमा करतो, एक आपल्या पती आपल्या प्रियेला क्षमा करतो, तिचे छोटे छोटे अपराध पोटात घालतो, सगळे सहन करतो त्याप्रमाणे तुम्हीही माझे सगळे अपराध सहन करा.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अर्जुन ही जी विनंती करतो, अर्जुन म्हणतो ही विनंती करण्याची सुद्धा माझी योग्यता नाही.
एवढी करावयास विनवणी I योग्यता नाही माझ्या ठिकाणी I
परी लेकरू सलगी करोनी I बोलायचं की बापाशी ll
मुलगा कितीही चुका झाल्या तरी आपल्या वडिलांशी बोलेलंच ना. त्याची योग्यता नसते तरी तो असे करतो त्याचप्रमाणे माझी योग्यता नसूनही मी तुमची क्षमा मागतो.
मित्र वागला उद्धटपणे I तरी मित्र सोशी सहजपणे I एक मित्र आपल्या मित्राशी कसाही वागला तरी दुसरा ते सहज सहन करतो.
त्याने शिव्या दिल्या तरी तो त्याच्या गळ्यात गळे घालतो. तसे तुम्ही मला सहन करा क्षमा करा. एकाच प्रार्थनेत एवढे सुंदर तीन भाव या ठिकाणी आले. एक आहे लालनभाव, तुम्ही माझे पिता आहात मी तुमचा पुत्र आहे हा लालन भक्तीचा भाव आहे. दुसरी सख्यभक्ती आणि तिसरी, प्रेमिका आणि प्रियकर ही माधुर्यभक्ती या श्लोकात आलेली आहे. या तिन्हीही भावातून अर्जुन भगवंताची क्षमा मागतो. तुमचे महात्म्य न जाणल्याने अज्ञानातून माझ्याकडून या चुका झाल्या. ही क्षमायाचना करता करता अजून पुढे भगवंताला कोणती विनंती करतो हे आपण पुढच्या विवेचनातून बघू या. या सुंदर विवेचनानंतर प्रश्न उत्तरांना सुरुवात झाली.
समापन प्रार्थना आणि हनुमान चालीसाने या विवेचनाची सांगता झाली.

प्रश्नोत्तरे
नंदिनी ताई
प्रश्न- वेत्तासि वेद्यं(ञ्) च परं(ञ्) च धाम, त्वया ततं(म्) विश्वमनन्तरूप॥११.३८॥ याचे अधिक विश्लेषण करावे.
उत्तर- वेत्ता म्हणजे जाणणारा. आपण म्हणतो ना की ती व्यक्ती तत्ववेत्ता आहे. वेद्य म्हणजे जे जाणून घेण्यासारखे आहे ते. अर्जुन भगवंताला म्हणत आहेत की जे जाणण्यायोग्य आहे ते तुम्हीच आहात आणि ते जाणणारे सुद्धा तुम्हीच आहात. आपणच या विश्वाला अनंत रूपाने व्याप्त केले आहे.
प्रसाद दादा
प्रश्न- रोजच्या आयुष्यात दृष्टी आणि व्यवहार कसा असावा?
उत्तर- आयुष्यात दृष्टी समान असायला हवी. व्यवहार हा प्रत्येक प्राणीमात्राशी वेगवेगळा असू शकतो. जसे आईचे आपल्या दोन्ही मुलांवर सारखेच प्रेम असते पण ती एकाला बदामाचे लाडू देते आणि दुसऱ्याला डाळीचे पाणी पाजते. आईचे प्रेम समान आहे पण ज्याला जी गोष्ट आवश्यक आहे ती देताना दोन्ही मुलांच्या बाबतीत आईचा व्यवहार वेगवेगळा आहे. त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातही वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळा व्यवहार होऊ शकतो पण हे लक्षात ठेवले पाहिजे की प्रत्येक व्यक्ती हे त्या भगवंताचेच रूप आहे.
पूनम ताई
प्रश्न- माझे वय ७० वर्षे असून काही शारीरिक व्याधींमुळे माझे मनोबल कमी झाले आहे. ते कसे वाढवता येईल?
उत्तर- भगवद्गीतेचे अध्ययन करत रहा, त्यामुळेच तुमचे मनोबल वाढेल. भगवद्गीता मनोबल वाढवते.
निशा ताई
प्रश्न- माझा भाऊ जन्मापासून अपंग आहे. त्याला गीता कशी ऐकवता येईल किंवा सांगता येईल?
उत्तर- अशा लोकांची बुद्धी अतिशय तीव्र असते. त्यांना मोबाईलवर अथवा रेकॉर्डिंग करून गीता ऐकवू शकता. ते खूप लवकर गीता शिकतील आणि कंठस्थही करतील. त्यांच्या व्याधीमधेही लवकर सुधारणा होऊ शकते.
रीटा ताई
प्रश्न- मी मंदिरात जाते तेंव्हा मला जाणवते की बरेचसे लोक स्वतःच्या स्वार्थासाठी खूप काही करतात. देवाकडे प्रार्थना करतात, नवस बोलतात, अनेक पदार्थ अर्पण करतात. हे चुकीचे नाही का?
उत्तर- हे चुकीचे आहे की बरोबर आहे हे आपण ठरवणारे कोण? जसे कर्म असेल तसे फळ मिळेल. आपण लोकांकडे लक्ष देऊ नये. आपल्या मनात हा भाव असावा की माझाकडून होणारे प्रत्येक कार्य हे देवाचे आहे आणि ते देवालाच अर्पण करावे.

II श्रीकृष्णार्पणमस्तु II